Sharmik Ekta
-
राजकीय
नांदेड विधान परिषद निवडणूक: ८ उमेदवारांचे १७ नामांकन अर्ज दाखल!
▫️द्विवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट; राजकीय वर्तुळात गदारोळ, प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला. नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २ जून २६ महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या…
Read More » -
सामाजिक
शासकीय आदेशाला केराची टोपली! मुखेड दुय्यम निबंधक कार्यालयात अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी न केल्याने समाजबांधव आक्रमक; तलाठी-पेशकारांच्या समक्ष जागेवरच पंचनामा!
मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ३१ मे २६ शासकीय आदेशांना पायदळी तुडवत मुखेड शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली नसल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाचे कडक निर्देश असतानाही एका जबाबदार शासकीय कार्यालयात महापुरुषांची जयंती साजरी न करणे, हा थेट शासकीय आदेशाचा अवमान आणि समाजाच्या भावनांशी खेळ असल्याचा आरोप होत आहे. या गंभीर प्रकारामुळे मुखेड तालुक्यातील समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी थेट कार्यालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. घटनेची माहिती मिळताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसील प्रशासनाने तातडीने पावले उचलली. मुखेडचे तलाठी देशमुख आणि पेशकार हक्के यांनी तात्काळ दुय्यम निबंधक कार्यालयात धाव घेतली. उपस्थित समाजबांधवांच्या आणि अधिकाऱ्यांच्या समक्ष या संपूर्ण लाजिरवाण्या प्रकरणाचा जागेवरच‘पंचनामा’ करण्यात आला. शासकीय कार्यालयात जयंती न साजरी झाल्याचे पंचनाम्यातून अधिकृतपणे समोर आले आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुय्यम निबंधक…
Read More » -
सामाजिक
भाई आसद बल्खी यांच्या ‘रोखठोक’ इशाऱ्याला यश! मुखेड प्रभाग क्र. ९ मध्ये नाल्यांची सफाई आणि बंद पथदिवे दुरुस्तीचे काम अखेर सुरू
▫️३ दिवसांत आंदोलनाचा ‘अंतिम इशारा’ मिळताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागे मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २९ मे २६ प्रभाग क्रमांक ०९ मधील नागरी समस्यांवरून नगर परिषद प्रशासनाला ३ दिवसांचा ‘अंतिमइशारा‘…
Read More » -
सामाजिक
डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आक्रमक; मुखेड-लातूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन!
▫️मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी संतप्त; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत मुख्यालय प्रतिनिधी, मुखेड: मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असतानाच, गेल्या काही दिवसांपासून परिसरात डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. हक्काचे डिझेल वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज अचानक मुखेड–लातूर महामार्गावर एकत्र येत जोरदार १५ मिनिट ‘रास्ता रोको‘ आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.…
Read More » -
सामाजिक
तुपदाळ खु. येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे कडब्याला भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
मुखेड/ तुपदाळ खु प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २६ मे २६ तालुक्यातील तुपदाळ खु. येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील कडब्याच्या गंजीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत हणमंत रघुनाथ बोडके, जळशिंग मारोती बोडके आणि दादाराव नामदेव दोमाटे या शेतकऱ्यांच्या जवळपास १५ ते २० हजार कडबा पेंढ्या जळून खाक झाल्या असून, अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. याच कडक उन्हामुळे तुपदाळ खु. येथील शेतात साठवून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीने अचानक पेट घेतला. वाळलेला कडबा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ढीग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वर्षभर जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून साठवून ठेवलेला चारा डोळ्यादेखत जळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. आगीची माहिती मिळताच तुपदाळचे सरपंच संदिप चंद्रकांतराव घाटे…
Read More » -
शहर
कचरा ट्रॅक्टर अपघातातील मृताच्या वारसदाराचा न्याय हक्कासाठी लढा; १ जूनपासून आजीचे आमरण उपोषण
▫️केवळ कागदी घोडे आणि पोकळ आश्वासनं: नगरपालिका आणि पोलिसांकडून अहवाल दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न? मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २५ मे २६ एकीकडे प्रशासकीय दिरंगाई आणि दुसरीकडे भ्रष्ट व्यवस्थेचा बळी ठरलेली एक ७५ वर्षीय वृद्ध महिला आता आपल्या हक्काच्या न्यायासाठी थेट मृत्यूशी झुंज देण्यास तयार झाली आहे. मुखेड नगर परिषदेच्या कचरा ट्रॅक्टर अपघातात आपल्या नणंदेला गमावलेल्या नुराबी अ. करीम बल्खी यांनी तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, प्रशासनाच्या संवेदनाहीनतेचा निषेध करत १ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणा‘चा इशारा दिला आहे.…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये रविवारी मोठी दुर्घटना! नगीना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू!!
