Sharmik Ekta
-
क्राईम
मुखेडमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा हातोडा! १३ हजारांची रोकड आणि ८ दुचाकी जप्त; ८ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल
◽️सूतगिरणीच्या पाठीमागे रंगला होता डाव; मुखेड पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई! मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ जून २६ तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मुखेड पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलत एक मोठी कारवाई केली आहे. मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरब खंडगाव येथे सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी ८ जुगाऱ्यांना रंगेहात पकडत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटना स्थळावरून जुगाराचे साहित्य, १३ हजारांची रोकड आणि तब्बल ५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली असाएकूण ५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
Read More » -
क्राईम
हिमायतनगरमध्ये ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; ११ लाख १५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!
हिमायतनगर प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ १८ जून २६ नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन‘ अंतर्गत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला, जर्दा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ११ लाख १५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन‘ अंतर्गत स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना आदेश दिले होते. या आदेशानुसार, पोलीस…
Read More » -
राजकीय
जनतेचे प्रश्न ऐरणीवर; महाराष्ट्रात मात्र नेत्यांचा सत्तेचा घोडेबाजार जोरात! बळीराजा, तरुण आणि सामान्य जनता वाऱ्यावर
▫️बळीराजा हवालदिल; शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट! ▫️पदव्या हातात, पण काम नाही; तरुण रोजगारासाठी वणवण! मुखेड विशेष प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १७…
Read More » -
राजकीय
ठाकरे गटात मोठा भूकंप! ‘ऑपरेशन टायगर’मुळे ६ खासदारांचे बंड; संजय राऊतांचा संताप अनावर, शिवराळ भाषेत हल्लाबोल
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १७ जून २६ गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात आले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला लोकसभेत फार मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘मशाल‘ चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारां पैकी तब्बल ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचे वृत्त समोर आले आहे. येत्या १९ जूनला, म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापन दिनी हेबंडखोर खासदार आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत, लोकसभेचे गटनेते अरविंद…
Read More » -
प्रभारी राजच्या विळख्यात मुखेड तालुका; विकासाचा गाडा रुतला;एकाच खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या
मुखेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १७ जून २६ नांदेड जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या मुखेड तालुक्यात सध्या प्रशासकीय अनागोंदीचा कळस गाठला गेला आहे. अनेक महत्त्वाच्या विभागांमधील प्रमुख पदे रिक्त असल्याने ‘प्रभारी राज‘ सुरू झाले असून, याचा थेट फटका तालुक्यातील विकासकामांना आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे. तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काहींची बदली झाली आहे. ही रिक्त पदे भरण्या ऐवजी शासनाने उपलब्ध अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त पदभार सोपवला आहे. आधीच एका विभागाचा डोलारा सांभाळताना दमछाक होत असलेल्या अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या कार्यालयाची सूत्रे दिल्याने कोणत्याही एका विभागाला पूर्ण न्याय देता येत नाहीये. यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता धोक्यात आली असून तातडीच्या निर्णयांना विलंब होत आहे. नांदेड जिल्ह्यातील एकमेव १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे आहे, मात्र येथील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. डॉ. बालाजी आदमपूरकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने आरोग्यव्यवस्थेवर ताण येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असताना पूर्णवेळ…
Read More » -
क्राईम
मे. तोष्णीवाल मेडिकलवर प्रशासनाचा बडगा; औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत मोठी कारवाई!
