आरोग्य
-
मुलीचा प्राण वाचविणाऱ्या देवदूताचा सत्कार..
आजपर्यंत हजारो सर्पदंश रुग्णांना डॉ.पुंडेनी दिले जिवनदान. मुखेड / प्रतिनिधी. नायगाव तालुक्यातील गडगा येथील १२ वर्षाच्या मेघा नागनाथ स्वामी हिला पहाटे झोपेत विषारी सापानेदंश केला होता.त्यामुळे मेघाला मुखेड येथील प्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक डॉ.दिलीपराव पुंडे यांच्या रुग्णालयात दाखल केले होते.डॉ.पुंडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला मृत्यूच्या दाढेतून वाचविले असुन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेघाला रुग्णालयातून सुटी देवुन जिवनदान दिले आहे त्यामुळे स्वामी परिवार व गावकऱ्याच्या वतीने देवदूत डॉ.पुंडे यांचा सत्कार करण्यात आला गडगा येथील रहिवाशी असलेली मेघा स्वामी ही २७ मार्च रोजी पहाटे दोनच्या सुमारास आपल्या घरात…
Read More » -
ड्रेनेजचा पाणी राज्य महामार्गावर; मोठी रोगराई पसरण्याची शक्यता !
मुखेड/प्रितिनधी : शहरातील बारहळी नाका येथील मुख्य ड्रेनेजचा पाणी थेट राज्य महामार्गावर येत असल्याने सकाळी जॉगिंगसाठी ये जा करणाऱ्या व स्थानिक नागरीकांना याचा नाहक त्रास होताना दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून ड्रेनेज तुडुंब भरली असून ड्रेनेज घाण पाणी रस्त्यावरुण वाहत आहे. या ड्रेनेजचे पाणी बारहळी नाका ते नारायणप्रभा बाळ रुग्णालय ते गोदावरी हाँिस्पटल ते शहरालगत असलेल्यानदीला जाऊन पोहचत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रेनेज घाण पाणी जात असताना नगर पालिका…
Read More » -
पशुपालक बांधवांनो जखमी,वृद्ध गायांचे अवहेलना करू नका -डॉ.राहुल कांबळे
मुखेड प्रतिनिधी:- जिल्ह्यातील पशुपालक बांधवांनी आपल्या मुक्या प्राण्यांची अवहेलना करू नका आपल्या कडे चांगले असे पर्यंत आपण त्या गाईची दूध खातो त्यांचे गोरे सांभाळून विक्री करतो त्यावर आपलं घर चालवतो आपलाआधार निर्वाह होतो आपला संसार व्यवस्थित होतो जेव्हा गाय वयोवृद्ध झाली की गोरक्षण मध्ये आपणआणून सोडतो भाकड गाई पाय मोडलेल्या गाई जी दूध देत नाही तिची खूप अवहेलना करून गोरक्षण मध्येआपण आणून देत आहात हे अत्यंत चुकीचा आहे आई–वडील म्हातारे झाले की वृद्ध आश्रमामध्ये पाठवतआहात आणि गाई पण म्हाताऱ्या झाल्या की गोरक्षण संस्थेमध्ये पाठवत आहात ही माणुसकी नाही आहेमाणुसकीला शोभणारी ही गोष्ट नाहीये आपणाला गाई बद्दल जर प्रेम असेल तर त्या गाईचं पालन पोषणव्यवस्थित करा वयोवृद्ध झाल्यानंतर पण तिला पालनपोषण करा रस्त्यावर आपल्या सोडू नका गायीचीअलवेदना करू नका आता ती राष्ट्रीय माता आहे याची जाणव पशुपालकांना असणं गरजेचं आहे असंडॉ.राहुल कांबळे म्हणाले आज एका गाईला खूप अत्यंत त्रास होता तिचा पाय मोडला होता पण त्या पाय मोडलेल्या ठिकाणी हाडाचेफणसे मधेच होते त्यामुळे हाड झुटत नव्हते एका पशुपालकाने ही गाय गोरक्षण संस्था मुखेड मध्ये आणूनसोडली तिच्या या त्रासामुळे चारा खात नव्हती बेचैन होती तळमळ करत होती तिच्या पायामध्ये खूप आयापडल्या होत्या खूप मोठी जखम झाली होती त्यामुळे आज त्या गाईच्या पायाच्या शस्त्रक्रिया करून तिच्यावेदना कमी केल्या जखमी मध्ये पडलेल्या आळ्या पूर्ण काढल्या आणि मोडलेल्या पायाती हाडाचे फणसेकाढून टाकले तिचे प्लास्टर केले या गाईच्या वेदना जाणून घेऊण डॉ.राहुल कांबळे यांनी अत्यंत प्रयत्न करुनगाईवर विलाज यशस्वी झाला त्या गाईला जीवदान मिळाले अत्यंत त्रास त्या गाईला होता ते त्रास कमीडॉ.कांबळे हे यशस्वी झाले हि गाय आता उभा टाकली आहे चारा खाते व्यवस्थित आहे गाई बद्दलची आस्थाअसली पाहिजे गाई बद्दलची अवहेलना नको आहे याप्रसंगी डॉ.राहुल कांबळे यांनी पशुपालकांना संबोधितकेले
