Uncategorized

  • विधानसभेसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला आचारसंहिता लागणार; शिंदे गटाच्या नेत्याने उघड केलीरणनीती

    मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक कधी लागणार, याची संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी थेट आचारसंहिता लागू होण्याचीतारीखच सांगून टाकली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या काही दिवसांतनिवडणूक आयोगाकडून फुंकले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होत असते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी केवळ हरियाणाविधानसभेचीच निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर राज्यातील विरोधीपक्षाकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. सत्ताधारी पक्षाच्या सोयीसाठी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे, असा गंभीर आरोपविरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर  लावण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचे कारण देऊन विधानसभेची निवडणूक जाहीर केली नाही, असेस्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्याच वेळी दिले होते.दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी माध्यमाशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येत्या पाच…

    Read More »
  • एससी , एसटी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात उद्या पासून नांदेडमध्ये आमरण उपोषण

    नांदेड : एससी, एसटी प्रवर्गातील वर्गवारी करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आज दिनांक 18 सप्टेंबर पासून नांदेड शहरातील…

    Read More »
  •  (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक,जनजागृती फिरत्या रथाचा तहसीलदार यांच्या हस्ते शुभारंभ 

    मुखेड प्रतिनिधी:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९१ मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणिप्रात्यक्षिक,जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ मुखेड तहसील कार्यालयाच्या आवारात दि १६ सप्टेंबर रोजी तहसिलदार राजेश जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीस सुरुवात करण्यात आली  मुखेड विधानसभा २०२४ आणि २५ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी, नागरिकांना मतदान प्रक्रियेचाप्रत्यक्ष अनुभव आणि मशीन्सची ओळख करून देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)  आणिव्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) बद्दल देशव्यापी जागरूकता कार्यक्रम सुरू आहे.  राज्यविधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ईव्हीएमआणि व्हीव्हीपीएटीच्या मूलभूत वैशिष्ट्यांबद्दल ज्ञान देणे, मतदानाची चरण–दर–चरण प्रक्रिया स्पष्ट करणेआणि मतदारांना कसे पडताळावे याबद्दल शिक्षित करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. VVPAT स्लिपद्वारेत्यांच्या निवडी. शारीरिक प्रात्यक्षिकांद्वारे जागरूकता (ईव्हीएम)  आणि VVPAT कार्यक्षमतेची सखोलसमज वाढवते आणि गैरसमज दूर करण्यासाठी, मतदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अधिकमाहितीपूर्ण आणि सहभागी मतदारांची खात्री करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या…

    Read More »
  • महाकाली गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ५२ जणांचे रक्तदान.

    मुखेड / प्रतिनिधी. जय महाकाली गणेश मंडळाच्या वतीने मखेड येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.…

    Read More »
  • ईद मिलाद-उन-नबी म्हणजे काय? हा सण कसा साजरा केला जातो, पहा धार्मिक महत्त्व

    मुखेड : ईद–ए–मिलादला ही  ईद मिलाद–उन–नबी असेही म्हणतात. इस्लाम धर्मात ईद मिलाद–उन–नबी हा सणपैगंबर हजरत मोहम्मद स.अ यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद मिलाद–उन–नबी हा इस्लामिककॅलेंडरचा तिसरा महिना, रबी अल–अव्वालच्या 12 तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामीसण आहे. या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात. लोकमशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित मुहम्मद स.अ यांच्या शिकवणींचे स्मरण करतात. 15 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून 16 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ईद मिलाद–उन–नबी साजरी केली जाईल. इस्लाम धर्मात ईद मिलाद–उन–नबीचे महत्त्व खूप जास्त आहे. इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारेप्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो. तसेच, हा सण इस्लामीलोकांना एकात्मतेत बांधतो आणि त्यांना पैगंबरांच्या शिकवणी लक्षात ठेवण्यास प्रेरित करतो. याशिवाय हासण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करतो आणि गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठीप्रोत्साहित करतो. या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि ठिकठिकाणी मिरवणुकाही काढल्या जातात. घरे आणिमशिदींमध्ये कुराण वाचले जाते. या दिवशी गरिबांना दानही केले जाते. ईद मिलाद–उन–नबीच्या दिवशी दानआणि जकात केल्याने अल्लाह प्रसन्न होतो, असे मानले जाते. ईद मिलाद–उन–नबीचा इतिहास – ईद मिलाद–उन–नबीचा इतिहास इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद स.अ साहिब यांच्या जन्माशी जोडलेलाआहे. हजरत मुहम्मद साहिब यांचा जन्म मक्का येथे 570 मध्ये झाला. सुन्नी लोक 12 तारखेला रबीअल–अव्वाल रोजी प्रेषित मुहम्मद यांचा जन्म साजरा करतात, तर शिया लोक 17 तारखेला हा सण साजराकरतात. हा दिवस केवळ प्रेषित मुहम्मद यांचा जन्मच नव्हे तर त्यांच्या मृत्यूचा शोक म्हणूनही स्मरणातठेवला जातो. पैगंबर यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ते 6 वर्षांचे असताना त्यांच्याआईचेही निधन झाले. आपल्या आईच्या मृत्यूनंतर, पैगंबर मोहम्मद त्यांचे काका अबू तालिब आणि आजोबाअबू मुत्तलिब यांच्यासोबत राहू लागले. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला आणि आईचे नाव बीबी अमीना होते. अल्लाहने सर्वप्रथम प्रेषित हजरत मोहम्मद यांना पवित्र कुराण दिले. यानंतरच पैगंबरांनी पवित्र कुराणचासंदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, असे मानले जाते.

