क्राईम
-
मुखेड शहरात खुलेआम होतेय गांजा विक्री; १४ ते १८ वयोगटातील मुले नशेच्या आहारी
मुखेड प्रतिनिधी:- गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम मुखेड शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. दहा ते पनास रुपयां पर्यंतया गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. गांजाची नशाही पूर्वी गुन्हेगारा पुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. शहरआणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. मुखेड परिसरातील १४ ते १८ वयोगटांतील मुले या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे. सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्चितच तरुण पिढीला बरबाद करणारी आहे. शहरातील जुनी नगरपालिका परिसर,लोखंडे चौक परिसर ,खाटीक गल्ली परिसर ,वाल्मिक…
Read More » -
मुखेड तालुक्यात गुटखा विक्री जोमात…
गुटखा विक्रेत्यांना अभय कुणाचे ? घाऊक विक्रेत्यांचा शोध घेऊन संबंधित विभाग कारवाई करेल काय ? मुखेड प्रतिनिधी:- शहरासह ग्रामीण परिसरात प्रत्येक खेड्यात गल्ली बोळातील किराणा दुकान व इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या सरास विक्री होतांना दिसून येत आहे. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटका विक्रेते हे सर्व खेड्यात व गावात प्रत्येक दुकानावर गुटख्याचा माल मोटारसायकल वरून पोहोचून देण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.युवक , पुरुष तथा शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात यागुटख्याच्या आहारी गेले आहेत. कर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेतराज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता. कठोर अंमलबजावणीसाठी कायदासुद्धा निर्माण केला आहे; परंतु अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. दुर्लक्षामुळे गुटखा विक्री जोमात सुरू आहे. कारवाईत गुटख्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्याचे दिसतअसले तरी थातूरमातूर कारवाई नंतर पुन्हा गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती त्या कार्यवाही नंतर…
Read More » -
सावरगाव पी.रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार , एक जखमी
मुखेड प्रतिनिधी:- शहरातील वासुदेव गल्लीतील रहिवासी असलेले दोन युवकांच्या मोटारसायकलला सावरगाव पी. परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होवून यातील एकजण जागीच ठार झाला आहे तर एक जण किरकोळजखमी झाला आहे. दि.२३ फेब्रुवारी रोजी वासुदेव गल्लीतील रहिवासी नागेश कुमार कुंभारकर (४०) आणि माधव धुमाळ (३०) हे दोघेजण मोटारसायकल क्रमांक एम. एच. २२ ए.आर. ८७४५ वर अहमदपूरहुन नातलगाचे अंत्यसंस्कारकरुन मुखेडकडे येत होते. सदर मोटारसायकलला सावरगाव (पी) परिसरात अपघात झाला. या अपघातातनागेश कुमार कुंभारकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर माधव धुमाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. नागेश कुंभारकर यांना जखमी अवस्थेत मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले. अपघात नेमका कसा झाला याबाबत काहीही माहिती कळू शकली नाही. या प्रकरणी वृत्तलिहीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान तालुक्यात फेब्रुवारीमहिन्यात ११ अपघात झाले असून ८ ते ९ व्यक्तींनी मोटारसायकल अपघातात आपला जीव गमावला आहे.
Read More » -
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा 50 हजारांचा दंड
* नाशिक जिल्हान्यायालयाचे आदेश,मंत्रीपद अन् आमदारकी धोक्यात नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटें आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचीशिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याप्रकरणी ही शिक्षासुनावण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. 1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकरावकोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्याहोत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्याहोत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हेआमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वादसुरू होता.
Read More » -
ऑटो अपघातात पिता ठार तर मुलगा जखमी
मुखेड तालुक्यात अपघात काही थांबेना मुखेड प्रतिनिधी:- मुखेड दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता मुखेड चांडोळा वळण रोडवरील भगनूरवाडी रस्त्या जवळ ऑटो पलटी होऊन यातील अकबर चांदसाब शेख (वय ७०) रा. शिवाजीनगर ता. तुपरान जि. मेदक(तेलंगाना) हे ठार झाले असून मुलगा जखमी झाला आहे. तुपरान जि. मेदक येथील अकबर चांद शेख हे आपल्या परिवारासह मुखेड येथे लग्नाला आले होते. ते परत हैद्राबादला देगलूर मार्ग जात होते. त्यांचा मुलगा जफर हा गाडी चालवत होता…
Read More » -
बांधकाम कामगाराचा अपघातात मृत्यू; दिवसेंदिवस अपघातात वाढ
मुखेड प्रतिनिधी:- तालुक्यातील बेरळी खुर्द येथील नितीन ज्ञानोबा बेळीकर (३४) हा खैरका येतील बांधकामावरूनमुखेड येथे येऊन कामगारांना जेवन घेऊन जात असताना रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना १७फेब्रुवारी रोजी अंदाजे दुपारी ३.३० वाजता घडली. तालुक्यातील बेरळी खुर्द येथील कामगार नितीन बेळीकरहा खैरका येथील कामावरून मुखेडकडे मोटारसायकलने कामगारांना जेवण घेऊन येण्यासाठी मुखेड येथेआले व जेवण घेऊन कामावर जात असताना शहराजवळील गरुडकर यांच्या कागद कारख्याजवळ त्यांचाअपघात झाला. यात नितीनला जब्बर मार लागला. दरम्यान नितीन हा जाग्यावरच बराच वेळ तडफडला पणरस्त्यावर रहदारी कमी असल्याने त्यांना दवाखान्यात आणण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे त्याचा जागेवरचमृत्यू झाला. नितीन बेळीकर यास उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांतगायकवाड यांनी मृत घोषित केले आहे. याबद्दल पोलिस जमादार बालाजी तेलंग यांनी पोलिस पंचनामा केला आहे. दुचाकी वाहनास दुसऱ्या अज्ञातवाहनाने धडक मारली की दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असा प्रश्न निर्माणझाला आहे.
