Sharmik Ekta

  • Uncategorized

    मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्वातंत्र्य सेनानी डॉ. राजासिंह हरीसिंह चौहान यांचे नाव 

    नाव दिल्याने खूप आनंद होत आहे. या निर्णयाचे आम्ही सर्व मुखेड तालुक्यातील बांधव स्वागत व सरकारचेधन्यवाद करतो:- अरूनसिंह राजासिंह चौहान     मुखेड प्रतिनिधी:-  मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस थोर स्वातंत्र्य सेनानी डॉ. राजासिंह हरीसिंह चौहान यांचेनाव देण्याचा जीआर दि. १५ जानेवारी २०२५ रोजी राज्य सरकारने काढला.   राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत ( आयटीआय ) शिल्पकारागीर प्रशिक्षणयोजनेतर्गत ( CTS ) प्रशिक्षण देण्यात येते . या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणदेवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्याकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे .      दि . ०८ ऑक्टोबर , २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मा.मंत्री ( कौ.रो.उ.व.ना.) विभाग यांचीएकसदस्यीय समिती त्या जिल्हयाचे पालकमंत्री यांच्याशी विचारविनिमय करून नावात बदल करणेबाबतनिर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता.  त्याअनुषंगाने १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षणसंस्थांची नावे बदलण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधिन होती .    यात राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नांव बदलण्यास मान्यता दि. १५ रोजीदेण्यात आली. यात मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेस स्वातंत्र्य सेनानी डॉ. राजासिंह हरीसिंह चौहान यांचे देण्यात आले. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले

    Read More »
  • आरोग्य

    मुखेड उपजिल्हा रुग्णालयासह प्रा.आरोग्य केंद्र,उपकेंद्रात अँटी रॅबिज इंजेक्शनचा तुटवडा.

    वरिष्ठ अधिका–यांनी या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देण्याची मागणी. मुखेड / प्रतिनिधी     शासन स्तरावरून तब्बल दोन महिन्यांपासून कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असणारे अँटी रेबिजइंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात असल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिक उपजिल्हा रुग्णालयात येतआहेत.पण उपजिल्हा रूग्णालयातसुद्धा पुरवठा जेमतेम असल्याने दररोज अनेक नागरिकांना बाहेरीलखाजगी मेडिकल स्टोर मधुन इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातीलप्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही इजेंक्शन रुग्णांना मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होवुनहेळसांड होत आहे.रुग्णांची गैरसोय थांबविण्यासाठी या महत्वपुर्ण विषयाकडे संबधित विभागाच्या वरिष्ठअधिकारी यांनी लक्ष्य घालुन सर्वसामान्य नागरिकांना इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे अशी मागणीतालुक्यातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे.      मुखेड तालुक्यात ०१ उपजिल्हा रूग्णालय, ०८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३६ आरोग्य उपकेंद्र कार्यरतआहेत. पण या सर्व रूग्णालयात व आरोग्य केंद्रात मागील दोन महिण्यापासुन शासन स्तरावरून कुत्राचावल्यानंतर आवश्यक असणारे अँटी रेबिज इंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने संपूर्णतालुक्यातील वेगवेगळ्या गावातील नागरिक कुत्रा वाचल्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी मुखेड उपजिल्हारुग्णालय गाठत आहेत.कारण त्यांना त्यांच्या गावाजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात इंजेक्शनवेळेवर रुग्णांना देण्यासाठी भेटत नाहीत त्यामुळे नागरिक परेशान होत आहेत.कुत्रा वाचल्यावर घेण्याचेइंजेक्शन मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये भिती निर्माण होत आहे.सरकारी दवाखान्यात इंजेक्शन मिळतनसल्यामुळे  सर्वसामान्य नागरिकांना सदरील इंजेक्शन विकत घ्यावे लागते आहे.रुग्णांच्या नातेवाईकांनाआर्थीक भुर्दंड सोसावे लागत आहे.     शहरातील उपजिल्हा रूग्णालयात ११ जानेवारी रोजी एका युवकास कुत्रा चावल्यानंतर रूग्णालयातनेण्यात आले.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अँटी रेंबिज इंजेक्शनसाठी चक्क नांदेडला रेफरचे पत्र दिल्याचेरुग्णांच्या नातेवाईकाने सांगितले.अशा या  महत्त्वाच्या विषयाकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाआरोग्य अधिकारी यांनी लक्ष देवून रुग्णांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांतुन होतआहे.कोणत्याही व्यक्तींला कुत्रा चावल्यास त्यांना चार अँटी रॅबिज इंजेक्शन घ्यावे लागतात. तसेचचावलेली जखम खोल असल्यास अँटी रॅबिज सिरम घ्यावे लागते तेही जिल्हा स्तरावर मिळत असल्यानेसर्वसामान्य नागरिकांना कुत्रा चावल्यानंतर सरळ नांदेडला रेफर करावे लागत आहे.किंवा रुग्णांना खाजगीमेडिकल स्टोरमधुन इंजेक्शन घ्यावे लागत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दोनमहिन्यापासून अँटी रँबिज इंजेक्शनचा आरोग्य विभागाकडून पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांची हेळसांडहोत आहे याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने घेवुन इंजेक्शन उपलब्ध करुण देण्याची मागणी होत आहे.

