Uncategorized

  • नजीर शेख युजीसी नेट उत्तीर्ण

    नांदेड/प्रतिनिधी:-  सामाजिक कार्यकर्ते व लेखक शेख नजीर यांनी युजीसी नेट परीक्षा पास केली. यापुर्वीच महाराष्ट्र सेट पासकेले. त्यांनी सेट व नेट इतिहासात पास केले. श्री शेख हे देळूब बु. गावचे असून आई–वडील नसल्याने कष्टकरीत शिक्षण घेतले. अथक परिश्रमामातून यश संपादन केले. आई नंतर मोठी बहिणीने त्यांचे पालन पोषण केले. मावशीच्या घरी राहून ते शिकत होते. शेख यांचेप्राथमिक शिक्षण देळूब गावी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण राजाबाई हायस्कूल पार्डी येथे झाले. बी.ए. अर्धापूर तर एम. ए. नांदेड शहरात झाले. सातवी ते बारावी शिक्षणासाठी चार किलोमीटर पायी तरबी.ए. साठी दहा किलोमीटर सायकलीवर जाऊन शिक्षण घेतले. वडिलांचे छत्र बालपणी हरवले व काहीवर्षांतच आई गेली. पुढे ते नांदेडला मावशी व बहिणीच्या घरी राहून अभ्यास करू लागले. लहानपणी आईसोबत ते शेतात मजुरीला जात पुढे शेळी पालन करत शिक्षणही घेतले. सेट नेट दोन्ही पास झाल्यानेमहाराष्ट्रातील थोरामोठ्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या यशात बहिण, मावशी, गुरूजनात प्रा. साईनाथ, जगदीश कदम, अल्ताफ हुसेन, मित्र लक्ष्मण कदम, फारूख अहमद आदींचे मार्गदर्शन व योगदान आहे.

    Read More »
  • तिसरी आघाडी 150 जागा लढणार, शिंदे- फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार; शरद पवारांवरहीहल्लाबोल

    स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार : राजू शेट्टी पुणे:-  पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चूकडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखीलघेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्यानेत्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणारअसल्याची माहिती देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचं बोलणं सुरु दरम्यान, मनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचंबोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्यानेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाआहे. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही चांगले उमेदवार देणार असल्याचे कडू म्हणाले. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलंपरिवर्तन आणणार आहात? असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसंकाय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. परिवर्तनाचा अधिकारी युतीलाहीनाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडूम्हणाले. स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आमनच्याकडेछोट्या मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. प्रस्थिपीत लोकांच्या विरोधात लढा देणारेउमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशीमाझं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमचीभूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळंराज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    Read More »
  • इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार, मतदारसंघही ठरले!

    नांदेड : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधूनलोकसभा  पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणारआहेत. बोलताना इम्तियाज जलील यांनी आगामी रणनीती बाबत भाष्य केलं आहे. दरम्यान, इम्तियाज जलीलयांच्यामुळे कोणाला फटका बसणार? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. इम्तियाज जलील म्हणाले, नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये रोष पाहायलामिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनीकशी मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांचीनिवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसादआम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीमआम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांनाकाडीचंही महत्त्व देत नाहीत. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु? आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोत. आम्ही कसं निवडून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत.

    Read More »
  • भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

    मुंबई:- निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यातएकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणीहोऊन निकाल जाहीर करण्यात येईल. महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे. यातच आज भाजपची पहिली यादी जाहीर करण्यातआली आहे. पुण्यातून कोथरूड विधानसभेतून पुन्हा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीआहे. भाजपची विधानसभा उमदेवारांची पहिली यादीखालीलप्रमाणे नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस कोथरूड – चंद्रकांत पाटील शहादा – राजेश उदेसिंग पाडवी नंदुरबार – डॉ. विजयकुमार गावित धुळे शहर – ओमप्रकाश अग्रवाल धुळे ग्रामीण – डॉ. सुभाष भामरे सिंदखेडा– जयकुमार रावल रावेर – हरिभाऊ जावळे भुसावळ (SC) – संजय सावकारे जळगाव शहर – सुरेश (राजुमामा) भोळे

    Read More »
  • आजपासून १००रू, २००रू चा स्टॅम्प इतिहासजमा, कोणत्याही व्यवहारासाठी पाचशेचाच स्टॅम्प; सर्वसामान्यांच्या खिशाला खड्डा पडणार

