Uncategorized

  • दगडाने ठेचून मित्रानेच केला मित्राचा खून

    पोलीसांनी आठ तासातच लावला खुनाचा छडा मुखेड प्रतिनिधी:- दबडे शिरूर शिवारातील हरिचंद्र तांड्याजवळ वन विभागाच्या जागेतील एका दरीत १० ऑक्टोबर रोजीअशोक ईश्वर चावरे (३५) वर्ष यांचा खून झाला होता. या खुनाचा तपास पोलिसांनी अवघ्या आठ तासातलावला असून हा खून दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. यातीलआरोपी मित्र नरेश विनायक आंबेकर (२२) याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. शहरातील फुलेनगर येथे वास्तव्यात असणारे अशोक ईश्वर चावरे हा घरून कामावर जातो म्हणून ८ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी गेले. त्यांच्या सोबत याच गल्लीत राहणारे त्यांचा मित्र नरेश विनायक अंबेकर सोबत तो जांब येथे जाऊन दिवसभर दारू पिले व सोबत दारू घेऊन तांडाजवळ हरिचंद्र वनविभागाच्या जागेत पुन्हा दारू पित बसले. यात दोघांचा वाद निर्माण झाला. या वादात आंबेकर यांनीअशोकच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याने प्रेताला फरफटत नेऊन एका दरीतफेकले. फरफटत नेल्यामुळे अशोकच्या पाठीला खरचटले होते. दरम्यान पोलिसांनी वेगाने तपास करूनआरोपीला आठ तासातच अटक केली. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नरेशविनायक आंबेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपी नरेश विनायक आंबेकर याने मंगळवारी दिवसभर सोबतच दारू प्राशन केली. त्यानंतर पुन्हा हरिचंद्रतांड्याजवळ दारू प्राषण केली आणि तेथेच दगडाने ठेचून खून केला. घटनास्थळी गुरुवारी वअंत्यसंस्कारासाठी मदत करीत नातेवाईक व पोलीसांवर लक्ष ठेऊन होता. पोलीसांना मात्र या प्रकरणातआरोपी हा नरेश आंबेकर हाच असल्याची शंका आल्यानंतर पकडण्यासाठी त्याला पोलीस उपनिरीक्षकमंचक फड, पो. ना. गंगाधर चिंचोरे, पो. कॉ. प्रदिप शिंदे, गणेश पवार, सुरेश गाजलवाड व मेकलवाड यांनीपरिश्रम घेतले तर पुढील तपास पोलीस निरिक्षक लक्ष्मणराव केंद्रे हे करीत आहेत.

    Read More »
  • मुखेड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेताब शेख तर सचिवपदी राजेश बंडे.

    मुखेड / प्रतिनिधी. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्णिंत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार…

    Read More »
  • मुखेड तालुक्यातील हरिश्चंद्र तांड्याजवळ एका इसमाचा खून

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील दगडे शिरूर शिवारातील हरिचंद्र तांडाजवळ वन विभागाच्या जागेतील एक दरीत शहरातील फुलेनगर येथे राहणाऱ्या अशोक ईश्वर…

    Read More »
  • रतन टाटा राहिले नाहीत वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन, देशावर शोककळा!

    भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडीरुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचीप्रकृती अस्वस्थ होती. प्रत्यक्षात बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी आली. काही तासांनी त्यांनी जगाचानिरोप घेतल्याची बातमी आली. रतन टाटा यांचे जाणे देशाचे मोठे नुकसान आहे. मात्र, देश त्यांना कधीहीविसरणार नाही. त्यांनी देशासाठी अनेक महान गोष्टी केल्या. टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांची सर्वात मोठी भूमिका होती. त्यांनी देशासाठी आणिसर्वसामान्यांसाठी अशी अनेक कामे केली, ज्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. रतन टाटा हे एक उदारव्यक्ती होते आणि संकटाच्या वेळी देशाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असायचे. मी तुम्हाला दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की मी पूर्णपणे ठीक आहे. याआधी सोमवारीही रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती, त्यानंतर काही तासांनी खुद्दरतन टाटा यांच्या X (ट्विटर) हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिले होतेकी माझी काळजी केल्याबद्दल सर्वांचे आभार! मी एकदम ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही, मीवयाशी संबंधित आजारांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलो आहे. पण यावेळी तोहॉस्पिटलमधून परत येऊ शकला नाही, आणि कायमचा शेवटच्या प्रवासाला निघाल्याचे दुःख देशालावाटेल.  रतन टाटा  यांच्या निधनाने श्रमिक एकता न्यूज परिवार आपल्या दुःखात शामिल आहे 

    Read More »
  • मासच्या आढावा बैठकीत नुतन पदाधिका-यांच्या निवडी जाहीर.

