Uncategorized
-
मुखेड तालुक्यात हाहाकार! लेंडी धरण ओव्हरफ्लो, सहा गावांना पुराने वेढले; तिघांचा मृत्यू
◽️हसनाळ येथील नागरिकात संताप ;वेळेवर मदत मिळाली नसल्याचे आरोप मुखेड प्रतिनिधी:- १८ ऑगस्ट २५ मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने लेंडी धरणातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने सहागावांना वेढा घातला. अनेक नागरिक अडकले आहेत, बचावकार्य सुरू आहे, पण तीन महिला दगावल्या आहेत. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सहा गावात मागील पंधरा पेक्षा जास्त तासापासून पूर परिस्थिती कायम आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस आणि लेंडी धरणाला आलेला पुर आल्याने तालुक्यातील भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. तीनशेहून अधिकनागरिक अडकले होते, त्यापैकी अनेकांना बाहेर काढून सुखरूप स्थळी हालवण्यात आले आहे. हसनाळ गावातील बेपत्ता असलेल्या पाचपैकी भीमाबाई मादाळे, गंगाबाई मादाळे आणि ललिताबाई भोसले या महिलांचा १५ तासाच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला आहे. तर पिराजी म्हैसाजी थोटवे, चंद्रकला विठ्ठल शिंदे हे अजून ही बेपत्ता…
Read More » -
हिमायतनगर शहरात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्त
◽️पोलिस प्रशासन या डीजेवाल्यावर कार्यवाही करणार कधी? हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी सर्वोच्च न्यायालयाने दिवसा व रात्रीच्या वेळी डीजे आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. असे असतानाही हिमायतनगर शहरात शासकीय नियम पायदळी तुडवून डीजे कर्णकर्कश आवाज वाढवून वाजवले जातात. या ध्वनिप्रदूषणाचा ज्येष्ठ नागरिकांसह हृदय रुग्ण,लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. मात्र, याकडे हिमायतनगर पोलीस प्रशासनाने ‘हाताची घडी तोंडावर बोट‘ ठेवून बघ्याची भूमिका स्वीकारल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पोलिसांच्या या भूमिकेमुळे डीजेवाल्यांचे चांगलेच फावले आहे शहरात लग्न असो,की, कुणाचा बर्थडे असो, अथवा इतर कहीही कार्यक्रम असो, शहरात कोणीही आपल्या मन मर्जी प्रमाणे…
Read More » -
नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पूरस्थिती शेतीचे मोठे नुकसान
नांदेड प्रतिनिधी:- १७ ऑगस्ट २५ नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नद्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झालीआहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा हाहाकार सुरू असून हजारो हेक्टर शेती पुराखाली गेलीआहे. सर्वाधिक फटका किनवट, हिमायतनगर आणि माहूर तालुक्याला बसला आहे. नदी–नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून फुलवळ मंडळात तब्बल १३३.२५ मि.मी. पाऊस पडला आहे. किनवट व माहूर परिसरातील पैनगंगा नदीला पूर आला असून शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उमरी तालुक्यातील मोखंडी नाल्यासह अनेक गावांत पाणी घुसले असून घरे, मंदिरे आणि ग्रामपंचायतीच्या इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्प ९५ टक्के भरल्याने प्रशासनाने दरवाजे उघडून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूकेला आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचीपथके तैनात आहेत. प्रशासन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे.
Read More » -
गाढ झोपेत अंगावर घरातील भिंत कोसळली; वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू
कंधार प्रतिनिधी :- १६ ऑगस्ट २५ कंधार तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वृद्ध पती पत्नीच्या अंगावर भिंत कोसळून दोघांचाही जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला आहे . दि १५…
Read More » -
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकांच्या हत्येचा गुन्हा उघडकीस, आरोपी अटक
मुखेड प्रतिनिधी:- १५ ऑगस्ट २५ मुखेड शहराजवळील तांदळी येथील एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना दि १२ ऑगस्ट मंगळवार रोजी घडली होती. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होते. याघटनेतील आरोपीस उघडकीस आणून अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दि १४ गुरुवार रोजी पोलीसांनी या घटनेतील आरोपीचा शोध घेऊन त्यांस अटक करून मुखेड पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्धखुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तांदळी येथील रहिवासी युवक बाबाराव बालाजी मेथे वय २७ वर्षे हा भाजीपाला व बाजार आणण्यासाठी मुखेड शहरात दि. ११ रोज सोमवारी आला. परंतुतो घरी परत न आल्याने त्याची शोधा शोध परिवारातील सदस्यांनी सुरू केली असता दि.१२ रोज मंगळवारी त्याचा नगरपरिषदेच्या फिल्टर पाणी टाकी समोर उमरदरी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात अवस्थेत मृतदेह सापडला होता. या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते पोलिसांनी तपास सुरू केला असता तांदळी येथील युवक बाबाराव मेथे व बालाजी वर्धमान भालेराव राहणार कुंद्राळा कँप तालुका मुखेड येथील युवक हे दोघे शहरातील एका दारूच्या दुकानात बसून दारू पिली व दारूची बॉटल सोबत घेऊन शहरातील नगरपरिषदेच्या पाणी टाकी समोर उमरदरी शिवारात आडोशाला बसून पुन्हा दारू पित असताना त्या दोघात किरकोळ वादातून बाचाबाची झाली. बाचाबाची चेरूपांतर हाणामारीत झाले या हाणामारीत बालाजी भालेराव याने बाबाराव मेथे याच्या डोक्याला दगड मारला असता बाबाराव मेथे जमिनीवर खाली पडला व तो जमिनीवर पडल्याचे पाहून दुसरा मोठा दगडत्याच्या डोक्यात घातला यामध्ये बाबाराव मेथे हा जागीच…
Read More » -
मुखेड – नर्सी रोडवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढा शहर काँग्रेसची मागणी
मुखेड -(ता. प्रतिनिधी) १५ ऑगस्ट २५ शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेले पोटगाळे व्यापाऱ्यावर कार्यवाही करून अतिक्रमण काढण्यासाठी उप – अभियंता…
Read More » -
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वाजेगाव येथे चित्रकला स्पर्धा प्लास्टिक मुक्त स्पर्धेचे आयोजन.
