Sharmik Ekta
-
शैक्षणिक
दहावीच्या परिक्षेत इमरान महेताब शेखने मिळविले ९३.२० टक्के.
गुरूदेव विद्यामंदीर माध्यमिक विद्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला . मुखेड / प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्यापरिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील गुरूदेवविद्या मंदिर माध्यमिक विध्यालयाचा विद्यार्थी इमरान महेताब शेख याने ९३.२० टक्के गुण मिळवूननेत्रदीपक यश संपादन करीत गुरूदेव विद्या मंदिर माध्यमिक विध्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमानमिळविला आहे या यशाबद्दल इमरानचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे. नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्याअधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील गुरूदेव विद्यामंदीर विद्यालयाचा विद्यार्थी वराष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांचे चिरंजीव इमरान महेताब शेख याविद्यार्थ्यांने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९३.२० टक्के गुण मिळविले आहे.यातत्याला मराठी विषयात ८२,हिंदी विषयात ८७, इग्लिंश ७५, गणित ९४, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९३ वसामाजिकशास्त्रे १०० गुण मिळाले आहेत.इमरानने या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच गुरुजणांना दिले आहे.या यशाबद्दल आमदारडाॅ.तुषार राठोड,माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार अविनाश घाटे,माजी आमदारसुभाष साबणे,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड,माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटीलगोजेगावकर,माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, प.स.चे माजी उपसभापती सुभाष पाटील दापकेकर, माजी जि.प.सदस्य संतोष बोनलेवाड, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड,गटशिक्षण अधिकारी कैलासहोनधरणे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,माजी नगरसेवक राहुललोहबंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पा.सकनुरकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजु पाटीलरावणगावकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबुराव कदम,भाजपाशहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड,शिक्षण विस्तारअधिकारी डाॅ.शिवाजी कराळे,शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव येवतीकर,शिक्षण विस्तारअधिकारी उत्तम चव्हाण, गुरूदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव गरुडकर,उपाध्यक्ष संजयगरुडकर,कोषाध्यक्ष डाॅ.बालाजी गरुडकर, मुख्याध्यापक बालाजी येवते,राष्ट्रीय अल्पसंख्याकपरिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आब्दुल बशीर माजीद, तालुकाध्यक्ष असद बल्खी, डोरनाळीचे सरपंचप्र.हुल्लाजी पाटील शिंदे,उपसरपंच प्र.प्रकाश पा.शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटीलकलबंरकर,राष्ट्रवादीचे जयभिम सोनकांबळे,प्रा.डाॅ.संतोष मंगनाळे,दिलीप चव्हाण,विकासराजुरकर,गजानन ढगे सह सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष,पदाधिकारी व विविध क्षेत्रातीलमान्यवरांनी इमरानचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
Read More » -
शैक्षणिक
आज दहावी परीक्षेचा निकाल
दुपारी १ वाजता अधिकृत संकेत स्थळावर पाहता येणार निकाल मुखेड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज १३ जाहीरहोणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. राज्यमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकालजाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकतालागली होती. अखेर ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिकशिक्षण मंडळाकडून आज १३ मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १वाजता पाहता येणार आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाकडून नियोजन केलेल्या कालावधीत आपापल्याशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुळेगुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. फेब्रुवारी–मार्च २०२५ महिन्यातदहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर केलाजाणार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. येथे पाहा निकाल ? https:// results.digilocker.gov. in, https://sscresult. mahahsscboard.in, http:// sscresult.mkcl.org, https:// results.targetpublications.
