शहर

  • मुखेड व परिसरातील भाविकांनी मनोभावे पूजा करून शनिदेवाचे घेतले दर्शन 

    मुखेड प्रतिनिधी मुखेड :- शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी मुखेड शहर, कर्नाटक, तेलंगणा सह विविध ठिकाणच्या भाविकांनीशनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. मुखेड व परिसरातील भाविकांचेदर्शनासाठी लांब रांगा लागल्याने रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. शनी पिडा परिहार्थ तेल, काळेतीळ खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. मुखेड तालुक्यात गत काही दिवसांपासून नैसर्गिक संकटाचीमालिका सुरू आहे. कधी अतिवृष्टी तर पावसाने दिलेली ओढ यातून पिकेही हातची गेल्याने शेतकरी हतबलदिसून येत आहे. तालुक्यात हिवताप, डेंग्यू, टायफॉइड, चिक न गुनियासारख्या आजाराने अनेक जण त्रस्तआहेत. जीवनात संकटाची मालिका खंडित व्हावी, जगणे सुसह्य व्हावे, रब्बी हंगामात शिवार सुजलामसुफलाम व्हावे, आर्थिक सुब्बता यावी, संकटे, साडेसात्ती हद्दपार व्हावी यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनीशनिवारी सकाळ पासूनच दर्शनासाठी रांगा, लावल्या होत्या. मुखेड शहरात प्राचीन अतिशय स्वयंभूशनिदेवाचे जाज्वल्य पुरातन मंदिर उंच निसर्ग रम्य डोंगरावर काळी पाषाणाची ४ ते ५ देखणी मूर्ती मंदिरातशनीच्या साडेसाती व पीडा परिहार्थ शनी देवाची वक्रदृष्टी होवु नये म्हणून अनेक भाविकांनी पूजा अर्चाकेली. शनिवारी सकाळी १० वाजुन १९ मिनिटाला सुर झालेली अमावस्या रविवारी सकाळी ११ पर्यंत होती. त्यानिमित्त विविध प्रकारच्या साहित्याची विक्री झाली आहे. काळे तीळ तेल, काळे उडीद, पांढरे फूल, नारळ, धूप घेऊन भाविकांनी शनिवारी सकाळपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी लांब अंतर राखत रांगा लावल्या. नवसाला हमखास पावणारे शनिदेव म्हणून मंदिर प्रसिद्ध आहे. नवस फेडण्यासाठी पूर्तता करण्यासाठीअनेक भाविक दुरून येत असतात. श्री शन्नेश्वराय नःम चा जयघोष करीत हजारो भाविक– भक्तांनी दर्शनघेतले आहे.

    Read More »
  • दुःखद घटना. मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथील भूमीपुत्र शहीद

    राठोड हे २०२५ मध्ये स्वंय इच्छुक सेवानिवृत्ति होणार होते मुखेड प्रतिनिधी लेह मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या…

    Read More »
  • मुखेड मतदारसंघात २ लाख १५ हजार ३९९ मतदारांनी बजावला हक्क

    उद्या विद्यापीठात 6 विधानसभा व लोकसभेसाठी मतमोजणी मुखेडः प्रतिनिधी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्याअनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन तसेच अंमलबजावणी करत निवडणूक व मतदानप्रक्रिया पार पडली असुन मुखेड मतदारसंघात रात्री उशीरापर्यंत मतदारांनी रांगा लावून मतदान प्रक्रियेतसहभाग नोंदवला आहे. विधानसभेसाठी एकुन ७०.१४ क्के मतदान झाले आहे. २ लाख १५ हजार ३९९मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूककामी ३६६ मतदान केंद्रावर २ हजार ४०अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुखेड–कंधार विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून ११ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ७०.१४ टक्के मतदान झाले आहे. मुखेड–कंधार मतदारसंघात ३६६ मतदान केंद्रआहेत. मतदारसंघात १ लाख ५९ हजार ६८५ पुरूष मतदार तर १ लाख ४७ हजार ३९९ महिला मतदार तसेचइतर ०८ असे एकुन ०३ लाख ०७ हजार ९२ मतदारांची संख्या आहे. त्यापैकी २ लाख १५ हजार ३९९मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये १ लाख ११ हजार ८९१ पुरूष मतदार तसेच १लाख ०३ हजार ५०६ महिला तर इतर ०२ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाचे हक्कबजावले आहेत. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ९१ मुखेड मतदारसंघाचे निवणडणुक निर्णय अधिकारीतथा उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेशजाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदारजोहरे, नायब तहसीलदार विलास तेलंग, नायब तहसीलदार पांडुरंग गंगनर, गट विकास अधिकारी मुखेड सी. एल.रामोड, गटविकास अधिकारी कंधार महेश पाटील, पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीसनिरीक्षक भालचंद्र तिडके, निवडणुक विभागाचे लिपीक प्रशांत लिंबेकर, क्यादेव महाडीवाले, मंडळअधिकारी जी.एस. गरुडकर, एस.डी. कुसुमकर, तलाठी सतिश देशमुख, एन.एस. होनराव, राजु सुवर्णकार, सतिष बेदरकर, शेख गौस, बलभिम चावरे, मिडीया कक्षप्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड,. बादेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान यांच्यासह निवडणूक विभाग व पोलिस विभागातील अनेकअधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत. मुखेड विधानसभा निवडणूकी करिता ३६६ मतदान केंद्रावर एकूण २ हजार ४० अधिकारी व कर्मचारी यांचीनियुक्ती करण्यांत आली होती यात पोलीस अधिकारी १०, सीआरपी जवान १००, पोलीस कर्मचारी ३४७, होमगार्ड ३४५, उपविभागीय पोलिस अधिकारी ०१ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदारसंघात अंपग मतदान केंद्र जि.प.हा. सावरगाव येथे तर सखी मतदान केंद्र गुरुदेव विद्या मंदीर शिवाजीनगर मुखेड, संवेदनशील मतदान केंद्र क्रमाक १६० कोळगाव येथे, युवा मतदान केंद्र जि.प.प्रा.शा. जांब (बु.), मुखेड नगर परिषद येथील हुतात्मा स्मारक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. त्याचबरोबरदि.१२ ते १३ नोव्हेंबर पर्यंत दिव्यांग व वय ८५ वर्षावरील २९६ मतदारांनी तर निवडणूक कर्तव्यावर असलेले १हजार ९९३ अधिकारी व कर्मचारी यांनी १८ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. मुखेडविधानसभेच्या निवडणुकीत एकुन ११ उमेदवार आपले नशिब आजमावत असुन या सर्वांचे भवितव्य मतपेटीतबंद झाले आहे. २३ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे मतमोजणी होणार सर्व उमेदवार व मतदारांचे लक्ष आत्ता २३तारखेच्या मतमोजणीकडे लागले आहे.

