Uncategorized
-
स्मार्ट मीटरच्या सक्तीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने दिला महावितरणला आंदोलनाचा इशारा…
▫️नांदेड झोनच्या अधीक्षक अभियंत्यास देण्यात आलं मागणींचे निवेदन… नांदेड प्रतिनिधी:- १३ ऑगस्ट २५नांदेड : महावितरणकडून शहरात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या…
Read More » -
मुखेड: युवकाचा संशयास्पद मृत्यू
▫️रक्ताच्या थारोळ्यात सापडला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय;शहरात खळबळ मुखेड प्रतिनिधी:- १२ ऑगस्ट २५ मुखेड शहरा जवळील तांदळी येथील रहिवाशी बाबाराव बालाजी मेथे युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि १२ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील तांदळी येथील रहिवासी युवक बाबाराव बालाजी मेथे वय २७ हा तेलंगणातील अरमूर येथे रोजगाराचे काम करण्यास गेलेला होता तो काल आपल्या गावी तांदळी येथे येऊन त्याच्या छोट्या मुलीला कावीळ झाल्याने शिवणखेड येथे औषध उपचार करण्यासाठी नेऊन परत आपल्या गावी आले व सोमवारी आठवडी बाजाराचा भाजीपाला अनण्यासाठी मुखेड येथे आले पण ते घरीन परतल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शोधा शोध सुरू केली परंतु रात्रभर मिळून आले नाही आज सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू केली असता शहरातील बारहाळी रोड फिल्टर पाण्याची टाकी जवळील…
Read More » -
मुखेड कोर्टासमोर रस्त्यावरच चालतेय बेकायदेशीर दुचाकी दुकान; नरसी रोडवर अतिक्रमणाने नागरिक त्रस्त
मुखेड -(ता. प्रतिनिधी) ०९ ऑगस्ट २५ नरसी रोडवरील कोर्टासमोरील रस्त्यावर हिब्बटकर यांचे मोटारसायकल व पिचकारी दुरुस्तीचे दुकान बेकायदेशीरपणे रस्त्यावर थाटले गेले असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दुकानातून रस्त्यावरच मोटार सायकलींची दुरुस्ती आणि पिचकारी फवारणीचे काम केले जात असल्याने सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरून ये–जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास होत असून, अपघाताचेही धोके वाढले आहेत. विशेष म्हणजे सदर दुकानदार हे कोर्टा समोरच दुकान थाटून आवाजाने व फवारणीतून निर्माण होणाऱ्याध्वनी आणि रासायनिक प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शासकीय कार्यालये, इंग्रजी माध्यमाची शाळा आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी करूनही अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे“, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Read More » -
रक्षाबंधन निमित्त जि.प.मुलींचे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी पाठवल्या ५०० राख्या.
▫️”माझी शाळा माझे उपक्रम” अतंर्गत विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या व भेटकार्ड पत्र,शुभेच्छा संदेश. मुखेड / प्रतिनिधी. दि.०९ ऑगस्ट २५ शहरातील…
Read More » -
प्रवासी युवका कडून महिला वाहकाला मारहाण;गुन्हा दाखल
मुखेड प्रतिनिधी:- ०८ ऑगस्ट २५ तिकिटाचे चिल्लर पैसे मागितले म्हणून प्रवाशाने एस टी. महिला कंडक्टरला शिवीगाळ करत थापड मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुखेड ते शिरूर बसमध्ये घडली. घटनेबाबत शिरूर आगारातील महिला वाहक महेश्वरी एकलारे वय (५०) मुखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विजय बापूराव वाघमारे रा. बावनवाडी यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार महेश्वरी एकलारे या शिरूर आगारात गेल्या २२ वर्षांपासून एस.टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी…
Read More » -
पिसाळलेला कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दुध प्यायलेल्या १८२ ग्रामस्थांनी भीतीपोटी रुग्णालयात घेतली रेबीज लस
मुखेड प्रतिनिधी:-०७ ऑगस्ट २५मुखेड लुक्यातील बिल्लाळी येथील शेतकरी रामदास किशन इंगळे यांच्या म्हशीचा पिसाळलेले कु्त्रा चावल्याने मृत्यू झाला होता .…
Read More » -
मुखेड शहरात “अंगदान जीवन संजीवनी” अभियान अंतर्गत जनजागृती रॅली संपन्न
