Sharmik Ekta

  • शैक्षणिक

    मुखेड शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलची दयनीय अवस्था

     ▫️मैदान झाले मुतारी, घाणीमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर गदा ▫️शाळेच्या मैदानाचा ‘शौचालय’ म्हणून वापर  ▫️अतिक्रमणात अडकली ‘पीएमश्री’ शाळा ▫️त्वरित उपाययोजना करा, पालकांची मागणी मुखेड प्रतिनिधी:- २६ जुलै २५ मुखेड शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल ही शाळा शिक्षणाच्या दृष्टीने ‘पीएमश्री’ योजनेतील प्रगतशाळां पैकी एक मानली जाते. शाळेत आधुनिक सुविधा, नवी इमारत, दर्जेदार साहित्य, उपकरणे आणिभव्य मैदान असूनही वास्तवात मात्र या शाळेतील विद्यार्थिनींना घाणीच्या साम्राज्यात शिक्षण घ्यावे लागतआहे. या दुर्दैवी चित्रामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मुखेड बसस्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या या शाळेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दुकाने, व्यवसाय सुरू आहेत. मात्र, शहरात लघुशंकेसाठी कोणतीही पुरेशी व व्यवस्थित सोय नसल्याने व्यापारी, ग्राहक, नोकरदार शाळेच्या मैदानातच लघुशंका करतात. शाळा सुटल्यानंतरही गेट खुले ठेवले जात असल्याने रात्रीच्या वेळेस तळीरामांचा ‘मैदानात मुक्काम’ सुरू असतो. यामुळे या मैदानाचा वापर लघुशंका, शौच, कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे यासाठी होत असून याचा थेट परिणाम शाळेच्या स्वच्छतेवर आणि विद्यार्थिनींच्या आरोग्यावर होत आहे.शाळे भोवती अतिक्रमण झाल्याने व शहरातील मुतारीची कमतरता असल्यामुळेच शाळेच्या आवाराचा असाही गैरवापर होतो आहे. काही दुकानांतून मांस विक्री करून त्याचा उरलासुरला कचरा थेट शाळेच्या मैदानात फेकला जातो. यामुळे दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि अस्वच्छतेमुळे मुलींच्या शैक्षणिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. या दृष्टीने प्रशासनाचे आणि पालक समितीचे लक्ष अद्यापही गेलेले नाही. पालक मेळाव्यांमध्ये शाळेच्या दोन्ही गेटवर उंच भिंती बांधून कुलूपबंद करण्याची सूचना अनेक पालकांनी केली होती. मात्र, ती केवळ चर्चेपुरती मर्यादित राहिली. या शाळेतील मुलींसाठी निकोप व…

    Read More »
  • सामाजिक

    शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी

    ▫️कारवाईत चालकांकडून ७ लाख ४ हजार रुपयाचा दंड वसूल नांदेड दि. २४ जुलै २५ प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत १८ ते ३० जुन २०२५ कालावधीत वायुवेग पथक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची मोटार वाहन कायद्यातील…

    Read More »
  • राजकीय

    शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे; माजलगावात दोन तास चक्काजाम आंदोलन

    ▫️शेतकरी कर्जमाफीसाठी मेंढ पाळा सहित  चक्काजाम आंदोलन  माजलगाव :- २५ जुलै २५ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजलगाव तालुक्यातील वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे साकळी ११.३० वाजता चक्काजाम आंदोलनास सुरवात  करण्यात आले हे आंदोलन दोन तास चालू होते या आंदोलनात शेतकरी तसेच दिंव्याग बाधव, मेंढ्या सहित मेंढपाळ मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही महिन्या पासून प्रहार चे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफीची मागणी शासनाकडे केली आहे.  त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणही केले नंतरपदयात्रा काढली आता कर्जमाफी बाबत प्रत्येकाने आवाज उठवणे गरजेचे असल्याने आंदोलनाच्या पुढील टप्पा म्हणून २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही केवळ शेतकरी, दिव्यांग, मेढपाळ, मछीमार, कर्मचारी यांच्या विविध प्रश्नासाठी व एकत्र येऊन शासनाकडे कर्जमाफीची मागणी जोर कस पणे मांडण्यासाठी दोन तास चक्काजाम आंदोलन केले आहे. या आंदोलना मध्ये शेतकरी संघटनेचे नेते भाई गांगभिषण थावरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते एडवोकेट भाई  नारायण गोले पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख नारायण होके पाटील, आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे, मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, शेतकरी क्रांती सेनेचे योगेश कानडे, वीर शंभू संघटनेचे गणेश शिंदे , आझाद क्रांतीचे तालुकाध्यक्ष…

