Sharmik Ekta
-
शहर
कष्टाचं चीज झालं; कष्टाळू मुलगा शेख रियाज़ झाला साहेब
आई–वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून मी केलेल्या प्रयत्नला मला यश मिळाल .:- रियाज मुखेड (प्रतिनिधी) – दि ११ एप्रिल २५ मुखेड शहरातील अत्यंत कष्टाळू व अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले कित्येक वेळेस अपयश आला तरी खचून नजाता आपल्या यशासाठी दिवस रात्र धडपड करून जिद आणि चिकाटीच्या बळावर शेवटी यश गाठण्यात यशस्वी ठरले असे शेख रियाज़ सलीम एक कष्टाळू गरीब कुटुंबातील मुलगा आज कार्यकारी…
Read More » -
Uncategorized
होनवडज येथे रामनवमी निमित्त जंगी कुस्त्यांचे सामने रंगले.
शेवटच्या कुस्तीचे पारितोषिक विजय पाटील सुगावकरांच्या हस्ते प्रदान. मुखेड / प्रतिनिधी. मुखेड तालुक्यातील मौजे होनवडज येथे श्रीराम नवमी निमित्त जंगी…
Read More » -
राजकीय
मुखेड-कौठा-नांदेड महामार्गसावधान,प्रशासन गुत्तेदार लोकप्रतिनिधी झोपले आहेतकाँग्रेसचे अनोखे फलक युद्ध
मुखेड /प्रतिनिधी दि.०९ एप्रिल २५मुखेड कौठा नांदेड राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट बांधकाम चर्चेत असतानाच चालू बांधकामावर कुठेच फलक नसल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सावधान…
Read More » -
क्राईम
रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
चांडोळा ते बोरगांव रस्त्यावर झाला अपघात मुखेड प्रतिनिधी चांडोळा गावा पासून दोन कि.मी अंतरावर तळ्यातून माती घेऊन येणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊनभीषण अपघात झाला. या धडकेत एक जागेवर ठार झाला. तर इतर दोघांना डोक्यात जबर मार लागलाअसून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना दि. ९ एप्रिल रोजी सकाळी८.३० च्या दरम्यान झाली आहे. धनज गावातील मारोती राजेश घोडके (१७), मनीष राम वल्लेमवाड (१८), विवेक संतोष मानेकर (२०) हे तिघे आज सकाळी एमएससीआयटी संगणक कोर्ससाठी दुचाकीवरुन (क्र एम एच २६ X २५८६) मुखेडकडे येत होते. चांडोळा गावा जवळील तलावातून काळी माती घेऊन एक ट्रॅक्टर (क्र एम एच २६ बी एक्स ३२७८) अचानक मुख्य रस्त्यावर आला. त्यामुळे दुचाकीची व ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यात मनीष उर्फ मनोजराम वल्लेमवाड याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. तर मारोती घोडके याचा डावाहात फॅक्चर असून डोक्यात गंभीर दुखापत आहे. तसेच विवेक मानेकर यास डोक्यात गंभीर दुखापत झालीआहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर दोघांना डॉ. प्रकाश ठक्करवाड यांनी अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.
