Sharmik Ekta
-
आरोग्य
उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णच आणतात बाहेरून औषधे.
▫️लोकप्रतिनिधीचे उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष ▫️डेंग्यूची तपासणी होत नाही;बाहेरून तपासणीस मोजावे लागते ९०० ते १००० रुपये मुखेड प्रतिनिधी:- ०८ जुलै २०२५ उपजिल्हा रुग्णालय येथे…
Read More » -
सामाजिक
आठ दिवस मृत्युशी झुंज देत अखेर बालाजी गायकवाड तांदळीकर यांचे निधन
▫️मुखेड पेट्रोल पंपाच्याजवळ कार–दुचाकीच्या अपघातातील घटना मुखेड / प्रतिनिधी. ०८ जुलै २५ दि २८ जून रोजी मुखेड–नरसी राज्य महार्गावरील बजरंगनगर शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ एका दुचाकी व कारचा भिषण अपघात झाला होता त्यात .बालाजी गणपती गायकवाड तांदळीकर( मीस्त्री ,) आठ दिवस मृत्युशी झुंज देत अखेर आज दुपारी दोन वाजता निधन झाले आहे. …
Read More » -
क्राईम
रमी मध्ये हरला, बीडचा ASI चोर बनला, आधी SP कार्यालयात बॅटरी चोरल्या, आता दुचाकी चोरताना सापडला!
▫️बॅटरींची चोरी केल्यानंतर अमित सुतार यांचं केलं होतं निलंबन ▫️दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी बीड:- ०८ जुलै २५ बीडमध्ये पोलीस…
Read More » -
संपादकीय
उद्या जेष्ठ स्वातंत्र सैनिक डॉ. राजासिंह चौहान यांचे २५ वे पुण्यस्मरण दिन
▫️मुखेड पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते पहिले सभापती होते मुखेड प्रतिनिधी:- ०८ जुलै २५ मुखेड येथील जेष्ठ स्वातंत्र सेनानी डॉ. राजासिंह हरिसिंह चौहाण यांचे दि. ०९ जुलै २०२५ रोजी २५ वेपुण्यस्मरण दिन साजरा होत आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समवेतत्यानी हैद्राबाद येथील निजाम रावटी विरोधात तीव्र लढा छेडला होता. आपल्या इतर सहकार्यासह घरावर तुळशीपत्र ठेवून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जिवाची बाजी लावून प्राणपणाने लढणारे व्यक्तीमत्व म्हणून चौहाण यांची संबंध मराठवाड्यात ख्याती होती. डॉ. राजासिंह चौहाण यांचा जन्म मुखेड सारख्या डोंगराळ ग्रामीण भागात झाला. जातीने राजपुत असलेले डॉ. चौहाण हे केवळ त्या वेळेसची ७ वी पासहोते. पण त्यांनी आयुर्वेदिक उपचार पध्दती घेतली होती. सर्व लोकांना ते मोफत उपचार करत असत. त्यामुळे ते डॉ. म्हणून प्रसिध्द होते. डॉ. चौहाण हे मुखेड पंचायत समितीचे पहिले सभापती होने. त्यांनी हैद्रावाद…
Read More » -
सामाजिक
ऑटोचालक अमन लदाफ यांचा प्रामाणिकपणा; हरवलेला पर्स व मोबाईल केला परत
लोहा / प्रतिनिधी ०८ जुलै २५ सध्याच्या काळात जेथे हलक्याशा संधीचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे, तेथे काही व्यक्ती आपल्या प्रामाणिक पणा आणि इमानदारीने समाजासाठी आदर्श ठरतात. अशाच एकातरुण ऑटोचालकाने आपली जबाबदारी सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव दाखवत एक स्तुत्यकृती केली आहे. लोहा शहरात उर्दू शाळेजवळ एका महिलेचा ₹४,७०० रोख रक्कम असलेला पर्स आणि ₹२५,०००किंमतीचा मोबाईल फोन ऑटोमध्ये विसरून राहिला होता. प्रवास संपल्यानंतर संबंधित महिला घरीगेल्यावरच आपले मौल्यवान सामान हरवल्याचे लक्षात आले. पर्स व मोबाईल हे कोणत्याही मोहात न पडता ऑटोचालक अमन लदाफ यांना आढळून आले आणित्यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट संबंधित महिलेच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन ती वस्तू परतकेली. ही कृती केवळ प्रामाणिकतेचे नव्हे, तर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरलीआहे. पर्समध्ये रोख रक्कम असल्याने आणि मोबाईल महत्त्वाचा असल्याने कुटुंब अत्यंत चिंतेत होते. पण अमनलदाफ यांच्या या प्रामाणिकपणामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या या कार्याचे स्थानिकपातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे. अमन लदाफ यांच्यासारख्या तरुणांमुळेच समाजात अजूनही इमानदारी आणि विश्वासाचे मूल्य टिकूनआहे. अशा व्यक्तींचे सार्वजनिक पातळीवर गौरव करणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून नव्यापिढीसाठी ही प्रेरणा ठरेल.
