क्राईम

  • बांधकाम कामगाराचा अपघातात मृत्यू; दिवसेंदिवस अपघातात वाढ 

    मुखेड प्रतिनिधी:- तालुक्यातील बेरळी खुर्द येथील नितीन ज्ञानोबा बेळीकर (३४) हा खैरका येतील बांधकामावरूनमुखेड येथे येऊन कामगारांना जेवन घेऊन जात असताना रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना १७फेब्रुवारी रोजी अंदाजे दुपारी ३.३० वाजता घडली. तालुक्यातील बेरळी खुर्द येथील कामगार नितीन बेळीकरहा खैरका येथील कामावरून मुखेडकडे मोटारसायकलने कामगारांना जेवण घेऊन येण्यासाठी मुखेड येथेआले व जेवण घेऊन कामावर जात असताना शहराजवळील गरुडकर यांच्या कागद कारख्याजवळ त्यांचाअपघात झाला. यात नितीनला जब्बर मार लागला. दरम्यान नितीन हा जाग्यावरच बराच वेळ तडफडला पणरस्त्यावर रहदारी कमी असल्याने त्यांना दवाखान्यात आणण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे त्याचा जागेवरचमृत्यू झाला. नितीन बेळीकर यास उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांतगायकवाड यांनी मृत घोषित केले आहे. याबद्दल पोलिस जमादार बालाजी तेलंग यांनी पोलिस पंचनामा केला आहे. दुचाकी वाहनास दुसऱ्या अज्ञातवाहनाने धडक मारली की दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असा प्रश्न निर्माणझाला आहे.

    Read More »
  • मुखेड नपा ट्रॅक्टरच्या अपघात प्रकरणात १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित; न्यायासाठी वारसांचा लढा

    दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे नातेवाईकची मागणी मुखेड प्रतिनिधी :-  मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राबीयाबी अहेमद बल्खी (वय ८०) यांच्या वारसाला नुकसान भरपाई मिळावी आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे अर्जाद्वारे करण्यात आली आहे. २१ जानेवारी २०२४ रोजी मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने निष्काळजीपणे वाहतूक करत वृद्ध महिलेस जोरातधडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बल्खी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, याप्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. पी.एस.ओ राठोड यांनीमनमर्जीप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप असून, अद्यापही संबंधित ट्रॅक्टर आणि चालकाचा शोधलागलेला नाही. अर्जदार असद इब्राहीम बल्खी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुखेड पोलीस ठाण्यातील तपास अधिकारीजाणूनबुजून प्रकरण दाबून ठेवत आहेत. त्यांनी नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरविषयी स्मरणपत्र पाठविल्याचेसांगितले, मात्र अद्याप कोणताही ठोस तपास झालेला नाही. मोटार अपघात अधिनियम २०२३ नुसार, अपघातानंतर ६ महिन्यांच्या आत नुकसान भरपाईसाठी अर्जदाखल होणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणाला आता १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित आहे. त्यामुळेमृत महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत आहे. तपास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, तातडीने मोटार अपघात प्राधिकरण व जिल्हान्यायालय, मुखेड येथे अर्ज दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यातआली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीहीमागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

    Read More »
  • गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार; नराधम शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं

    तामसा प्रतिनिधी:- माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. हदगाव तालुक्यातील तामसा येथील शिक्षकांने गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत…

    Read More »
  • एसटी व दुचाकीचा अपघात; बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर

