Sharmik Ekta
-
सामाजिक
नांदेड जिल्ह्याला मिळाले नवे सिंघम; डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार
▫️हिंगोलीतील ऐतिहासिक व धडाकेबाज कामगिरी नांदेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २३ जून २६ नांदेड जिल्हा पोलीस दलाला अधिक बळकट आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील आपल्या अल्पशा कार्यकाळात गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांची नांदेडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे. जून२०२६ च्या ताज्या प्रशासकीय बदल्यां नुसार त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.…
Read More » -
क्राईम
मुक्रमाबादमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई 9 किलो 850 ग्रॅम गांजा जप्त, दोघांना अटक
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ जून २६ अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नांदेड पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुक्रमाबाद परिसरातून दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ९ किलो ८५० ग्रॅम गांजा व एक मोटारसायकल असा एकूण ६ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. या कारवाईत रामकिशन मुलगीर नटवे(रा. जळकोट, जि. लातूर) व शंकर सदानंद धोते (रा. लते गल्ली, जि. लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून गांजा व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधिकारी करीत आहेत.
Read More » -
राजकीय
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजुरकर विजयी
▫️मतमोजणी शांततेत व सुरळीत संपन्न नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ 22 जून २६ महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या…
Read More » -
क्राईम
शंकरसागर जलाशयात माय-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदेडजवळील विष्णुपूर येथील घटना
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६ शहराशेजारीच असलेल्या विष्णुपुरी येथील शंकरसागर जलाशयात एक महिला आणि तिच्या तरुण मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडालीआहे. मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुपुरी भागातील प्रसिद्ध काळेश्वर मंदिर परिसराजवळ हा शंकरसागर जलाशय आहे. रविवार, दिनांक २१ जून रोजी या भागात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांना जलाशयाच्या पात्रात एक महिला आणि एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. भाविकांनीया घटनेची माहिती तात्काळ नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यावर तरंगत असलेले महिला व तरुणाचे मृतदेह सुखरूप पात्राबाहेर काढले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही वेळातच दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात यश मिळवले. हे मृतदेह संगवाबाई कळसकर (वय…
Read More » -
सामाजिक
कै. माधवराव मुद्देवाड यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प; मित्र परिवाराकडून अभिवादन
मुखेड / प्रतिनिधी :– श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६ कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि आयुष्यभर समाज हितालाच आपले ध्येय मानणारे कै. माधवराव मुद्देवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कै. मुद्देवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. कै. माधवराव मुद्देवाड हे केवळ एक नेते नव्हते, तर शेकडो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. या अभिवादन कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला. “कै. मुद्देवाड यांनी समाजातील शेवटच्या…
Read More » -
क्राईम
नांदेड पुन्हा रक्ताळले! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर थरारक गोळीबार; शहरात प्रचंड खळबळ
नांदेड (विशेष प्रतिनिधी) : श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही, हे सिद्ध करणारी आणखी एक थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटना नांदेड मध्ये घडली आहे. खडकपुरा भागातील रहिवासी शेख शमीम शेख इसाक (वय ४२) यांची अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहर पुन्हा एकदा हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…
Read More » -
सामाजिक
परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळून ७ जणांचा मृत्यू, ३२ भाविक जखमी
परभणी: प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६ परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात आज एक अत्यंतदुर्दैवी आणि मोठी दुर्घटना घडली. मंदिराच्या सभा मंडपाचे छत अचानक कोसळल्याने ७ भाविकांचा मृत्यू झाला असून, ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण दबले गेले होते. शनिवार असल्याने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती, त्याच वेळी हा अपघात घडला. यशवाडी हे परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने, येथे दर शनिवारी आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आज सकाळ पासूनच मंदिरात भाविकांची मोठी रिघ लागली होती. मुख्य मंदिरा समोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच, दुपारी अचानक सभा मंडपाच्या चालू बांधकामाचा एक मोठाभाग पत्त्यासारखा कोसळला. पिलर आणि छताचा संपूर्ण राडारोडा थेट खाली उभ्या असलेल्या भाविकांवर पडल्याने मोठी जीवितहानी झाली. छत कोसळल्याचा प्रचंड आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळीदाखल झाला. मात्र, मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने सुरुवातीला बचाव पथक आणि रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिक आणि…
Read More » -
सामाजिक
अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ ठरलेले डीआयजी शहाजी उमाप यांची मोठी कारवाई; परभणी एलसीबीसह ८ अमलदारांवर गाजली कुऱ्हाड!
▫️“कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल.” – डीआयजी शहाजी उमाप नांदेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६…
Read More » -
सामाजिक
घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची छावाची मागणी !
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६ मुखेड तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू अद्याप उपलब्ध झाली नसुन ती…
Read More » -
सामाजिक
शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचा प्रश्न आता लोकसभेत; दीपक सिंह हुजुरीयांचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे
▫️संवैधानिक हक्कांचे उल्लंघन आणि बोर्डाच्या रचनेवर प्रश्न नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ जून २६ नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि शीख समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून स्थानिक पातळीवरील राजकीय आणि धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते दीपक सिंह हुजुरीया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना थेट पत्र लिहून हे मुद्दे आगामी संसद अधिवेशनात मांडण्याची मागणी केलीआहे. हुजुरीया यांनी पाठविलेल्या पत्रात स्थानिक स्तरावर शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर दावा केला आहे.…
Read More »