Read More » -
मुखेड नपा ट्रॅक्टरच्या अपघात प्रकरणात १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित; न्यायासाठी वारसांचा लढा
दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे नातेवाईकची मागणी मुखेड प्रतिनिधी :- मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राबीयाबी अहेमद बल्खी (वय ८०) यांच्या वारसाला नुकसान भरपाई मिळावी आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे अर्जाद्वारे करण्यात आली आहे. २१ जानेवारी २०२४ रोजी मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने निष्काळजीपणे वाहतूक करत वृद्ध महिलेस जोरातधडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बल्खी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, याप्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. पी.एस.ओ राठोड यांनीमनमर्जीप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप असून, अद्यापही संबंधित ट्रॅक्टर आणि चालकाचा शोधलागलेला नाही. अर्जदार असद इब्राहीम बल्खी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुखेड पोलीस ठाण्यातील तपास अधिकारीजाणूनबुजून प्रकरण दाबून ठेवत आहेत. त्यांनी नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरविषयी स्मरणपत्र पाठविल्याचेसांगितले, मात्र अद्याप कोणताही ठोस तपास झालेला नाही. मोटार अपघात अधिनियम २०२३ नुसार, अपघातानंतर ६ महिन्यांच्या आत नुकसान भरपाईसाठी अर्जदाखल होणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणाला आता १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित आहे. त्यामुळेमृत महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत आहे. तपास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, तातडीने मोटार अपघात प्राधिकरण व जिल्हान्यायालय, मुखेड येथे अर्ज दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यातआली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीहीमागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
Read More » -
गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार; नराधम शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं
तामसा प्रतिनिधी:- माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. हदगाव तालुक्यातील तामसा येथील शिक्षकांने गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत…
Read More » -
एसटी व दुचाकीचा अपघात; बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर
मागील आठ दिवसातला हा तिसरा अपघात तर चौथा मृत्यू मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील चांडोळा तांडा जवळ एसटी व दुचाकीचा दि. ३ फेब्रुवारी रोजी अंदाजे सांयकाळी ५ च्यादरम्यान अपघात होऊन बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर झाल्याची घटना घडली. तालुक्यातील ईटग्याळ पदे येथील मारोती रमेश सूर्यवंशी वय ३८ व अश्विनी रमेश सूर्यवंशी वय ३२ हे दोघेभाऊ बहीण दुचाकी क्रमांक एम एच २६ बी डब्ल्यू ९२५२ ने ईटग्याळ पदे वरून चांडोळा मार्गे नांदेड ला जात असताना मुखेड – चोंडी – देगलूर ही बस चांडोळा मार्ग देगलूर ला जात असताना चांडोळा तांडा जवळसमोरासमोर धडक होऊन बहीण अश्विनी रमेश सूर्यवंशी (वय ३२) हिचा जागीच मृत्यू झाला तर भाऊमारोती सूर्यवंशी ( वय ३८) याच्या पायाला व उजव्या हाताला फॅक्चर झाल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयातडॉ. बालाजी गरूडकर यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले. सदर घटना कळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश हासुळे यांनी घटनेचा पंचनामा केला. मयतास शवविच्छेदनासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नातेवाईकांना ही घटना कळताच उपजिल्हारुग्णालयाकडे धाव घेत एकच हंबरडा फोडला होता.
Read More » -
पिता पुत्रांच्या आत्महत्तेस जबाबदार महाराष्ट्र ग्रामीण बॅकेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा
आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला ५० लाख रु तातडीने मदत द्यावी. बिलोली दि.१३ (प्रतिनिधी) मिनकी येथे शेतकरी पितापुत्रांनी केलेल्या आत्महत्ते नंतर शेतकरी…
Read More »