Uncategorized
-
आ.डॉ तुषार राठोड यांना आरोग्यमंत्री पदी निवड करुन, रुग्णसेवा मजबूती करण्याची संधी द्यावी- आदी बनसोडे
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड:- मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपा पक्षाकडून प्रचंड मताधिक्यानेविजयी होणारे आमदार डॉ तुषार राठोड यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळा मध्ये आरोग्यमंत्री पदी निवड करुन, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा मजबुती करण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी नर्सेस संघटना समन्वय आदीबनसोडे यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा मा. देवेंद्र फडणवीसयांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे. मुखेड कंधार मतदार संघामध्ये मागील दहा वर्षांच्या कालावधीत प्रचंड प्रमाणात निधी मंजूर करुनतालुक्याचा सर्वांगिण विकास केला आहे, डॉ तुषार राठोड हे स्वतः एम बि बि एस , रेडीओलाॅस्टिटवैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन वडीलांच्या निधनामुळे, रिक्त झालेल्या विधानसभापोटनिवडणुकीत मतदारसंघातील नागरीकांच्या आग्रहास्तव राजकारण आले त्यांनी मतदार संघातसर्वाणगिक विकासाबरोबरच शहरातील नागरिकांनसह ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवाउपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची मंजुरी आणून, तालुक्यातील आरोग्यसेवामजबुत केली आहे, शहरांमध्ये 100 खांटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन आणले, कोरोना काळातदेवदुता सारखं नागरिकांच्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे आरोग्याची काळजी घेतली, नागरिकांना मास्क वाटप, आरोग्य तपासणी, सोशल डिसटंन्स पाळून भाजीपाला, किराणा उपलब्ध करुन दिले, अनेकांना राशन किटवाटप केले, नागरिकांच्या सेवेसाठी स्वतः कोव्हिड पाॅझिटीव्ह झाले, असे होऊनही कोव्हिड रुग्णांनावेळोवेळी धिर दिला, अंगणवाडी,शाळा बंद असताना शासनाकडून मागणी करुन, पाकीट बंद खाऊचेघरपोच वाटप करुन, बालकांच्या पोषणाची जबाबदारी देऊन कुपोषणापासुन रोखणाऱ्या युवा नेतृत्वलोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड यांची महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्तारात आरोग्यमंत्री पद देऊनमहाराष्ट्राची आरोग्यसेवा मजबुत करण्याची संधी द्यावी, अशी मागणी मतदार संघातील युवक आरोग्यदूतनर्सेस संघटना मराठवाडा विभागाचे समन्वयक आदी बनसोडे यांनी निवेदनाद्वारे भाजपाचे प्रदेश अध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे
Read More » -
उंद्री प.दे. येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त रविवारी भव्य पालखी सोहळा !
आज जागरण तर सोमवारी महाप्रसाद व कुस्त्यांची भव्य दंगल मुखेडतालुक्यातील उंद्री प.दे. येथेश्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आज पासून विविध…
Read More » -
भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसी मुख्यमंत्री करायला हवे
ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांची मागणी मुखेड प्रतिनिधी:- भाजपाचा डीएनए ओबीसीचा असल्याचे भाजपा व महायुतीचे स्पष्ट बहुमत आलेले असताना मुख्यमंत्रीओबीसींचा करून फडणवीसांनी वक्तव्य सिद्ध करावे अशी मागणी ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांनीकेली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस नेहमीच भाजपाचा डीएनए ओबीसींचा असल्याचे वक्तव्य करत असतात. महाराष्ट्र विधानसभानिवडणुकीत कधी नव्हे ते भाजपा प्रणित महायुतीचे राक्षसी बहुमत मिळाले आहे शिवाय महायुतीत अनेकओबीसी आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. अशावेळी फडणवीस यांनी आपले वक्तव्य सिद्धकरण्यासाठी ओबीसी नेतृत्व पुढे आणून मुख्यमंत्रीपद बहाल करावे. अन्यथा फडणवीसांनी ते वक्तव्य केवळमराठा समाजाविरुद्ध ओबीसी समाजाला भडकावून त्यांना भाजपाकडे वळवण्याचे षडयंत्र म्हणून त्यांनाभाजपाकडे वळवण्यासाठी केल्याचे सिद्ध होईल. भाजपा आणि फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा अशाप्रकार चा एकतर्फी विजय महायुतीला मिळालेला आहे अशा वेळेस भाजपाचा डीएनए ओबीसीचा असल्याचेसिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्रीपद ओबीसी नेतृत्वाला देण्यात यावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ओबीसीनेते व ओबीसी जनगणना परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी केले आहे.
