Uncategorized

  • उद्यापासून श्रावणकावडी देवस्थानचा कलशारोहण कार्यक्रम

    मुखेड प्रतिनिधी:-   मुखेड शहरापासून जवळच असलेल्या ऐतिहासिक रामायणकालीन श्रावणकावडी देवस्थानच्याकलशारोहण कार्यक्रमास ५ फेब्रुवारीपासून सुरुवात तर ९ फेब्रुवारी रोजी सांगता होणार असल्याची माहितीश्रावणकावडी देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमास येवती मठाचे मठाधिपती सद्‌गुरु नराश्याम महाराज, मुखेड गणाचार्य मठाचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, हाळदा मठाचे मठाधिपती हाळदेकर महाराज, कोलंबी मठाचे मठाधिपतीकोलंबीकर महाराज, बेटमोगरा मठाचे मठाधिपती डॉ. सिध्ददयाळ बेटमोगरेकर महाराज, बारुळ मठाचेमठाधिपती श्रीसंत नामदेव महाराज बारुळकर, दापका मठाचे मठाधिपती नामदेव महाराज दापकेकर यांचीप्रमुख उपस्थिती असणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार असून, रात्री ८ वाजताएकनाथ महाराज वंडगीरकर, ६ रोजी त्र्यंबक महाराज नंदगावकर यांचे कीर्तन, ७ रोजी सकाळी ९ वाजतामूर्ती प्राणप्रतिष्ठापणा, कलशारोहण मठाधिपतींच्या सान्नीध्यांत होणार आहे तसेच रात्री ८ वाजता नामदेवमहाराज दापकेकर यांचे कीर्तन होणार आहे. ८ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहेतसेच ९ फेब्रुवारी रोजी नरसिंग महाराज केरुरकर यांचे सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन व दुपारीमहाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमासाठी ब्रह्मवृंद वे.शा.सं.श्री प्रबोधन महाराज शास्त्री पाळेकर, ह.भ.प. शिवाजी महाराज जळकोटकर, अण्णासाहेब महाराज जुन्नेकर यांच्या नियोजनात कार्यक्रम होतील. यासंपूर्ण कार्यक्रमास भाविक– भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्याबाई भीमरावमहाराज श्रावणकावडीकर यांनी केले आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी गजानन उत्तमराव कवटीकवार, ६ रोजी श्रावणकावडी देवस्थान समिती व रामरावमस्कले, ७ रोजी संतोष मारोतीराव बोनलेवाड, ८ रोजी बाबुराव हाणमंतराव देबडवार व राजेश चौधरी व ९रोजी बबलू शेषराव टेकाळे यांच्या वतीने अन्नदान होणार आहे

    Read More »
  • सेलू येथील पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्यास मुखेडहून मोठ्या संख्येने पत्रकार जाणार – महेताब शेख.

    मुखेड / प्रतिनिधी. मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्ण परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने…

    Read More »
  • सेलू येथील १ फेब्रुवारीच्या मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – महेताब शेख.

    मुखेड / प्रतिनिधी. मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्ण परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने…

    Read More »
  • “पोलिस व पत्रकारांना परस्पर सहकार्याची गरज” : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार

    देगलूर/प्रतिनिधीपत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देगलूर येथे आयोजित पोलीस व पत्रकारांचा सन्मान आणि कार्यालय उद्घाटन सोहळ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार…

    Read More »
  • मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्वातंत्र्य सेनानी डॉ. राजासिंह हरीसिंह चौहान यांचे नाव 

    नाव दिल्याने खूप आनंद होत आहे. या निर्णयाचे आम्ही सर्व मुखेड तालुक्यातील बांधव स्वागत व सरकारचेधन्यवाद करतो:- अरूनसिंह राजासिंह चौहान     मुखेड प्रतिनिधी:-  मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस थोर स्वातंत्र्य सेनानी डॉ. राजासिंह हरीसिंह चौहान यांचेनाव देण्याचा जीआर दि. १५ जानेवारी २०२५ रोजी राज्य सरकारने काढला.   राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत ( आयटीआय ) शिल्पकारागीर प्रशिक्षणयोजनेतर्गत ( CTS ) प्रशिक्षण देण्यात येते . या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणदेवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्याकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे .      दि . ०८ ऑक्टोबर , २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मा.मंत्री ( कौ.रो.उ.व.ना.) विभाग यांचीएकसदस्यीय समिती त्या जिल्हयाचे पालकमंत्री यांच्याशी विचारविनिमय करून नावात बदल करणेबाबतनिर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता.  त्याअनुषंगाने १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षणसंस्थांची नावे बदलण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधिन होती .    यात राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नांव बदलण्यास मान्यता दि. १५ रोजीदेण्यात आली. यात मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेस स्वातंत्र्य सेनानी डॉ. राजासिंह हरीसिंह चौहान यांचे देण्यात आले. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले

    Read More »
  • हिमायतनगर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याचीमागणी..