Read More » -
Uncategorized
निर्भिड पत्रकार संदीप कामशेट्टे यांचा वाढदिवस साजरा ; मुखेड तालुका मराठी पत्रकारसंघाच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे संघटक संदीप कामशेट्टे यांच्या जन्मदिना निमित्त संघटनेच्या वतीनेशाल,पुष्पगुच व पेढे देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. कामशेट्टे पुण्यनगरीचे पत्रकार असून गेली अनेक वर्षे प्रभावी,निर्भिड पत्रकारिता करत आहेत. आज रविवार दिनांक ११ मे रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे जन्मदिन साजरा करण्यात आला. जेष्ट पत्रकार यशवंत…
Read More » -
राजकीय
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाऱ्हाळी येथे जाहीर सभा
शेषेराव चव्हाणांसह अनेकांचा पक्षप्रवेश इतरांना आपल्या पक्षात ओढण्याचा चिखलीकर यांचा धडका सुरू मुखेड प्रतिनिधी:- विधानसभा निवडणुकीनंतर नांदेडमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेशाची चढाओढ लागली आहे विशेष म्हणजे ही चढाओढ भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात होत आहे उद्या दि ११ मे रोजी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे आयोजित जाहीर सभेत शिवशंकर जय साखरकारखान्याचे माजी अध्यक्ष शेषेराव चव्हाण आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. ही माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी मोठा संकल्प हाती घेतला आहे आणि आतापर्यंत ९०हजार सदस्यांची नोंद झाली असून हा आकडा लवकरच लाखाच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनीव्यक्त केला. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ना. इंद्रनील नाईक, रूपाली ताई चाकणकर यांच्यासह विविध स्तरांतील नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेषेराव चव्हाण यांच्यासोबत बाबुराव पवित्रे, अण्णासाहेब जहिरे, दिलीप कोटगिरे यांचाही पक्षप्रवेशहोणार आहे. या कार्यक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय शक्तीला नवे बळ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पत्रकार परिषदेस माजी आमदार मोहन हंबर्डे, अविनाश घाटे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, व्यंकटराव पाटील गोजे– गावकर, प्रा. उदय चव्हाण, मुक्तेश्वर…
Read More » -
Uncategorized
शहीद जवान सचिन वनंजे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप.
देगलूर प्रतिनिधी:- काश्मीरमध्ये सैन्याचं वाहन दरीत कोसळून वीरमरण आलेले जवान सचिन वनंजे यांच्यावर आज देगलूरमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. जवान सचिन वनंजे यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी अंत्ययात्रेवर शहरातून सर्वत्र फुलांची उधळण करण्यात आली. सचिन वनंजेयांना सलामी देत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी आणिअधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन पत्नीनं आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला. ६ मे रोजीजम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं ८००० फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचं वाहन कोसळल्यानं कर्तव्यावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले २९ वर्षीय सचिन वनंजे यांना वीरमरण आलं होतं. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर काल रात्री सचिन यांचं पार्थिव देगलूर इथं आणण्यात आलं. यावेळी सचिनयांच्या पत्नी, भाऊ आणि आई वडिलांना अश्रू अनावर झाले. शहीद जवान सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातून हजारो नागरिक देगलूर इथं उपस्थित होते. जवान सचिन वनंजे यांना अखेरचा निरोप देताना सर्वांच्या अश्रूचा बांधफुटला. नांदेड मधील नागरिकांनी शोकाकुल वातावरणात सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहत अखेरचा निरोप दिला.
Read More » -
राजकीय
मुखेडात भारतीय लष्कराचे काँग्रेस कडून अतिशबाजी व घोषणानी अभिनंदन
मुखेड -(ता. प्रतिनिधी) भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ चे मुखेड काँग्रेसकडून शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून लष्कराचे अभिनंदन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड आणि काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुखेड शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय लष्कर जिंदाबाद भारतीय लष्कराचा विजय असो पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. शहरातील पटेल चौक बसस्थानक चौक बाबा आंबेडकर पुतळा चौक आणि हुतात्मा चौकासह अनेक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भारतीय लष्कराची कारवाई जनतेस सांगितले. अचानक झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात वेगळेच वातावरण निर्माण झाले. विविध शहरातील मुखेड मध्ये सुरू झाली काय अशी चर्चा नागरिकात चालू होती. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर यांच्यासह युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले, ओबीसी शहराध्यक्ष बालाजी वाडेकर,युवा नेता सदाशिव चव्हाण, विलास पाटील इमडे, बालाजी इंगोले, कपिल काठेवाड, ओंकार जाधव, उत्तम कासले, पप्पू कासले, संतोष पवार, महेश धोत्रे, शिवाजी जांभळीकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्राचे शूर : पुत्र देगलूर तालुक्यातील सचिन वनंजे काश्मीर मध्ये शहीद