    Read More »
  • उद्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त अग्निकुंड व पालखी सोहळ्याचे आयोजन

    मुखेड/प्रतिनिधी:-  मुखेडचे ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी यात्रेस प्रांरभ  झाला असून दि. २१ रोजी पहाटे ४ वा. अग्रिकुंड होणारआहे. या वर्षी निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कुस्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त महाराष्ट्र सह कर्नाटक, तेलंगानाराज्यातून हजारो भाविक भक्त येतात. या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे अग्निकुंड. या अग्ग्रीकुंडातीलविस्तवावरून भाविक उघड्या पायाने चालतात. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवारी सायंकाळी श्रीवीरभद्रेश्वर भगवान मंदिरात प्रसाद गुळ (शिरणी) वाटपाचा कार्यक्रम व दि.२१ रोज गुरुवारी पहाटे अग्ग्रीकुंडव पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रकाश पाटील बेळीकर यांच्याकडून कर्नाटकातीलपूर्वतांचा कार्यक्रम व अतुल देबडवार यांच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी तसेच शिवराज मुगावेयांच्यावतीने विद्युत रोषणाई, यादव गव्हाणे यांच्या वतीने दीप सजावट करण्यात येणार आहे. पौर्णिमेपासून(दि.१५ ते २१ पर्यंत) मंदिरात वीरशैव महिला व पुरुष भजनी मंडळ यांचा दुपारी २ ते ५ या वेळेत भजनाचाकार्यक्रम राहील व रात्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ बारवगल्ली मुखेड यांचा कार्यक्रम राहील. दि.२० बुधवारसायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत स्थानिक कलाकार वीरभद्र मठपती, उत्तमराव वन्नाळे, गोविंदरावकोतापल्ले, दीपक कोतापल्ले, सरिता पुरी, उमाताई कोत्तापल्ले, सुमती भालके, वसंत पाटील, दत्तात्रयनिम्मलवाड, रामदास बत्तेवाड, जयपाल मठपती, पांडुरंग बेळीकर, शेलार रोडगे, वादक संजय उमाटे, सुरेंद्रभद्रे, रविंद्र भद्रे, शिवराज उमाटे, अनुप वन्नाळे, विष्णुदास उमाटे, हरिदास उमाटे, ऋषिकेश इंगोले, बासरीवादक व्यंकटराव हंगरगे, निवेदक शंकरराव मुंडे, प्राचार्य रामकृष्ण बदने, बालाजी इंगोले यांच्या भक्तीगितांचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी पहाटे अग्नि कुंडाचा कार्यक्रम व पालखी मिरवणूक होणार आहे यासर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री वीरभद्रेश्वर भगवान ग्राम देवस्थान व समस्त गावकरी मंडळींच्यावतीने करण्यात आले आहे.

    Read More »
  • मुखेड विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी दुसरे प्रशिक्षण                       

    मुखेड प्रतिनिधी:-                                    …

    Read More »
  • 8 नोव्हेंबर रोजी मुखेड मतदारसंघ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी

    मुखेड प्रतिनिधी :-  91- मुखेड मतदारसंघातील उमेदवारांच्यानिवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवारी 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीतआयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगानेकेलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. तहसील कार्यालय, मुखेड पहिला मजला येथे खर्च निरिक्षकांसमोर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचीतपासणी करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्यावेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीलानामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यतदोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्वखर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे. या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्यापरिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्याकायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यासलोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्याकालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे 91-मुखेड विधानसभा मतदार संघाचेनिवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे

    Read More »
  • नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू

    नांदेड : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 06:52 मिनिटांनी भूकंपाचे…

    Read More »
Back to top button