Sharmik Ekta
-
Uncategorized
मानव अधिकार संरक्षण समितीवर नांदेड जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी जैनोदीन पटेल यांची निवड
मुखेड प्रतिनिधी: – सामाजिक,अध्यात्मिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जैनोदीन पटेल यांची ‘मानवअधिकार संरक्षण समितीच्या नांदेड जिल्हा जनसंपर्क अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आलेलीआहे.समितीचे राष्ट्रीयअध्यक्ष डॉ. भगवानभाई दाठिया सर, तसेच जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्रराज्यगजानन भगत सर, महाराष्ट्र राज्य उपसचिव सौ. सरला इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन करत १२ फेब्रुवारी२५ रोजी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील न्यायप्रेमी, सामाजिक कार्याची आवडअसणाऱ्या विविध क्षेत्रातील इच्छुक मंडळीनी, युवक युवती, महिला पुरुषांनी नियुक्तीसाठी यांच्याशी संपर्ककरून मानव अधिकार संरक्षण समितीत सहभागी व्हावे, असे अवाहन करण्यात आलेले आहे. जैनोदीन पटेलयांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजिद,संपादक जयभीम सोनकांबळे,पत्रकार महेताब शेख,संपादक आसद बल्खी,पत्रकार शादुल होनवडजकर ,अब्दुल…
Read More » -
क्राईम
मुखेड नपा ट्रॅक्टरच्या अपघात प्रकरणात १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित; न्यायासाठी वारसांचा लढा
दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे नातेवाईकची मागणी मुखेड प्रतिनिधी :- मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राबीयाबी अहेमद बल्खी (वय ८०) यांच्या वारसाला नुकसान भरपाई मिळावी आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे अर्जाद्वारे करण्यात आली आहे. २१ जानेवारी २०२४ रोजी मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने निष्काळजीपणे वाहतूक करत वृद्ध महिलेस जोरातधडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बल्खी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, याप्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. पी.एस.ओ राठोड यांनीमनमर्जीप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप असून, अद्यापही संबंधित ट्रॅक्टर आणि चालकाचा शोधलागलेला नाही. अर्जदार असद इब्राहीम बल्खी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुखेड पोलीस ठाण्यातील तपास अधिकारीजाणूनबुजून प्रकरण दाबून ठेवत आहेत. त्यांनी नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरविषयी स्मरणपत्र पाठविल्याचेसांगितले, मात्र अद्याप कोणताही ठोस तपास झालेला नाही. मोटार अपघात अधिनियम २०२३ नुसार, अपघातानंतर ६ महिन्यांच्या आत नुकसान भरपाईसाठी अर्जदाखल होणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणाला आता १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित आहे. त्यामुळेमृत महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत आहे. तपास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, तातडीने मोटार अपघात प्राधिकरण व जिल्हान्यायालय, मुखेड येथे अर्ज दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यातआली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीहीमागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
Read More » -
शैक्षणिक
शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगेंनी दिली जि.प.मुलींचे हायस्कूलला भेट.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेच्या व्यवस्थापन बाबत केले कौतुक. मुखेड / प्रतिनिधी. नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ.सविता बिरगे यांनी मुखेड…
Read More » -
क्रीडा
बेरळी खु. ता मुखेड येथे सरपंच चषक टेनिस बॉल क्रिकेटचे खुल्ले सामने !
मुखेड प्रतिनिधी :- मुखेड – विधानसभचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड समर्थ यांच्या वतीने बेरळी खु. येथे सरपंचचषक क्रिकेटपच्या खुले सामन्याचे आयोजन केले असून प्रवेश फी २१००/- रु. व प्रवेशाची अंतिम तारीखदि. १४ फेब्रुवारी – २०२५ असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. लोकप्रिय कार्यसम्राट आमदारडॉ. तुषारजी गोविंदराव राठोड साहेब समर्थक बेरळी खु. आयोजित सरपंच चषकचे प्रथम पारितोषीक ५१,१११/- रुपये श्री. भागवत पांडुरंग तोटेवाड सरपंच बेरळी खु.व श्री. सिध्दार्थ बळीरामकांबळे बेळीकर उपसरपंच यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३१,१११/- रुपये मारोती मामाफुसकुलवाड मा. उप सभापती पंचायत समिती मुखेड व श्री माधव ईरबा बद्देवाड सहशिक्षक, श्री अतुलज्ञानोबा बेळीकर बी. ए. ट्रेडर्स मुखेड यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक २१,१११/- रुपये श्री मष्णाजी बद्देवाड मा. सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड व श्री बाबुराव नागोराव गिरबनवाड मा. सरपंच बेरळी खुर्द यांच्यातर्फे चतुर्थ पारितोषीक १५,१११ कै. गंगाराम नारायण पाटील श्री. नारायण गंगाराम पाटील यांच्या तर्फेठेवण्यात आले आहे. असे अनेक पारितोषिके ठेवण्यात आले आहेत. सरपंच चषक २०२५ या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. गंगाधर गोविंदराव राठोड साहेब मा. नगराध्यक्षमुखेड कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड साहेब आणि विशेष अतिथी म्हणून तहसीलदारराजेश जाधव साहेब, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे साहेब, व गटविकास अधिकारी सी एल रामोड साहेबयांची उपस्थिती लाभणार आहे . सामन्या मध्ये फेरबदल करण्याचा अधिकार कमिटी कडे राहील. असे आयोजकाकडून कळविण्यात आलेआहे.