नांदेड प्रतिनिधी:- १४ ऑगस्ट २५ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा”या अभियानांतर्गत कु. रुकैया…
Read More » -
घाबरून जाऊ नका ‘फेसबुक तुमचे फोटो वापरणार’ संदेश खोटा अन् अफवा पसरवणारा
मुखेड प्रतिनिधी:- १४ ऑगस्ट २५ काल पासून अनेकांनी फेसबुकवर एकसारखी पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की, फेसबुकवर नवीन नियमावली उद्यापासून लागू होत आहे. यात तुमचे फोटो वापरण्याची परवानगी दिली जाईल. ही परवानगी नाकारण्यासाठी फेसबुकवर हा संदेशपोस्ट करा. याबाबत सायबर तज्ज्ञांशी जाणून घेतले असता या संदेशात तथ्य नसून, तो अफवा पसरवणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेसबुकवर पोस्ट होत असलेला हा मेसेज प्रत्यक्षात फेसबुकवर फिरणारा एक जुना आणि अफवा पसरवणारा आहे. यात दिलेली माहिती कायदेशीरदृष्ट्या किंवा तांत्रिकदृष्ट्या खरी नाही. केवळ फेसबूक वापरकर्त्यांना घाबरवून सोडण्यासाठी असा संदेश तयार करण्यात आला आहे. अनेक वापरकर्ते कोणतीही माहिती न घेता सरळसोटपणे तो व्हायरल करत आहेत. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे साधन नसून, माहिती, व्यवसाय, मनोरंजनआणि मार्केटिंगसाठी एक प्रभावी व्यासपीठ झाले आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इन्क. (Meta Platforms Inc.) ही कंपनी फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप यांसारखी लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्सचालवते. या ॲप्सचा वापर करताना प्रत्येक वापरकर्त्याने त्यांच्या पॉलिसी म्हणजेच अटी व शर्ती(Terms & Conditions) आणि गोपनीयता धोरण (Privacy Policy) समजून घेणे अत्यंत आवश्यक…
Read More » -
रोजगार हमी योजनेच्या कामाचे बिल काढताना लाच मागितल्याचा लेखा अधिकारी संजय नरमिटवार यांच्यावर आरोप
▫️प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडीची लेखी तक्रार मुखेड प्रतिनिधी:- १३ ऑगस्ट २५ मुखेड : पंचायत समितीतील सहाय्यक लेखा अधिकारी संजय नरमिटवार यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांकरिता बिल काढताना थेट लाच मागितल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडीने थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष संजय सुदामराव कांबळे यांनी निवेदनात स्पष्ट केलं आहे की, “काम झालं असूनही मस्टर पुढे पाठवायचा नाही. बिले दडपून ठेवायची. आणि दुसरीकडे बोगस काम करणाऱ्यांना पैसे दिल्यास बिले तात्काळ मंजूर!” हा प्रकार म्हणजे थेट गरीब मजुरांची लूट असून, पंचायत समितीचा कारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेला आहे, असा आरोप त्यांनी केला. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, नरमिटवार यांच्याकडून सातत्याने आर्थिक मागणी केली जाते. सामान्य मजुरांना काम करूनही पैसे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रचंड पिळवणूक होत आहे. सदर प्रकाराची तातडीने चौकशी करून नरमिटवार यांची बदली करावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीजोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. अन्यथा दिव्यांग आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. पंचायत समितीमध्ये सुरू असलेल्या या कथित भ्रष्ट कारभारामुळे स्थानिक प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असून, आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा सज्जड इशाराही यात देण्यात आला आहे.
Read More » -
स्वच्छतेची शपथ घेऊन मुखेड शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम
▫️तहसीलदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व नगर परिषद,सफाई कर्मचारी , नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ मुखेड प्रतिनिधी:- १३ ऑगस्ट २५ स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने मुखेड तहसील कार्यालय व नगर परिषद मुखेड यांच्या संयुक्तविद्यमाने दि.१२ ऑगस्ट २५ रोजी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी, नगर परिषद पदाधिकारी, सफाई कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले. शपथ विधीनंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाजारपेठ परिसर, तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक, कचरा, गवत व इतर घाण काढून परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यात आला या उपक्रमाद्वारे…
Read More »