Sharmik Ekta
-
संपादकीय
रमजान ईद : आत्मशुद्धीपासून सामाजिक एकतेकडे जाणारा प्रवास
मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २१ मार्च २६ (संपादकीय विशेष लेख) रमजान ईद, ज्याला ईद–उल–फित्र म्हणूनही ओळखले जाते, हा इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणिपवित्र सण आहे. संपूर्ण महिनाभर चाललेल्या रमजानच्या उपवासानंतर येणारा हा सण केवळ आनंदाचा नसून, तो आत्मशुद्धी, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. रमजान ईद म्हणजे आनंद, उत्साह आणि उत्सवाचा दिवस — पण त्यामागे दडलेला संदेश अधिक गहिरा आणि विचार करायला लावणारा आहे. महिना भराच्या कठोर साधनेनंतर येणारा हा सण माणसालाकेवळ धार्मिकतेकडेच नाही, तर माणुसकीकडेही नेतो. रमजान हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर आत्मसंयम, शिस्त आणि आत्मपरीक्षणाचा काळ आहे. दिवसातून अनेक वेळा प्रार्थना, गरीब–गरजूंना मदत, वाईट सवयींपासून दूर राहणे — या सर्व गोष्टींचा सराव रमजान मध्ये केला जातो. त्यामुळे ईद हा त्या साधनेचा आनंदोत्सव ठरतो. ईदचा खरा अर्थ “परत येणे” असा आहे — चांगुलपणाकडे, प्रामाणिकपणाकडे आणि सहानुभूतीकडे परत येणे. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात माणूस अनेकदा स्वतःपासून आणि समाजा…
Read More » -
सामाजिक
चिमुकली फातेमा धुंदीचा पहिलाच रोजा; कुटुंबात अभिमानाचा क्षण
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० मार्च २६ रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर अवघ्या ६ वर्षांच्या फातेमा मुजीब धुंदी हिने आपल्याआयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. लहान वयातच तिनेदाखवलेली श्रद्धा आणि संयम सर्वांसाठी कौतुकास्पद ठरत आहे. फातेमा ही भाजपचे युवा नेते खाजा धुंदी यांची पुतणी असून, तिच्या या पहिल्या रोज्याबद्दल कुटुंबातआनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडूनतिचे कौतुक करण्यात येत आहे. रमजान महिन्यातील रोजा हा केवळ उपवास नसून संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा आहे. फातेमाने इतक्या लहान वयात हा अनुभव घेतल्याने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजोबा करीमसाब धुंदी व वडील मुजीब धुंदी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.
Read More » -
सामाजिक
लातूर रोड-मुखेड-बोधन रेल्वे मार्गासाठी रेल्वे संघर्ष समिती आक्रमक; आमदार तुषार राठोड यांना दिले निवेदन
▫️रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणू”; आमदार तुषार राठोड यांचेआश्वासन मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १९ मार्च २६ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड – मुखेड – बिलोली – बोधन या १३४ कि.मी.च्यारेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे संघर्ष समितीने आता कंबर कसली आहे. या संदर्भात आज दि १९ मार्च रोजी समितीच्या शिष्टमंडळाने मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार गोविंदराव राठोडयांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. रामगुंडम ते कुर्डूवाडी या निजामकालीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले असून, बोधन पर्यंत पूर्वेकडे व लातूर रोड…
Read More » -
सामाजिक
प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची उदासीनता; सलगरा-बेटमोगरा रस्ता बनला मृत्यूचा सापळा!
▫️सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या केराची टोपली मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ मार्च २६ तालुक्यातील सलगरा ते बेटमोगरा या दरम्यानचा रस्ता सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशा भीषण अवस्थेत असून प्रवाशांसाठी तो ‘जीवघेणा‘ ठरत आहे. विशेष म्हणजे, बेटमोगरा हे गाव तालुक्याचे नेतृत्व केलेल्या एका माजी आमदारांचे गाव असतानाही, या मार्गाचे नशीब अद्याप उघडले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. ज्या गावाने तालुक्याला आमदार दिले, त्या गावाचा मुख्य रस्ताच जर चिखल आणि खड्ड्यांच्या साम्राज्यात अडकला असेल, तर इतर गावांची काय अवस्था असेल? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी सत्तेत असताना आणि सत्ता गेल्यावरही या महत्त्वाच्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षकेल्याचा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत.…
Read More » -
राजकीय
लातूर रोड-बोधन’ रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी द्या आणि निधी वितरित करा; खासदार रवींद्र चव्हाणयांची संसदेत आग्रही मागणी
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ मार्च २६ नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी संसदेत मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नावर आवाज उठवत, लातूर रोड – जळकोट – मुखेड – बोधन या नवीन रेल्वे मार्गाला तातडीने प्रशासकीय मंजुरी…
Read More » -
सामाजिक
लातूर रोड–बोधन रेल्वेसाठी मुखेडात रणशिंग! संघर्ष समितीचा एल्गार; अध्यक्षपदी दिलीप कोडगिरे यांची निवड
▫️”मुखेड रेल्वे संघर्ष समितीचा ‘हुंकार‘; आता लढा थेट दिल्लीपर्यंत!” मुखेड: (प्रतिनिधी) श्रमिक एकता न्यूज़ १८ मार्च २६ गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गासाठी आता आर–पारची लढाई लढण्याचा निर्धार मुखेडकरांनी केला आहे. मंगळवार, १७ मार्च२०२६ रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या निर्णायक बैठकीत रेल्वे संघर्ष समितीचीघोषणा करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप श्रीराम कोडगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आता रेल्वेच्या लढ्याला नवी धारचढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारण बाजूला, आता केवळ विकास!…
Read More » -
सामाजिक
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड
नांदेड दि. १६ मार्च २६ महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा…
Read More » -
सामाजिक
मुखेड तालुक्यातील जांब येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ समाधान शिबिर उत्साहात संपन्न; नागरिकांच्या समस्यांचे जागीच निवारण
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ दि १४ मार्च २६ शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर‘ टप्पा क्र. १ अंतर्गत, मुखेड तालुक्यातील जांब बु. येथील जिल्हा परिषद शाळेत आज दि. १४ मार्च २०२६ रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महसूल आणि इतर विभागांमार्फत नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करून त्यांच्या तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी प्रमोद बिराजदार यांनी केले. यावेळी मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अकृषिक (NA) परवानगी रद्दकरण्याबाबतच्या अद्ययावत सुधारणा आणि एकवेळचे अधिमुल्य भरण्याच्या नवीन व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना‘ आणि जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या नियमावलीवरही त्यांनी प्रकाश टाकला. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ त्वरित देण्यात आला. यामध्ये ७/१२ अभिलेखांमधील दुरुस्ती करून नवीन ७/१२ वाटप करण्यात आले.…
Read More » -
संपादकीय
सोशल मीडियाचे ‘मायाजाल’: महाराष्ट्रातही लहान मुलांवर बंदीची गरज आहे का?
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ मार्च २६ विशेष लेख: सोशल मीडिया आणि बालपण आजचे युग हे डिजिटल युग आहे. हातातील स्मार्टफोन आणि त्यात असलेले सोशल मीडियाचे अथांगविश्व यात आजची पिढी पूर्णपणे गुंतलेली दिसते. नुकतेच आपल्या शेजारील आंध्र प्रदेश सरकारने १३ वर्षांखालील आणि कर्नाटक सरकारने…
Read More » -
सामाजिक
कुटुंब व्यवस्थेचे जतन झाले तरच जीवनाची मूल्य टिकतील– युवराज पाटील
▫️मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प संपन्न मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ दि १३ मार्च २६ एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे…
Read More »