Uncategorized

  • जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या – डिजिटल मिडिया संपादक पत्रकारसंघटनांची मागणी

    नांदेड प्रतिनिधी:- २३ जून २५ नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आणि दुर्दैवी बाब आहे. ही बैठक केवळ शासकीय आणि राजकीय वर्तुळापुरती मर्यादित न राहता सामान्य जनतेसाठी खुलीअसावी यासाठी पत्रकारांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. माध्यमांचा सहभाग म्हणजे केवळ वृत्तसंकलन नव्हे तर निर्णयप्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विकास आराखड्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. अशा निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे प्रशासनावरील विश्वासाला तडा गेला आहेआणि प्रशासन काही लपवू इच्छित आहे का असा प्रश्न निर्माण होतो असे निवेदनात म्हटले आहे. ही घटना फक्त पत्रकारांचा अपमान नसून जनतेचाही अपमान आहे असेही संघटनेचे म्हणणे आहे. यापुढील सर्व जिल्हा नियोजन समितीच्या बैठका खुल्या ठेवाव्यात, अधिकृत पत्रकार प्रतिनिधींना प्रवेशद्यावा आणि पारदर्शकतेसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासन जर विकास प्रक्रियेत प्रामाणिक असेल तर माध्यमांची उपस्थिती टाळण्याचे कारण नाही असेसांगत, माध्यमे टीका करत असली तरी प्रशासनाचे सकारात्मक काम देखील लोकांपर्यंत पोहोचवतात, हेलक्षात घेऊन प्रशासनाने याप्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशा मागणीचे निवेदन डिजिटल मिडीयासंपादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण खंदारे, जावेद शेख, महेंद्र देमगुंडे, प्रविण देशमुख, कवरचंद मंडेल, शिवाजी हंबर्डे, गंगाधर गच्चे, मोहमर रफिक, शेख मौला, नितीन नरवाडे, सदाशिव गच्चे, भेय्यासाहेब गेडबोले आदीनी दिले आहे.

    Read More »
  • जिल्हा परिषद वांगी शाळेचा विद्यार्थी बनला हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर..

    नांदेड प्रतिनिधी:- १९ जून २५ नांदेड पासून अवघ्या बारा किलोमीटर वरती गोदावरीच्या काठावर वसलेले अवघ्या 1500 लोकवस्ती वांगी गावातील शेतकरी…

    Read More »
  • एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले.

    विमानात २४२ प्रवासी होते. त्यापैकी ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. भावी डॉक्टरांच्या भरल्या ताटावर आला मृत्यू  एअर इंडियाकडून आपत्कालीन नंबर जारी गुरूवारची दुपार संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखद ठरली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुपारी 1.30 च्यासुमारास लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथून एअरइंडियाच्या विमानाने टेकऑफ केलं खर पण अवघ्या १० मिनिटांतच हे विमान शहरातील नागरीवस्तीतील एक इमारतीला धडकून खाली कोसळलं आणि आगीचे लोळ उठले, प्रचंड मोठा स्फोट झाला आणि एकच कल्लोळ माजला यावेळी विमानात सुमारे २४२ प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आता या अपघातानंतर एअर इंडियाकडून एक आपत्कालीन संपर्क क्रमांक अर्थात हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. एअर इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइनक्रमांक १८०० ५६९१ ४४४  हा सुरू करण्यात आला आहे. या अपघातातत होरपळलेल्या लोकांना, जखमी प्रवाशांना जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे असे एअर इंडियाने सोशल मीडियासाइट एक्स वरील पोस्टमधये नमूद केलं आहे. अहमदाबादहून गुरूवारी दुपारी १ लाजून ३८ मिनिटांन निघालेल्या बोइंग ७८७-८ या फ्लाईटमध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिकआणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत असल्याचे एअरलाइननेम्हटले आहे. एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (https://x.com/airindia) आणिhttp://airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती प्रसिद्ध करणार आहे.

    Read More »
  • सेवानिवृत्त मु. अ. विठ्ठलराव वाघजी भायेगावे अंबुलगेकर गुरुजी यांचे निधन!

