जिजाऊ रथयात्रा ६ एप्रिल रोजी मुखेडात ,स्वागताची जय्यत तयारी!

मुखेड प्रतिनिधी:-
मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियानांतर्गत भोसले गडी वेरूळ ते लाल महाल पुणे अशी राज्यभर जिजाऊ रथयात्रा जाणार असून दिनांक ६ एप्रिल रोजी जिजाऊ रथयात्रा मुखेड शहरात दाखल होत आहे. दरम्यान जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
सदर जिजाऊ रथयात्रा ६ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात असून सकाळी लोहा दुपारी कंधार तर दुपारी दोन ते तीन वाजता च्या दरम्यान रथयात्रेचे मुखेड शहरात आगमन होणार आहे.
मराठा सेवा संघाच्या ३३ विविध कक्षांच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू असून सदर चळवळ अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने ही जिजाऊ रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियान राबविणार आहे.
मुखेड शहरांमध्ये एक ते दोनच्या दरम्यान कंधार फाटा येथे रथयात्रेचा आगमन होणार असून मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड च्या वतीने शहरात भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी शहरात मुख्य रस्त्यावर भव्य कमानी उभारण्यात येत असून स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनर पोस्टर लावण्यात येत आहेत. जिजाऊ रथयात्रेचे बँड ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, जिजाऊ पूजन व प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. यासोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ही पुष्पहार अर्पण करून रथयात्रा बारावी चौकातून पुढे नरसी कडे मार्गस्थ होणार आहे.
मराठा सेवा संघाच्या मराठा जोडो अभियानांतर्गत येत असलेल्या रथयात्रेच्या स्वागतासाठी सर्व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे शिवश्री सदाशिवराव पाटील जाधव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष यशवंत बोडके, सचिव शिवाजीराव इंगोले, किशनराव इंगोले बालाजीराव इंगोले, रामदास पाटील जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप पाटील हसनाळकर, आनंद पाटील जाधव, संतोष पाटील इंगोले,छावाचे गिरीधर पाटील केरुरकर, राजमुद्राचे सचिन पाटील इंगोले, रामेश्वर पाटील इंगोले, संतोष तळेगावे, विश्वंभर पाटील मसलगेकर, गंगाधर पाटील मसलेकर, राजकुमार बामणे पाटील, गजानन पाटील शीरुरकर , कल्याण पाटील इंगळे, संतोष पाटील इंगळे, प्रा. ज्ञानेश्वर जोगदंड, डॉ.एम.जे. इंगोले,डॉ.व्यंकटराव सुभेदार डॉ. प्रशांत खंडागळे, डॉ. संदीप ढगे डॉ. रणजीत काळे, डॉ. विजयकुमार मोरे, प्रा. श्रीपती पवार, शिवाजी पाटील कार्लेकर, एडवोकेट गोविंदराव डुमणे, ऍडव्होकेट जोगदंड, एडवोकेट शारदाताई जाधव, राजे छत्रपती अकॅडमीचे ज्ञानेश्वर पाटील डुमणे, बालाजी पाटील ढोसणे, प्रभाकर पाटील तांदळीकर शिवशंकर पाटील कलंबरकर, शंकर पाटील जांभळीकर, गंगाधर पाटील जांभळीकर, श्रीनिवास माने, शिवकुमार बिरादार, विठ्ठल पाटील येवतीकर, व्यंकटराव जाधव वसुरकर, अंतेश्वर पाटील बिल्लाळीकर, गोटू पाटील बिल्लाळीकर, किरण पाटील बोडके , ज्ञानेश्वर पाटील वडजे ओंद्रीकर हनुमंत पाटील वडजे, शरद पाटील जाधव दिगंबर पाटील जाधव, आदींनी केले आहे.



