राजकीय
-
‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल्स… नगरसेवकांची सहल जोरात!
▫️निवडणुकीचा फिव्हर: नेते एकत्र, कार्यकर्ते संभ्रमात मुखेड: “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल्स… सगळं ओक्के मध्ये हाय!” या प्रसिद्ध वाक्याची प्रचिती सध्या नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जशी तापू लागली आहे, तसे राजकीय वातावरण चांगलेच रंगले असून, मुखेड शहरातील बहुतांश नगरसेवक सध्या सहलीवर (टूर) गेल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील (महायुती) बहुतांश नगरसेवक सहलीवर गेल्याचे समजते. विशेष म्हणजे, जे नेते आणि नगरसेवक स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असतात, तेच आता निवडणुकीच्या निमित्ताने ‘एकाच गाडीत‘ बसून सहलीचा आनंद घेत आहेत. दुसरीकडे, आपल्या नेत्यांना एकत्र पाहून जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा संभ्रमआणि नाराजी पाहायला मिळत आहे. “नेते एकत्र झाले, पण कार्यकर्त्यांत मात्र दुरावाच राहिला,” अशी भावना सध्या मुखेडच्या राजकीय गल्लीबोळांत ऐकायला मिळत आहे. नगरसेवक सहलीवर असताना शहरात मात्र समस्यांचा डोंगर साचला आहे. मुखेड नगर परिषदेला अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाही. सध्या देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याकडे मुखेडचा अतिरिक्त पदभार आहे, ज्यामुळे प्रशासकीय निर्णयांना विलंब होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.…
Read More » -
मविआच्या ‘त्या’ निर्णयामुळे कार्यकर्ते संतप्त, बंडाची ठिणगी मतपेटीतून उमटणार?
▫️१२५ मतं असलेल्या काँग्रेसला डावलून अवघ्या १३ मतांच्या शिवसेना उबाठा ला झुकते माप; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप. ▫️सव्वाशे मतं असलेल्या काँग्रेस उमेदवाराला ऐनवेळी माघार घेण्याचे आदेश! नांदेड प्रतिनिधी…
Read More » -
नांदेड स्थानिक प्राधिकारी निवडणूक: ५ उमेदवारांची माघार; आता अमरनाथ राजूरकरांसह ३ उमेदवार निवडणूक रिंगणात!
▫️भाजपकडून अमरनाथ राजूरकर तर दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत ▫️अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट; राजकीय घडामोडींना वेग नांदेड प्रतिनिधी…
Read More » -
शेतकऱ्यांची घोर फसवणूक! कर्जमाफीच्या शासन आदेशाची होळी करत किसान सभेचा राज्य सरकारवर तीव्र संताप
▫️आजवरची सर्वात कडक आणि फसवी कर्जमाफी: कॉ. अर्जुन आडे किनवट प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०३ जून २६ निवडणुकी पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि सत्तेत आल्यावर जाचक…
Read More » -
आझाद मैदानावर कामगारांचा एल्गार! सिटूच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांचे ‘आक्रोश ठिय्या आंदोलन’
▫️‘किसान सभा आणि जनवादी महिला संघटनेचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा’ मुंबई,विशेष प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ३ जून २६ मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर आज सिटू च्या नेतृत्वाखाली हजारो फेरीवाले, यंत्रमाग, बिडी आणि औद्योगिक कामगारांनी एकत्र येत ‘आक्रोश ठिय्या आंदोलन‘ केले. १ जूनपासून सुरू झालेल्या या आंदोलनात आज असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांनी प्रचंड संख्येने सहभाग नोंदवला. केंद्र…
Read More » -
नांदेड विधान परिषद निवडणूक: ८ उमेदवारांचे १७ नामांकन अर्ज दाखल!
▫️द्विवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट; राजकीय वर्तुळात गदारोळ, प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला. नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २ जून २६ महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या…
Read More » -
नेते बदलले, पक्ष बदलले, पण आडनावं तीच! नांदेडच्या राजकारणातील घराणेशाहीवर निष्ठावंतांचा हल्लाबोल
▫️राजकारणात घराणेशाही कायम; निष्ठावंत कार्यकर्ते केवळ टाळ्या वाजवण्यासाठीच काय? नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २१ मे २६ पक्ष कोणताही असो, निवडणूक कोणतीही असो; तिकीट आणि सत्ता मात्र त्याच ठराविक घराण्यां भोवती फिरत असल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा उघड झालं आहे. गेल्या अनेक दशकां…
Read More » -
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शिवसेना ॲक्शन मोडवर; पक्ष संघटना बळकटीकरणासाठी शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!
▫️मुखेड-कंधार मतदारसंघाच्या मतदार यादी पुनर्रचना प्रक्रियेचा सविस्तर आढावा; बूथ स्तरापर्यंत समन्वय मजबूत करण्यावर भर नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २०…
Read More » -
संतोषदादा बांगर यांना मंत्रिपद मिळणे ही काळाची गरज; शहरप्रमुख बजरंग कल्याणे यांची डरकाळी!
▫️जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान द्या; शिवसैनिकांसह जनसामान्यांची आग्रही मागणी! मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १६ मे २६…
Read More » -
हिमायतनगरची सुरक्षा रामभरोसे? सीसीटीव्ही बसवण्यासाठी नगरपंचायत व पोलिसांना साकडे
▫️ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेचा पुढाकार; शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत हिमायतनगर श्रमिक एकता न्यूज़ (प्रतिनिधी): अजीम हिंदुस्तानी हिमायतनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी शहरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, या मागणीसाठी ‘ऑल…
Read More »