Sharmik Ekta
-
सामाजिक
मुखेड कोर्टासमोर रस्त्यावरच चालतेय बेकायदेशीर दुचाकी दुकान; नरसी रोडवर अतिक्रमणाने नागरिक त्रस्त
मुखेड -(ता. प्रतिनिधी) ०९ ऑगस्ट २५ नरसी रोडवरील कोर्टासमोरील रस्त्यावर हिब्बटकर यांचे मोटारसायकल व पिचकारी दुरुस्तीचे दुकान बेकायदेशीरपणे रस्त्यावर थाटले गेले असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दुकानातून रस्त्यावरच मोटार सायकलींची दुरुस्ती आणि पिचकारी फवारणीचे काम केले जात असल्याने सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरून ये–जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास होत असून, अपघाताचेही धोके वाढले आहेत. विशेष म्हणजे सदर दुकानदार हे कोर्टा समोरच दुकान थाटून आवाजाने व फवारणीतून निर्माण होणाऱ्याध्वनी आणि रासायनिक प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शासकीय कार्यालये, इंग्रजी माध्यमाची शाळा आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी करूनही अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे“, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Read More » -
शैक्षणिक
रक्षाबंधन निमित्त जि.प.मुलींचे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी पाठवल्या ५०० राख्या.
▫️”माझी शाळा माझे उपक्रम” अतंर्गत विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या व भेटकार्ड पत्र,शुभेच्छा संदेश. मुखेड / प्रतिनिधी. दि.०९ ऑगस्ट २५ शहरातील…
Read More » -
क्राईम
प्रवासी युवका कडून महिला वाहकाला मारहाण;गुन्हा दाखल
मुखेड प्रतिनिधी:- ०८ ऑगस्ट २५ तिकिटाचे चिल्लर पैसे मागितले म्हणून प्रवाशाने एस टी. महिला कंडक्टरला शिवीगाळ करत थापड मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुखेड ते शिरूर बसमध्ये घडली. घटनेबाबत शिरूर आगारातील महिला वाहक महेश्वरी एकलारे वय (५०) मुखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विजय बापूराव वाघमारे रा. बावनवाडी यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार महेश्वरी एकलारे या शिरूर आगारात गेल्या २२ वर्षांपासून एस.टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी…
Read More » -
आरोग्य
पिसाळलेला कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दुध प्यायलेल्या १८२ ग्रामस्थांनी भीतीपोटी रुग्णालयात घेतली रेबीज लस
मुखेड प्रतिनिधी:-०७ ऑगस्ट २५मुखेड लुक्यातील बिल्लाळी येथील शेतकरी रामदास किशन इंगळे यांच्या म्हशीचा पिसाळलेले कु्त्रा चावल्याने मृत्यू झाला होता .…
Read More » -
आरोग्य
मुखेड शहरात “अंगदान जीवन संजीवनी” अभियान अंतर्गत जनजागृती रॅली संपन्न
मुखेड प्रतिनिधी:- ७ ऑगस्ट २५ महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्य भरात ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पावडे,नोडलअधिकारी डॉ. हनुमंत पाटील, व डॉ. बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषटांकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे दि ५ ऑगस्ट रोजी अंगदान जीवन–संजीवनी अभियान अंतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतामध्ये पहिले हृदयप्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो .हाउद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मेकेवाड, डॉ. गोपुलवाड, डॉ. शेटवाड, उपस्थित होते. व वरिष्ठलिपीक,माधव तोटावाड , RKSK समुपदेशक शौकत अली बेग व NCD समुपदेशक, शेख शहानवाज,NCD…
Read More » -
आर्थिक
रेल्वेने १८ किलोमीटर फरफटत नेला मृतदेह इस्लामपूर ते हिमायतनगर लोहमार्गावरील घटना
हिमायतनगर प्रतिनिधी:- ०७ ऑगस्ट २५ धावत्या रेल्वेमध्ये उतरायचा प्रयत्न करत असलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा…
Read More » -
राजकीय
मुखेड येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा जिल्हा समितीचे चौथे अधिवेशन उत्साहात पार पडले
मुखेड प्रतिनिधी:- ७ ऑगस्ट २५ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाचे नांदेड जिल्हा समितीचे चौथे जिल्हा अधिवेशन मुखेड येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात सवार्नुमते महत्वाचे ठराव पारित करण्यात आले. शेतमजुर, कामगारव मजुरांचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच १३ सदस्यीय जिल्हा समितीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ. अंकुश अंबुलगेकर यांची तर जिल्हा सचिवपदी कॉ. मंजुश्री कबाडे यांची पुनर्निवड करण्यात आली. मुखेड येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या नांदेड जिल्हा अधिवेशनाच्या मंचास कॉ. सुभाष थोरात यांचे तर सभागृहास कॉ. उत्तम पुंडगे यांचे नाव देण्यात आले. लाल बावटाचे जिल्हाध्यक्ष कॉ. अंकुश अंबुलगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात करण्यातआली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हासचिव कॉ. मंजुश्री कबाडे यांनी केले. अधिवेशनाचे उदघाटन शेतमजुर युनियनचे राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे यांनी केले याप्रसंगी राज्यसमिती सदस्य कॉ. भगवानकोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉ. अंकुश अंबुलगेकर, कॉ. रुक्मिनताई घुळेकर, कॉ. शहादत धुंदीयांच्या अध्यक्ष मंडळाने अधिवेशनाचे कामकाज