    Read More »
  • Uncategorized

    हिमायतनगर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याचीमागणी..

     •प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांचे मुख्याधिकारी  यांना निवेदन  हिमायतनगर प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणिमध्यमवर्गीयांसाठी पीएम आवास योजना (PMAY 2.0 Scheme) सुरू केली आहे. सदर योजनेचे नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना घरकुल  योजनेची मागणी हिमायतनगर नगरपंचायतचे मा. नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद…

    Read More »
  • Uncategorized

    राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

    मुखेड(प्रतिनिधी) शिवश्री किड्स प्ले इंग्लिश स्कूल मुखेड येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटातसाजरी करण्यात आली. सौ. सरस्वती विष्णकांत इंगोले यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन जिजाऊ वंदना घेण्यात आली. शाळेतीलविद्यार्थी माँसाहेब जिजाऊंच्या  तर काही विद्यार्थी स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजांच्यावेशभुषेत व काही विद्यार्थी मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्वप्ने व स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजयांना देऊन समतेचे स्वराज्य निर्माण करण्यात राजमाता जिजाऊ यांचे योगदान महत्वाचे आहे. आजच्याकाळातही राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि कार्य तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचारही समाजालाविधायक दिशा देत असल्याचे प्रतिपादन शाळेचे संचालिका सौ. सरस्वती इंगोले मॅडम यांनी केले.शिवश्री किड्स यांच्या प्ले इंग्लिश स्कूल मुखेड येथे राजमाता जिजाऊ व स्वामीविवेकांनद जयंतीचे आयोजनकरण्यात आले होते. या प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मतव्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यावेळी त्यांनीराजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीमहाराज यांची वैचारीक, राजकीय, सामाजीक जडणघडण करण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे विचारअत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचावारसा पुढे चालविणे आवश्यक असल्याचेही सांगितले. आपल्या मुलावर संस्कार करतांना प्रत्येक आईनेराजमाता जिजाऊ यांचे विचार आणि चरित्र समोर ठेवणे आवश्यक आहे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठीजिजाऊचे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या स्वराज्यात सर्व जातीधर्मातील सामान्य, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित लोकांना न्याय देत त्यांचाउत्कर्ष कसा साधला जाईल यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वराज्यास मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंगोले सर, इंगोले मॅडम यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी संचालिका सौ. सरस्वती इंगोले मॅडम, मुख्याध्यापिका सौ. स्मिता मुखेडकर, सौ. कुंदरुपे मॅडम, सौ. बादेवाड मॅडम, समरीन मॅडम, सौ. ताटे बाई* तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

    Read More »
  • क्रीडा

    म.ज्यो.फुले महाविद्यालयात नेहरू युवा केंद्राची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी

    मुखेडप्रतिनिधी :-येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग , क्रीडा विभाग आणि नेहरू युवा केंद्र , नांदेड यांच्या…

    Read More »
  • क्राईम

    पिता पुत्रांच्या आत्महत्तेस जबाबदार महाराष्ट्र ग्रामीण बॅकेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा

    आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला ५० लाख रु तातडीने मदत द्यावी. बिलोली दि.१३ (प्रतिनिधी) मिनकी येथे शेतकरी पितापुत्रांनी केलेल्या आत्महत्ते नंतर शेतकरी…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड रजिस्ट्री कार्यालयात आर्थिक पिळवणूक प्रकरण दोषीवर कार्यवाही करा अन्यथा अमरण उपोषण – अरण्ये

    कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे तहसिलदार यांचे सह जिल्हा निबंधक यांना पत्र मुखेड प्रतिनिधी मुखेड दुय्यम निबंध कार्यालयात रजिस्ट्री करीत…