Read More » -
वैदिक साहित्य आणि पर्यावरण या विषयावर आँनलाईन व्याख्यान संपन्न
मुखेड प्रतिनिधी :-येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय , नांदेडच्या संस्कृत विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी विज्ञान…
Read More » -
मन्नेरवारलू सखी मंचाने रक्तदान शिबीर आयोजित करुन एक आदर्श निर्माण केला. मंगाराणी आंबुलगेकर
हळदी कुंकू सोहळयात समाजातील कतृत्वान महिलांचा सन्मान व रक्तदान शिबीराचे आयोजन. . नांदेड प्रतिनिधी:- समाजातील महिलांना संघटीत करून फक्त हळदी…
Read More » -
मुखेड उपजिल्हा रुग्णालयासह प्रा.आरोग्य केंद्र,उपकेंद्रात अँटी रॅबिज इंजेक्शनचा तुटवडा.
वरिष्ठ अधिका–यांनी या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देण्याची मागणी. मुखेड / प्रतिनिधी शासन स्तरावरून तब्बल दोन महिन्यांपासून कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असणारे अँटी रेबिजइंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात असल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिक उपजिल्हा रुग्णालयात येतआहेत.पण उपजिल्हा रूग्णालयातसुद्धा पुरवठा जेमतेम असल्याने दररोज अनेक नागरिकांना बाहेरीलखाजगी मेडिकल स्टोर मधुन इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातीलप्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही इजेंक्शन रुग्णांना मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होवुनहेळसांड होत आहे.रुग्णांची गैरसोय थांबविण्यासाठी या महत्वपुर्ण विषयाकडे संबधित विभागाच्या वरिष्ठअधिकारी यांनी लक्ष्य घालुन सर्वसामान्य नागरिकांना इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे अशी मागणीतालुक्यातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे. मुखेड तालुक्यात ०१ उपजिल्हा रूग्णालय, ०८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३६ आरोग्य उपकेंद्र कार्यरतआहेत. पण या सर्व रूग्णालयात व आरोग्य केंद्रात मागील दोन महिण्यापासुन शासन स्तरावरून कुत्राचावल्यानंतर आवश्यक असणारे अँटी रेबिज इंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने संपूर्णतालुक्यातील वेगवेगळ्या गावातील नागरिक कुत्रा वाचल्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी मुखेड उपजिल्हारुग्णालय गाठत आहेत.कारण त्यांना त्यांच्या गावाजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात इंजेक्शनवेळेवर रुग्णांना देण्यासाठी भेटत नाहीत त्यामुळे नागरिक परेशान होत आहेत.कुत्रा वाचल्यावर घेण्याचेइंजेक्शन मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये भिती निर्माण होत आहे.सरकारी दवाखान्यात इंजेक्शन मिळतनसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सदरील इंजेक्शन विकत घ्यावे लागते आहे.रुग्णांच्या नातेवाईकांनाआर्थीक भुर्दंड सोसावे लागत आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयात ११ जानेवारी रोजी एका युवकास कुत्रा चावल्यानंतर रूग्णालयातनेण्यात आले.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अँटी रेंबिज इंजेक्शनसाठी चक्क नांदेडला रेफरचे पत्र दिल्याचेरुग्णांच्या नातेवाईकाने सांगितले.अशा या महत्त्वाच्या विषयाकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाआरोग्य अधिकारी यांनी लक्ष देवून रुग्णांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांतुन होतआहे.