Sharmik Ekta
-
क्राईम
नांदेडमध्ये रक्ताची होळी सुरूच! तिहेरी हत्याकांडानंतर २४ तासांत पुन्हा एक खून; शहरात दहशतीचे सावट
▫️मुर्मुरा गल्लीत रज्जूसिंगची तलवारीने वार करून निघृण हत्या; वजिराबाद पोलिसांकडून दोघांना बेड्या नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०५ एप्रिल २०२६)…
Read More » -
महाराष्ट्र
अध्यात्म क्षेत्रातील दीपस्तंभ निखळला; श्री दत्त शिखर संस्थानचे गादीचे महंत मधुसूदनजी भारतीमहाराजांचे निधन
माहूर:- श्रमिक एकता न्यूज़ ०५ एप्रिल २६ अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक देदिप्यमान दीपस्तंभ निखळला आहे. माहूर येथील श्रीदत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांचेदुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरातील दत्तभक्त परिवारावर शोककळा पसरली आहे. महंत प.पू. अच्युत भारती महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर, सन १९७८ मध्ये संस्थानच्या धार्मिक परंपरेनुसार प.पू. मधुसूदनजी भारती महाराज गादीवर विराजमान झाले होते. गेल्या ४६ वर्षांहून अधिककाळ त्यांनी माहूर गड आणि दत्त शिखराची गौरवशाली परंपरा अत्यंत निष्ठेने आणि भक्तीभावाने जपली. महाराजांचे संपूर्ण आयुष्य दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी समर्पित होते. अत्यंत साधीराहणी आणि उच्च विचारसरणी लाभलेल्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भक्तांना आध्यात्मिकदिशा मिळाली. त्यांच्या जाण्याने केवळ एका संस्थेचेच नव्हे, तर आध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.…
Read More » -
सामाजिक
आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या ‘कपाळकरंट्या’ कर्मचाऱ्यांवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक! पगारातून होणार १५ टक्के कपात
▫️तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक कायदा; आता जन्मदात्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत मुलांच्या खिशातून वसूल होणार! हैदराबाद/तेलंगणा (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०५ एप्रिल…
Read More » -
सामाजिक
बांगड्या विकणाऱ्या चा मुलगा जमीर शेखची “धर्मदाय निरीक्षक” पदासाठी निवड.
मुखेड / प्रतिनिधी. श्रमिक एकता न्यूज़ ०४ एप्रिल २६ तालुक्यातील मौजे चांडोळा येथील बांगड्यांचे व्यवसायिक रहिमोद्दीन शेख यांचा मुलगा जमीर रहिमोदीन शेख यांनी अथक परिश्रम,जिद्द,चिकाटी आणी अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या (गट–ब) परीक्षेमध्ये ईडब्लूएस प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावत ‘धर्मदाय निरीक्षक‘ पदाला गवसणी घातली आहे.या यशाबद्दल जमीरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यातील मौजे चांडोळा येथील रहिवासी असलेले रहीमोद्दीन शेख हे चांडोळा व परिसरातील गावामध्ये बांगड्या विक्री करण्याचा व्यवसाय करून आपल्या कुंटुबांचा उदरनिर्वाह चालवीतात त्यांची घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असुन त्यांनी आपल्या व्यवसावरच कुटुंबाचा गाडा चालवत लेकरांना शिक्षण देण्याचे कार्य पाडले आहे.आपला मुलगा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी व्हावे म्हणून त्यांनी…
Read More » -
सामाजिक
काळाचा क्रूर घाला! मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पित्याचाही मृत्यू; कंधार तालुक्यातील फुलवळवर शोककळा
▫️बाप-लेकावर एकाच वेळी झाले अंत्यसंस्कार; निछलकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कंधार (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०४ एप्रिल २०२६) निसर्गाचा नियम आहे की…
Read More » -
क्राईम
नांदेड हादरले! गँगवारमधून तिघांची निघृण हत्या; शासकीय रुग्णालयात घुसून हल्लेखोरांचा थरार
▫️ई-स्क्वेअर परिसरात एकाचा खून, तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांना संपवले; शहरात दहशतीचे वातावरण नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०४ एप्रिल…
Read More » -
सामाजिक
न्यायासाठी ८० वर्षीय मरुबाई कांबळे यांचे ‘आमरण उपोषण’! प्रशासकीय आश्वासनानंतरही मरुबाईंच्या जागेचा प्रश्न कायम
▫️तहसीलदारांच्या दिलेले लेखी आश्वासन हवेतच;उपोषणाचा आजचा पाचवा दिवस मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०३ एप्रिल २६ तालुक्यातील खरब खंडगाव येथील मरुबाई सखाराम कांबळे (वय ८० वर्षे) या वयोवृद्ध दलित महिलेच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळवून देण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. १३ जानेवारी२०२६ रोजी तहसीलदारांनी लेखी पत्र देऊनही अतिक्रमण धारकांवर कोणतीही कारवाई न झाल्याने, संतापलेल्या मरुबाई कांबळे यांनी आता ‘आमरण उपोषण’ पुकारले आहे.…
Read More » -
आरोग्य
CBSE चा ऐतिहासिक निर्णय! आता शाळांमध्ये ‘मासिक पाळी आरोग्य केंद्र’ अनिवार्य
▫️नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू; विद्यार्थिनींचे शिक्षण आता राहणार अखंडित नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०३ एप्रिल मासिक पाळीदरम्यान उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी आणि संकोचामुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट सुटते किंवा त्यांना शाळा चुकवावी लागते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता सर्व संलग्न शाळांमध्ये ‘मासिक…
Read More » -
राजकीय
‘सांगा तुमच्या पागल मित्राला, युद्ध नको बुद्ध हवा!’ गॅस दरवाढीवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर उपरोधिक प्रहार
▫️मुखेडमध्ये ‘फेकूदिन’ साजरा; नालीतील गॅसवर चहा बनवून मोदींच्या आश्वासनांची उडवली खिल्ली मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०२ एप्रिल २६ केंद्र सरकारने आज व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे २०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आणि १ एप्रिलच्या ‘एप्रिल फुल‘चे औचित्य साधून…
Read More » -
सामाजिक
मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी!
▫️शहरात भीतीचे वातावरण; तात्काळ बंदोबस्त करण्याची ‘IMA’ मुखेडची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज ०१ एप्रिल २६ मुखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, कुत्र्यांच्या चाव्यामुळेरेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तात्काळपावले उचलण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) मुखेड शाखेने केली आहे. ‘आयएमए‘ने मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील आठवड्यात एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा…
Read More »