Uncategorized

  • शिवसेना उबाठा कडून हजारो भाविकांना महाप्रसादाला सुरुवात

    ▫️सतत 11 दिवस चालणार महाप्रसादाचे वाटप ▫️जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांच्या उपस्थितीत महाआरती करून सुरुवात श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी:- २२ सप्टेंबर…

    Read More »
  • उमरदरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पंप ऑपरेटरला जीवे मारण्याची धमकी

    मुखेड प्रतिनिधी:- २२ सप्टेंबर  मुखेड तालुक्यातील उमरदरी ग्रामपंचायतचे पंप ऑपरेटर झकेरिया युसुफ खान पठाण यांना ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य वकाही ग्रामस्थांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या पत्रावर आधारित या तक्रारीत झकेरिया पठाण यांनी नमूदकेले आहे की, वेळोवेळी अर्ज करूनही त्यांना वेतन, राहणीमान भत्ता, भविष्य निधी, अपघात विमा, सार्वजनिक टाकी दुरुस्ती साहित्य व गणवेश उपलब्ध करून देण्यात आले नाही. या संदर्भात चौकशीची मागणी केल्यानंतर पदाधिकारी आणि काही ग्रामस्थांनी त्यांना विनाकारण त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. झकेरिया पठाण यांनी आपल्या जीवितास धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी केली असून, धमकी देणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीतील गैरप्रकार उघडकीस आले असून, पुढे वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Read More »
  • जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्र माऊली यांच्या वाढदिवसा निमित्त  “एक पेड माँ के नाम” उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

    मुखेड प्रतिनिधी:- २१ सप्टेंबर  जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्र माऊली यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर “एक पेड माँ केनाम” हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुखेड तालुक्यात पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. हा उपक्रम जिल्हा सेवा समिती दक्षिण नांदेड व तालुका सेवा समिती मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्र माऊली यांचा वाढदिवस २१ ऑक्टोबर रोजी असून “जगदगुरूंच्या संकल्पनेतून व पर्यावरण रक्षणाच्या प्रेमातून एक पेड माँ के नाम हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे असे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, नंदकुमार मडगुलवार, दिलीप कोडगिरे, भाजप शहराध्यक्ष नागनाथ लोखंडे, किशोर चव्हाण, बाळू नाईक, सुधीर चव्हाण, संदीप केंद्रे, शिवाजी राठोड ,जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ नागलगावे, प्रसिद्धी प्रमुख अशोक चारकुलवार, तालुका अध्यक्ष मारोती इबितवार, तालुका सचिव माधव मोरे, तालुका संजीवनी प्रमुख अमर स्वामी, जिल्हा संजीवनी प्रमुख शंकर पाटील नखाते, जिल्हा धर्म क्षेत्र प्रमुख महेश इंगळे, तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख वेंकट मारकवाड, तालुका प्रसिद्धी प्रमुख हणमंत पाटील, कोळी गल्ली सेवाकेंद्र अध्यक्ष मारोती मुदेवाड, दत्त मंदिर सेवा केंद्र अध्यक्ष गणेश कळसकर, तालुका कॅप्टन नामदेव पांडलवार, ब्लॅक कमांडो तुकाराम दोमाटे, शंकर गदपवाड, लक्ष्मण पाटील जाधव, विठ्ठल बोडके तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून समाजात पर्यावरण संवर्धना बाबत जागृती निर्माण होऊन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या वृक्षारोपण…

    Read More »
  • बिबट्या निर्दोष! जन्मदाताच निघाला खूनी 

    मुखेड प्रतिनिधी:- २१ सप्टेंबर मुखेड तालुक्यातील तांदळी येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील जन्मदात्यानेच आपल्याच मुलाचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळटिकला नाही चार दिवसातच त्याचं बिंग फुटलं आहे. १६ सप्टेंबर रोजी बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार देणाऱ्या वडीलानेच मुलाचा खूनकेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी वडील उत्तम विठ्ठल जाधव (६५) यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे याबाबत माहिती अशी की, मयत जनार्दन हा आई वडीलांसोबत भांडणे करायचा. ३० ऑगस्ट रोजीजनार्दन याने आई सुमनबाई व वडीलास बेदम मारहाण केली. आईस कपडे काढून मारहाण केली. यामुळे वडील उत्तम जाधव यांनी १५ सप्टेंबर रोजी रात्री नांदेडहून तांदळी येथे जाऊन आखाड्यावरील पत्रावर गाढ झोपलेल्या मुलावर कोयत्याने छातीवर तीन तर पाठीवर १९ वार केले. त्यानंतर मुलीकडे जाऊन मुक्काम केला होता. १७ रोजी मयत जनार्दनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची खबर वडील उत्तम जाधव यांनी दिली होती. त्यामुळे पोलीस व वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला म्हणून चौकशी करीत होते. पण पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी खुनाच्या अँगलने तपास केला असता…

