सामाजिक

  • विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मुखेड न्यायालयासमोर अभिवक्त्यांचे धरणे आंदोलन!

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- दि. २५ जुलै NEET-2026 परीक्षा पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन…

    Read More »
  • पोलीस व अधिकाऱ्यांसमोरच शासकीय कामात अडथळा; कारवाईच्या मागणीसाठी जाहुर कब्रस्तान कमिटी उपोषणाला

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क देगलूर: २१ जुलै २६ मौजे जाहुर ता. मुखेड, जि. नांदेड येथील मुस्लिम कब्रस्तानच्या शासकीय मोजणीत जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘वक्फ संस्था ग्रेव्हयार्ड (कब्रस्तान)’ समितीच्या वतीने आज, २० जुलै रोजी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. देगलूरचे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, जाहुर येथील मुस्लिम कब्रस्तानच्या जागेची वक्फ बोर्डाकडे रीतसर नोंदणी झालेली आहे. या जागेची भूमी अभिलेख विभागाकडून शासकीय मोजणी सुरू होती. यावेळी पोलीस बंदोबस्त, भूमी अभिलेख कर्मचारी व तलाठी उपस्थित होते. मात्र, मोजणी सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी (रमाकांत व्यंकट हिवराळे, शफी हसनसाब शेख, रसूल हसनसाबशेख, निजाम हसनसाब शेख, विनायक शामसुंदर बोडके, उमाकांत शामसुंदर बोडके, बंडू बापुराव बोडकेआदी) एकत्र येत ‘गट नं. मध्ये मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नाही, या ठिकाणी आमची जमीन आहे‘ असा दावा करून मोजणीच्या कामात अडथळा निर्माण केला. पोलीस बंदोबस्त आणि जबाबदार अधिकारी उपस्थित असतानाही शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता, अधिकारी मोजणी न करताच निघून गेले, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या बेजबाबदार…

    Read More »
  • नीट परीक्षेतील गैरव्यवहारा विरोधात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मुखेड अधिवक्ता संघाचा जाहीर पाठिंबा

    (श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड): १९ जुलै २६ देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या राष्ट्रीयस्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये (NEET-UG) झालेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीच्या निषेधार्थ, नवी दिल्लीतील जंतर–मंतर येथे शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला ‘अधिवक्ता संघ, मुखेड‘ने आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. १७ जुलै २०२६ रोजी झालेल्या अधिवक्ता संघाच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सध्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता व मानसिक तणाव वाढला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जंतर–मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान करत आणि…

    Read More »
  • मुखेड शहरात १९ जुलै रोजी मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी ‘विशेष कॅम्प’

    ▫️शहरातील ७ प्रमुख ठिकाणी २९ बी.एल.ओ. राहणार उपस्थित; मतदारांनी लाभ घेण्याचे अनुप पाटील यांचे आवाहन श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :-…

    Read More »
  • लातूर रोड-जळकोट-मुखेड-बिलोली-बोधन रेल्वेचा प्रश्न ऐरणीवर; विधिमंडळात आवाज उठवण्याची आमदारांकडून अपेक्षा

    ▫️विकासासाठी रेल्वे आवश्यक! आमची मागणी – रेल्वे द्या, विकास घडवा! श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड १५ जुलै २६ :  लातूर रोड–जळकोट–मुखेड–बिलोली–बोधन या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाची मागणी आता पुन्हा एकदा जोरधरत आहे. परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रेल्वेचा प्रश्न आगामी विधिमंडळअधिवेशनात उपस्थित केला जावा, अशी तीव्र अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.…

    Read More »
  • उदगीरमध्ये पावसासाठी साकडे: ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी अदा केली ‘नमाज-ए-इस्तिस्का’

    ▫️पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह नागरिक चिंतेत; वरुणराजाच्या कृपेसाठी अल्लाहकडे विशेष दुवा श्रमिक एकता न्यूज नेटवर्क उदगीर:- १५ jule पावसाळ्याचे दिवस सुरू होऊनही उदगीर शहर आणि परिसरात अद्याप समाधानकारक पाऊसन झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या कठीण…

    Read More »
  • भ्रष्टाचाराचा प्रताप! अवघ्या वर्षभरातच नांदेड-नागपूर-तुळजापूर महामार्ग खचला; उड्डाणपुलाचा भाग कोसळून निष्पापांचा जीव धोक्यात.

    ▫️विष्णुपुरीतील भीषण अपघातात दोन मुली गंभीर जखमी; निकृष्ट कामामुळे एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती! श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड | ०९ जुलै २०२६ विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा एक भयंकर चेहरा आज नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. केवळ एका वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालेल्या नांदेड–नागपूर–तुळजापूर महामार्गाचा आणि विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा काही भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. याभीषण अपघातात दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून, एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विष्णुपुरी जवळील श्री गुरुवंशी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अचानक रस्ता खचला आणि पुलाचा बाजूचा भाग कोसळला त्यामुळे…

    Read More »
  • मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचा थरार! हिंगोली, नांदेडसह परभणीत सलग तीन धक्के

    ▫️हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील ‘शिरली’ गाव; नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ०९ जुलै २६ हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना ९ जुलै २६  मध्यरात्री भूकंपाच्या सलग तीन धक्क्यांनी हादरवून सोडले. मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना अचानक जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली होती. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली या गावात होता. पहिला आणि सर्वाधिक तीव्रतेचा धक्का मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटांनी जाणवला, ज्याची रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंद झाली. त्यानंतर काही वेळातच, पहाटे २:१५आणि २:१७ वाजता अनुक्रमे ३.६ आणि ३.९ तीव्रतेचे आणखी दोन सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्रीच्या वेळेस बहुतांश नागरिक झोपेत असताना हे धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक असे तीनधक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवूनअसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी. राहुल कर्डिले यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलेआहे. भूकंपाची पूर्वकल्पना मिळणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवतानागरिकांनी पूर्णपणे सतर्क राहावे. तसेच, पुन्हा असे धक्के जाणवल्यास तात्काळ घराबाहेर पडूनसुरक्षित आणि मोकळ्या जागेत थांबावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

    Read More »
  • नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती; एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, नांदेड ०७ जुलै २६ जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR – २०२६) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, तसेच एकही अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. तसेच, या मोहिमेच्या प्रभाव  अंमलबजावणीसाठी माध्यमांनी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित ही मोहीम राबवली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण २७ लाख ७७ हजार ०७३ मतदारांच्या माहितीची अचूक पडताळणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ३०८८ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO प्रत्येक घरी…

    Read More »
  • मुखेड दुयम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; जादा पैसे घेतल्याशिवाय खरेदीखत होईना!

    ▫️पैसे न दिल्यास खोट्या त्रुटींचा बाऊ; पैशांची मागणी पूर्ण होताच खरेदीखत तत्काळ! श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड ०४ जुलै २६ खरेदी खत करण्यासाठी नियमा…

    Read More »
Back to top button