    मुखेड प्रतिनिधी : ११ जून २५ अंबुलगा बुद्रुक येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव वाघजी भायेगावे…

    Read More »
  • जन्म-मृत्यू नोंदीच्या प्रमाणपत्रासाठी तहसीलदारांना आदेश द्यावा:- बालाजी आईलवाड

    मुखेड : प्रतिनिधी जन्म मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका दंडाधिकारी तहसीलदार यांना आदेश पारीत करावे अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे शिवसेनेचे मुखेड उपतालुका प्रमुख अॅड बालाजी आईलवाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून ई–मेलद्वारे केली आहे. जन्म व मृत्युचे प्रमाणपत्र यापूर्वी तहसिल कार्यालयातून तालुका दंडाधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जात होते. पण मध्यतंरीच्या काळात शासनाच्या वतीने जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्थगिती देण्यात आली होती. या निर्णयामुळे नागरिकांची मोठी गोची झाली कारण आधार काढण्यासाठी, आधारमधील नाव दुरूस्ती, जन्मतारीख दुरूस्ती व इतर महत्वाच्या कामासाठी जन्मप्रमाणपत्र हे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे जन्म–मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिक संबंधित कार्यालयाभोवती चकरा मारत आहेत. याबबातीत शासनाने पुन्हा जीआर काढले आहे पण त्या जीआर(आदेशाची) अद्याप अमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही. जुन महिण्याच्या सुरुवातीला शैक्षणिक संस्थाना (शाळेत) प्रवेश घेण्यासाठी जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे. त्या करीता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन आपण संबंधीत कार्यकारी तालुका दंडाधिकारी यांना तात्काळजन्म– मृत्यू नोंद प्रमाणपत्र देण्यासाठी आदेशीत करावे. कारण शासनाने यासंदर्भात जीआर काढले तोजिआर अद्याप अंमलात आले नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तहसीलदार यांना आदेशितकरण्याची मागणी शिवसेनेच तालुका उपप्रमुख बालाजी आईलवाड यांनी केली आहे. जर असेच यापुढेचालत राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कधी न भरुन येणारे होईल याची जाणीव ठेवून निर्णय घ्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर विद्यार्थ्यांना घेवून मोर्चा काढण्यात येईल असा इशा– राही आईलवाड यांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

    Read More »
  • धर्मांची भिंत नाही, माणुसकीचा पूल: पुण्यात पावसात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर अविष्कार

     “धर्म माणसांना वेगळं करत नाही, मनं जोडली गेली पाहिजेत.” पुणे : पावसाच्या तडाख्यामुळे एक लग्न धोक्यात आलं होतं, पण माणुसकीच्या ओलाव्याने तो सोहळा अविस्मरणीय झाला. पुण्यातील वानवडी परिसरात मंगळवारी संध्याकाळी हिंदू विवाह सोहळ्याला अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळ उडाला. खुल्या लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेला विवाह अक्षरश: अडचणीत आला होता. मात्र, याच क्षणी धर्मापेक्षा मोठ्या असलेल्या एका भावनेने – सहजीवनाच्या – एका सुंदर उदाहरणाची साक्ष पुणेकरांनी घेतली. पावसामुळे विवाहस्थळी पाणी साचले, पाहुणे पळापळ करू लागले आणि मुहूर्त जवळ येत होता. अशावेळेस शेजारच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम रिसेप्शनने माणुसकीचा हात पुढे केला. कोणतेहीधार्मिक वा सामाजिक भेद न करता त्यांनी हिंदू विवाहासाठी आपला मंच खुले दिले. कवडे आणि गलांडे पाटील कुटुंबीय जेव्हा त्या मुस्लिम कुटुंबियांच्या नातेवाईकांकडे मदतीसाठी गेले, तेव्हा त्यांना कुठलाही विचार न करता ‘हो‘ उत्तर मिळालं. दीड तासासाठी पूर्ण रिसेप्शन हॉल हिंदूविवाहासाठी खुला करण्यात आला. तिथे चि. सौ. कां. संस्कृती आणि चि. नरेंद्र यांचा विवाह विधिपूर्वकपार पडला. मंगलाष्टकाच्या गजरात, साक्षीदार निसर्ग आणि उपस्थित सर्व धर्मीय पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहएक नवा संदेश देऊन गेला – “धर्म माणसांना वेगळं करत नाही, मनं जोडली गेली पाहिजेत.” या प्रसंगाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही विवाहसमारंभांचे नवविवाहित जोडपे आणि नातेवाईकांनीएकत्र फोटो काढले, गोडधोड भोजनात सहभागी झाले, आणि एका क्षणापुरतं का होईना – पण “भारतहा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे” याचं जिवंत उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. पाऊस हा अडथळा न ठरता, तो एका नव्या सुरुवातीचा पूल ठरला. आणि माणुसकीच्या या प्रसंगाने पुन्हाएकदा दाखवून दिलं – “धर्म वेगळे असले तरी, आपुलकी आणि मदतीची भावना सगळ्यांना एकत्र आणू शकते.”

    Read More »
  • नांदेड बसस्थानक उद्यापासून मुळ जागी सुरु होणार !

