Uncategorized

  • भष्ट्राचाराच्या मुदयावरूण सहकारी पतपेढीची आमसभा प्रचंड गदारोळात गुंडाळली

    ▫️सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन नांदेड प्रतिनिधी:- दि २८ सप्टेंबर सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक…

    Read More »
  • विभागीय शालेय तायक्वांदो  स्पर्धेत सेवादास विद्यालयाचे यश

     ▫️दोन खेळाडूंची झाली राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड      मुखेड प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर  विमुक्त जाती  सेवा समिती शैक्षणिक संकुल वसंतनगर कोडग्याळ या शैक्षणिक संस्थेच्या सेवादास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सेवादास ज्यु. कॉलेज वसंतनगर (को.) येथील खेळाडू १) हाक्के गणपत दत्तात्रय२) चिकटवाड प्रथमेश धोंडिबा यांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.    खेळाडूंच्या या यशाबद्दल  संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई गोविंदराव राठोड, सचिव प्राचार्य गंगाधर गोविंदराव राठोड साहेब, मुखेड–कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार  डॉ. तुषार गोविंदराव राठोड साहेब, उप–प्राचार्य डॉ.व्ही. एस. जाधव ,  क्रीडा विभाग प्रमुख प्रा.बाबुराव गंदपवाड, तायक्वांदो क्रीडा प्रशिक्षक मास्टर बालाजीराव जोगदंड, शिवाजी जाधव , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.जयपाल राठोड,  उप–मुख्याध्यापक सुभाष राठोड,  संस्कृतीक विभाग भारत जायभाये, आदिसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी  अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

    Read More »
  • मुखेड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी;ओढे, नाले, तलाव तुडुंब : अनेक गावांचा संपर्क तुटला

    ▫️भवानी तांडा येथील ३५ शेळ्या, अंबुलगा, बोमनाळी येथून ७ जनावरे गेली वाहून मुखेड प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरासह मुखेड तालुक्यांमध्ये अतिवृष्टी पावसाने हाहाकार माजवलाअसून २७ रोजी पाऊसाने तालुक्यात पुन्हा जोरदार सुरुवात केली असून अनेक जनावरे अतीदृष्टीमुळेवाहून गेली आहेत. अनेक छोट्या नदी नाल्याला पुन्हा पूर आला असून शेतातल्या शिल्लक पिकांचेहीमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. काही गावाकडे जाणाऱ्या पुलाहून पाणी जात असल्याने तहसील प्रशासनाने पुलावर वाहतूक बंद केलीआहे तर पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तहसीलदार राजेश जाधव यांनी यांनी नुकसानग्रस्त भागातभेट देवून पाहणी केली आहे. २६ रोजी रात्री सुरू झालेला पाऊस सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होतापावसाची तीव्रता अधिक असल्याने नदी, नाल्यांना पूर आला. नदी काठ वरील अनेक गावातील घरातपाणी घुसले आहे. शहरात मोती नाल्याचा पाण्याचा प्रवाह वाढला असून फुले नगर येथील काही घरातपाणी शिरले आहे. तालुक्यात पाच महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. जांब बु. येथे ११२ मिमी, मुखेडयेथे ६७ मिमी, येवती ७१ मिमी, चांडोळा ६७ मिमी, बाहऱ्हाळी १०२ मिमी, तालुक्यात ६१ मिमी पाऊसएक दिवसात कोसळला असून आजवर ९३२ मिमी पाऊसची नोंद झाली आहे. उंद्रीप. मु. येथील विठ्ठलहुलाप्पा नांगरे यांच्या शेतातील गोठ्यात वीज पडून एक बैल दगावला तर मौजे भवानी तांडा येथेमुसळधार पावसामध्ये जयराम धनाजी पवार यांच्या जवळपास ३५ शेळ्या पुरामध्ये वाहून गेल्याअसल्याची माहिती पोलीस पाटील व पशुवैद्यकी विभागाचे गंदीगुडे यांनी सांगितले. तसेच बोमनाळीयेथील नागनाथ गोविंद होनराव यांची एक म्हैस आणि एक हलगट अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्याओढ्यात वाहून गेले. त्याचबरोबर मौजे थामणगाव तालुका मुखेड येथील मेहबूब अमीरशाह मुर्शद यांचाहलगट पुराच्या पाण्यात वाहून मयत झाला आहे. राम रघुनाथ मंत्रे यांच्या ५ मेंढ्यांचा मृत्यु झाला मन्याड नदीला पूर आल्याने रातोळी व बेटमोगरा येथील पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. बाहाळी, निवळी येथील पुल बंद करण्यात आला आहे तर हातराळ येथील पुल वाहतूक खबर दारीचा उपाय म्हणूनबंद करण्यात आले आहेत. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी सलगरा, बेळी, चीवळी सह अनेकगावानं भेटी देवून पाहणी केली आहे.