    तत्पूर्वी, लाडकी बहीण योजना राबवली गेली आहे. या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्येपाठवण्यात आले आहेत. मात्र याचा मोठा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे आता हापडलेला खड्डा भरून काढण्यासाठी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला त्याहून अधिक मोठा खड्डा पडणार आहे. आजपासून (16 ऑक्टोबर) शंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशेरुपयांचाच मुद्रांकवर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंदकेल्याने सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणारआहे. सर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिककामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवरती केलीजात होती. मात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रसाठीदोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठी आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळेलाडक्या बहिणीला दिले किती खिशातून जाणार किती असाच प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीचा सुद्धा भडका दुसरीकडे, जीवनावस्यक वस्तू, औषधांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातीलफोडणीला महागाईच्या झळा बसू लागल्याने लाडकी बहीण चांगलीच संकटात सापडली आहे. डाळ, तांदूळ, शेंगदाणे, कडधान्यासह मसाल्याच्या दर वाढले आहेत. त्यामुळे स्वयंपाक घराचे बजेट फोलमडले आहे. शासनाने एकीकडे ‘लाडकी बहीण‘ योजना सुरू करून महिलांना महिना पंधराशे देत दिलासा दिला. मात्रदुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला गेले आहेत. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घरचालवण्यासाठी असलेले बजेट बाढल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसेदेखील अपुरे पडू लागले आहेत. व्याधीग्रस्तांनाही महागाईवा फटका बसू सागला गणेशोत्सवामध्ये 100 ते 110 रुपये किलोने मिळणारी तेलाची पिशवी 130 ते 140 रुपयांवर गेली आहे. 1700 रुपयांचा तेलाचा डबा 2 हजारांवर पोहचला आहे. सध्या औषधांच्या किंमतीमध्ये 15 टक्क्यांपर्यंतवाढ झाली आहे. व्याधीग्रस्तांनाही महागाईवा फटका बसू सागला आहे. गेल्या दीड महिन्यांतच खोबऱ्याचे दरदुपटीने वादले आहेत. गेल्या महिन्यात 160 ते 165 रुपयांवर असलेले खोबरे 250 रुपयांवर पोहोचले आहे. दिवाळीपर्यंत खोबऱ्याचे प्रति किलो दर तीनशे रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनीवर्तविली आहे.

    Read More »
  • विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन

    नांदेड प्रतिनिधी:- महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्‍यात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे. नांदेड…

    Read More »
  • मिसाईल मॅन ऑफ इंडिया’, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

    मुखेड प्रतिनिधी:-माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिन दि १५ ऑक्टोंबर रोजी ०६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुखेड…

    Read More »
  • महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

    मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीयनिवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.15) जाहीर केलाआहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसहे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्याराजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानेआजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाने झारखंडमध्येहोणाऱ्या विधानसभांच्या तारखांचीही घोषणा केली आहे. या ठिकाणी दोन टप्प्यात निवडणुका पार पडणारपहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर, दुसरा टप्पा 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.  महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9.63 कोटी आहे. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष आिण 4.66 कोटीमिहला मतदार आहेत. पिहल्यांदा मतदान करणाऱ्यांांची संख्या 20.93 लाख आहे. यातील 234 जागाया सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूिचत जाती प्रवर्गासाठीराखीव आहेत. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून िदलीजाईल. व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, ते पाहू शकतील असेही राजीव कुमारयांनी सांिगतले. यािशवाय मतदान प्रिक्रयेचे िचत्रीकरण होणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्याउमेदवारांना वृत्तपत्रात मािहती द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात एक लाख 186 पोिलंग बुथ असतील विधानसभेला िनवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्याअर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणारआहेत, अशी मािहती िनवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत िनवडणुकीचा कार्यक्रमपूर्ण होणार आहे.

    Read More »
  • मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब

    मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना राज्यसरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रिक्त असलेल्या १२ जागांपैकी सात जागांसाठी महायुती सरकारने नावे निश्चित केली असून यामध्येभाजपकडून तीन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याराष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोन जागांसाठीच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघयांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवारयांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळआणि सांगली–मिरज–कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांनाविधानपरिषदेवर संधी देण्याचे ठरवल्याची माहिती आहे

    Read More »
  • ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

    वसीमा शेख सध्या नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वसीमा शेख या मूर्ती ‘लहान पण किर्ती महान’ असं…

    Read More »
Back to top button