Sharmik Ekta
-
शैक्षणिक
संत नामदेव महाराज विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षानंतर भेट
▫️चंद्रकांत तेलंगे यांच्या पुढाकारातून स्नेहसंमेलन संपन्न मुखेड प्रतिनिधी:- ०८ जून २५तालुक्यातील संत नामदेव महाराज विद्यालय दापका (राजा) येथील शैक्षणिक वर्ष…
Read More » -
शैक्षणिक
विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके
मुखेड प्रतिनिधी:- ०८ जून २५ मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली तेआठवीपर्यंतच्या २९ हजार ४६६ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. समग्र शिक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या माध्यमातून ही पुस्तके प्राप्त झाली असून, एकूण १ लाख ७४ हजार ९८४ पुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे. पुस्तकांचे वितरण शाळा प्रवेशदिनी होण्यासाठी गटसाधन केंद्र मुखेडमार्फत जोरदार तयारी सुरू आहे. तालुक्यातील १६ केंद्रांवर – मुखेड, ब्राँच मुखेड, हिप्परगा, माकणी, बाराहाळी, डोरनाळी, दापका, गुडोंपत, मुक्रामाबाद, गोजेगाव, अंबुलगा, राजुरा, पाळा, होनवडज, खरबखंडगाव, माऊली व हंगरगा – येथे पुस्तकेपाठवण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी हामिद दौलताबादी यांच्या मार्गदर्शनाखाली गटसमन्वयक शिवाजीराव येवतीकर, डॉ. शिवाजी कराळे, नागनाथ द्याडे, डी.एम. देवकत्ते, उत्तम चव्हाण आदीअधिकारी आणि सर्व केंद्रप्रमुख, कर्मचारी, कार्यालयीन सहकारी परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळाल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात सुरळीत होणार असून, पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Read More » -
महाराष्ट्र
आज केज येथे शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा
केज प्रतिनिधी :- ०८ जून २५ शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा ८ जुन रोजी सकाळी ११ वाजता येथे जे. के. फंक्शन हॉल(मंगल कार्यालय) फुलेनगर केज येथे होणार आहे. या मेळाव्याला शेकापचे सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील, माजी आमदार भाई बाळारामपाटील. आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, पक्षाचे शेतकरी सभा प्रदेशाध्यक्ष भाई एस. व्ही. जाधव सर, पक्षाचे खजिनदार भाई अतुल म्हत्रे, कार्यालयीन चिटणीस ड. राजेंद्र कोरडे, सहचिटणीस भाई बाबासाहेब देवकर, कार्यालयण सहचिटणीस भाई प्रा. उमाकांत राठोड, महिलांच्या प्रदेश चिटणीस मानशी म्हात्रे. जेष्ठ नेते भाई बाबुराव लगारे, बाधित शेतकरी महामार्ग आघाडीचे भाई दिगंबर कांबळे, शिक्षक आघाडीचेप्रा. चंद्रकांत चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई युनुस पाठाण, राज्य चिटणीस मंडळसदस्य डॉ. अनिकेत देशमुख, चिटणीस मंडळ सदस्य ड. उदय गवारे, चिटणीस मंडळ सदस्य भाई विकासशिंदे, चिटणीस मंडळ सदस्य चित्रलेखा गोळेगावकर, विद्यार्थी आघाडी साम्या कोरडे यांच्यासहमराठवाड्यातील सर्व मध्यवर्ती समितीचे सदस्य जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख मान्यवर उपस्थित रहाणारअसल्याची माहिती भाई मोहन गुंड यांनी दिली आहे. या मेळाव्यात शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर चळवळ उभी करण्यासाठी विविध ठराव घेण्यात येणारआहेत. तसेच, मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्याच्या निवडी देखील या मेळाव्यामध्ये करण्यातयेणार आहेत. मराठवाडा विभागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे, आवाहन भारतीयशेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
Read More » -
राजकीय
प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता
पुणे :- ०८ जून २५ सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भात चार आठवड्यांत अधिसूचना जारीकरण्याच्या दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभागरचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसात महापालिकेची प्रभागरचनेची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरवला असून, त्यासंबंधीचे आदेश लवकरच जाहीर केले जातील. महायुती सरकारने यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीतही हीच प्रणाली वापरण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवली आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचीप्रक्रिया येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचा कालावधी, महापालिका–जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या एकत्रित निवडणुकाघेण्यासाठीची यंत्रणा या साऱ्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी न्यायालयाकडे काहीकालावधीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचनेचे नवीनआदेश दिले, तर त्यासाठी रचना, आरक्षण, मतदार यादी तयार करणे यासाठी तीन महिन्यांचा अवधीलागणार आहे. जूनमध्ये आदेश दिले तर तेव्हापासून ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया होईल. त्यामुळे पुढील 45 दिवसांत म्हणजे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मतदान होऊ शकते.
Read More » -
शैक्षणिक
आयटीआयच्या स्थानिक सल्लागार सदस्यपदी पत्रकार कोनापूरे,कांबळे व रोडगे यांची नियुक्ती
मुखेड प्रतिनिधी:- दि ०७.जून २५स्वातंत्र्य सेनानी राजासिंह हरिसिंह चौहाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड (आयटीआय) या संस्थेच्या संस्था व्यवस्थापक समितीच्या…
Read More » -
सामाजिक
मुखेड तालुक्यातील पिंपळकुंठा–बिल्लाळी पाटी रस्त्याची दयनीय अवस्था!
रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांचे जीवन धोक्यात, प्रशासन मात्र गप्प मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील पिंपळकुठा ते बिल्लाळी पाटीदरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः…
Read More » -
सामाजिक
बेटमोगरा येथील जि.प शाळेच्या मुख्याध्यापकाचे भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
▫️गुणपत्रिकेसाठी एका विद्यार्थ्याकडून हजारो रुपये उकळल्याने गटशिक्षणाधिकारीकडे तक्रार ◽️मुख्याध्यापकाने पैसे मागितल्याचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल! मुखेड प्रतिनिधी:- ०६ जून २५ मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने दिवसेंदिवस भ्रष्टकारभाराचे कळस गाठल्याचे दिसून येत आहे. दहावी बोर्ड परिक्षेच्या फि भरण्यापासून ते गुणपत्रिकादेण्यापर्यंत गावातील एका गरीब विद्यार्थ्याकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप. विद्यार्थ्याने मुख्याध्यापक विरोधात गटशिक्षणाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्याबोर्डाच्या परिक्षेत खाजगी रित्या १७ नंबरचा ऑनलाईन पद्धतीने फार्म भरून आपल्या पत्नीला परिक्षेत बसवण्याच्या आशेने तक्रारदार यादव खंडू नवलेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक वाय डी भैरवाडयांची भेट घेतली. मुख्याध्यापकाने गरिब विद्यार्थीनीच्या पतीच्या मजबुरीच्या फायदा घेत यासाठी हजारोंरुपयांची मागणी केली. याव्यतिरिक्त यादव नवलेकर यांनी स्वतः पैसे भरुन बाहेरुन ऑनलाईन पद्धतीनेअर्ज केले असतानाही पुन्हा ऑनलाईन करण्यासाठी दोन हजार लागतात, म्हणून नगदी दोन हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर परिक्षेच्या काळात बि.ओ. कार्यालयाच्या लोकांना पैसे पाठवले तरच तुमचीपत्नी पास होते असे खोटे बोलून पुन्हा दोन हजार रुपये उकळले. मात्र यादव नवलेकर यांना अनाधिकृतपणे मुख्याध्यापकाकडून येवढे आर्थिक फटके बसल्यानंतर उत्तीर्णझालेल्या पत्नीच्या गुणपत्रिकेसाठी मुख्याध्यापक वाय डी भैरवाड यांनी फोन करुन चक्क दोन हजार रुपयांची पुन्हा मागणी केल्याने संतापलेल्या पतीने मुख्याध्यापकाची केलेली कॉल रेकॉर्डींग दि.५ जूनरोजी मुखेड येथील संबंधित गटशिक्षणाधिकारी हामीद दौलताबादी यांच्याकडे सादर करुन लेखी निवेदनाद्वारे मुख्याध्यापक विरोधात तक्रार केली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सदर या निवेदनावर जयभिमसोनकांबळे,मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, मारोती गायकवाड, आसलम दौलताबादी सह आदींचीस्वाक्षऱ्या आहेत.
Read More » -
सामाजिक
मुखेड शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले
मुखेड (प्रतिनिधी) ०६ जून २५ राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुखेड शहरात अत्यंत जल्लोषात आणि…
Read More » -
सामाजिक
सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच का सैल होतेय? नांदेडमध्ये वर्षभरात ३३० हून अधिक घटस्फोट; संवाद हरवतोय,शंका वाढतेय
नांदेड – मोबाईलचा अतिरेक, संवादाचा अभाव, करिअरचा ताण, एकमेकांविषयी समजून न घेण्याचीवृत्ती… यामुळे नांदेडमध्ये सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच सैल होऊ लागली आहे. २०२४ मध्ये नांदेडजिल्हा कौटुंबिक न्यायालयात तब्बल ३३१ घटस्फोटाचे खटले दाखल झाले, तर यंदाच्या केवळ पाचमहिन्यांतच १६४ नव्या तक्रारी समोर आल्या आहेत. तुटलेली माणुसकीची नाळ, सोशल मीडियामधील आभासी जग, लॉक असलेले फोन, अपत्यावरूनहोणारे वाद, सासुरवाशीण संघर्ष, आर्थिक असमतोल – ही आधुनिक घटस्फोटाची नवी कारणं ठरतआहेत. ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये म्युच्युअल सेपरेशन होत असून, कोर्टाऐवजी सामोपचारातून प्रश्नसोडवले जात आहेत. घटस्फोट आता फक्त वादामुळेच नव्हे, तर संवादाच्या अनुपस्थितीतही होतोय. “नात्यांमध्ये समजून घेणं, वेळ देणं आणि संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे,” असं मत अॅड. प्रसाद रानवळकर यांनी व्यक्तकेलं. घर तुटू नये म्हणून संवादाचं बंधन मजबूत ठेवा – नाहीतर ‘सातजन्माची’ गाठ एका क्लिकवर तुटू शकते!
Read More » -
सामाजिक
आज मुखेड येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक व शोभायात्रेचं आयोजन
मिरवणूकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:-छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सव समिती मुखेड प्रतिनिधी:- २ जून २५ छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मुखेड शहरात आज २ जून २०२५ सोमवार रोजी भव्य मिरवणूक वशोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ मे रोजी नियोजित असलेली मिरवणूक पावसाच्याअंदाजामुळे पुढे ढकलण्यात आली होती .या ऐतिहासिक मिरवणुकीचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज सार्वजनिक जन्मोत्सव समिती, राजमुद्रा सामाजिक संघटना, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, साईभक्त मित्र मंडळ आदींनी केलं असून, सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बान्हाळी रोड येथून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत शिवकालीन देखावे, घोडे–उंटांची मिरवणूक, मर्दानी खेळ, भजनी मंडळं, डीजे संगीत, आकर्षक पुतळा आणि पालखी मिरवणूक असे विविध आकर्षण देखावे असणार आहेत.या कार्यक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही…
Read More »