▫️पाण्याचा अंदाज न आल्याने घडली काळाची भीषण झेप; साठे चौक परिसरावर पसरली शोककळा नांदेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६…
Read More » -
क्राईम
शेतीच्या नावाखाली काळा धंदा; मुखेड तालुक्यात ५ किलो गांजासह शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात!
▫️पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचा दणका! मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६ मुखेड तालुक्यातील हिप्परगा (दे) शिवारात एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडच्या स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने या शेतावर छापा टाकून तब्बल ५ किलो १९०…
Read More » -
क्राईम
मुखेडचे माजी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे परभणीत थेट निलंबित; अवैध धंद्यांना खतपाणी घातल्याने एसपींची धडक कारवाई!
▫️पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे कडक आदेश; अवैध धंदे खपवून घेणार नाही, ठाणेदारांना थेट इशारा! मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २४…
Read More » -
सामाजिक
लग्नातील वायफळ खर्चाला फाटा! पेठकर कुटुंबाने लग्नकार्यातून काढला संपूर्ण गावाचा ‘अपघाती विमा’
▫️धोंड्याच्या महिन्या’त जपली पुरोगामी विचारधारा कंधार प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ मे २६ लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा बडेजाव, अवाढव्य खर्च आणि पैशांची उधळण हे समीकरण आताठरलेलं असतं. पण याच थाटामाटाला फाटा देत, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरायेथील पेठकर कुटुंबाने समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहे. आपल्या घरातीलविवाहसोहळ्याचे औचित्य साधत या कुटुंबाने गावातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांचा अपघातीविमा उतरवला असून, त्यांच्या या पुरोगामी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामान्यतः ‘धोंड्याचा महिना‘ (अधिक मास) हा शुभकार्यासाठी वर्ज्य मानला जातो. या काळात लग्नकिंवा इतर मंगल कार्ये करण्याचे अनेकजण टाळतात. मात्र, अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी–परंपरांना छेददेत पेठकर कुटुंबाने याच महिन्यात विवाहसोहळा संपन्न केला. केवळ लग्न उरकले नाही, तर त्यालासामाजिक भान आणि कर्तव्याची अनोखी जोड दिली. लग्नात मानपान, अवाजवी रोषणाई किंवा जेवणावळींवर लाखो रुपयांचा चुराडा करण्याऐवजी, पेठकरकुटुंबाने गावातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचा विचार केला. बहाद्दरपुरा गावातील सुमारे ३,५००लोकांचा अपघाती विमा काढून त्यांनी एकाच वेळी संपूर्ण गावाला सुरक्षिततेचे कवच बहाल केले आहे. आजकाल लग्नांमध्ये होणारा बडेजाव कर्जबाजारीपणाला कारणीभूत ठरत असताना, पेठकर कुटुंबानेघेतलेला हा निर्णय डोळे उघडणारा आहे. “लग्न असावं तर असं!” अशीच भावना आता परिसरातीलनागरिकांमधून व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही या ‘विमा लग्नाची‘ जोरदार चर्चा सुरू असून, हापुरोगामी विचार इतर कुटुंबांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. “लग्नाचा आनंद फक्त आमच्यापुरता मर्यादित न राहता, त्याचा फायदा संपूर्ण गावाला व्हावा आणिसंकटाच्या काळात गावकऱ्यांना मदत मिळावी, याच भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला.” — पेठकर…
Read More »