Uncategorized

  • जिप्सी मॉर्निंग ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    ▫️प्रशस्तीपत्र ठरले विशेष आकर्षण मुखेड: २२ जुलै २५जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध परीक्षेत नैपुन्य मिळवलेल्या गुणवंताचा सत्कार जोशी इन्फोटेकच्या कॉन्फरन्स…

    Read More »
  • ग्रामीण गुंठेवारी प्रस्‍ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल करावेत

     नांदेड प्रतिनिधी :- दि. २० जुलै २५   गुंठेवारीचे प्रस्‍ताव दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड (चिखलवाडी कॉर्नर नांदेड) येथे गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला…

    Read More »
  • व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

    नांदेड दि.१७ जुलै २५नांदेड येथील महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या प्रीतिप्रेमाच्या भावनेला आध्यात्मिक उंचीवर नेणाऱ्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाला मातोश्री केवळाबाई…

    Read More »
  • दौंडमधील खळबळजनक घटना; नवरा आणि महिलाच्या वादात , 11 महिन्यांचा चिमुकला ठरला शिकार

    दौंड:- ११ जुलै २५ पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एकामहिलेनं आपल्या पत्नीवर त्रिशूलने हल्ला केला होता. पण या वादात पत्नीच्या हातून हा त्रिशूल थेट ११महिन्यांच्या मुलाच्या शरीरात घुसला. या दुर्दैवी घटनेत निष्पाप मुलाचा हकनाक मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती–पत्नीलाअटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अवधूत मेंगावडे असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या ११ महिन्यांचा होता, जग कळायच्याआत जन्मदातीच्या हातून चिमुकल्याला मरण आलं आहे. ही घटना दौंड तालुक्याच्या केडगाव याठिकाणीघडली. अशाप्रकारे मुलाचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच यवतपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन मेंगवडे हे आपली पत्नी आणि मुलासह केडगावमध्ये राहतात. घटनेच्या वेळी किरकोळ कारणावरून त्यांचा बायकोसोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्या नंतर बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूल घेतला. पण तो त्रिशूल बाजूला भावजयीच्या कड्यावर असलेल्या मुलाला लागला. जखमी झालेल्या चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पणत्रिशूलचा घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

    Read More »
  • मुखेड तालुक्यात कृषी विभागाच्या आशीर्वादाने युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकरी हवालदिल

    मुखेड : प्रतिनिधी ०९ जुलै २५  मुखेड तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, आणि यात कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. खत विक्रेते जादा दराने खते विकत आहेत आणि काही ठिकाणीखतासोबत इतर खते घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  मागील काही दिवासांपासून कृषी सेवा केंद्र चालकांकडून वेगवेगळी कारणे देऊन, युरियाची कृत्रिमटंचाई निर्माण केली जात आहे. मात्र, कृषी केंद्र चालकांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणतीहीठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गुरुवारी अनेक दुकानात फिरूनही युरिया मिळाला नाही. खरेदी विक्रीसंघाचे कार्यालयात युरिया नसल्याने शेतकरी हैराण झालेल्या चित्र मोंढ्यात पाहावयास मिळत आहे. युरिया खताचा भाव २६५ रुपये असून सध्या ५०० एम एल लिक्विड युरिया उपलब्ध असून त्यांची किंमत२२५ आहे. ठोक विक्रेते किरकोळ व्यापारी दुकानदारांना पाहिजे असल्यास लिंकिंग नॅनो युरिया घेतल्यास आम्ही युरिया तुम्हाला देऊ या भूमिकेत आहेत. शहरातील ठोक व्यापारी बफर स्टॉक केल्याने मोढ्या येथील एकूण २५ कृषी सेवा केंद्रापैकी फक्त दोनच दुकानात युरिया उपलब्ध आहे. तर २३दुकानात तब्बल १ महिन्यापासून युरिया सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यानो युरिया शेतकऱ्यांनी घेण्यासाठी शहरात युरिया खताचा भाव २६५रूपये तर बाराहाळी रस्त्यावर व बेरळी रस्त्यावर असलेल्या वेअर हाऊसमधील स्टॉक असलेल्या युरियाखत बाहेर जिल्ह्यातील जळकोट, जांब, उदगीर, देगलूर येथे ४०० रुपये दराने खुलेआम विक्री चालू आहे.  काही खत विक्रेते युरिया खताची जादा दराने विक्री करत आहेत, आणि काही ठिकाणी खतासोबत इतरखते घेण्याची सक्ती केली जात आहे या विषयाकडे तहसीलदार, कृषी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. गावोगाव प्रचार व माहिती देणे, आवश्यक असताना पंचायत समिती, कार्यालयात कृषी विभाग व तालुकाकृषी अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकत आहेत. तालुका खरेदी विक्री एक खत नाही संघात दोन ट्रकयुरिया उपलब्ध झाला होता; पण चार दिवसांत युरिया खताची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहितीमिळाली आहे.…

    Read More »
  • आयडीबीआय बँक शाखा व्यवस्थापकाचे अपघाती मृत्यू; सोमवारी होता विवाह सोहळा

    हदगाव:- ०७ जुलै २५ लोहा येथे नुकतेच बदली झालेले आयडीबीआय बँकेचे मॅनेजर आशिष देशमुख (वय ३०) यांचा कवठा गावाजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास नांदेड–नागपूरराष्ट्रीय महामार्गावर हदगाव तालुक्यातील कवठा गावाजवळ घडली. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी लाधडक दिली. देशमुख मूळचे वाशिम जिल्ह्यातील असून सोमवारी त्यांचा विवाह सोहळा होणार होता. ते अविवाहित असून कुटुंबातील एकुलता एक मुलगा होते. अपघातावेळी रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कामाचीमाती फेकलेली होती आणि हलक्या पावसात हेल्मेटमुळे दृश्यता कमी झाल्याचा अंदाज वर्तवला जातआहे. आशिष देशमुख यांच्या पश्चात कुटुंबामध्ये आई,दोन बहिणी, काका, काकू, भावंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आशिष देशमुख हेकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भैय्यासाहेब देशमुख, डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्षडॉ,अरुण देशमुख यांचे पुतणे आहेत. आशिष च्या अकाली निधनाची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी एकच टाहो फोडला आषाढीएकादशीच्या पूर्वसंध्येला त्याचे निधन झाल्याने गावकऱ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली नाही.

    Read More »
  • अनिकेत अन्नमवाड या तरूण कर्मचार्‍याचां कार्यालयात र्‍हदयविकारांने मृत्यु

    मुखेड गटविकास अधिकारी रामोड यांचे ते जावाई होते मुखेड प्रतिनिधी:- ०३ जुलै २५ मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथिल अनिकेत गंगाराम…

    Read More »
  • संघर्षमय जीवनातील प्रवासाचा वाटसरु म्हणजे माझा मोठा भाऊ,माझा आधारस्तंभ – प्रकाश दत्ता सोनकांबळे बेटमोगरेकर

    जीवनातील प्रत्येक संकटाशी सामना कसा करावा हे मायेची ऊब देत कुटुंबासह इतरांना समजून सांगणारं आणि स्वतः आलेल्या परिस्थितीशी दोन हात…

    Read More »
  • प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    नांदेड दि. २८ जून २५ :-  केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांचे वय ५…

    Read More »
  • आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव 

    नांदेड प्रतिनिधी:- २६ जून २५ 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या घोषीत कालावधीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी…

    Read More »
Back to top button