Read More » -
क्राईम
गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार; नराधम शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं
तामसा प्रतिनिधी:- माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. हदगाव तालुक्यातील तामसा येथील शिक्षकांने गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत…
Read More » -
Uncategorized
नांदेड जिल्ह्यात प्रथमच आढळली मगर; वनविभागाच्या पथकाला मगर पकडण्यास आला यश.
लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली मुखेड (नांदेड) प्रतिनिधी:- मुखेड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतात दि ११ फेब्रुवारी २५ रोजी मंगळवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान दीड वर्षाची नर जातीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मगरीस शेतातून पकडले आहे. मात्र, शेतात अचानक मगरआढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळूनआल्याची माहिती आहे. घोटका येथील शेतकरी शेषेराव यादव कदम यांच्या शेतात मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनरयांनी वनपाल धोंडगे यांना मंगळवारी पहाटे दिली. वनपाल शंकरराव धोंडगे, वनरक्षक अरुण राठोड वसर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी लागलीच शेतात धाव घेत मगरीस चिमट्याच्या सहाय्यानेपकडले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मगरीवर डॉ. धनराज मुर्कीकरयांनी प्राथमिक उपचार केले. सध्या ही मगर वनक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. या कामास नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) भिमसिंग राठोड, मुखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ, निखील हिवरे यांनी मार्गदर्शन केले तर वनसंरक्षक धम्मपालसोनकांबळे, लक्ष्मण पांडुरणे, शेख महेबुब, प्रभु राठोड नदान शेख व ब्रम्हा राठोड यांनीही परिश्रम केले
Read More » -
Uncategorized
गृहरक्षक दलाचे जवान इब्राहिम बल्खी यांच्या निधनाबद्दल पोलिस ठाणे कडून श्रद्धांजली अर्पण
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड (जि. नांदेड) – गृहरक्षक दलाचे सेवानिवृत्त जवान इब्राहिम बल्खी (वय 76) यांच्या निधनानंतर मुखेड पोलिस ठाणे आणि…
Read More » -
Uncategorized
राजमाता अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
मुखेड प्रतिनिधी:- येथील श्रावणकावडी देवस्थान येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व स्वच्छतेचे प्रतीक असलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी आ. हणमंतराव पाटीलबेटमोगरेकर, भाजपनेते माधव अण्णा साठे, रामचंद्र आडेपवार, किशन पाटील हाके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दि. ८ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आले. तर दि.९ रोजी सकाळी १० वाजता काल्याची किर्तनाने पाच दिवसीय सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, धोबी समाजाचे नेते बालाजीराव शिंदे, ओ.बी.सी. समाजाचे नेते विश्वनाथ कोलमकर, माजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणी, अॅड. शिवराज पाटील कुंद्राळकर, सत्यवान अण्णा गरुडकर, मंदिरबांधकाम साठी डिझाईन केलेले इंजि. भारत गरूडकर, डॉ. रामराव श्रीरामे, रामराव मस्कले, अशोक पाटीलनाईक, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. सतीश धमणे, शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, शेतकरी नेते शिवशंकरपाटील कलंबरकर, बालाजी चाफेकर, संभाजी पाटील उन्द्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती
Read More » -
Uncategorized
जिल्हाधिकारी राऊत यांची बदली;त्यांच्या जागी राहुल कर्डीले
नांदेड/प्रतिनिधी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभा, लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुक यशस्वी करून जिल्ह्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. अभिजीत राऊत यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची राज्यशासनाने छत्रपती संभाजीनगरयेथे सहआयुक्त वस्तु व सेवा कर या पदावर बदली केली आहे. त्यांच्या जागी सिडको नवी मुंबई येथेसहव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेले राहुल कर्डीले यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून ४फेब्रुवारी रोजी काढलेल्या एका आदेशान्वये पाठवले आहे.
Read More » -
आरोग्य
मन्नेरवारलू सखी मंचाने रक्तदान शिबीर आयोजित करुन एक आदर्श निर्माण केला. मंगाराणी आंबुलगेकर
हळदी कुंकू सोहळयात समाजातील कतृत्वान महिलांचा सन्मान व रक्तदान शिबीराचे आयोजन. . नांदेड प्रतिनिधी:- समाजातील महिलांना संघटीत करून फक्त हळदी…
Read More »