क्राईम
-
बाप की हैवान! पोटच्या मतीमंद लेकीवर अत्याचार करणारा नराधम बाप जेरबंद; जळकोट हादरले!
लातूर/ जळकोट :- श्रमिक एकता न्यूज़ ४ मे २६ रक्षणकर्ताच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा माणुसकी नेमकी कुठे शोधावी? असा संतप्त सवाल जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील घटनेने उपस्थित केला आहे. एका मतीमंद अल्पवयीन मुलीची हतबलता पाहून तिचा सांभाळ करण्याऐवजी, तिच्यावर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या तिच्या सख्ख्या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाच्या कृत्यामुळे ती निष्पाप मुलगी आता १९ आठवड्यांची गरोदर असून, या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जन्मतःच मतीमंद आहे. तिला जगाची समज नाही, स्वतःची व्यथा मांडता येत नाही, याचाच फायदा या नराधम बापाने घेतला. माहे डिसेंबर २०२५ पासून तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता. पोटच्या पोरीला त्याने आपल्या वासनेची शिकार बनवले. जेव्हा मुलीच्या शरीरातील बदलांमुळे ती गरोदर असल्याचे उघड झाले, तेव्हा पीडितेच्या आईने दिनांक १७/०४/२०२६ रोजी रात्री २३.०० वाजता जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीला गुन्हा अज्ञात व्यक्ती विरुद्ध दाखल झाला होता, मात्र तपासात समोर आलेले सत्य ऐकून संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.…
Read More » -
दुष्काळी अनुदानावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हा नोंदवा! मुखेड तहसीलदारांचे पोलिसांना कडक आदेश
▫️बेरळी (खु.) येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; ८ ते ९ वेळा पुरावे देऊनही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याने खळबळ मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता…
Read More » -
“तुलाही वर पाठवीन!” आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी; शहीद गोविंद पानसरेंबद्दल अपमानास्पदभाषा आणि प्रकाशकाला खुनाची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल!
मुखेड /प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २३ एप्रिल २६ महाराष्ट्राच्या वैचारिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध साहित्यिक शहीद गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संभाषणाची कथित ऑडिओक्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. नेमव्ही की घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करून गोविंद पानसरे…
Read More » -
मालमत्तेच्या वादातून चुलतीनेच केला ६ वर्षीय पुतण्याचा खून; लातूर पोलिसांकडून १७ तासांत गुन्ह्याचाउलगडा
मुखेड प्रतिनिधी : श्रमिक एकता न्यूज़ २१ एप्रिल २६ कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे उघडकीस आली आहे. अवघ्या १७ तासांच्या आतचाकूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत आरोपी चुलतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते. पोलीस तपासात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आदळून आला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा १७ तासांच्या आत पर्दाफाश केला. हत्या झालेल्या मुलाचे नाव देवांश स्वामी असे आहे. तर हत्या करणाऱ्या महिलेचे नाव अनिता दिनेश स्वामी असे आहे. रविवारी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. तेव्हा हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले. हत्या केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. एवढेच नाही तर स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनाव देखील आरोपीने महिलेनेरचला होता. जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर संशय येऊ नये. मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवतत्याला मुलाला सुखरूप शोधून काढले आणि त्याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला. चुलतीनेच हत्या केल्याचे सामोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्वामी कुटुंबात मागील काही…
Read More » -
चाकूर हादरले! दोन मुले बेपत्ता, एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६ लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सकाळी घराबाहेर खेळायला गेलेली दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती, त्यापैकी एका ७ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस दुसऱ्या मुलाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. काय आहे नेमकी घटना? चाकूर शहरातील जुने महादेव मंदिर गल्ली भागात राहणारे साईचरण दिनेश स्वामी (वय…
Read More » -
मुखेडचा ‘पंचनामा’: माफियांचा उच्छाद, प्रशासन ‘आंधळं’ आणि यंत्रणा ‘मुकी’!
▫️रेती, मुरूम, लाकूड तस्करी अन् गांजा विक्रीचा सुळसुळाट; लोकप्रतिनिधींचेही सोयीस्कर मौन? मुखेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १७ एप्रिल २६ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले…
Read More » -
मुखेडमध्ये अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या विळख्यात; वारंवार तक्रारींनंतरही प्रशासन ‘निद्रावस्थेत’!
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६ मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत.…
Read More » -
नांदेडमध्ये शोककळा: नाल्याच्या साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
▫️दोन सख्ख्या भावांचा समावेश नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६ नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात एक अत्यंत भीषण आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना, हारूनबाग भागातील एका मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या चार चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण इस्लामपुरा आणि देगलूर नाका परिसरात शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेली चारही मुले ही शहरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी होती. शाळा सुटल्यानंतर ही मुले नेहमीप्रमाणे घराकडे जात होती. वाटेत हारूनबाग परिसरात एका मोठ्याखड्ड्यात पावसाचे किंवा नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हीमुले पोहण्याच्या मोहापायी पाण्यात उतरली. मात्र, खड्ड्यातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ एक अशी चारही मुले पाण्यात बुडाली. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या मुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत: महोमद…
Read More » -
लाकूड माफियांसमोर प्रशासन हतबल की सामील? मुखेड तालुक्यात निसर्गाचा गळा घोटण्याचा प्रकारसुरूच!
▫️सततच्या तक्रारीनंतरही अवैध लाकूडतोड सुरूच; वनविभागाच्या ‘आशीर्वादाने’ डोंगर बोडके? मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ एप्रिल २६ मुखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूडतोड सुरू आहे. निसर्गाचा समतोल राखणारे जुने आणि मोठे वृक्ष दिवसा ढवळ्या तोडले जात असून, लाकूड माफियांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे, या गंभीर विषयावर ‘श्रमिक…
Read More » -
शासकीय रुग्णालयात पोलिसां देखत तरुणाचा खून; दोन पोलीस निलंबित
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०९ एप्रिल २६ शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक थरारक घटना ४ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात घडली. पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची पोलिसांच्या डोळ्यां देखत हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची गाजपडली आहे. शहरातील ई–स्क्वेअर परिसरात झालेल्या एका वादात सय्यद आवेज (२७) आणि मोहम्मद अरबाज हेदोघे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, आरोपीचा पाठलाग थांबला नव्हता. आपल्या भावाच्या (अरिजीतसिंग) खुनाचा बदला घेण्याच्या ईर्ष्येने पेटलेला राजेश चव्हाण हा हातात तीक्ष्ण शस्त्र घेऊन थेट रुग्णालयात घुसला. रुग्णालयातील अपघात विभागाबाहेर पोलीस तैनात असतानाही, आरोपीने संतापच्या भरात सय्यद…
Read More »