Sharmik Ekta

  • क्राईम

    मालमत्तेच्या वादातून चुलतीनेच केला ६ वर्षीय पुतण्याचा खून; लातूर पोलिसांकडून १७ तासांत गुन्ह्याचाउलगडा

    मुखेड प्रतिनिधी :  श्रमिक एकता न्यूज़ २१ एप्रिल २६ कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे उघडकीस आली आहे. अवघ्या १७ तासांच्या आतचाकूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत आरोपी चुलतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते. पोलीस तपासात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आदळून आला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा १७ तासांच्या आत पर्दाफाश केला. हत्या झालेल्या मुलाचे नाव देवांश स्वामी असे आहे. तर हत्या करणाऱ्या महिलेचे नाव अनिता दिनेश स्वामी असे आहे. रविवारी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. तेव्हा हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले. हत्या केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. एवढेच नाही तर स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनाव देखील आरोपीने महिलेनेरचला होता. जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर संशय येऊ नये. मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवतत्याला मुलाला सुखरूप शोधून काढले आणि त्याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला. चुलतीनेच हत्या केल्याचे सामोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्वामी कुटुंबात मागील काही…

    Read More »
  • क्राईम

    चाकूर हादरले! दोन मुले बेपत्ता, एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६ लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सकाळी घराबाहेर खेळायला गेलेली दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती, त्यापैकी एका ७ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस दुसऱ्या मुलाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. काय आहे नेमकी घटना? चाकूर शहरातील जुने महादेव मंदिर गल्ली भागात राहणारे साईचरण दिनेश स्वामी (वय…

    Read More »
  • संपादकीय

    जगतज्योती महात्मा बसवेश्वर -आधुनिक युगातील तरुणाईचे दीपस्तंभ

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६ ‘कायकावे कैलास’ (काम हेच कैलास आहे) हा मंत्र देणारे १२ व्या शतकातील महान क्रांतीकारक, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती केवळ एक उत्सव नसून, ती विचारांच्या परिवर्तनाची वेळ आहे. आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात भरकटलेल्या तरुणाईला महात्मा बसवेश्वरांचे विचार एक नवी दिशा देऊ शकतात. आजचा युवक शॉर्टकटच्या शोधात असतो. पण महात्मा बसवेश्वरांनी शिकवले की, कोणतेही काम छोटे नसते. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. “तुमचे काम प्रामाणिकपणे करणे, हाच खरा देव आहे,” हा त्यांचा संदेश आजच्या ‘स्टार्टअप‘ आणि ‘करिअर‘च्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तरुणांनी केवळ फळाची अपेक्षा न करता कष्टावर निष्ठा ठेवली, तर प्रगतीचे कैलास गाठणे कठीण नाही. हीच्या गप्पा मारतो, पण महात्मा बसवेश्वरांनी ९०० वर्षांपूर्वी ‘अनुभव मंटपा‘च्या माध्यमातून जगातील पहिली संसद स्थापन केली होती. जिथे जात, धर्म आणि लिंगाचा भेद न करता प्रत्येकाला आपले मत…

    Read More »
  • शैक्षणिक

    प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचा १४ कोटींचा निधी परत; दोषींवर कारवाई करा!

    ▫️शिक्षक परिषदेची पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे आक्रमक मागणी; निधी पुन्हा मिळवून देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल…

    Read More »
  • शहर

    मुखेडमध्ये भक्तीचा महाकुंभ! महात्मा बसवेश्वर स्मारकाचे २५ एप्रिलला भव्य अनावरण

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६ लिंगायत धर्मसंस्थापक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारकाच्या रूपाने मुखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. येत्या २५ एप्रिल २०२६ रोजी या ऐतिहासिक स्मारकाचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार असून, सध्या संपूर्ण तालुक्यात ‘बसवमय‘ वातावरणपाहायला मिळत आहे. हा सोहळा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण, मुखेड येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.  या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. या स्मारकाचे अनावरणश्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री १००८ जगगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठयांच्या शुभ हस्ते होणार असून, या कार्यक्रमासाठी विविध मठांतील शिवाचार्य महाराजांचे सान्निध्य लाभणार आहे. या कार्यक्रमाला श्री १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलूर), श्री १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज(बिचकुंदा), श्री १०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज (हणेगाव), श्री १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज(देवणी), श्री १०८ सद्योजात शिवाचार्य महाराज (नागठाणा), श्री १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज(उदगीर), श्री १०८ सिद्धद्याळ शिवाचार्य महाराज (बेटमोगरा), श्री १०८ डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज…

    Read More »
  • शहर

    चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंते निलंबित, तिघांना कारणे दाखवा नोटीस

    ▫️देगलूर नाका दुर्घटनेनंतर महापालिकेची धडक कारवाई; चौकशी अहवालात निष्काळजीपणा उघड नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ एप्रिल २६ शहरातील देगलूर…

    Read More »
  • क्राईम

    मुखेडचा ‘पंचनामा’: माफियांचा उच्छाद, प्रशासन ‘आंधळं’ आणि यंत्रणा ‘मुकी’!

    ▫️रेती, मुरूम, लाकूड तस्करी अन् गांजा विक्रीचा सुळसुळाट; लोकप्रतिनिधींचेही सोयीस्कर मौन? मुखेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १७ एप्रिल २६  ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले…

    Read More »
  • क्राईम

    मुखेडमध्ये अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या विळख्यात; वारंवार तक्रारींनंतरही प्रशासन ‘निद्रावस्थेत’!

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६ मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत.…

    Read More »
  • क्राईम

    नांदेडमध्ये शोककळा: नाल्याच्या साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    ▫️दोन सख्ख्या भावांचा समावेश नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६  नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात एक अत्यंत भीषण आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना, हारूनबाग भागातील एका मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या चार चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण इस्लामपुरा आणि देगलूर नाका परिसरात शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेली चारही मुले ही शहरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी होती. शाळा सुटल्यानंतर ही मुले नेहमीप्रमाणे घराकडे जात होती. वाटेत हारूनबाग परिसरात एका मोठ्याखड्ड्यात पावसाचे किंवा नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हीमुले पोहण्याच्या मोहापायी पाण्यात उतरली. मात्र, खड्ड्यातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ एक अशी चारही मुले पाण्यात बुडाली. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या मुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत: महोमद…

    Read More »
  • सामाजिक

    प्रशासनाच्या नाकाखाली अवैध उत्खनन सुरूच; महसूल विभागाचे मुरूम चोरणाऱ्यांना पाठबळ?

    मुखेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १५ एप्रिल २६ उमरदरी (ता. मुखेड) येथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदेशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.…

    Read More »
Back to top button