Sharmik Ekta

  • सामाजिक

    उद्या मुखेड येथे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचा आयोजन

    ▫️सचिन साठे यांची विशेष उपस्थिती  मुखेड (प्रतिनिधी)   लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृती दिनानिमित्त दि.१८ जुलै रोजी सचिन साठे यांच्या उपस्थितीत मुखेड येथे डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेने च्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेना मुखेड तालुक्याच्या वतीने लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठेयांच्या ५६ व्या स्मृती दिनानिमित्त  अभिवादन सभेचे आयोजन १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कै.गोविदराव राठोड क्रीडा संकुल मुखेड येथे सभागृहात  करण्यात आले आहे.   या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे,  राष्ट्रीय सचिव गणेश भगत ,प्रमुख पाहुणे आमदार डॉ तुषार राठोड, आमदार जितेश आंतापुरकर, माजी आमदार अविनाश घाटे, टी.एन.कांबळे, प्रदेश अध्यक्ष राज क्षिरसागर, शिवा कांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य जे टी.भंगारे ,  डी. एन, शेळके, प्राचार्य मनोहर तोटरे, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड , सरपंच दिगांबर गवलवाड , जेष्ठ कार्यकर्ते सखाराम बा–हाळीकर , जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोयणर आदी उपस्थित राहणार आहेत,          मुखेड येथे होत असलेल्या अभिवादन सभेसाठी तालुक्यात गाव भेटी घेऊन मोठ्या प्रमाणात प्रचार अणि प्रसार सर्व पदाधिकारी,  समाजबांधव करीत आहेत,  या कार्यक्रमात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध  गायक तथा प्रबोधनकार व्यंकट सोनटक्के यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. अभिवादन सभायशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष जयसिंग कांबळे, कोडीबा वळगे, बालाजी कमळीकर, उतमवाघमारे, आनंद घाटे, शिवाजी कांबळे, दिपक तोटरे , विजय कांबळे,  श्रीनिवास जांबळीकर,प्रल्हाद गायकवाड…

    Read More »
  • आर्थिक

    विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू; कोळपणी करताना विद्युत पोलचा घात

    ▫️किनवट तालुक्यातील कोसमेट गाव येथील घटना  ▫️शेतकऱ्याचा बैल मरण पावल्याने शेतकरी  आर्थिक अडचणीत किनवट/कोसमेट १७ जुलै २५ शेतात कोळपणी करताना लोखंडी विद्युत पोलमध्ये उतरलेल्या विजेमुळे बैलाला शॉक लागून जागीचमृत्यू झाल्याची घटना दि १६ जुलै रोजी अंदाजे ११.३० च्या…

    Read More »
  • क्राईम

    धक्कादायक ! २५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

    ▫️विद्या सुकळे यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे अद्याप गुलदस्त्यात पोलिसांकडून सखोलतपास सुरू मुखेड/एकलारा १७ जुलै २५ विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . विद्या सुशील सुकळे (वय २५) असे तिचे नाव आहे  ही घटना एकलारा गावात सोमवारी (दि. १५ जुलै) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षकमंचक फड आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी…

    Read More »
  • सामाजिक

    बेकायदेशीर पणे रस्त्यावर थांबणाऱ्या मुंबई -पुणे ट्रॅव्हल्सचा नागरिक व टिव्हशनसाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास 

    ▫️रस्त्यावर ट्रॅव्हल्स थांबण्या ऐवजी शहरा बाहेर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी  मुखेड प्रतिनिधी:- १६ जुलै २५ शहरातून व बाहेर तालुक्यातून मुंबई पुणे खाजगी ट्रॅव्हल्स…

    Read More »
  • शैक्षणिक

    जि.प.मुलींचे हायस्कूल गुणवत्तेसह विविध उपक्रम राबविणारी सर्वोत्तम शाळा – डॉ.दिलीप पुंडे.

    ▫️पिएमश्री योजनेतून प्रशालेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी. मुखेड / प्रतिनिधी. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड ही गुणवत्तेसह विविध उपक्रम राबविणारी…

    Read More »
  • अधिक

    पैशांची खूप मस्ती आली का? तुला घरातून उचलेन आणि कपडे काढून मारेन;भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

    नांदेड प्रतिनिधी:- १५ जुलै २५ भाजपचे नायगावचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. नरसी सेवा सोसायटीत प्रशासक नेमणुकीवरून ही शिवीगाळ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि नेत्यांचे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आता भाजपचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीआहे. आमदार राजेश पवार यांनी अत्यंत अश्लाघ्य शब्दांत उपनिबंधकांना शिवीगाळ केली असल्याचं याक्लिपमध्ये ऐकायला येत आहे. श्रमिक एकता न्यूज़ ऑनलाईन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये…