    Read More »
  • दारू तयार करण्यासाठीचे लागणारे दीड हजार लिटर रसायन पोलिसांने पकडले

    ▫️माहूर पोलिसांची तालुक्यात तीन गावात एकाच वेळी धाड ▫️नवरात्रोत्सवापूर्वी मिशन फ्लॅश आऊट अंतर्गत धाडसी कारवाई श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी:- दि २०…

    Read More »
  • मालवाडा घाटात ट्राफिक जाम;ट्राफिक मध्ये अडकले माहूरचे तहसीलदार

    ▫️नवरात्र उत्सवात होणार वाहतुकीची कोंडी श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी दि १८ सप्टेंबर राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या चुकीच्या कामामुळे वाहतूकदारांना प्रचंड त्रास होत…

    Read More »
  • पत्रकार विजय बनसोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

    मुखेड प्रतिनिधी:- दि १८ सप्टेंबर मुखेड: मुखेड येथील धडाडीचे पत्रकार विजय इरबा बनसोडे(वय ४२) यांचे आज दि १८ सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील व दोन मुले ,भाऊ असा परिवारआहे. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार सायंकाळी ०५ वाजता…

    Read More »
  • कॉम्रेड उज्वला पडलवार ” इंदिरा गांधी आर्यन लेडी ”  पुरस्काराने सन्मानित 

    नांदेड प्रतिनिधी:-  १८ सप्टेंबर  नांदेड : मिमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा,मंथन क्रियटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार प्रेस परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा इंदिरा गांधी आर्यन लेडी पुरस्कार देऊन कॉ.उज्वला पडलवार यांना १७ सप्टेंबर रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात सन्मानित करण्यातआले. दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक तथा आयोजक रुपेश पाडमुख यांनी नुकतीच घोषणा केली होती.  दरवर्षी विविध क्षेत्रात नामवंत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.कॉ.उज्वला पडलवार यांच्या सह इतरही नामवंत व्यक्तींना विविध मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. नांदेड लोकसभेचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण आणि पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या हस्ते हापुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, डीवायएफचेतालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, कॉ. प्रफुल कऊडकर,कॉ. सुभाषचंद्र गजभारे,कॉ.बालाजीपाटील भोसले, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. प्रेमीला पतंगे आदींची उपस्थिती होती.

    Read More »
  • तांदळी येथे युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बिबट्याच्या हल्याचा संशय

    मुखेड प्रतिनिधी :- दि  १७ सप्टेंबर  मुखेड तालुक्यातील तांदळी येथील जनार्दन उत्तम जाधव (वय ३०) यांचा संशयास्पद मृतदेह शेतातीलशेडच्या पत्रावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गळा फोडलेला व शरीरावर बोखरल्याचे जखमा असल्याने हा मृत्यू बिबट्याच्या हल्यामुळे झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जनार्दन जाधव काही दिवसांपूर्वी पुणे शहरातून गावी आले होते. दि. १५ सप्टेंबर रोजी त्यांनी मुखेड येथे जाऊन भाजीपाला खरेदी केली व सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतातील पत्र्याच्या झोपडीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी दि. १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांचा रक्तबंबाळ मृतदेह झोपडीच्या पत्रावर आढळून आला. ही घटना समजताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे व पोलीस उपनिरीक्षक संदीप यमावार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पोलिसांना तपास कार्य अडचणीने करावे लागले.   या घटनेमुळे तांदळी व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने तपासकरून बिबट्याच्या उपस्थितीची खात्री करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमकेकारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

    Read More »
  • स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर, सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ; कधी होणारनिवडणुका?

    मुंबई : मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढी संबंधित मागणी करणारा अर्ज सर्वोच्चन्यायालयात सादर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या या मागणीवर न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी पार पडली. यातसुप्रीम कोर्टाने निवडणुकींसाठी ३२ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ३१ जानेवारीनंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. ओबीसी आरक्षणांच्या मुद्यासह इतर अनेक कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्यानिवडणुका रखडल्या गेल्या. निवडणुकांना दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली. चारमहिन्यांच्या आत म्हणजेच ऑक्टोबर २०२५ पर्यंत निवडणुकांशी निगडीत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेशन्यायालयाने निवडणूक आयोगाला मे महिन्यात दिले होते. त्याप्रमाणे, आयोगाने प्रभाग पुनर्चना, आरक्षण, मतदारयाद्या तयार करणे अशी कामे सुरु केली आहेत. पण, ईव्हीएम, सण–उत्सव, कर्मचाऱ्यांची कमतरता अशी कारणं राज्याकडून सादर करण्यात आली. त्यानंतर, सुप्रीम कोर्टानेनिवडणुकींसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणुका या पुढीलवर्षीच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिलीआहे. त्यानुसार आता राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही. यासंदर्भात आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेत एवढा उशीर का? असा जाब विचारला. तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ३१ जानेवारी२०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ३१ जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल.

    Read More »
Back to top button