    Read More »
  • राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद

    राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय  पुणे:- शिक्षक संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा व चा व कंत्राटी शिक्षक भरतीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णयवाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठीराज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरमोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यातआला. शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होवून १५हजार शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तेव्हा सदर शासन निर्णय शासनानेतात्काळ मागे घ्यावेत असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले. बालकांच्या मोफत व सक्तिच्याशिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये शिक्षक निश्चितीचे निकष सन २०११ पासून राज्यात लागू करून १३ वर्षेझाली तरी अद्याप अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक स्तर इयत्ता १ ते ५ व उच्च प्राथमिक स्तर ६ ते ८ हाआकृतीबंध अध्याप लागू केलेला नाही. आकृतीबंध लागू करणेबाबत शासन निर्णयही झालेत मात्र प्रत्यक्षअंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या अधिनियमाचे उल्लंघन होत आहे असे असताना राज्य शासनाकडून १५ मार्च २०२४ च्या शासननिर्णय द्वारे शिक्षक निश्चितीचे जाहीर केलेलेनिकष हे वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. वाडीवस्तीवर जन्म झाला म्हणूनपटसंख्येअभावी शिक्षक कमी करून तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणे हा त्याविद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. वाडी–वस्तीवर जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय? त्याला इतरशाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क व अधिकार बालकांच्या मोफत व सक्तिच्याशिक्षणाचा अधिनियमाने दिला आहे तो हक्क शासनास डावलता येणार नाही असेही मत सर्व उपस्थितांनीव्यक्त केले. या बैठकीस शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव (शिवाजीपाटील), शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे व राज्याध्यक्ष विजय कोंबे, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षकपरिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, आखिलभारतीय शिक्षक संघाचे किरण पाटील, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्षनवनाथ गेंड, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल पलांडे, मनोज मराठे, पंजाबराव देशमुख संघटनेचेराज्याध्यक्ष प्रभाकर झोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतिश कांबळे, स्वाभिमानीशिक्षक संघटनेचे यादव पवार, शिक्षक सहकार संघटनेचे निलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजीदअहमद, जुनी पेन्शन संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, एम एड कृती समितीचे राजू सावकार जाधव,इब्टा शिक्षक संघटनेचे उतरेश्वर मोहलकर, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय महासंघ मधुकर काटोळे,एकल शिक्षक सेवा मंच राज्याध्यक्षविकास खांडेकर, उपस्थित होते अशी माहिती राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांनी

    Read More »
  • ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम  

    नांदेड प्रतिनिधी:- नांदेड :- मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजीची…

    Read More »
  • पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी मोतीपाशा पाळेकर तर  सचिवपदी ॲड. रणजित जामखेडकर यांची निवड 

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सिताराम येचुरी यांना आदरांजली सभा घेत कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही : डी टी आंबेगावे मुखेड प्रतिनिधी:- मुखेड :  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या मुखेड तालुका  कार्यकारिणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्षसंजीवकुमार गायकवाड, जिल्हाकार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर, जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडेयांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची बैठक पार पडली.  या बैठकीच्या सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सिताराम येचुरी यांनाआदरांजली वाहण्यात आली. तदनंतर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतनपदाधिकाऱ्यांची मान्यवरांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये मुखेड तालुका अध्यक्षपदीमोतीपाशा पाळेकर, उपाध्यक्ष विठ्ठल कल्याणपाड, सचिव ॲड. रणजित जामखेडकर, कोषाध्यक्ष रवीसोनकांबळे, सहसचिव आसद बल्खी, सल्लागार जयभीम सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी शिंदे उंद्रीकरआदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना बढती देत त्यांचीमराठवाडा अध्यक्षपदी तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बाबूराव वाघमारे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे  तरमार्गदर्शक म्हणून मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांचीउपस्थिती होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डी टी आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर  अन्याय, अत्याचार होऊ देणार नाही, पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना काही वेळा जाणूनबुजून पत्रकारावरखोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत धमकवण्यात येते. अशावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारअसून पत्रकारांच्या  कुटुंबीयांचे आरोग्यविषयक व शैक्षणिक प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. यावेळीमराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी मराठवाड्यासह राज्यातील पत्रकार संघटनेशी जोडणार असूनत्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले तर नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनीमुखेडच्या नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्भीड पत्रकार तथा संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळेबेटमोगरेकर यांनी तर आभार आसद बल्खी यांनी मानले.

    Read More »
  • राशनचा तांदुळ काळ्या बाजारात नेणारा ट्रक पोलिसानी पकडला

    २६ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त नांदेड प्रतिनिधी:- मो. रफीक शेख नांदेड- पोलीस अधिक्षकांचे विशेष पथकास गुप्त मिळालेल्या माहितीवरुन…

    Read More »
  • देश जनहित पार्टी च्या मराठवाडा अध्यक्षपदी अब्दुल रईस यांची निवड

    नांदेड प्रतिनिधी:- येथील शिवाजी नगर येथील रहिवाशी अब्दुल रईस अहेमद अब्दुल जब्बार यांची देश जनहित पार्टी च्या मराठवाडा प्रदेश प्रभारी…

    Read More »
Back to top button