क्राईम

नांदेडमध्ये गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; गोदावरी पात्रात बुडून दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड :- २० सप्टेंबर २६

विष्णूपुरी येथील काळेश्वर मंदिर घाट परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा गोदावरीनदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. मृत तरुण स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारे बजरंग बिरूयेडुरे (वय १८, रा. किनी, ता. देगलूर) आणि दीपक मारुती सोळंके (वय २०, रा. बारहळी, ता. मुखेड) हेदोघे रविवारी दुपारी काळेश्वर घाट येथे गणेश विसर्जनासाठी आले होते. विसर्जन आटोपल्यानंतर दोघेहीनदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे दोघेही खोल पाण्यात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि जीवरक्षक दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळीधाव घेतली. जीवरक्षकांनी शोधमोहीम राबवून बजरंग येडुरे यांचा मृतदेह बाहेर काढला, तर दीपक सोळंके यांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात बचावकार्य सुरू आहे. गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजणघालणाऱ्या या दुर्दैवी घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button