    नांदेड प्रतिनिधी:-एसटी महामंडळाच्या नांदेड मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंतच्या रस्त्यांची अंत्यतदुर्दशा झाली होती. याच रस्त्याच्या मजबुतीकरणासह फुटपाथ, पथदिवे आदी कामांसाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे १३ एप्रिल रोजी नवीन कौठा भागातील मोदी मैदान येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेहोते. मात्र या तात्पुरत्या बस स्थानकात प्रवाशांना कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. यासह सुरक्षा वाऱ्यावर आली होती. मोवाईल, पाकीट चोरी, वाटमारी सारखे प्रकार दररोज होत आहेत. त्यात नादेड शहरात येण्यासाठी आणि शहरातून बस स्थानकाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मोठी आर्थिक लूट सुरू होती. या सर्व नरकयातनांमुळे प्रवांशी त्रस्त झाले होते. त्यामुळे आता हेबस स्थानक मूळ ठिकाणी कधी स्थलांतर होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. बस स्थानकाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम दोन, तीन दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचेकामही यादरम्यान करण्यात आले. मात्र सिमेंट रस्त्याच्या मजबुती करणासाठी आवश्यक असणारी क्युरिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे या तीन दिवसांच्या कालावधीत क्युरिंग करण्यात आली. तर अन्य कामांनाही गती देण्यात आली. या भुनषंगाने रस्त्यासह सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत एसटी महामंड व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची दि. १४ रोजी सकाळी बैठक झाली. याबैठकीत झालेल्या कामाची माहिती देण्यात आली. यानंतर कौठा येथील स्थलांतरित बसस्थानकात प्रवाशांना होणारा त्रास आणि असुविधा लक्षात घेता उद्या दि. १५ मे पासून एसटीचे मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा नांदेड शहरातील मुळ जागेवरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर एसटीच्या विभागीय नियंत्रकांनी जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना मध्यवर्ती बसस्थानक शहरातील मुळ जागेवरून सुरू होईल. येथून प्रवाशांची वाहतूक करावी तसेच दि. १४ मे रोजी नांदेड येथेमुक्कामी येणाऱ्या सर्व फेऱ्या शहरातील बसस्थानकात मुक्कामी पाठवाव्यात अशा सुचना दिल्या आहेत. सोबतच प्रवास भाड्यात झालेली वाढ वा घट पुर्ववत करण्यात यावी, अशी सुचनाही विभाग नियंत्रकांनीकेली आहे.

    Read More »
  • निर्भिड पत्रकार संदीप कामशेट्टे यांचा वाढदिवस साजरा ; मुखेड तालुका मराठी पत्रकारसंघाच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा

    मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे  माजी अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे संघटक संदीप कामशेट्टे यांच्या जन्मदिना निमित्त संघटनेच्या वतीनेशाल,पुष्पगुच व पेढे देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. कामशेट्टे पुण्यनगरीचे पत्रकार असून गेली अनेक वर्षे प्रभावी,निर्भिड पत्रकारिता करत आहेत. आज रविवार दिनांक ११  मे रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे जन्मदिन साजरा करण्यात आला. जेष्ट पत्रकार यशवंत…

    Read More »
  • शहीद जवान सचिन वनंजे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप.

    देगलूर प्रतिनिधी:- काश्मीरमध्ये सैन्याचं वाहन दरीत कोसळून वीरमरण आलेले जवान सचिन वनंजे यांच्यावर आज देगलूरमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. जवान सचिन वनंजे यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी अंत्ययात्रेवर शहरातून सर्वत्र फुलांची उधळण करण्यात आली. सचिन वनंजेयांना सलामी देत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी आणिअधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.  आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन पत्नीनं आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला. ६ मे रोजीजम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं ८००० फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचं वाहन कोसळल्यानं कर्तव्यावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले २९ वर्षीय सचिन वनंजे यांना वीरमरण आलं होतं. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर काल रात्री सचिन यांचं पार्थिव देगलूर इथं आणण्यात आलं. यावेळी सचिनयांच्या पत्नी, भाऊ आणि आई वडिलांना अश्रू अनावर झाले. शहीद जवान सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातून हजारो नागरिक देगलूर इथं उपस्थित होते. जवान सचिन वनंजे यांना अखेरचा निरोप देताना सर्वांच्या अश्रूचा बांधफुटला. नांदेड मधील नागरिकांनी शोकाकुल वातावरणात सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहत अखेरचा निरोप दिला.

    Read More »
  • भारत सरकार नोटरी अधिकारी पदी ॲड. सुनील चौरे यांची निवड

    मुखेड/प्रतिनिधी:- दि २३ एप्रिल २५ मुखेड येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड.सुनील दत्तात्रयराव चौरे यांची  केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकारचे नोटरी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.     मुखेड येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड.सुनील चौरे हे गेल्या अनेक वर्षा पासुन मुखेड न्यायालयात वकीली व्यवसाय करीत असून…

    Read More »
Back to top button