Uncategorized
-
मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनात लातूरच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, आंदोलकांमध्ये हळहळ
▫️दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरडगाव येथील सतीश देशमुख हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता मृत्यू ३० ऑगस्ट मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू…
Read More » -
स्वतःच्या जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवले : शेख बाबू पटेल यांच्या शौर्याला सलाम !
▫️लेंडी नदीत बुडणाऱ्या शेतकऱ्याला जीवनदान– बागन टाकळी ग्रामपंचायतीकडून सत्कार; शासनानेही दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी मुखेड प्रतिनिधी:- ३० ऑगस्ट देगलूर तालुक्यातील बागन टाकळी गावाचे शेख बाबू पटेल यांनी दाखवलेले धाडस आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. देगलूर शहराजवळील लेंडी नदीवर सकाळच्या वेळी शंकर पाटील विभुत्ते (रा. खानापूर) हे शेतकरी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात होते. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असताना बाबू पटेल यांनी जीवाची पर्वा न करता नदीच्या पाण्याच्या वेगाच्या प्रवाहात धावत त्यांना सुरक्षित बाहेर काढले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. पाण्याच्या प्रवाहाशी दोन हात करूनत्यांनी एका शेतकऱ्याचे जीवन वाचवले. या घटनेनंतर बागन टाकळी ग्राम पंचायतीचे उपसरपंच मौलापटेल…
Read More » -
सततच्या अतिवृष्टीमुळे नांदेड शहर व जिल्ह्यात हाहाकार; अनेक ठिकाणी पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी लष्कराची एक तुकडी लवकरच नांदेडमध्ये दाखल होणार
▫️नांदेड शहरातील अनेक भागांतील घरामध्ये पाणी शिरले नांदेड – नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी पहाटे पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. नांदेड शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्हाभरातही एकूणच पूर परिस्थिती पाहता नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुन्हा एकदा बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे. लष्कराची ही तुकडी लवकरच नांदेडमध्ये पोहोचणार आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रात ८८ हजार १४३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला २९ ऑगस्ट रोजी येलो अलर्ट दिला आहे. पहाटेपासूनच मुसळधारपाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका प्रामुख्याने नांदेड शहराला बसल्याचे सध्यातरी चित्र आहे नांदेडशहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. वसंतनगर, बाबानगर, मगनपुरा, राजर्षी शाहूनगर, नवामोंढा भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विनायकनगर आणि दत्तनगर शारदानगर येथेहीघरामध्ये पाणी शिरले आहे. नवीन नांदेडतील सिडको, वसरणी, कौठा या भागातही अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. जुन्या नांदेडातील गंगानगर, लूंबिनी नगर, विणकर कॉलनी, शिवनगर नाल्यालगत असलेल्या घरामध्ये पाणी शिरले आहे. नांदेड शहर आणि जिल्हाभरात सुरू असलेल्या या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज शुक्रवारी सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सर्व वार्ड ऑफिसर, आपत्ती व्यवस्थापन पथक व त्यांचे कर्मचारी फिल्डवर राहतील असे आदेश दिले आहेत. आवश्यक्तेनुसार स्थलांतर करण्याचे नियोजन केले आहे. अतिवृष्टीमध्ये कामाचे योग्य नियोजन, समन्वय व अंमलबजावणी करण्यासाठी झोननिहाय उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आयुक्त डोईफोडे यांनी नियुक्ती केली आहे. त्यामध्येझोन क्र ३ साठी निलेश सुंकेवार ९८६०८७२३२० झोन क्र. ४ साठी अजितपालसिंघ संधू ९०११०००९६५, झोन ५ साठी सुमंत पाटील ९७६७१७५९९९, आणि झोन १,२ व ६ साठी विकास गाढवे ९७६४२३०६२८यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व अधिकाऱ्यांनी त्या त्या झोनमध्ये आवश्यकता सर्व उपाययोजना तात्काळ करण्याचेही आदेश दिले आहेत. नांदेड शहरातील काही भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळीह लविण्यात आले आहे.…
Read More » -
एकिकडे पूरग्रस्तांचा कहर,तर दुसरीकडे बाईचा नंगा नाच !
मुखेड प्रतिनिधी:- २७ ऑगस्ट मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्त गावांवर बॅक वॉटरच्या पुरामुळे अस्मानी संकट ओढवले असूनहासनाळ गावांत सहा माणसे मृत्युमुखी तर मुक्रामाबाद येथे एकाच व्यक्तीचे ४० जनावरे मृत्युमुखी असेपूरग्रस्त गावात कितीतरी शेकडो जनावरे दगावली आहेत. रावणगाव , हासनाळ , भिंगोली, भेंडेगाव , मारजवाडी मुक्रामाबाद, रावी, सह इतर अनेक पूरग्रस्त गावांतअनेकांची संसार अक्षरशः उद्धवस्त झाल्याने एकिकडे हजारो गोरगरिब जनता मदतीसाठी टाहो.. फोडीतअसताना दुसरीकडे मात्र मुखेडला लागून जवळच असलेल्या देगलूर शहरात दहीहंडी उत्सवाच्यानावाखाली बाया नाचवण्याचे काम केल्याने राजकीय पुढार्यांतली माणुसकी कुठे गेली ? असा सवालआता जनतेतुन विचारला जात आहे. सण उत्सव साजरा करणे ही आपली भारतीय संस्कृती असली तरी एकीकडे महाराष्ट्रात आपल्याजिल्ह्यावर पूर परिस्थितीचे महाभयंकर संकट ओढवले असताना दुसरीकडे मात्र पवित्र अशा दहीहंडीच्यानावाखाली लाखो रुपये खर्च करून बाईचा नंगा नाच लावणे हे कितपत योग्य आहे. बाया नाचवण्या इतक्या खर्चात जर पूरग्रस्तांना मदत केली असती तर माणसातल्या माणुसकीचे दर्शनघडले असते हे खरे नाही का ? अजुनही काही ठिकाणी माणुसकी जिवंत आहे. पूरग्रस्तांना मदत करणारेही, काही सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळ व दहीहंडी मंडळेदिसले त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसरीकडे बाईचा नंगानाच लावलेला पाहून मनाला कुठेतरी वेदना होऊन खेद वाटतो. तर दुसरीकडे पूरग्रस्तांच्या कहर ..कडे पाठ फिरवून बाईचा नंगा नाच लावून बघत बसणे हे राजकीयपुढार्यांना कितपत शोभते हे ज्याचे त्यांनी विचार करावा एवढेच या बातमी मागचा उदेश आहे .