पाहिले. स्टीअरिंग कमिटीमध्ये कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. मंजुश्री कबाडे हे होते. कॉ. लक्ष्मण भोकसखेडे, कॉ. रामराव यामावाड यांची मिनिट्स कमिटी होती. अधिवेशनात जिल्हा सचिव कॉ. मंजुश्री कबाडे यांनी मागील तीन वर्षांचा राजकीय, संघटनात्मक वकार्यात्मक अहवाल मांडला व तो सर्वांसमोर पारित झाला. अधिवेशनात खालील महत्वाचे ठराव पारितकरण्यात आले यामध्ये गायरान जमीन, वन जमीन व इतर जमिनीवरील कसण्मैया दलित, आदिवासीतसेच इतर भुमीहीनांच्या नावे जमीन झाली पाहिजे आणी बेघरांना घरे बांधण्यासाठी प्लॉट मिळाले पाहिजे करिता संघर्ष उभारणे, युनियनचे अस्तित्व असलेल्या प्रत्येक गावात मनरेगा अंतर्गत रोहयोचे कामसुरू करणे व इतर गावांमध्ये त्या आधारे युनियनचा विस्तार करणे, महिला, दलित व आदिवासीयांच्यासोबतच्या भेदाभेद व इतर स्वरूपाच्या अत्याचाराविरु द्ध लढणे, शेतमजुरांच्या बरोबरीने इतरग्रामीण मजुरांना युनियनच्या झेंड्याखाली संघटित करणे, बांधकाम कामगार व ऊसतोड कामगारांमध्ये विशेषत्वाने युनियन मजबूत करणे या ठरावाच्या आधारे पुढील काळात शेतमजूर व ग्रामीण मजुरांचासंघर्ष तीव्र करण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला. जिल्हा अधिवेशनात १३ सदस्यांची जिल्हासमिती निवडण्यात आली. राज्यधिवेशनासाठी एकूण १५ प्रतिनिधी व ०५ निरीक्षक निवडण्यात आले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. अकबर सय्यद, मुखेड तालुका सचिव कॉ. शहादत धुंदी, कॉ. प्रदीप देशटवाड यांनी विशेष परिश्रम घेतले तर कॉ. लक्ष्मण भोकसखेडे, कॉ. रामराव यामावाड, कॉ. अंबादास…
Read More » -
राजकीय
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा
नांदेड प्रतिनिधी:- ०६ ऑगस्ट २५ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुधवरी 6 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी…
Read More » -
Uncategorized
नवीन प्रभाग रचना, OBC आरक्षणासह होणार महापालिका निवडणुकाः सर्वोच्च न्यायालयाचा मोठानिर्णय
▫️२७ टक्के ओबीसी आरक्षणासह होणार निवडणुका ▫️सर्व निवडणुका नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घ्याव्यात ▫️प्रभाग रचना निश्चित करणे हा राज्याचा अधिकार मुंबई:- ०४ ऑगस्ट २५ सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग (वॉर्ड) रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावत, निवडणुकांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि २७ टक्के ओबीसी आरक्षणासह होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेरमोकळा झाला आहे. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. काही स्थानिक घटकांनी नव्या रचनेतील बदलांवर आक्षेप घेतले होते. मात्र, आज न्यायालयाने यायाचिका फेटाळत राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्का मोर्तब केले. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नव्या प्रभाग बांधणीच्या आधारे निवडणुका घेण्याचामार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका देखील सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली. या याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आमच्या ६ मे२०२५ च्या आदेशानुसार २७% ओबीसी आरक्षणा नुसारच निवडणुका घेण्यात येतील. तसेच वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्य विधिमंडळाने तसा कायदा केला आहेआणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहे, असेही सर्वोच्चन्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी प्रभाग रचना की जुनी प्रभाग रचना याविषयी वाद सुरू होता. महाविकास आघाडीच्या काळात प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आलेहोते. त्यानंतर शिंदे– फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा त्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आले. मात्र, वॉर्ड रचना कशी असावी याचा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे, त्यानुसार प्रभाग रचना होईल. जी प्रभाग रचना राज्य सरकार ठरवेल त्यानुसारच निवडणुका होईल, असे आज सर्वोच्च न्यायालयाने…
Read More » -
क्राईम
पिंपळगावजवळील लॉजमध्ये कंधारच्या शिक्षकाचा मृतदेह आढळला
आत्महत्या की हत्या? – याचा तपास अर्धापूर पोलीस करत आहेत. ३ ऑगस्ट २०२५ | अर्धापूर (नांदेड) नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात खाजगी संस्थेवर कार्यरत शिक्षकाचा अर्धापूर तालुक्यातीलपिंपळगाव महादेव पाटीजवळ एका लॉजमध्ये आज सकाळी ११ वाजता मृतदेह आढळून आल्याने एकचखळबळ उडाली आहे. आशिष भाऊसाहेब शिंदे (रा. गुंटूर ता. कंधार) असे मृत शिक्षकाचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिंदे हे कंधार तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी लॉजच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा बराच वेळ न उघडल्याचे लक्षात येताच त्यांनी अर्धापूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडून पाहणी केली असता, शिंदेमृतावस्थेत आढळून आले. पोलिस निरीक्षक संजय कदम, भानुदास राठोड, रामेश्वर गुळेदवार आणि अरुण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी तपास केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदना…
Read More »