    Read More »
  • राजकीय

    कार्यसम्राट कॉम्रेड उज्वला पडलवार यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ पुरस्कार जाहीर

    नांदेड : २५ जुलै २५ कामगार चळवळीत सक्रीय भूमिका बजावणाऱ्या कार्यसम्राट कॉम्रेड उज्वला पडलवार यांना यंदाचा ‘क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ दिला जातो. यंदा नांदेड जिल्ह्यातून कामगार हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या उज्वला पडलवार यांची निवड करण्यात आली आहे.  लवकरच एका विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे भाई मोहन गुंड व अशोक रोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी आशा वर्कर्स, गटप्रवर्तकताई, अंगणवाडी सेविका, घरकामगार महिला असंघटित कामगार अशा विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि कामगारांच्या हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलने उभारली आहेत.  त्यांच्या संघर्षशील नेतृत्वामुळे अनेक प्रश्‍न शासनाच्या दखलीस आले आणि कामगार महिलांना आवाज मिळाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेजात आहे, ही बाब नांदेड सह राज्यभरातील सामाजिक व कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद आहे. कॉम्रेड पडलवार यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, हा पुरस्कार त्यांच्या कार्याला मिळालेली योग्य पावती मानली जात आहे. समाजहितासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान हेसामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

    Read More »
  • राजकीय

    मुखेड प्रहार जनशक्ती पक्षाचं रस्ता रोको आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक

    मुखेड प्रतिनिधी:- २५ जुलै २५ शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मांगण्यासाठी मुखेड येथे दि २४ जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मुखेड महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती. आंदोलनाच्या शेवटी  प्रहार जनशक्ती पक्षांच्या वतीने तहसीलदार…

    Read More »
  • शैक्षणिक

    हिमायतनगरच्या उर्दू जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थाचें शिक्षण विभागच करते शैक्षणिक नुकसान

    ▫️तब्बल चार वर्षापासून गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थाचें होत आहे शैक्षणिक नुकसान ▫️नांदेड जिल्हा शिक्षण विभागाचे जानिवपूर्वक दुर्लक्ष हिमायतनगर प्रतिनिधि :- अजिम हिंदुस्तानी दि २४ जुलै २५ हिमायतनगर येथील उर्दू जिल्हा परिषद् हायस्कूल शाळेत तब्बल चार…

    Read More »
  • राजकीय

    हनुमंतराव बेटमोगरेकर यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड

    ▫️कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून पेढे वाटप करत आनंद केला व्यक्त मुखेड प्रतिनिधी:- २४ जुलै २५ मुखेड– कंधार विधानसभेचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचेसंचालक हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची एकमताने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मुखेड तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे स्वागत करून मुखेड शहरात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, महेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील अडलुरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर , शौकत पठाण ,प्रकाश कानगुले, रामेश्वर पाटील इंगोले, शिवाजी गायकवाड, बालाजी वाडेकर, प्रकाश निमलवाड, सय्यद मुजीप, हाफीज पठाण, एम.आर. गोपणर, ईरफान मोमीन, संजय नुक्कुलवार, आकाश पाटील उन्द्रीकर आदींनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. दरम्यान, त्यांची निवड होताचफटाके फोडून‘ पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

    Read More »
  • शैक्षणिक

    लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी शाळास्तरावर उपक्रम राबवणे गरजेचे… व्यंकट गंदपवाड

    नांदेड प्रतिनिधी:- २४ जुलै २५भारतीय लोकशाही ही जगाला दिशा देणारी लोकव्यवस्था प्रणाली आहे. ती सामाजिक समता, बंधुता, एकात्मता जोपासणारी व…

    Read More »
  • शैक्षणिक

    जिप्सी मॉर्निंग ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    ▫️प्रशस्तीपत्र ठरले विशेष आकर्षण मुखेड: २२ जुलै २५जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध परीक्षेत नैपुन्य मिळवलेल्या गुणवंताचा सत्कार जोशी इन्फोटेकच्या कॉन्फरन्स…

    Read More »
  • सामाजिक

    कुरेशी समाज (खाटीक) बांधवांनी पुकारलेल्या बेमुदत बंदीचा फटका मुखेड येथील आठवडी बाजाराला बसला.

    ▫️सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी. मुखेड प्रतिनिधी:- २२ जुलै २५ मुखेड येथे प्रत्येक सोमवारी जनावरांचा बाजार भरतो त्यात तालुका भरातून शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणतात पण दि.…

    Read More »
Back to top button