सामाजिक

  • पुरोगामी अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड

    ◽️उपाध्यक्षपदी ॲड.ए.पी.लष्करे तर सचिवपदी ॲड.टी.एम.वाघमारे मुखेड प्रतिनिधी:- ०४ फेब्रुवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय,मुखेड येथील पुरोगामी अभिवक्ता संघाची २०२६-२०२७ साठीची…

    Read More »
  • कुरेशी समाज (खाटीक) बांधवांनी पुकारलेल्या बेमुदत बंदीचा फटका मुखेड येथील आठवडी बाजाराला बसला.

    ▫️सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी. मुखेड प्रतिनिधी:- २२ जुलै २५ मुखेड येथे प्रत्येक सोमवारी जनावरांचा बाजार भरतो त्यात तालुका भरातून शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणतात पण दि.…

    Read More »
  • भारत सोनकांबळे यांनी सार्वजानिक बांधकाम उपविभागाकडे केलेल्या रस्ता दुरुस्तीच्या पाठपुराव्याला यश

    ▫️सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्यावरील नंदगाव पाटी ते कर्णा फाटा दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीस मंजुरी ▫️कामाचे अंदाजपत्रक तांत्रीक मान्यतेसाठी विभागीय कार्यालयास…

    Read More »
  • उद्या मुखेड येथे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचा आयोजन

    ▫️सचिन साठे यांची विशेष उपस्थिती  मुखेड (प्रतिनिधी)   लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृती दिनानिमित्त दि.१८ जुलै रोजी सचिन साठे यांच्या उपस्थितीत मुखेड येथे डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेने च्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेना मुखेड तालुक्याच्या वतीने लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठेयांच्या ५६ व्या स्मृती दिनानिमित्त  अभिवादन सभेचे आयोजन १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कै.गोविदराव राठोड क्रीडा संकुल मुखेड येथे सभागृहात  करण्यात आले आहे.   या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे,  राष्ट्रीय सचिव गणेश भगत ,प्रमुख पाहुणे आमदार डॉ तुषार राठोड, आमदार जितेश आंतापुरकर, माजी आमदार अविनाश घाटे, टी.एन.कांबळे, प्रदेश अध्यक्ष राज क्षिरसागर, शिवा कांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य जे टी.भंगारे ,  डी. एन, शेळके, प्राचार्य मनोहर तोटरे, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड , सरपंच दिगांबर गवलवाड , जेष्ठ कार्यकर्ते सखाराम बा–हाळीकर , जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोयणर आदी उपस्थित राहणार आहेत,          मुखेड येथे होत असलेल्या अभिवादन सभेसाठी तालुक्यात गाव भेटी घेऊन मोठ्या प्रमाणात प्रचार अणि प्रसार सर्व पदाधिकारी,  समाजबांधव करीत आहेत,  या कार्यक्रमात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध  गायक तथा प्रबोधनकार व्यंकट सोनटक्के यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. अभिवादन सभायशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष जयसिंग कांबळे, कोडीबा वळगे, बालाजी कमळीकर, उतमवाघमारे, आनंद घाटे, शिवाजी कांबळे, दिपक तोटरे , विजय कांबळे,  श्रीनिवास जांबळीकर,प्रल्हाद गायकवाड…

    Read More »
  • बेकायदेशीर पणे रस्त्यावर थांबणाऱ्या मुंबई -पुणे ट्रॅव्हल्सचा नागरिक व टिव्हशनसाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास 

    ▫️रस्त्यावर ट्रॅव्हल्स थांबण्या ऐवजी शहरा बाहेर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी  मुखेड प्रतिनिधी:- १६ जुलै २५ शहरातून व बाहेर तालुक्यातून मुंबई पुणे खाजगी ट्रॅव्हल्स…

    Read More »
  • डॉ.राजासिंह चौव्हाण यांना स्मृ‌तिदिन्न‌निमित्त मुखेडमध्ये विविध कार्यक्रमासह अभिवादन.

    गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,भोजनदान,रुग्णांना फळ वाटप व वृक्षरोपणसह विविध कार्यक्रम संपन्न मुखेड / प्रतिनिधी. ११ जुलै २५     पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै.डाॅ. राजासिंह हरीसिंह चौव्हाण यांच्या २५ व्या स्मृ‌तिदिन्न‌निमित्त दि.०९ जुलै रोजी मुखेड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात व आयटीआय काॅलेज,उपजिल्हा रुग्णालय,कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये,  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.डाॅ.राजासिंह चौव्हाण यांच्या स्मृ‌तिदिन्न‌निमित्त आयटीआय काॅलेज…

    Read More »
  • आठ दिवस मृत्युशी झुंज देत अखेर बालाजी गायकवाड तांदळीकर  यांचे निधन

     ▫️मुखेड पेट्रोल पंपाच्याजवळ कार–दुचाकीच्या अपघातातील घटना  मुखेड / प्रतिनिधी. ०८ जुलै २५         दि २८ जून रोजी मुखेड–नरसी राज्य महार्गावरील बजरंगनगर शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ एका दुचाकी व कारचा भिषण अपघात झाला होता त्यात .बालाजी गणपती गायकवाड तांदळीकर( मीस्त्री ,) आठ दिवस मृत्युशी झुंज देत अखेर आज दुपारी दोन वाजता निधन झाले आहे.  …