    Read More »
  • हिमायतनगर :वादग्रस्त इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून पोलिसांत तक्रार

    हिमायतनगर प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर दि. २७ सप्टेंबर रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशनला सय्यद अब्दुल अजिम (वय ३८, व्यवसाय-इलेक्ट्रीशियन, रा. बाजार चौक,…

    Read More »
  • नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना शनिवार २७ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर

    नांदेड प्रतिनिधी:- २६ सप्टेंबर नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय…

    Read More »
  • सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार- व्यंकट गंदपवाड 

    नांदेड  प्रतिनिधी :- २६ सप्टेंबर  सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवलेले विषय सभासदांच्या व पतसंस्थेच्या हिताचे नसल्याने व तसेच सत्ताधारी संचालक मंडळाने  केलेली नियमबाह्य कर्मचारी भरती सर्वसाधारण सभे पुर्वी गाजत आहे.यामुळे  सभासदांचा प्रचंड रोष या सत्ताधारी संचालक मंडळावर आहे.याचे कारण असेही गेल्या अनेक वर्षापासून रिक्त जागा असताना. सत्ताधारी संचालक मंडळाने कर्मचारी भरती केली. पतसंस्थेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना, पतसंस्था संगणकिकृत असताना भरती केली .भरतीमुळे सभासदांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. व तसेच या पतसंस्थेने सुरक्षा कवच योजना स्वतःपतसंस्थेची उभारलेली असताना, अपघात विमा योजना ही इतर विमा योजनेकडून घेऊन या पतसंस्थेला २८ लाखांचा भुर्दंड बसलेला आहे. याचे कारण असेही यादरम्यान तीन मयत सभासद होऊनही अद्यापपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही. याच्यावरही  कहर म्हणजे सत्ताधारी संचालक मंडळांनी या सभेमध्येआपल्या स्वतःची इमारत असताना दुसऱ्या रिकाम्या जागेवर बांधकाम करण्याचा ठराव विषयी सूचित त्यांनी ठेवलेला आहे व तसेच ही पतसंस्था स्वबळावर असताना अद्याप पर्यंत या पतसंस्थेने कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. परंतु या सत्ताधारी संचालक मंडळांनी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ववाढीव व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यासाठी ठराव ठेवलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व सभासदांमध्ये  तीव्र नाराजी पसरलेली आहे. यासाठी शिक्षक परिषद व संघर्ष समितीने पतसंस्था विरोधात यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर ढोल बजाव आंदोलन केलेले आहे व सहकार विभागाकडे या ठरावा संदर्भाततक्रारी केलेली आहेत .तरी  होणारी सर्वसाधारण सभा सत्ताधारी संचालक मंडळांना जाब विचारणारीअसेल सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे व यासाठी महाराष्ट्र शिक्षक परिषद सत्ताधारी संचालक मंडळाला जाब विचारणार असे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी स्पष्टकेले.      …

    Read More »
  • पूर्वसूचना न देता विष्णुपुरी प्रकल्प धरणाचे दरवाजे उघडले; मोठे नुकसान, १ जणांचा मृत्यू.

    ▫️शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या (अल्पसंख्यांक) महानगर पदाधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व ईतर मागण्यासाठी दिले निवेदन नांदेड प्रतिनिधी २५ सप्टेंबर…

    Read More »
  • दूल्हेशाह रहमान नगर येथे बॅक वॉटरच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

    ▫️शहरातील अनेक भागात शिरले पुराचे पाणी नांदेड प्रतिनिधी:- दि. २४ सप्टेंबर   गोदावरी पात्रात पाणी सोडण्याने शहरातील अनेक भागात बॅक वॉटर शिरले असून अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचवेळी शहरातील दूल्हेशाह रहमान नगर येथे शेख मिन्हाज शेख साजिद वय १६ वर्षीय युवकाचा या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या युवकाचा बाहेर काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  विष्णूपुरी प्रकल्पातून सध्या अडीच हजार क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी गोदावरी नदी पात्राबाहेर आली असून शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. वसरणी येथील पंचवटीनगर, जुन्या नांदेडातील काला पूल, गौतम नगर खडकपुरा, दूल्हेशहा रहमान नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर शिरले आहे. याच बॅक वॉटरमध्ये बुधवारी सकाळी शेख मिन्हाज शेख साजिद वय १६ वर्षे हा युवक पाण्यामध्ये बुडाला. तो बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्या बाहेर काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शहरात महापालिकेकडून मंगळवारी सायंकाळ पासून खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. गोदावरी नदीचे पाणी शहरातील सखल भागात येणार आहे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी याबाबत माहितीही देण्यात आली होती. मात्र बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. गोदावरी जीव…

    Read More »
  • मातोश्री कै. रामबाई गंदपवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

    मुखेड प्रतिनिधी:- २३ सप्टेंबर मुखेड तालुक्यात सामाजिक जाणीवेतून सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या गंदपवाड परिवाराने यंदाही एक आगळीवेगळी परंपरा जपली. महाराष्ट्र…

    Read More »
  • शहरात उद्या मोफत आरोग्य व आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबीरचे आयोजन

     ▫️गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे बल्खी यांचे आवाहन मुखेड प्रतिनिधी:-  दि.२२ सप्टेंबर मुखेड : शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथे मंगळवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच अयुष्मान भारत कार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे, हे शिबिर जुनी नगरपालिकेच्या बाजूस, राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृह समोर पार पडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक भाई आसद इब्राहीम बल्खी व एस. के. बबलू यांनी केले. स्व. मा. आ. भाई गणपतराव देशमुख या शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिरामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करूनदेण्याचा उद्देश आहे. शिबिराचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम समाजसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यात डॉ. संतोष टाकसाळे (वैद्यकीय अधीक्षक व क्षयरोग तज्ञ), डॉ. आदमपुरकर (फिजिशियन), डॉ. वर्षा कोरडे व डॉ. मांजरमकर (नेत्ररोगतज्ञ), डॉ. लक्ष्मीकांत पेंडकर(बालरोग तज्ञ), डॉ. पदमवार (दंतरोग तज्ञ), डॉ. देवकत्ते व डॉ. जबीन शेख (स्त्रीरोग तज्ञ) तसेच डॉ. मुकुल गोपुलवाड (अस्थिरोग तज्ञ)…

    Read More »
Back to top button