अत्यविधी दि ९ मे रोजी सकाळी १० वाजता देगलूर येथे होणार देगलूर प्रतिनिधी:- काश्मीरच्या तुफानी थंडीमध्ये देशसेवेचे व्रत जोपासणारे तमलूर (ता. देगलूर) गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे (वय ३०) यांनी दि ७ मे २५ रोजी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. दुपारी १२ ते १ च्यासुमारास ड्युटीवर असताना त्यांचे वीरमरण झाले. या दुःखद घटनेने संपूर्ण देगलूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शहीद सचिन वनंजे हे लहानपणा पासूनच राष्ट्र…
Read More » -
सामाजिक
मिशन उडान; घेतलेला निर्णय आणि केलेली घोषणा पूर्णत्वास नेणारे व्यक्तीमत्व:- अबीनाश कुमार
मिशन उडान अंतर्गत ३ हजार ५०० बेरोजगारांना नियुक्ती पत्र अबीनाश कुमार यांच्या इच्छाशक्तीची राज्यभर चर्चा मिशन उडान नांदेड पॅटर्न देशभर राबविण्याची गरज नांदेड प्रतिनिधी:- विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना खाली नांदेड चे पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार व अप्पर पोलिस अधिक्षक सुरज सुरव यांच्या सकल्पनेतून जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या मिशन उडान अंतर्गत रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व असे यश मिळाले. नऊ हजार जणांनी नोंदणी केलेल्या या मेळाव्यात देशभरातील नामांकित ९७ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिवसभरया कंपन्यांनी तब्बल ३ हजार ५०२ युवकांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिले आहे. नियुक्तीपत्र हातात पडताचया बेरोजगार युवकांच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला होता अबीनाश कुमार यांनी नवा इतिहास घडवीला आणि राजकारण्यांना एक प्रकारे धडाच शिकवीला. त्यांनी नांदेड मध्ये जनहितवादी अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आहेत. नांदेडच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करणारे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमारयांनी ‘मिशन उडान‘ च्याअगोदर ‘मिशन फ्लॅश आऊट‘ च्या माध्यमातून भल्याभल्याना धूळ चारली. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आणि सामान्य जनतेला न्यायाचीआशा निर्माण झाली.गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला आळा घालून त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थाअबाधित ठेवण्याचा नेहमीच कसोशिने प्रयत्न केला. नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रेमाने व विश्वासाने काम करून घेण्याची कार्यपद्धत सर्वांनाचआवडणारी आहे. ३ मे २०२५ रोजी त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदानयेथे ‘मिशन उडान‘ या लक्षवेधी अभियाना अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याउद्देशाने भव्य बेरोजगार मेळावा घेतला.या मेळाव्यात साधारणतः ११ हजार सुशिक्षित बेरोजगारांनारोजगार मिळेल असे नियोजन केले.वेगवेगळ्या नामांकित कंपण्यांना आमंत्रित केले आणि पहिल्यासत्रात ३ हजार ५०० बेरोजगारांना नोकरी मिळाल्याचे नियुक्ती पत्र दिले. नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूपच आशादायी होता.…
Read More » -
शैक्षणिक
मुखेड तालुक्याचा निकाल ९५.२० टक्के; ३ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण
मुखेड प्रतिनिधी इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल दि.५ मे रोजी दुपारी बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला. यामध्ये मुखेड तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.२० टक्के लागला असल्याची माहिती मुखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे यांनी दिली. मुखेड तालुक्यात २ हजार ३८४ मुले व १ हजार ६४१ मुली असे एकुण ४ हजार २५ विद्यार्थी व विद्याथीर्नी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी २ हजार २३३ मुले तर १ हजार ५९९ मुली असे एकुण ३ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे. तालुक्यात एकुण १० केंद्रावर बारावीच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी तहसिलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी सी.एल.रामोड, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, परिक्षक बाळासाहेब कदम, सायलु करेवाड यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते. सर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे
Read More » -
सामाजिक
आधी पुनर्वसन मगच लेंडी धरण करा ; अन्यथा धरणग्रस्त घेणार जलसमाधी – राजीव पाटील.
मुखेड / प्रतिनिधी. सन २००६ च्या कायद्यानुसार आधी लेंडी प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करुन मगच धरण करा अन्यथा धरणग्रस्त जलसमाधी घेणार…
Read More »