Read More » -
Uncategorized
धामणगाव येथे १२ एप्रिल रोजी हजरत सय्यद बाबुपिर रह अलै उर्स शरीफ
१३ एप्रिल रोजी इम्रान वारसी व रौशनी वारसी यांच्या कव्वालीचा जंगी मुकाबला मुखेड/प्रतिनिधी:- दि ०९ एप्रिल २५ मुखेड तालुक्यातील मौजे धामणगाव येथे हजरत सय्यद बाबुपिर रह अलै उर्स शरीफ निमित्त शनिवार दि.१२एप्रिल २०२५ रोजी भव्य संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही संदल मिरवणूक रात्री १०:३० वाजताच्या दरम्यान माली पटेल यांच्या वाड्यातून निघून गावातील प्रमुख मार्गाने जावून पुढे हजरत सय्यद बाबुपिर दर्गा शरीफ पोहचणार आहे. रविवार दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वा. भव्य कुस्त्या रंगणारआहेत. तर रात्री ठिक ८:०० वा. दर्गाह परिसरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा प्रसिद्ध शायर इम्रान वारसी (मुंबई) व रौशनी वारसी (टिव्ही सिंगर, मुंबई यांच्या शानदार कव्वाली चा मुकाबला होणार असल्याची माहिती ह. सय्यद बाबुपीर दर्गाह कमिटीतील उमर पटेल, निजाम पटेल, रियाज पटेल, मकसूदपटेल, बाबा पटेल, पाशा पटेल, जीलानी पटेल, हमीद पटेल यांनी व या ऊर्स कमिटी चे अध्यक्ष जैनु पटेल, उपाध्यक्ष इब्राहिम पटेल, सचिव इसाक पटेल, कोषाध्यक्ष मलिक पटेल इत्यादींनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातुन कळवीले आहे. परिसरातील जनतेनी ह. सय्यद बाबुपिर उर्स संदल मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच भव्य कुस्त्यांचा आणि कव्वाली च्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहनही उर्स कमिटी वदर्गा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
Read More » -
क्राईम
नांदेड जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुक्कावार यांच्यासह २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
आरटीआय कार्यकर्ता शेख मकसूद शेख अहेमद लोहगांवकर यांनी न्यायालयात दाखल केली होती याचिका नांदेड प्रतिनिधी:- बिलोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठा ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या विविध घरकुल योजनेचेलाभार्थी घरकुलाचे बांधकाम करीत आहेत तर दुसरीकडे कुठलेही घरकुलाचे बांधकाम न करता शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून सरपंच, ग्रामसेवक, इंजिनिअर, लेखाधिकारी, गटविकास यांच्या संगनमताने बिना घरकुलाचे बांधकाम करता प्रत्येक लेव्हलचे बनावट प्रमाणपत्र सादर करून बोगस(घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या निधीची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार बिलोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या कोठा ग्रामपंचायतमध्ये झाल्याने अधिकाऱ्यासह २० जणांवर फसवणूकीचा गुन्हा करण्यात आला आहे नांदेड–बिलोली तालुक्यातील कोठा येथील बारा लाभाथ्यर्थ्यांनी पूर्वीचे जुने पक्के घर असतानाही प्रधानमंत्री…
Read More » -
क्राईम
मुखेड तालुक्यात अवैध गौण खनिजाचा बोलबाला;तहसीलदारांचा याकडे कानाडोळा
मुखेड प्रतिनिधी:- दि ०८ एप्रिल २५ मुखेड शहरातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शासनाचे ठेके बंद असताना काळी रेती व लालरेती व विना नंबरच्या हायवा टिप्पर मध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात भरून वाहतूक होत असतानाच्या प्रशासनाकडे वारंवार सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्याकडून तक्रारी करण्यात येत होत्या तरी देखील तहसीलदारांनी कारवाई करत नसल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे मनोबल उंचावले त्याच बरोबर शहराच्या चारी बाजूला मुखेड ते कौठा रोडवर व मुखेड ते शिरूर ताजबंद रोडवर तसेच मुखेड ते हिप्पटरोडवर त्याचबरोबर मुखेड ते नरसी रोडवर खरब खंडगाव येथे अवैधरित्या दगड कटिंगच्या आरामशीन निर्माण झाल्या असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज साठवण केल्याचे दिसून येते याबाबत तहसील कार्यालय मुखेड यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करून देखील मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी कसल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याने शहरातील अवैधरित्या गौण खणीजचा व्यवसाय करणारे व्यवसाय हे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत आहेत या सर्व प्रकरणाला जबाबदार महसूल प्रशासन आहे नुकतीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अवैध वाहतूक यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे बावनकुळे यांनी आदेशित…