    मागील आठ दिवसातला हा तिसरा अपघात तर चौथा मृत्यू  मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील चांडोळा तांडा जवळ एसटी व दुचाकीचा दि. ३ फेब्रुवारी रोजी अंदाजे सांयकाळी ५ च्यादरम्यान अपघात होऊन बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर झाल्याची घटना घडली. तालुक्यातील ईटग्याळ पदे येथील मारोती रमेश सूर्यवंशी वय ३८ व अश्विनी रमेश सूर्यवंशी वय ३२ हे दोघेभाऊ बहीण दुचाकी क्रमांक एम एच २६ बी डब्ल्यू ९२५२ ने ईटग्याळ पदे वरून चांडोळा मार्गे नांदेड ला जात असताना मुखेड – चोंडी – देगलूर ही बस चांडोळा मार्ग देगलूर ला जात असताना चांडोळा तांडा जवळसमोरासमोर धडक होऊन बहीण अश्विनी रमेश सूर्यवंशी (वय ३२) हिचा जागीच मृत्यू झाला तर भाऊमारोती सूर्यवंशी ( वय ३८) याच्या पायाला व उजव्या हाताला फॅक्चर झाल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयातडॉ. बालाजी गरूडकर यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले. सदर घटना कळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश हासुळे यांनी घटनेचा पंचनामा केला. मयतास शवविच्छेदनासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नातेवाईकांना ही घटना कळताच उपजिल्हारुग्णालयाकडे धाव घेत एकच हंबरडा फोडला होता.

    Read More »
  • पिता पुत्रांच्या आत्महत्तेस जबाबदार महाराष्ट्र ग्रामीण बॅकेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा

    आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला ५० लाख रु तातडीने मदत द्यावी. बिलोली दि.१३ (प्रतिनिधी) मिनकी येथे शेतकरी पितापुत्रांनी केलेल्या आत्महत्ते नंतर शेतकरी…

    Read More »
  • मुखेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात होतेय नागरिकांची आर्थिक लुट.

    रजिस्ट्रीला घेतलेली ज्यादा रक्कम वापस करण्याची निवेदनाव्दारे मागणी. मुखेड / प्रतिनिधी. मुखेड येथील दुय्यम निबंध कार्यालयात रजिस्ट्री करीत असताना सर्व…

    Read More »
  • अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा मुखेड पोलिसांनी पकडला

    चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल मुखेड (प्रतिनिधी) :-   एका हायवा ट्रकमधून विनापरवाना लाल वाळूची वाहतूक सुरू असताना २३ डिसेंबर रोजी मुखेडपोलिसांनी ती हायवा ट्रक पकडून कारवाई केली. जाहूर चौकात ही हायवा पकडली. या कारवाईत ९ ब्रासवाळूसह पोलिसांनी २० लाखांचा हायवा ट्रकही जप्त केला आहे. चालक आणि मालक या दोघांविरुद्धहीगुन्हा दाखल केला आहे. मुखेड ठाणे येथे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती मिळाल्यानंतर मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक लक्ष्मण केंद्रे, अंमलदार प्रदीप शिंदे हे २३ डिसेंबर रोजी जाहूर चौकात पोहोचले. त्यावेळी सकाळीसव्वाआठ वाजेदरम्यान देगलूर रस्त्यावरून एक हायवा ट्रक विनापरवाना लाल वाळूची चोरटी वाहतूककरीत असल्याचे आढळले. दोन पंचांना बोलावून या छाप्याबाबत माहिती दिली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी लाल वाळू भरून येत असलेला हायवा ट्रक थांबवला. या हायवा चालकाकडे वाळू वाहतुकीच्यापरवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. यातील हायवा चालक आकाश सोपान वाघमारे रा. राजुरा ता. मुखेड आणि मालक मारुती पुंडलिकजंगमवाड रा. राजुरा, ता. मुखेड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकअबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    Read More »
  • मस्साजोग प्रकरणाचा तपास करून दोषींवर  कठोर कारवाईची मागणी

    मुखेड : बिड जिल्हतील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रुर हत्याकरण्यात आली आहे या गंभीर घटनेचा तपास विशेष यंत्रणेद्वारे करुन जो कोणी या प्रकरणाचामास्टरमाईंड, दोषी असेल त्याचा लवकर शोध घेऊन त्याला कठोरातील कठोर शिक्षा देऊन सरपंच संतोषदेशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल अशी मागणी राजमुद्रासामाजिक संघटना व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दिनांक १६ डिसेंबर रोजी तहसीलदारयांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदन सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांच्यावतीने मुखेड तहसिल कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिनपाटील इंगोले, अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर, महाराष्ट्र ग्राहकपंचायत संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावकार बच्चेवार, राजमुद्राचे बालाजी वडजे मसलगेकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सुडके येवतीकर, प्रितम गवाले बावलगावकर, नरेश पाटील इंगोले, योगेशपाटील जाधव, विरभद्र स्वामी केरुरकर, कपिल काठेवाडे, श्रीनिवास पाटील पाळेकर सह आदिंची उपस्थितीहोती.