    Read More »
  • ऑटोचालक अमन लदाफ यांचा प्रामाणिकपणा; हरवलेला पर्स व मोबाईल केला परत

    लोहा / प्रतिनिधी ०८ जुलै २५ सध्याच्या काळात जेथे हलक्याशा संधीचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे, तेथे काही व्यक्ती आपल्या प्रामाणिक पणा आणि इमानदारीने समाजासाठी आदर्श ठरतात. अशाच एकातरुण ऑटोचालकाने आपली जबाबदारी सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव दाखवत एक स्तुत्यकृती केली आहे. लोहा शहरात उर्दू शाळेजवळ एका महिलेचा ₹४,७०० रोख रक्कम असलेला पर्स आणि ₹२५,०००किंमतीचा मोबाईल फोन ऑटोमध्ये विसरून राहिला होता. प्रवास संपल्यानंतर संबंधित महिला घरीगेल्यावरच आपले मौल्यवान सामान हरवल्याचे लक्षात आले. पर्स व मोबाईल हे कोणत्याही मोहात न पडता ऑटोचालक अमन लदाफ यांना आढळून आले आणित्यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट संबंधित महिलेच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन ती वस्तू परतकेली. ही कृती केवळ प्रामाणिकतेचे नव्हे, तर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरलीआहे. पर्समध्ये रोख रक्कम असल्याने आणि मोबाईल महत्त्वाचा असल्याने कुटुंब अत्यंत चिंतेत होते. पण अमनलदाफ यांच्या या प्रामाणिकपणामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या या कार्याचे स्थानिकपातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे. अमन लदाफ यांच्यासारख्या तरुणांमुळेच समाजात अजूनही इमानदारी आणि विश्वासाचे मूल्य टिकूनआहे. अशा व्यक्तींचे सार्वजनिक पातळीवर गौरव करणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून नव्यापिढीसाठी ही प्रेरणा ठरेल.

    Read More »
  • जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित सचिव पांडुरंग नागेश्वर यांचा आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार…

    मुखेड / प्रतिनिधी ०६ जुलै २५ नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी मुखेड पंचायत समिती चे ग्राम पंचायत अधिकारी  पांडुरंग नागेश्वर यांची नुकतीच बहुमताने निवड झाल्यानंतर त्यांचा मुखेड येथे डॉ तुषार राठोड आमदार यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी अशोक कासराळीकर यांची तर उपाध्यक्षपदी रवी क्षिरसागर व सचिव पदी पांडुरंग नागेश्वर नरसीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग नागेश्वर यांची पतसंस्थेचे सचिव म्हणून निवड झाल्यामुळे  आ. तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्राम पंचायत संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष सय्यद नजीर, मा. अध्यक्ष कृष्णा रामदिनवार, सचिव सतीश गायकवाद, हणमंत डावकरे , सचिन पाटील, संजय जाधव , आनंदबिरू  , डी वी मांडेवाड , गायक सुरेश वाडकर, संदीप श्रीमंगले , सिद्धेश्वर खेळभडे , निळकंठ गीते, चंद्रकांत देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

    Read More »
  • कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    ▫️मुखेड काँग्रेसची बांधकाम मंत्र्याकडे तक्रार.     मुखेड प्रतिनिधी:- ०१ जुलै २५ मुखेड शहराच्या चौपदरीकरणाचे काम दीड वर्षापासून रखडले असून कंत्राटदाराने रस्ता खोदूनठेवल्यामुळे अनेक अपघात अनेकांना जीव गमवावे लागत आहे.अशा जोगदंड कन्स्ट्रक्शन कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मुखेड काँग्रेसकडून बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.      मुखेड शहरातून जाणाऱ्या लातूर नरसी राज्य मार्गाचे चौपदरीकरणाचे ३२ कोटी चे काम सुमारे दीडवर्षांपूर्वी पासून चालू झाले आहे.अद्याप पर्यंत काम पूर्ण झाले नसल्याने सदर मार्गावर अनेक गंभीरअपघात होऊन वाहन चालकांना जीव गमवावे लागले आहे.नुकतेच दोन बांधकाम मिस्त्री यांची दुचाकी आणि कारचा गंभीर अपघात होऊन त्यात मृत्यूशी झुंज देत आहेत.त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शिष्ट मंडळप्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार राजेशजाधव यांची भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटलेआहे की सदर रस्त्याचे खोदकाम करून ठेवणाऱ्या जोगदंड कन्स्ट्रक्शन कंपनीवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,तात्काळ सदर रस्ताकाम सुरू करून लवकर पूर्ण करावे अन्यथा काँग्रेसकडुन पुढील जिवित हानी टाळण्यासाठी आणि सदर कंपनीस धडा शिकवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर तीव्र आक्रमक आंदोलन करण्यात येईल.असे निवेदनातून सांगितले आहे,यानिवेदनावर डॉ.श्रावण रॅपनवाड,शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेस शहराध्यक्षजयप्रकाश कानगुले, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर अण्णा  साखरे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इम्रानपठाण,शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,शहर उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड,युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सचिव सुनील पाटील आरगिळे,काँग्रेसचे  तालुकासचिव रामेश्वर पाटील इंगोले,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष एम.आर.गोपनर,अल्पसंख्यांक काँग्रेसता.उपाध्यक्ष शेख मुजीब,इरफान पठाण आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Read More »
Back to top button