     •प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांचे मुख्याधिकारी  यांना निवेदन  हिमायतनगर प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणिमध्यमवर्गीयांसाठी पीएम आवास योजना (PMAY 2.0 Scheme) सुरू केली आहे. सदर योजनेचे नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना घरकुल  योजनेची मागणी हिमायतनगर नगरपंचायतचे मा. नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद…

    Read More »
  • राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

    मुखेड(प्रतिनिधी) शिवश्री किड्स प्ले इंग्लिश स्कूल मुखेड येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटातसाजरी करण्यात आली. सौ. सरस्वती विष्णकांत इंगोले यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन जिजाऊ वंदना घेण्यात आली. शाळेतीलविद्यार्थी माँसाहेब जिजाऊंच्या  तर काही विद्यार्थी स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजांच्यावेशभुषेत व काही विद्यार्थी मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्वप्ने व स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजयांना देऊन समतेचे स्वराज्य निर्माण करण्यात राजमाता जिजाऊ यांचे योगदान महत्वाचे आहे. आजच्याकाळातही राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि कार्य तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचारही समाजालाविधायक दिशा देत असल्याचे प्रतिपादन शाळेचे संचालिका सौ. सरस्वती इंगोले मॅडम यांनी केले.शिवश्री किड्स यांच्या प्ले इंग्लिश स्कूल मुखेड येथे राजमाता जिजाऊ व स्वामीविवेकांनद जयंतीचे आयोजनकरण्यात आले होते. या प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मतव्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यावेळी त्यांनीराजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीमहाराज यांची वैचारीक, राजकीय, सामाजीक जडणघडण करण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे विचारअत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचावारसा पुढे चालविणे आवश्यक असल्याचेही सांगितले. आपल्या मुलावर संस्कार करतांना प्रत्येक आईनेराजमाता जिजाऊ यांचे विचार आणि चरित्र समोर ठेवणे आवश्यक आहे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठीजिजाऊचे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या स्वराज्यात सर्व जातीधर्मातील सामान्य, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित लोकांना न्याय देत त्यांचाउत्कर्ष कसा साधला जाईल यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वराज्यास मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंगोले सर, इंगोले मॅडम यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी संचालिका सौ. सरस्वती इंगोले मॅडम, मुख्याध्यापिका सौ. स्मिता मुखेडकर, सौ. कुंदरुपे मॅडम, सौ. बादेवाड मॅडम, समरीन मॅडम, सौ. ताटे बाई* तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

    Read More »
  • म.ज्यो. फुले महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा साजरा

    मुखेड प्रतिनिधी :- शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील प्रसिद्धी विभागाकडून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती…

    Read More »
  • जि.प.मुलींचे हायस्कूलमध्ये वॉटरफिल्टर यंत्राचे लोकार्पण

    गटविकासधिकारी व गटशिक्षण अधिका-यांची प्रमुख उपस्थिती. शालेय व्यवस्थापन समिती,शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग. मुखेड / प्रतिनिधी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त…

    Read More »
  • जांब बु  येथील सोसायटीतील कागदपत्रे चोरीस अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

    जांब प्रतिनिधी:- तालुक्यातील जांब बु येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या कार्यालयात चोरीझाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी २००७ ते २०१० या कालावधीतील मासिक व वार्षिक सभेचीसुचना बुक, प्रोसिडींग बुक, किर्द रजिस्टर आणि कर्ज खतावणीचे जुने रजिस्टर असे एकूण सहा महत्त्वाचेकागदपत्रे चोरुन नेली आहेत. सोसायटी सचिव रोहीदास वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताकार्यालय कुलूपबंद केले होते. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयात आल्यावर कुलूप तोडूनखिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी लोखंडी कपाटातून महत्त्वाचीकागदपत्रे लंपास केली असून, यांची अंदाजे किंमत ५८० रुपये आहे.  या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३३१ (४) आणि३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २००७ ते २०१० या काळात सोसायटीवरप्रशासक नेमण्यात आला होता. तसेच, जागेच्या मालकीसंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. त्यामुळे हीचोरी हेतुपुरस्सर केली गेली की साधी चोरी आहे, यावर गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे

    Read More »
Back to top button