Read More » -
शैक्षणिक
श्री सद्गुरू सेवालाल महाराज कनिष्ठ महाविद्यालयात नीट, जे.ई.ई, एम एच- सि ई टी व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गाचे भव्य उद्घाटन संपन्न
मुखेड/प्रतिनिधी:- ०७ जुलै २५ मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव पीर येथील श्री सद्गुरू सेवालाल महाराज कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि. ७ जुलै…
Read More » -
आरोग्य
आयडीबीआय बँक शाखा व्यवस्थापकाचे अपघाती मृत्यू; सोमवारी होता विवाह सोहळा
हदगाव:- ०७ जुलै २५ लोहा येथे नुकतेच बदली झालेले आयडीबीआय बँकेचे मॅनेजर आशिष देशमुख (वय ३०) यांचा कवठा गावाजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास नांदेड–नागपूरराष्ट्रीय महामार्गावर हदगाव तालुक्यातील कवठा गावाजवळ घडली. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी लाधडक दिली. देशमुख मूळचे वाशिम जिल्ह्यातील असून सोमवारी त्यांचा विवाह सोहळा होणार होता. ते अविवाहित असून कुटुंबातील एकुलता एक मुलगा होते. अपघातावेळी रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कामाचीमाती फेकलेली होती आणि हलक्या पावसात हेल्मेटमुळे दृश्यता कमी झाल्याचा अंदाज वर्तवला जातआहे. आशिष देशमुख यांच्या पश्चात कुटुंबामध्ये आई,दोन बहिणी, काका, काकू, भावंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आशिष देशमुख हेकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भैय्यासाहेब देशमुख, डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्षडॉ,अरुण देशमुख यांचे पुतणे आहेत. आशिष च्या अकाली निधनाची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी एकच टाहो फोडला आषाढीएकादशीच्या पूर्वसंध्येला त्याचे निधन झाल्याने गावकऱ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली नाही.
Read More » -
सामाजिक
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित सचिव पांडुरंग नागेश्वर यांचा आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार…
मुखेड / प्रतिनिधी ०६ जुलै २५ नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी मुखेड पंचायत समिती चे ग्राम पंचायत अधिकारी पांडुरंग नागेश्वर यांची नुकतीच बहुमताने निवड झाल्यानंतर त्यांचा मुखेड येथे डॉ तुषार राठोड आमदार यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी अशोक कासराळीकर यांची तर उपाध्यक्षपदी रवी क्षिरसागर व सचिव पदी पांडुरंग नागेश्वर नरसीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग नागेश्वर यांची पतसंस्थेचे सचिव म्हणून निवड झाल्यामुळे आ. तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्राम पंचायत संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष सय्यद नजीर, मा. अध्यक्ष कृष्णा रामदिनवार, सचिव सतीश गायकवाद, हणमंत डावकरे , सचिन पाटील, संजय जाधव , आनंदबिरू , डी वी मांडेवाड , गायक सुरेश वाडकर, संदीप श्रीमंगले , सिद्धेश्वर खेळभडे , निळकंठ गीते, चंद्रकांत देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
Read More » -
क्राईम
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या मदतीने तरुणाचा खून
▫️१२ तासांत दोघांना अटक – पोलिसांची वज्रकार्यवाही ▫️पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले तपास पथकाचे विशेष कौतुक हदगाव :- ०५ जुलै २५ हदगाव तालुक्यातील ढोरळी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राचा खून केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास काटेकर या व्यक्तीला संशय होता की त्याच्या पत्नीचे आपल्या मित्रासोबत अनैतिक संबंध आहेत. या रागातून त्याने काही मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तीला दारूच्या नशेत ठार मारले. हत्या केल्यानंतर मृतदेह गावाजवळ फेकण्यात आला. पोलिसांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने पोलिसांसमोर सांगितले की, दारूच्या नशेत त्यांनी हा गुन्हा केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस धागादोरा नसतानाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांच्या तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि साक्षीदारांच्या माहितीवरून केवळ १२ तासांच्या आत दोघा आरोपींना अटक केली. या जलद आणि अचूक कारवाईबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
Read More » -
क्राईम
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
परभणी : ०५ जुलै २५ परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून सुरूवातीपासूनच केला जातोय. परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथसूर्यवंशीला मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा ४५१ पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगा समोर सादरकेला. आता थेट संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयात बाजू मांडली होती. आता हायकोर्टाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिली आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ही याचिका दाखल केली होती. याबाबत प्रकाश आंबेडकर हे सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणारआहेत. हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झालेहोते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी हे देखील सहभागी झाले. यादरम्यान या आंदोलनाने उग्र रूपधारण केले. या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला होता. राहुलगांधी यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला. न्यायालयीन कोठडीत पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशीला बेदम मारहाण झाली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला. एका माथेफिरूने १० डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्याविरोधात ११ तारखेला परभणीत आंदोलन करण्यात आलं होते. या प्रकरणात तीन पोलिसांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले. आता हायकोर्टाने हे आदेश देतगुन्हा दाखल करा, असे थेट आदेशच दिले आहेत.
Read More »