    Read More »
  • नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक करणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात

    मुखेड प्रतिनिधी:- तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागेवर नोकरी लावण्याचे अमिष दाखूवनएका अधिकाऱ्यासह अन्य सहा जणांवर १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्यासह चौघांना मुंबई येथून आर्थिक गुन्हा शाखेने  आरोपींना अटक केली आहे. विविध विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्यांचागंभीर प्रकार मुखेड तालुक्यात घडला असून गंभीर गुन्हा प्रकरणी ११ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करताच तपास अधिकारीपोलीस उपनिरीक्षक एन. बी. कुंडगीर यांनी लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथील आरोपी रामदास नारायणशिंदे, मुंबई येथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य नियंत्रण विभागात अधिकारी असलेले सरकारी अधिकारी पवनकुमार धर्मा चव्हाण, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील जावेद राजक तांबोळी व निलंगातालुक्यातील कल्पेश रविकांत जाधव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी गोविंद गिरी आणि साक्षीदार व नातेवाईक यांच्याकडून तब्बल १ कोटी १४ लाख रुपये नगदी वफोन– पे च्या साह्याने घेतले असून पैसे पोहोचल्यानंतर बनावट निवड यादी तयार करून फिर्यादीच्यामोबाईल व्हॉट्सअॅपवर पाठवून दिली. सदर यादी बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपलाविश्वासघात आणि फसवणूक केल्याचे लक्षात येताच संबंधितांकडे याबाबत विचारणा केली असतासंबंधितांनी फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गोविंद गिरी रा. दबडेशिरूर ता. मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुरनं ३६९/ २०२४ कलम४२०,४०६,४६५,४६६, ४६७, ५७८, ४७१, ४८३, २९४, ५०७, १२० (ब) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

    Read More »
  • भरदिवसा बंद घर फोडले; ३ लाखाचा  ऐवज लांबविला ! नागरिकात भीतीचे वातावरण

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड शहरातील दीपनगर भागातील एका शिक्षक दाम्पत्याचे बंद घराचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश करतघरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनीचोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे शहरातील मध्यवर्ती भागतील घरात घरफोडी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना११ डिसेंबर रोज बुधवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने श्वानपथकास पाचारण केले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील दीपनगर भागात दादाराव आगलावे यांचे चैतन्य निवास हे घरआहे. दररोजच्या दिनक्रमा प्रमाणे दादाराव आगलावे आणि त्यांची पत्नी सौ. शिला आगलावे हे दोन्हीशिक्षक दाम्पत्य शाळेत कर्तव्यासाठी गेले असता घरी कुणीही नसल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्यानेघराचे कडी कोंडा तोडून भरदिवसा ११ रोजी बुधवारी दुपारी १ वाजता धाडसी चोरी केली आहे. यात घरातील लोखंडी कपाटातील ३५ ग्राम सोन्याचे दागिने नगदी १० हजार रु लंपास केल्याची माहितीसमोर आली आहे. सौ. शीला आगलावे हे शाळेच्या मध्यंतरामध्ये घरी आले आसता घरातील दरवाजे कुलूपकोंडी तुटून दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. मुख्य गेटला कुलूप होते. घरात गेल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले असता त्या क्षणी त्यांना धक्का बसला. दादाराव आगलावेयांनी पोलिस प्रशासनस ही बाब कळवली असता पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, फौजदार चव्हाण यांनीघटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. नांदेड येथील श्वान पथकास पाचारण केले आहे. दादाराव आगलावे यांच्या घरी धाडसी चोरी भरदिवसाझाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सदरील घटनेची सायंकाळी उशिरा मुखेड पोलिसठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

    Read More »
Back to top button