मुखेड प्रतिनिधी:- ७ ऑगस्ट २५ महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्य भरात ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पावडे,नोडलअधिकारी डॉ. हनुमंत पाटील, व डॉ. बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषटांकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे दि ५ ऑगस्ट रोजी अंगदान जीवन–संजीवनी अभियान अंतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतामध्ये पहिले हृदयप्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो .हाउद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मेकेवाड, डॉ. गोपुलवाड, डॉ. शेटवाड, उपस्थित होते. व वरिष्ठलिपीक,माधव तोटावाड , RKSK समुपदेशक शौकत अली बेग व NCD समुपदेशक, शेख शहानवाज,NCD…
Read More » -
रेल्वेने १८ किलोमीटर फरफटत नेला मृतदेह इस्लामपूर ते हिमायतनगर लोहमार्गावरील घटना
हिमायतनगर प्रतिनिधी:- ०७ ऑगस्ट २५ धावत्या रेल्वेमध्ये उतरायचा प्रयत्न करत असलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा…
Read More » -
मुखेड येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा जिल्हा समितीचे चौथे अधिवेशन उत्साहात पार पडले
मुखेड प्रतिनिधी:- ७ ऑगस्ट २५ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाचे नांदेड जिल्हा समितीचे चौथे जिल्हा अधिवेशन मुखेड येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात सवार्नुमते महत्वाचे ठराव पारित करण्यात आले. शेतमजुर, कामगारव मजुरांचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच १३ सदस्यीय जिल्हा समितीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ. अंकुश अंबुलगेकर यांची तर जिल्हा सचिवपदी कॉ. मंजुश्री कबाडे यांची पुनर्निवड करण्यात आली. मुखेड येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या नांदेड जिल्हा अधिवेशनाच्या मंचास कॉ. सुभाष थोरात यांचे तर सभागृहास कॉ. उत्तम पुंडगे यांचे नाव देण्यात आले. लाल बावटाचे जिल्हाध्यक्ष कॉ. अंकुश अंबुलगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात करण्यातआली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हासचिव कॉ. मंजुश्री कबाडे यांनी केले. अधिवेशनाचे उदघाटन शेतमजुर युनियनचे राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे यांनी केले याप्रसंगी राज्यसमिती सदस्य कॉ. भगवानकोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉ. अंकुश अंबुलगेकर, कॉ. रुक्मिनताई घुळेकर, कॉ. शहादत धुंदीयांच्या अध्यक्ष मंडळाने अधिवेशनाचे कामकाज पाहिले. स्टीअरिंग कमिटीमध्ये कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. मंजुश्री कबाडे हे होते. कॉ. लक्ष्मण भोकसखेडे, कॉ. रामराव यामावाड यांची मिनिट्स कमिटी होती. अधिवेशनात जिल्हा सचिव कॉ. मंजुश्री कबाडे यांनी मागील तीन वर्षांचा राजकीय, संघटनात्मक वकार्यात्मक अहवाल मांडला व तो सर्वांसमोर पारित झाला. अधिवेशनात खालील महत्वाचे ठराव पारितकरण्यात आले यामध्ये गायरान जमीन, वन जमीन व इतर जमिनीवरील कसण्मैया दलित, आदिवासीतसेच इतर भुमीहीनांच्या नावे जमीन झाली पाहिजे आणी बेघरांना घरे बांधण्यासाठी प्लॉट मिळाले पाहिजे करिता संघर्ष उभारणे, युनियनचे अस्तित्व असलेल्या प्रत्येक गावात मनरेगा अंतर्गत रोहयोचे कामसुरू करणे व इतर गावांमध्ये त्या आधारे युनियनचा विस्तार करणे, महिला, दलित व आदिवासीयांच्यासोबतच्या भेदाभेद व इतर स्वरूपाच्या अत्याचाराविरु द्ध लढणे, शेतमजुरांच्या बरोबरीने इतरग्रामीण मजुरांना युनियनच्या झेंड्याखाली संघटित करणे, बांधकाम कामगार व ऊसतोड कामगारांमध्ये विशेषत्वाने युनियन मजबूत करणे या ठरावाच्या आधारे पुढील काळात शेतमजूर व ग्रामीण मजुरांचासंघर्ष तीव्र करण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला. जिल्हा अधिवेशनात १३ सदस्यांची जिल्हासमिती निवडण्यात आली. राज्यधिवेशनासाठी एकूण १५ प्रतिनिधी व ०५ निरीक्षक निवडण्यात आले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. अकबर सय्यद, मुखेड तालुका सचिव कॉ. शहादत धुंदी, कॉ. प्रदीप देशटवाड यांनी विशेष परिश्रम घेतले तर कॉ. लक्ष्मण भोकसखेडे, कॉ. रामराव यामावाड, कॉ. अंबादास…
Read More » -
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा
नांदेड प्रतिनिधी:- ०६ ऑगस्ट २५ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुधवरी 6 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी…
Read More »