सामाजिक
-
हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील उर्दू नामफलक तात्काळ पुन्हा लावा; रेल्वे प्रशासनाला निवेदन
“भाषा हा धर्म नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत हिमायतनगर रेल्वे प्रशासनाला निवेदन” हिमायतनगर प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ २१ मे…
Read More » -
मुखेड उपजिल्हा रुग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुरड्याला सुया टोचून केले जखम; ‘हिंद लॅब’च्या कर्मचाऱ्यांची मुजोरी!
▫️१७ नंबर वरून १३ नंबर, तिथून ३१ नंबर… दोन तास चालली बाळाच्या नातेवाईकांची क्रूर थट्टा; खासगी लॅबने अवघ्या काही सेकंदात काढले रक्त; ‘मातंग अस्मिता संघर्ष सेने‘चा आंदोलनाचा इशारा…. मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० मे २६ येथील उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि ‘हिंद लॅब‘च्या कर्मचाऱ्यांचा अमानुष चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णालयात भरती असलेल्या अवघ्या ११ महिन्यांच्या कार्तिक सुनील तोटरे या निष्पाप बालकाचे रक्ताचे नमुने घेण्यास लॅब कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर, “आम्हाला एवढ्या लहान मुलाचे रक्त काढता येत नाही” असे म्हणून नातेवाईकांशी अत्यंत उद्धट व अर्वाच्य भाषा वापरत त्यांना बाहेर हाकलून दिले. या संतापजनक प्रकारामुळे मुखेड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ मे २०२६ रोजी हा प्रकार घडला. ताप आणि त्रासामुळे बेजार असलेल्या चिमुरड्या कार्तिकला उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संवेदन शून्यता दाखवत नातेवाईकांना दोन तास संपूर्ण दवाखान्यात…
Read More » -
पवन जगडमवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालगृहातील चिमुकल्यांना मिळाली शिवविचारांची शिदोरी!
▫️अनाथांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट; ‘शिवाजी कोण होता’ पुस्तक देऊन महाराजांच्या विचारांची दिली शिदोरी! नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक…
Read More » -
अनधिकृत होर्डिंगबाजांचे धाबे दणाणले! नांदेड शहर ‘फ्लेक्समुक्त’ करण्यासाठी प्रशासनाची वज्रमूठ
▫️न्यायालयीन निर्देश डावलणाऱ्यांवर होणार थेट फौजदारी कारवाई; मनपा आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक संपन्न. नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६…
Read More » -
देगलूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! पीक विमा आणि खत-बियाणांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
देगलूर (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १५ मे २६ “पीक विमा आमचा हक्क आहे, भीक नाही!” अशी गर्जना करत आज देगलूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावा आणि आगामी खरीपहंगामासाठी खते–बियाणांचा पुरवठा सुरळीत व्हावा, या मागण्यांसाठी कैलास येसंगे कावळगावकरयांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विशेषतः मरखेल, देगलूर आणि खानापूर या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आणितरुणांनी मोठी गर्दी केली होती. पीक विमा मंजूर होऊनही तो अद्याप खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासना प्रति तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आंदोलनाची तीव्रता पाहून नायब तहसीलदार तेलंग साहेब यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ कृषीअधिकारी आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. या बैठकीत विमा कंपनीला स्पष्टनिर्देश देऊन, पुढील आठवड्यात…
Read More » -
नांदेड जिल्ह्यात 16 मे पासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १५ मे २६ नांदेड जिल्ह्यात जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला १६ मेपासून…
Read More » -
होकर्णा नगरीचे ज्येष्ठ नागरिक नारायण विठोबा पाटील लुटे यांचे निधन
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १४ मे २६ होकर्णा नगरीचे ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी संप्रदायातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व कै. नारायण विठोबा पा.…
Read More » -
जळकोट-मुखेड-बिलोली-बोधन रेल्वेमार्गासाठी निधी मंजुरीची मागणी
▫️लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे आ. अमित देशमुख यांना निवेदन ▫️२,४३० कोटींच्या ब्रॉडगेज प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी द्यावा लातूर | प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १३ मे २६ लातूर रोड–मुखेड–बिलोली – बोधन या प्रस्तावित नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर करून प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने आमदार अमित देशमुख यांच्याकडे करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष आकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लातूर रोड ते बोधन दरम्यानच्या १३६ कि.मी. लांबीच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण (FLS) पूर्ण झाले असून माती व खडक परीक्षणाचे काम सध्याप्रगत टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २ हजार ४३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रेल्वेमार्ग जळकोट, मुखेड, चाकूर, कंधार, नरसी, नायगाव, बिलोली आणि देगलूर या महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणार असून मराठवाडा आणि तेलंगणा दरम्यान वाहतूक व संपर्क अधिक मजबूत होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने जळकोट परिसरात ५ ते ३० फूट खोलीपर्यंत मातीचे नमुने गोळा करून तेतपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवले असल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे. हा प्रकल्प नीति आयोगाच्या अखत्यारीतील महत्त्वाचा “मिसिंग लिंक” प्रकल्प मानला जात असून महाराष्ट्र व तेलंगणा सरकारकडून ५० टक्के खर्च वाटा मिळणे आवश्यक आहे. मात्र याबाबत अद्यापस्पष्टता नसल्याने प्रकल्प रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.…
Read More » -
मुखेडमध्ये हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० मे २६ मेवाडचे सुपुत्र आणि अदम्य साहसाचे प्रतीक असलेले हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची ४८६ वी जयंती मुखेड शहरात अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यातआली. दि. ९ मे २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून मुखेड मधील सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अरुणसिंह राजासिंह चौव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक एकतेचा संदेश देत महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले.…
Read More » -
डॉ. दिलीप पुंडे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीवर निवड
▫️सर्पदंश प्रतिबंधासाठी डॉ. दिलीप पुंडे आता देणार केंद्र सरकारला सल्ला; मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०९ मे…
Read More »