Sharmik Ekta
-
क्राईम
अहमदपूर-अंबेजोगाई रस्त्यावर भीषण अपघात; बुलेटस्वार तरुण जागीच ठार
अहमदपूर :- ११ मे २६ अहमदपूर-अंबेजोगाई रस्त्यावरील भागीरथी फार्म हाऊस जवळ आज सायंकाळी कार आणि बुलेटचा भीषण अपघात झाला. या…
Read More » -
संपादकीय
कलम आणि कायद्याचा बुलंद आवाज : ॲड. संदीप अण्णा कामशेट्टे
पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून तो समाजाचा आरसा आहे. हा आरसा स्वच्छ ठेवण्याचे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम जे मोजके लोक निष्ठेने करतात, त्यामध्ये ‘दैनिक पुण्यनगरी‘चे तालुका प्रतिनिधी ॲड. संदीप अण्णा कामशेट्टे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा छोटासा आढावा. संदीप अण्णा हे केवळ एक पत्रकार नाहीत, तर ते कायद्याचे जाणकार (एडव्होकेट) देखील आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कायदेशीर ज्ञानामुळे त्यांच्या बातम्यांमध्ये एक वेगळीच खोली आणि अचूक ताजाणवते. अन्यायाविरुद्ध लढताना कायद्याची ढाल आणि लेखणीची तलवार कशी वापरावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णांची कार्यशैली होय. तालुका प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी कधीही सत्तेसमोर गुडघे टेकले नाहीत. मग तो प्रश्न लेडीचा असो रेल्वेचा व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा असो, गावातील रस्त्यांचा असो किंवा सर्वसामान्यांच्या नागरी सुविधांचा; अण्णांनी नेहमीच आपल्या लेखणीतून प्रशासनाला जाब विचारला आहे. ‘पुण्यनगरी‘च्यामाध्यमातून त्यांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर न राहता, मार्गी लागेपर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आहे. कामाच्या व्यापातही संदीप अण्णांनी माणसे जोडण्याचे कसब जपले आहे. ‘अण्णा‘ या नावाला साजेसात्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मदतीला धावून जाणारा आहे. नव्या दमाच्या पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचा थेट संपर्क असून, लोकांच्या सुख–दुःखातते नेहमी हिरीरीने सहभागी होतात.…
Read More » -
सामाजिक
मुखेडमध्ये हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० मे २६ मेवाडचे सुपुत्र आणि अदम्य साहसाचे प्रतीक असलेले हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची ४८६ वी जयंती मुखेड शहरात अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यातआली. दि. ९ मे २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून मुखेड मधील सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अरुणसिंह राजासिंह चौव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक एकतेचा संदेश देत महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले.…
Read More » -
सामाजिक
डॉ. दिलीप पुंडे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीवर निवड
▫️सर्पदंश प्रतिबंधासाठी डॉ. दिलीप पुंडे आता देणार केंद्र सरकारला सल्ला; मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०९ मे…
Read More » -
सामाजिक
मोजे.होकर्णा येथे क्रांती सुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी
मुखेड/प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ८ मे २६मोजे.होकर्णा येथे वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक, लोकशाहीचे जनक क्रांती सुर्य जगत ज्योती,…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचे रॅकेट? चीन, अमेरिकेसह परदेशातून आणलेला साठा पोलिसांच्या जाळ्यात!
▫️वजीराबाद हद्दीत पोलिसांचा मोठा छापा ४३ लाखांचा शस्त्रसाठा जप्त; ४,७९६ तलवारी अन् खंजीर पकडले! नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ७ मे २६ नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या अवैध शस्त्र तस्करीवर मोठा प्रहार केला आहे. वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या एका धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ हजार ७९६ विविध प्रकारची धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. या शस्त्रांची बाजारपेठीय किंमत अंदाजे ४३ लाख ४८ हजार रुपये असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना खबऱ्यामार्फत शहरातील वजीराबाद हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चिंचोलकर यांनी आपल्या पथकासह बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा परिसरात सापळा रचून छापेमारी केली.…
Read More » -
क्राईम
नवऱ्याला शॉक देऊन ठार मारणाऱ्या बायकोला जन्मठेपेची शिक्षा !
