Uncategorized

युवा उद्योजक राहुल नावंदे यांच्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

मुखेड/प्रतिनिधी ३१ ऑगस्ट

कंधार तालुक्यातील दिग्रस बुयेथील युवा उद्योजक तथा बसव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ नावंदे हे नेहमीच ह्या ना त्या चांगल्या कारणांनी चर्चेत असतातत्यांच्या सामाजिक कार्याची नोंदयेथील जनता घेत असून त्यांच्या समाज कार्याला आणखीन एका गोष्टी मुळे चर्चेला उधाण आले आहे.

राहुल भाऊ नावंदे यांचे आजोबा लिंगैक्यमारोती शंकर नावंदे यांच्या पुण्य स्मरणार्थ शनिवार दि ३० ऑगस्ट रोजी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सद्‌गुरू गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.ब्र१०८ सद्गुरु गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकरयुवाउद्योजक राहुल भाऊ नावंदेसह बसव फाउंडेशन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बाहेरून आलेले मान्यवरइतर पदाधिकारीकार्यकर्ते गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतेमुखेड – कंधारमतदार संघातील ग्रामिण गोरगरीब गरजू रुग्णांना या रुग्णवाहिकेचा पुढील उपचारासाठी चांगलाच लाभ होणार असून सामान्य नागरिकांकडून राहुल भाऊ नावंदे यांचे सर्व स्तरातून मोठे कौतुक केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button