नांदेड प्रतिनिधी:-श्रमिक एकता न्यूज़ १६ जून २६ नांदेड शहरातील मे. तोष्णीवाल मेडिकल्स, डॉक्टर्स लेन, नांदेड या पेढीकडून मुदतबाहय औषधाची डॉक्टराच्या चिठठी शिवाय, फार्मासिस्टचे गैरहजेरी मध्ये, विना बिलांने विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरील पेढीविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या खालील नियम १९४५ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठठी शिवाय फार्मासिस्टचे गैरहजेरी मध्ये विना बिलाने औषधाची विक्री करू नये. डॉक्टराच्या चिठठीवरील औषधी विक्री करतेवेळी विक्री करण्यात येत असलेल्या औषधाचा तपशील व औषधावर नमूद तपशील यामध्ये तफावत आढळून येणार नाही याची त्यांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी. मुदतबाहय औषधांचे सेवनामुळे रूग्णांचे आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मुदतबाहय औषधी विक्री होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आवाहन सर्व औषधी विक्रेत्यांना करण्यात आले आहे. सर्व औषध विक्रेत्यांनी सतर्क राहून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम १९४५ चे पालन करूनच औषधांची विक्री करावी. कायद्याचे उल्लघंन झाल्यास किंवा त्यांचे…
Read More » -
क्राईम
आंबुलगा सेवा सहकार सोसायटीत सेक्रेटरीचा अजब कारभार! संचालकांना अंधारात ठेवून ठरावावर घेतल्या सह्या; मुखेड सहाय्यक निबंधकांकडे तक्रार
▫️कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून ‘अज्ञानपणाचा’ फायदा! ▫️बाजार समितीच्या सभापतींच्याच गावात अंधेर नगरी? ▫️निबंधक कारवाई करणार की अर्ज लालफितीत अडकणार? मुखेड…
Read More » -
शहर
कासार समाजातील तरुणाची उत्तुंग भरारी! डॉ. बिलाल हैदर परदेशी यांचे वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण
▫️डॉक्टर बनून समाजाच्या आणि कुटुंबाच्या आशा-आकांक्षा केल्या पूर्ण; सर्वत्र कौतुक मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज १५ जून २६ मुखेड येथील…
Read More » -
महाराष्ट्र
पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
▫️इरफान ठरला देवदूत! पहिली विहिरीत उडी मारून ५ जणांचा जीव वाचवला मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १५ जून २६ सोलापूरच्या पंढरपुरातून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. सोलापूरच्या म्हसवड– पंढरपूरमार्गावर तांदूळवाडी गावाजवळ टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचेआहेत. या भीषण अपघातानंतर संपूर्ण पंढरपुरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड–पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवरकाळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक एका विहिरीत टेम्पो कोसळला. टेम्पो कोसळून भीषण अपघातात ८ जणांचामृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरुषांसहित महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे. नेमक्या ह्याच वेळी तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरून येत होता. टेम्पो पाण्यात पडल्याचे पाहून त्याने तातडीने गावात मदतीसाठी फोन केले. याचवेळी एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचे पाहून तात्काळ इरफानने पाण्यात उडी घेतली आणि या चिमूरड्याला छातीशी धरून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. विहिरीत उडी मारल्यानंतर पाण्यात हालचाल दिसल्यावर आधी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांनाही इरफानने ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढलं. इरफानने पाच जणांचे जीव वाचवले तर दोन पुरुष पोहून बाहेर आले. मात्र, हा टेम्पो विहिरीत खाली उलट्या बाजूने पडल्याने टेम्पोच्या आतमध्ये…
Read More » -
राजकीय
नांदेडात काळ्या पाण्याची शिक्षा, गोव्यात नगरसेवकांची ‘मौज’; लोकशाहीची लाज वेशीवर टांगली!
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १५ जून २६ “जनतेने मत दिलंय ना? मग आता मरा घाणीच्या पाण्यात!” बहुदा नांदेडच्या नगरसेवकांचा जनतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच असावा, असे चित्र सध्या नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या गणितात गुंग झालेले आणि स्वतःला ‘जनतेचे सेवक‘ म्हणवून घेणारे नगरसेवक सध्या गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर निळ्या पाण्याच्या लाटांवर स्वार झाले आहेत; तर दुसरीकडे त्यांनीच वाऱ्यावर सोडलेली नांदेडची जनता नळातून येणाऱ्या गटारीच्या काळ्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याशी जीवघेणा संघर्ष करत आहे. नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पाणी नाही, तर थेट गटारीचा चिखल येत आहे. लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण याच दूषित पाण्यामुळे आजाराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अनेक कुटुंबांना विकतचे पाणी घेण्याची किंवा आरोग्याशी तडजोड करण्याची वेळ आली आहे. महापालिका आणि पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेत आहे आणि लोकप्रतिनिधींना या नरकयातनेची साधी लाजही उरलेली नाही, असा तीव्र संताप नागरिक व्यक्त करत आहेत. शहरात पाण्याचा हाहाकार माजलेला असताना, विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नगरसेवकांना ‘फाइव्ह स्टार‘ सहलीवर (टूर) रवाना करण्यात आले आहे. गोवा आणि कोकणातील आलिशान हॉटेल्समध्ये हे लोकप्रतिनिधी जनतेच्या पैशांवर मौजमजाकरत असल्याची जोरदार चर्चा आहे. या संतापजनक परिस्थितीवर नांदेडकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट हल्ला चढवला आहे. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर “प्रभागात…
Read More »