▫️भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पत्नी आम्रपाली हैबतेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा भोकर प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०७ मे २६ चारित्र्यावर संशय घेतल्याच्या रागातून विजेचा शॉक देऊन पतीची हत्या करणाऱ्या पत्नीस भोकरच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी आम्रपाली भीमराव हैबते (रा. तळेगाव, ता. उमरी) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने पती भीमराव नागोराव हैबते यांची विजेचा शॉक देऊन हत्या केल्याचे कोर्टात सिद्ध झाले. १५ जून २०१९ रोजी भीमराव हैबते हे नशेत घरी येऊन झोपले होते. त्यावेळी आरोपी आम्रपाली हिने घरातील विद्युत तारांच्या मदतीने बाजेवर झोपलेल्या पतीला विजेचा शॉक देत त्यांची हत्या केली. त्यानंतर पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव तिने रचला होता. मात्र, नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी विचारणा केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. मृत्यूबाबत शंका निर्माण झाल्याने मयताच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्टात नऊ साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळाचे…
Read More » -
सामाजिक
प्रभाग क्र. ०९ मधील नादुरुस्त हातपंप तातडीने दुरुस्त करा
▫️शेतकरी कामगार पक्षाची मुख्याधिकारीकडे मागणी मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ६ मे २६ मुखेड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर (प्रभाग क्र. ०९) येथील सार्वजनिक हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद इब्राहिमसाब बल्खी यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद मुखेड यांना लेखी निवेदन दिले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरात पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. प्रभागातील अनेक नागरिक, विशेषतः महिला, पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरे इतर वापरासाठी याच हातपंपावर अवलंबून…
Read More » -
क्राईम
महसूल प्रशासनाच्या नाकाखाली रेती माफियांचा नंगानाच; तक्रारीनंतरही मुखेड तहसील समोरून अवैध वाहतूक सुरूच!
◽️नूतन तहसीलदार विकास हे ‘सिंघम’ स्टाईलने कारवाई करणार का? मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ५ मे २६ मुजोर रेती माफियांनी मुखेड महसूल प्रशासनाला जणू काही गृहीतच धरले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी चक्क मुखेड तहसील कार्यालया समोरून क्षमतेपेक्षा जास्त(ओव्हरलोड) अवैध रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी अनेक तक्रारी होऊन आणि बातम्या प्रकाशित होऊनही या प्रकाराला आळा बसलेला नाही. त्यामुळे आता नूतन…
Read More » -
क्राईम
बाप की हैवान! पोटच्या मतीमंद लेकीवर अत्याचार करणारा नराधम बाप जेरबंद; जळकोट हादरले!
लातूर/ जळकोट :- श्रमिक एकता न्यूज़ ४ मे २६ रक्षणकर्ताच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा माणुसकी नेमकी कुठे शोधावी? असा संतप्त सवाल जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील घटनेने उपस्थित केला आहे. एका मतीमंद अल्पवयीन मुलीची हतबलता पाहून तिचा सांभाळ करण्याऐवजी, तिच्यावर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या तिच्या सख्ख्या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाच्या कृत्यामुळे ती निष्पाप मुलगी आता १९ आठवड्यांची गरोदर असून, या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जन्मतःच मतीमंद आहे. तिला जगाची समज नाही, स्वतःची व्यथा मांडता येत नाही, याचाच फायदा या नराधम बापाने घेतला. माहे डिसेंबर २०२५ पासून तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता. पोटच्या पोरीला त्याने आपल्या वासनेची शिकार बनवले. जेव्हा मुलीच्या शरीरातील बदलांमुळे ती गरोदर असल्याचे उघड झाले, तेव्हा पीडितेच्या आईने दिनांक १७/०४/२०२६ रोजी रात्री २३.०० वाजता जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीला गुन्हा अज्ञात व्यक्ती विरुद्ध दाखल झाला होता, मात्र तपासात समोर आलेले सत्य ऐकून संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.…
Read More »