    Read More »
  • आरोग्य

    एक दिवसीय मोफत मेगा मेडिकल कॅम्प शिबिरात ८०० हून अधिक रुग्णांची तपासणी

    ▫️नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि उम्मीद हेल्पलाइन सेंटरच्या वतीने शिबिराचा आयोजन  नांदेड प्रतिनिधी:- १४ जुलै २५  नांदेड येथे दि १३ जुलै रोजी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि उम्मीद हेल्पलाइन सेंटर द्वारे मोहम्मदिया फंक्शन हॉल, खुदबाई नगर, नांदेड येथे एक दिवसीय मोफत मेगा मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लव्हेकर हॉस्पिटल, नांदेड सिव्हिल हॉस्पिटल, क्षितिज हॉस्पिटल, आशाहॉस्पिटल आणि स्वामी विवेकानंद हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी आणि उपचार केले. याशिबिरात ८०० हून अधिक रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले,  तसेच मोफत औषधे, मोफत शुगर तपासणी , मोफत ईसीजी, मोफत स्पायरोमेट्री चाचणी आणि थायरॉईड चाचणी फक्त ५०रुपयांमध्ये करण्यात आली. यावेळी या शिबिराचे आयोजक अब्दुल बशीर मजीद आणि मोहम्मद…

    Read More »
  • महाराष्ट्र

    माझ्या हत्येचा कट होता; पण ही शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

    सोलापूर : १३ जुलै २५ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शाई फेकीची घटना घडली. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकावर आरोप केले. आपल्या वरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असं प्रवीण गायकवाड म्हणाले. तसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ही शेवटाची सुरुवात आहे, असंदेखील प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत. “मीअक्कलकोटला गेलो होतो. अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळंवंगन तेल टाकलं. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे. पण ही विचारधारा जी आहे, तुम्हाला आठवत असेल, डॉ. पानसरे यांचा खून झाला. डॉ. कलबुर्गी, डॉ. नरेंद्रदाभोळकर यांचा खून झाला. डॉ. गौरी लंकेशचा खून झाला. या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्तेहे असुरक्षित आहेत“, असं प्रवीण गायकवाड म्हणाले. “माझ्या हत्येचा कट होता. माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेसंभाजी भोसले असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी जिवंत आहे. अन्यथा माझ्यावर हल्लाझाला होता. याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे“, असं प्रवीण गायकवाड स्पष्ट म्हणाले.

    Read More »
  • शैक्षणिक

    शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार-राजकुमार मुक्कावार

     उप मुख्य कार्यकारी मुक्कावार  यांनी दिले  शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास आश्वासन. नांदेड प्रतिनिधी:- १२ जुलै २५   जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षकपरिषदेचे शिष्टमंडळ शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न विज्ञान विषय शिक्षकांना   वेतनश्रेणी लागू करणे. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,पदोन्नत मुख्याध्यापक यांची पदे श पदोन्नती भरावी प्राथमिकशिक्षक,प्राथमिक  पदवीधर,पदोन्नत मुख्याध्यापक यांना सलग बारा वर्षानंतर मिळणारी चट्टोपाध्यायवेतनश्रेणी व 24 वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ  वेतन श्रेणी लागू करावी.  डीसीपीएस धारक शिक्षकांची कपातीची रक्कम एनपीएस खाती संबंधित त्याच्या खात्यावर जमाकरावी. जिल्हा बदलीने व जिह्यातील शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी खाते विवरण पत्रातील त्रुटी  दुरुस्त करावे.जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर “शिक्षक दिना“पूर्वी घोषित  करून आदर्श शिक्षकांना पाचसप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात यावे.जिल्ह्यातील वैद्यकीय रजेची देयके व सेवानिवृत्त शिक्षकांचीथकित देयके यासाठी निधी उपलब्ध करून देऊन प्रलंबित  देयके अदा करवीत.शालेय पोषण आहारयोजना त्रयस्थ  यंत्रणेमार्फत रावावेत व शिक्षकांना दररोज लागणारी अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये. ती कामे कमी करावीत. या मागण्याचे निवेदन देऊन सर्व प्रलंबित प्रश्ननांवर चर्चा करण्यात आली.   या प्रसंगी  शिष्टमंडळास  त्यांनी प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करूनप्रलंबित प्रश्न सोडवू आश्वासन दिले. तसेच वेतन सातव्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात प्राथमिक पदवीधर व  सर्व विभागातील त्रुटी संदर्भातविभाग प्रमुखांना आदेशित केल्याची माहिती दिली.  याप्रसंगी  शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे राज्य संघटन मंत्री  सुरेश दंडवते, विभागीय अध्यक्ष  संजयकोठाळे, जिल्हा नेते  दिगंबर पाटील कुरे, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार, जिल्हा प्रवक्ते रवि ढगे, जिल्हा कार्यालयीन मंत्री बळवंतमंगनाळे, जिल्हा संघटन मंत्री संजय मोरे,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संजय वाकोडे,जिल्हा उपाध्यक्ष संभाजीपावडे, जिल्हा सल्लागार विजयकुमार गबाळे,  जिल्हा संघटक हणमंत काऊलवार, जिल्हा संघटक संजिवमानकरी, नांदेड तालुका अध्यक्ष भगवान बकवाड, तालुका सरचिटणीस गणेश गजलवार, मुखेड तालुकापदाधिकारी नारायण गोडाजी, भोकर तालुका पदाधिकारी  राजेश्वर चक्रावार आदिजण उपस्थित होते.

    Read More »
  • क्राईम

    फी’साठी मुजोर संस्थाचालकानं केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं 

    पूर्णा तालुक्यातील घटना :दोघांनवर गुन्हा दाखल  परभणी:- १२ जुलै २५ आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकाला फीससाठी चक्क संस्थाचालकाने…

    Read More »
Back to top button