Uncategorized

निर्भिड पत्रकार अनिल कांबळे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित

मुखेड प्रतिनिधी :-

मुखेड तालुक्यातील खैरका (गोपाळवाडी) येथे विठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दि. ७ नोव्हेंबर रोजी देशोनत्तीचे निर्भिड पत्रकार अनिल कांबळे सलगरकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे विठ्ठल बारसमवाड यांच्या वतिने दरवर्षीनिर्भीड, निपक्ष सामाजिक काम करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित केले जातोयावर्षी पत्रकार अनिल कांबळे यांना हा पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे 

अनिल कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून या माध्यमातून निर्भिडपणे मुखेड शहर वतालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे

या सन्मानामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे व मित्र मंडळाच्या वतिने त्यांचे अभिनंद होत आहे. तर यावेळी लघु आळंदी समजली जाणारी येवती येथील मठाधिपती श्री.प.पु. सदुरु नराशाम महाराज, ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर येथील प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, प्राचार्य धोंडीराम वाडकर, सुमनताई मोते, हणमंत आटाळकर, दशरथ आयतलवाड भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button