कोणत्याही व्यक्तींला कुत्रा चावल्यास त्यांना चार अँटी रॅबिज इंजेक्शन घ्यावे लागतात. तसेचचावलेली जखम खोल असल्यास अँटी रॅबिज सिरम घ्यावे लागते तेही जिल्हा स्तरावर मिळत असल्यानेसर्वसामान्य नागरिकांना कुत्रा चावल्यानंतर सरळ नांदेडला रेफर करावे लागत आहे.किंवा रुग्णांना खाजगीमेडिकल स्टोरमधुन इंजेक्शन घ्यावे लागत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दोनमहिन्यापासून अँटी रँबिज इंजेक्शनचा आरोग्य विभागाकडून पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांची हेळसांडहोत आहे याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने घेवुन इंजेक्शन उपलब्ध करुण देण्याची मागणी होत आहे.
Read More » -
पत्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे डॉ. संतोष टाकसाळे
दर्पण दिनानिमीत्त पत्रकार संघाचे ३ दिवस विविध उपक्रम. गजानन बंडे यांनी धन्वतंरी क्लिनिकल लॅबच्या माध्यमातून केली मोफत तपासणी… सुदृढ आरोग्य हे यशस्वी जिंवंनाची गुरुकिल्ली आहे.:- प्रसिद्ध सर्पदंशतज्ञ डॉ. दिलीप पुंडे मुखेड प्रतिनिधी:- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या पत्रकाराने आहार विहारसोबत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले आरोग्य सुदृढ राहिले, स्वास्थ चांगले राहिले तरचअधिक क्षमतेने सामजिक काम करण्यास आपणास मदत होणार आहे. आजाराचे प्रकार, लक्षणे बदलतआहेत, विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे, व्हायरस बदलून येत आहेत, आजार लपवल्याने सुद्धावाढतो, आजाराचे लक्षणे जाणवल्यास, वेळीच आजाराचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार करण्यातयेतो. आजारावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे सर्वांनी शारीरिक तपासणी नियमित करणे ही काळाची गरजआहे असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोष टाकसाळे यांनी केले आहे. यावेळी डॉ.दिलीप पुंडे बोलताना म्हणाले की सुदृढ आरोग्य हे यशस्वी जिंवंनाची गुरुकिल्ली आहे. समाजघडविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करतात सर्व घटकातील नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी पत्रकारअहोरात्र मेहनत करत असतात कामाच्या ओघात झोप,आहाराकडे दुर्लक्ष होते.सर्व क्षेत्रासह पत्रकारिताक्षेत्रात वाढत्या स्पर्धा बातम्या देण्यासाठी साकारलेली भूमिका जोखीम यातून तानतणाव वाढत आहे त्यामुळेअनेक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह,रक्तदाब,वाढीव कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहे. पत्रकाराने स्वतःसह आपल्या कुटुंबाची परिवाराचे आरोग्याची काळजी घ्यावी नियमित आरोग्य तपासणीकरवून घावे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यताआहे,आरोग्य विमा कवच काढुन घ्यावे,दिवसा गनिक मोठ्या कॉर्पोरेट आधुनिक रुग्णालयात आजार वरीलउपचार महागले आहेत.आरोग्य विमा कवच काळाची गरज झाल्याचे मत व्यक्त केले आहे प्रसिद्ध –हदयरोतज्ञ डॉ.अशोक कौरवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की पत्रकारांनी आपल्यासहआपल्या सर्व परिवाराचीही आरोग्याची काळजी घेण्याचे आपल्या मनोगतातुन आवाहन केले आहे दर्पण दीनानिमित्त अ.भा. मराठी पत्रकार परिषद सलग्णीत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ, उपजिल्हा रुग्णालय मुखेड, आय. एम.