Read More » -
Uncategorized
डॉ. शफी अहेमद यांचा पुंडे हॉस्पिटलच्या वतीने सत्कार संपन्न
मुखेड/प्रतिनिधी ‘संचेती’ हॉस्पिटल पुणे येथे नावलौकिक मिळवलेले डॉ. शफी अहेमद हे एम.बी.बी.एस. नंतर एम. एस. (ऑर्थो) उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा मुखेड…
Read More » -
क्राईम
श्रमिक एकता न्यूज इफेक्ट एक लाखांचा गांजा जप्त तस्करांचे धाबे दणाणले
चक्क महिलेकडे सापडला तब्बल ४ किलो ३८ ग्रॅम गांजा मुखेड प्रतिनिधी:- शहरात व ग्रामीण भागात गांजाची विक्री होत असल्याची बातमी श्रमिक एकता न्यूज पोर्टल वर दि ५ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आली…
Read More » -
सामाजिक
मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचार विरोधात विचार विनिमय बैठक संपन्न
नांदेड प्रतिनिधी:- मुस्लिम अत्याचार संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी नांदेड येथे दि ४ एप्रिल रोजी नॅशनल कॉन्फरन्सफॉर मायनॉरिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामावेशक बैठकीचे आयोजनअब्दुल बशीर माजीद यांच्या वतीने करण्यात आले होते. मशीदींवरील हल्ले , मुस्लिमांवरील हल्ले , मदरशांवरील हल्ले त्याचबरोबर हेटस्पीच वक्फ बोर्ड सुधारणाविधेयक इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलेहोत. या बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या मुस्लिम विरोधी धार्मिक हिंसाचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्तकरण्यात आली असून अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्राचं पुरोगामीत्व संपवत आहेत. तसेच अशाप्रकारच्या सातत्यपूर्ण होणाऱ्या दंगली , हिंसाचाराच्या घटना व हेच स्पीचमुळे राज्यातील मुस्लिम समाजभयग्रस्त झाला असून या भीतीच्या छावटातून त्यांना काढणे आवश्यक आहे व यासाठी सर्व धर्मनिरपेक्षकार्यकर्त्यांनी, व्यक्तींनी पुढाकार घ्यायला हवा अशी भूमिका या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सदर घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी लवकरच राज्यव्यापी शांततापूर्वक वातावरणात आंदोलने करण्यातयेणार असलाचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील मागील १० वर्षांमध्ये घडलेल्या मुस्लिम अत्यांचारांच्याघटनांचे संकलन करून त्याचा विस्तृत अहवाल तयार करून तो राज्यपाल , राष्ट्रपती , मुख्यमंत्री , प्रधानमंत्रीयांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पाठविण्यात येणारअसल्याची माहिती यावेळी राहुल डंबाळे यांनी दिली. या बैठकीत विविध जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. ज्यात प्रामुख्याने ॲड. झेड सिद्दिकी साहेब , ॲड. अब्दुल रहमान सिद्दिकी , ख्रिस्ती धरामगुरु रेवरंड जॉन्सन जेकब, आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेशदादा गायकवाड, निवृत्त न्यायाधीश पटेल व निवृत्त न्यायाधीश शफातुल्ला खान,अल्पसंख्याकांचे नेतेफिरोज खान लाला , श्याम वडजे पाटील , गंगाधर गायकवाड , विजय गाबने , मोहम्मद खान पठाण , मोहम्मद अझरुद्दीन , सय्यद शेर अली , शिरीन बेगम, रहीम अहमद खान , मोहम्मद वसीम , आरिफ खानपठाण , नासिर खातीर , आबिद फिरदोस खान , मुखेड तालुकाद्यक्ष आसद बलखी , युवा जिल्हाध्यक्ष जलील पठाण, जिल्हाध्यक्ष महेताब शेख , यांचेसह अनेक आजी–माजी नगरसेवक व राजकीय नेते याबैठकीत सहभागी झाले होते. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांनी बैठकीचे आयोजन केलेहोते. या बैठकीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील आठवड्यात छत्रपतीसंभाजी नगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी आणखीन एक विभागीय आढावा बैठक मुस्लिम अत्याचाराच्याअनुषंगाने घेण्यात येणार असल्याचेही अब्दुल बशीर माजिद यांनी सांगितले.
Read More »