    संघटन मजबुतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे -हणमंते. मुखेड / प्रतिनिधी. मातंग अस्मिता संघर्ष सेना या सामाजिक संघटनेची दि.०६ आँक्टोबंर रोजी…

    Read More »
  • ५०० रुपयेचा  मुद्रांक शुल्क  रद्द करून १०० चा मुद्रांक शुल्क कायम ठेवावा

    तहसीलदारांकडे शेतकरी कामगार पक्षाची निवेदनाद्वारे मागणी मुखेड प्रतिनिधी:- मंत्रिमंडळाने १०० रुपयेचा मुद्रांक शुल्क (बाँड) रद्द करू ५०० रुपयाचा मुद्रांक शुल्क करण्याचा निर्णयसरकारने घेतलेला आहे तो निर्णय रद्द करून १०० रुपयाचा मुद्रांक शुल्क (बॉण्ड) नियमित ठेवावा अशीमागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. शेतकरीआधीच आर्थिक दृष्ट्या संकटातअसताना सरकारच्या या निर्णयामुळे अजून तो आर्थिक दृष्ट्या खचलाजाईल म्हणून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना शेतकरी कामगार पक्षातर्फ निवेदन देण्यात आले. यावेळीशेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. गोविंद डुमणे, अॅड. रामकृष्ण जाधव, अॅड. शंकर बादावाड हजर होते

    Read More »
  • मुखेड पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड तर कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे यांची निवड

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न मुखेड मराठी पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारणी ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख यांच्या…

    Read More »
  • मुलींनी सजग व सुदृढ राहणे आजची गरज-डॉ.सौ.रचिता कौरवार.

    मुखेड / प्रतिनिधी. मुलींनी आपल्या मनात कोणत्याही गोष्टी न ठेवता त्या आपल्या आई,वडील व भावाकडे व्यक्त केल्या पाहिजेत,सेफ सर्कल ओळखता…

    Read More »
  • सौ.कमल घोडके (मेनकुदळे) यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.

    प्रतिनिधी प्रतिनिधी:-  केंद्रीय प्रा.शा. मुखेड केंद्रातील जि.प.प्रा.शाळा शिकारा येथील सह.शिक्षीका सौ.कमल गंगाराम घोडके(मेनकुदळे) हे नियतवयोमानाने नुकतेच सेवानिवृत्त झाले.शिकारा  ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंचरसिकाबाई बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मुखेडचे गटशिक्षणाधिकारी मा. कैलासहोणधरणे शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कदम, प्रमुख अतिथी डॉ.शिवाजी कराळे शिक्षणविस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, दिलीप देवकांबळे, दिनबंधु बनसोडे, उपसरपंच शितलकुमारइमडे,मुख्याध्यापक श्रीपत राठोड व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकताच सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्नझाला.सौ.कमल घोडके(मेनकुदळे)यांचा सहपतीक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी बालासाहेब कदम यांनी सत्कार मुर्तीच्या कार्याचा गौरव पुर्ण उल्लेख आपल्या मनोगतातूनकेला. शाळेतील शिक्षक व  विद्यार्थीनी आपल्या आवडत्या शिक्षीका विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्वराज साधू तर आभार नारायण ग्यादलवाड यांनी मानले.कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी केंद्र संकुलातील व जि.प.प्रा.शिकारा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रमघेतले.

    Read More »
  • सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन

    नांदेड प्रतिनिधी :  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  गुरुवार 3 ऑक्टोबर 2024  रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह  कंधार, पंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात…

    Read More »
Back to top button