ए. संघटना व वैद्यकीय संस्थेच्या वतीने वार्ताहरांची आरोग्य तपासणी शिबिरउपजिल्हा रुग्णालयात पार पडले यावेळी ते बोलत होते. पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराच्याअध्यक्षस्थानी डॉ. संतोष टाकसाळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सर्पदंशतज्ञ मुखेड भुषण डॉ. दिलीप पुंडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार होते यावेळी डॉ.कैलास चांडोळकर, डॉ.व्यंकटरावसुभेदार, डॉ.श्रीहरी बुडगेमवार, डॉ.पांडुरंग श्रीरामे, डॉ यु.आर गायकवाड, डॉ. बी.एस गरुडकर, डॉ.एच एसमेकेवाड, डॉ.मुकुल गोपुलवाड, डॉ.बी आदमपुरकर, डॉ.वर्षा कोरडे मॅडम, डॉ.शेटवाड, डॉ.जुनेद शेख, डॉ.अंजली ढवळे मॅडम आदी उपस्थित होते
Read More » -
दर्पण दिनानिमित्त आज पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी शिबिर
६ जानेवारीला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन मुखेड, (प्रतिनिधी)- प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुखेड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सल्गणीत मुखेड तालुकामराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.४ ते ६ जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसुन आज दि.४ जानेवारी रोजी आयएमए संघटना, वैद्यकीय संस्था व मुखेड उपजिल्हा रूग्णालय यांच्यासंयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच ६ जानेवारी रोजी रुग्णांना फळे व विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दर्पण दिनाचे अवचित्य साधुन आज ४ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजता वैद्यकीय संस्था, आय एमएसंघटना व उपजिल्हा रुग्णलाय यांच्या वतीने सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनकरण्यात आले असुन यात रक्त च्या सर्व तपासणी मधुमेह चाचणी, कोलेस्ट्रॉल रक्तदाब, हृदयरोग बाबतीतआवश्यक चाचणी, नेत्र तपासणी, हाड सांधे दुखी तपासणी, दंतरोग तपासणी, वजन, बीएमआय, शुगर, बीपी, एक्सरे अशा सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीजागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य मुखेडभुषण डॉ. दिलीप पुंडे हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणुनआयएमए संघटनेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध – हदयरोगतज्ञ डॉ. अशोक कौरवार, उपजिल्हा रुग्णालयाचेवैद्यकिय अधीक्षक डॉ. संतोष टाकसाळे, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामराम श्रिरामे, डॉ व्यंकटराव सुभेदारभोसले, डॉ. महेश पतेवार, आयएमए संघटनेचे सचिव डॉ. कैलास पाटील चांडोळकर, वैद्यकीय संस्थेचेसचिव डॉ. श्रिहरी बुडगेमवार, दंतरोगतज्ञ डॉ पांडुरंग श्रीरामे यासह अनेक मान्यवर तज्ञ डॉक्टरांची उपस्थितीराहणार आहे. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी वैद्यकीय संस्था, आयएमए संघटना व मुखेड उपजिल्हारुग्णलायातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत होणार आहे. त्याचबरोबर ०६ जानेवारी रोजी दर्पण दिन्नानिमित्तसकाळी १० वाजता मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वं सामान्य, गोरगरीब नागरिकांच्यापाल्याला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही, पेन, शॉपनर, खोडरबर पुस्तके वाटप करण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे तरी या विविध कार्यक्रमास पत्रकारबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Read More » -
हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
तंबाखू विक्रेत्यांना 8 हजार 500 रुपयांचा दंड आकारला …
Read More »