Read More » -
मुखेड विधानसभा मतदार संघात आज ३६६ केंद्रावर २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती
१० पोलीस अधिकारी, १०० सीआरपी जवान, ३४७ पोलीस कर्मचारी व ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात ५१ बस व ४२ खासगी वाहनांची व्यवस्था मुखेड प्रतिनिधी:- मुखेड : मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीसाठी२० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून मतदार संघात ३६६ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रापर्यंतकर्मचाऱ्यांना ने–आण करण्यासाठी ५१ बस व ४२ खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सर्वमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या राष्ट्रीय उत्साहातसहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी व लोकसभा प्रशासनाने मतदारांच्या पूर्ण सुविधेसह ३६६ मतदान केंद्रे सुरूकेले आहेत. यासाठी लागणारे २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यांत आली. मतदानकेंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कामी १०पोलीस अधिकारी, १०० सीआरपी जवान, ३४७ पोलीस कर्मचारी व ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यातआले आहे. मतदार संघात जिल्हा परीषद हायस्कूल सावरगा येथे अंपग मतदान केंद्र, शहरातील शिवाजी नगर येथीलगुरुदेव विद्या मंदीर येथे सखी मतदान केंद्र, जांब (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युवा मतदानकेंद्र तर नगर परिषद येथील हुतात्मा स्मारक येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदानकेंदावर अपंग मतदारांसाठी व्हिल चेअर व रॅमची व्यवस्था करण्यांत आलेली आहे व २८३ मतदान केंद्रावरजीपीआरएस व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सदरील निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णयअधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातनिवडणुक विभागाचे नायब तहसीलदार जोहरे, नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकास अधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी, पाटील, गट विकास अधिकारी, महेश पाटील, लिपीक प्रशांत लिंबेकर, महाडीवाले, मंडळ अधिकारी जी.एस. गरुडकर, एस.डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, एन. एस. होनराव, राजुसुवर्णकार, सतिष बेदरकर, शेख गौस, चावरे, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत.
Read More » -
मुखेड-कंधार मतदारसंघातील २९३ दिव्यांग – वयोवृध्द मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क तर १ हजार ३३१ टपाली मतदान
मुखेड प्रतिनिधी:- मुखेडः मुखेड–कंधारविधानसभा मतदारसंघात होऊ घातल्या लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग व ८५ वर्षावरील (वयोवृद्ध) २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी१२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ३३१ यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणुकनिर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी दिली. मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघात सर्व नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूकविभागाच्यावतीने मतदानाविषयी विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने १७ नोव्हेंबररोजी निवडणूक विभागाच्या स्वीप कक्षामार्फत तालुक्यातील कोळगाव येथे प्रत्येक घरोघरी जाऊन मतदानजनजागृती करून सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आव्हान करण्यातआले आहे. त्यासोबत जनजागृती मध्ये ‘मी मतदान करणारच‘ या घोषवाक्य समोर मतदारांची स्वाक्षरी घेतमतदार जनजागृती करण्यात आली आहे. सदरील मतदान जनजागृती अभियान हे निवडणुक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण, निवडणुकविभागाचे नायब तहसीलदार जोहरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकासअधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी पाटील, गट विकास अधिकारी महेश पाटील, लिपीकप्रशांत लिंबेकर, महाडीवाले, एस. डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, स्वीप कक्ष प्रमुख एस. एस. करेवाडमुजावार सर, एन. एस. होनराव, राजु सुवर्णकार, सतिष बेदरकर, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत.
Read More » -
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ५५ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल
उमेदवारांनी १८ तारखेपर्यंत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रत्येकी ३ जाहिराती देणे आवश्यक उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मतदारांना देणे अनिवार्य नांदेड,…
Read More » -
शेकोट्या पेटल्या;शहरासह तालुक्यातील भागात थंडी वाढली
राजकीय वातावरण तापले! मुखेड प्रतिनिधी:- थंडीने मुखेड शहरासह तालुक्यात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी हातरुण परिसरात…
Read More » -
निर्भिड पत्रकार अनिल कांबळे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित
मुखेड प्रतिनिधी :- मुखेड तालुक्यातील खैरका (गोपाळवाडी) येथे विठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दि. ७ नोव्हेंबर रोजी देशोनत्तीचे निर्भिड पत्रकार अनिल कांबळे सलगरकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे विठ्ठल बारसमवाड यांच्या वतिने दरवर्षीनिर्भीड, निपक्ष सामाजिक काम करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित केले जातोयावर्षी पत्रकार अनिल कांबळे यांना हा पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे अनिल कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून या माध्यमातून निर्भिडपणे मुखेड शहर वतालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे या सन्मानामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे व मित्र मंडळाच्या वतिने त्यांचे अभिनंद होत आहे. तर यावेळी लघु आळंदी समजली जाणारी येवती येथील मठाधिपती श्री.प.पु. सदुरु नराशाम महाराज, ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर येथील प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, प्राचार्य धोंडीराम वाडकर, सुमनताई मोते, हणमंत आटाळकर, दशरथ आयतलवाड भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More » -
निवडणूक निरीक्षक ए. गोविंदराज यांनी घेतला मुखेड येथील निवडणूक विषयक कामाचा आढावा
मुखेड प्रतिनिधी:- मुख्य खर्च निरीक्षक ए. गोविंदराज यांनी आज 91-मुखेड विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयास भेट देवून…
Read More » -
९१ मुखेड विधानसभा एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी ०६ जणांनी घेतली माघार
मुखेड प्रतिनिधी:- राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला याचा निकाल लागणार…
Read More »