Read More » -
मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईत….
▫️आरक्षणा शिवाय घरी परतणार नाही असंख्य युवकांनी केली भावना व्यक्त मुखेड प्रतिनिधी:- २६ ऑगस्ट मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर तीव्र चळवळ उभारणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हाएकदा आक्रमक झाले असून आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवार पासून (दि. २८ ऑगस्ट) मराठा समाजाचा विराट मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे . दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या भव्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुखेड तालुक्यातील हजारो मराठा युवक मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. गावागावांतून सकल मराठा समाजाने मोर्चासाठी जोरदार तयारी केली आहे. चावडी वाचन, गाव बैठका, मशाल रॅली, कीर्तन, भजन आदी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जातअसून, प्रत्येक मराठा बांधवांना आरक्षणासाठी मुंबई गाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुखेड परिसरात मोठी चळवळ उभी राहिली आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावेळी मुखेड शहरासह तालुक्यातील जवळपास सर्व गावांतून मोठ्या संख्येने तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक मुंबईकडे रवाना होणार आहेत. पूर्वीच्या आंदोलना पेक्षा या वेळी दहा पटींनी जास्त उपस्थिती दाखवली जाईल, असा विश्वास व्यक्तकरण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा समाजाचा संयमसुटू शकतो, असा इशारा सकल मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे.…
Read More » -
मुखेड तालुक्यातील सात जणांनी सर केले कळसुबाई शिखर
मुखेड प्रतिनिधी:- २५ ऑगस्ट राज्यातील सर्वोच्च शिखर असलेले कळसुबाई शिखर शनिवार 16 ऑगस्ट रोजी मुखेड तालुक्यातील सहा जणांनी अवघ्या साडेतीन…
Read More » -
मुखेड येथे कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
मुखेड प्रतिनिधी:- २३ ऑगस्ट २५ मुखेड येथील शाहू नगर येथे वास्तव्यात राहणारा देगलूर तालुक्यातील शहापूर येथील रहिवाशी शंकर माणिक मोते अंदाजे…
Read More » -
सुप्रभात मित्र मंडळाकडून पुरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप.
मुखेड प्रतिनिधी:- २१ ऑगस्ट तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील हसनाळ(पमु), भिंगोली, भेडेगांव,रावणगांव,मारजवाडी,भासवाडी व सांगवी(भा.) या गावासह परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी…
Read More » -
धक्कादायक… हॉस्टेलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
◽️नांदेड अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेल मधील घटना नांदेड प्रतिनिधी:- २० ऑगस्ट २५ शहरातील अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेल मध्ये एका दहावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. शहरातील अन्य एका हॉस्टेल मध्ये काही दिवसापूर्वीच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात असतानाच नरंगले बॉईज हॉस्टेल मध्ये आत्महत्येची ही घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण नेमका कशाचा आहे याचा आता तपास पोलिसासह समाजव्यवस्थेलाही करावा लागणार आहे. हदगाव तालुक्यातील चिकाळा येथील गंगाधर बजरंग माने (वय १५) हा दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थीशहरातील अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेलमध्ये गेल्या काही दिवसापासून राहत होता. २०ऑगस्ट रोजी त्याने सायंकाळच्या सुमारास होस्टेलमध्ये आपल्या रूममध्ये केबलने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्टच आहे. त्याचे रूम पार्टनर हे बाहेर होते. बाहेरून आल्यानंतर गंगाधर माने याने गळफास घेतल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनीतातडीने हॉटेल व्यवस्थापकाला सदर घटना सांगितली. हॉस्टेल व्यवस्थापकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. विमानतळ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक साखरे, साने आणि एएसआय सदाशिव आढाव यांनी…
Read More » -
नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
◽️हसनाळ येथे अद्याप ५ नागरिकांच्या मृत्यू झाल्याची घटना ◽️मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत ◽️जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करू नांदेड दि. १९ ऑगस्ट :- मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीझाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे नुकसान होऊन ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरीलशेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (विदर्भ, ताणी वकोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळीमृत्तांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तेवितरीत करण्यात आली. आज नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे दौऱ्यावर आले. त्यांनी मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन येथील नागरिकांची भेटघेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच मारजवाडी या पुर्नवसीत गावालाही त्यांनी भेट देऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, परिसरातील शेतकरी, नागरिक आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी या भागात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली.…
Read More »