    Read More »
  • आरोग्य

    पत्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे डॉ. संतोष टाकसाळे

    दर्पण दिनानिमीत्त पत्रकार संघाचे ३ दिवस विविध उपक्रम. गजानन बंडे यांनी धन्वतंरी क्लिनिकल लॅबच्या माध्यमातून केली मोफत तपासणी… सुदृढ आरोग्य हे यशस्वी जिंवंनाची गुरुकिल्ली आहे.:- प्रसिद्ध सर्पदंशतज्ञ डॉ. दिलीप पुंडे मुखेड प्रतिनिधी:-  पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या पत्रकाराने आहार विहारसोबत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले आरोग्य सुदृढ राहिले, स्वास्थ चांगले राहिले तरचअधिक क्षमतेने सामजिक काम करण्यास आपणास मदत होणार आहे. आजाराचे प्रकार, लक्षणे बदलतआहेत, विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे, व्हायरस बदलून येत आहेत, आजार लपवल्याने सुद्धावाढतो, आजाराचे लक्षणे जाणवल्यास, वेळीच आजाराचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार करण्यातयेतो. आजारावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे सर्वांनी शारीरिक तपासणी नियमित करणे ही काळाची गरजआहे असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोष टाकसाळे यांनी केले आहे. यावेळी डॉ.दिलीप पुंडे बोलताना म्हणाले की  सुदृढ आरोग्य हे यशस्वी जिंवंनाची गुरुकिल्ली आहे. समाजघडविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करतात सर्व घटकातील नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी पत्रकारअहोरात्र मेहनत करत असतात कामाच्या ओघात झोप,आहाराकडे दुर्लक्ष होते.सर्व क्षेत्रासह पत्रकारिताक्षेत्रात वाढत्या स्पर्धा बातम्या देण्यासाठी साकारलेली भूमिका जोखीम यातून तानतणाव वाढत आहे त्यामुळेअनेक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह,रक्तदाब,वाढीव कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहे. पत्रकाराने स्वतःसह आपल्या कुटुंबाची परिवाराचे आरोग्याची काळजी घ्यावी नियमित आरोग्य तपासणीकरवून घावे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यताआहे,आरोग्य विमा कवच काढुन घ्यावे,दिवसा गनिक मोठ्या कॉर्पोरेट आधुनिक रुग्णालयात आजार वरीलउपचार महागले आहेत.आरोग्य विमा कवच काळाची गरज झाल्याचे मत व्यक्त केले आहे प्रसिद्ध –हदयरोतज्ञ डॉ.अशोक कौरवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की पत्रकारांनी आपल्यासहआपल्या सर्व परिवाराचीही आरोग्याची काळजी घेण्याचे आपल्या मनोगतातुन आवाहन केले आहे दर्पण दीनानिमित्त अ.भा. मराठी पत्रकार परिषद सलग्णीत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ, उपजिल्हा रुग्णालय मुखेड, आय. एम.ए. संघटना व वैद्यकीय संस्थेच्या वतीने वार्ताहरांची आरोग्य तपासणी शिबिरउपजिल्हा रुग्णालयात पार पडले यावेळी ते बोलत होते. पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराच्याअध्यक्षस्थानी डॉ. संतोष टाकसाळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सर्पदंशतज्ञ मुखेड भुषण डॉ. दिलीप पुंडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार होते यावेळी डॉ.कैलास चांडोळकर, डॉ.व्यंकटरावसुभेदार, डॉ.श्रीहरी बुडगेमवार, डॉ.पांडुरंग श्रीरामे, डॉ यु.आर गायकवाड, डॉ. बी.एस गरुडकर, डॉ.एच एसमेकेवाड, डॉ.मुकुल गोपुलवाड, डॉ.बी आदमपुरकर, डॉ.वर्षा कोरडे मॅडम, डॉ.शेटवाड, डॉ.जुनेद शेख, डॉ.अंजली ढवळे मॅडम आदी उपस्थित होते

    Read More »
  • Uncategorized

    म.ज्यो. फुले महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा साजरा

    मुखेड प्रतिनिधी :- शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील प्रसिद्धी विभागाकडून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती…

    Read More »
  • Uncategorized

    जि.प.मुलींचे हायस्कूलमध्ये वॉटरफिल्टर यंत्राचे लोकार्पण

    गटविकासधिकारी व गटशिक्षण अधिका-यांची प्रमुख उपस्थिती. शालेय व्यवस्थापन समिती,शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग. मुखेड / प्रतिनिधी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त…

    Read More »
Back to top button