Sharmik Ekta

  • क्राईम

    नांदेडमध्ये थरार: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १९ वर्षीय तरुणाची हडको परिसरात निर्घृण हत्या

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क | नांदेड : १९ सप्टेंबर २०२६ नांदेड शहरातील हडको परिसरातील शाहूनगर (वाघाळा) येथे मध्यरात्री एका १९ वर्षीय तरुणाची धारदारशस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संघरत्न ऊर्फ‘डोरेमॉन‘ माधवराव वाघमारे असे या मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास हडको परिसरातील पाण्याच्या टाकीच्या आवारात ही रक्तरंजित घटना घडली. मारेकऱ्यांनी संघरत्नवर शस्त्रांनीजोरदार हल्ला चढवला. या अमानुष मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने विष्णुपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसूनचौकशी करण्यात येत आहे. सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे…

    Read More »
  • क्राईम

    नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई; ५५ गुन्हे दाखल तर ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: १८ सप्टेंबर २६  जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

    Read More »
  • क्राईम

    जांब धान्य ट्रक प्रकरण: मुखेड पोलिसांचा तपास सुरू, पुरवठा विभागाच्या अहवालाकडे लक्ष; काळा बाजार की शेतकऱ्याचा माल?

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १८ सप्टेंबर २६ मुखेड तालुक्यातील जांब (बु.) येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडलेल्या धान्याच्या ट्रक बाबतचे गूढ अद्याप कायम आहे.  सदर ट्रक मुखेड पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून, त्यातील तांदूळ हा शेतकऱ्याचा आहे की काळ्या बाजारात जाणारा आहे, याबाबत शहरात उलट–सुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मुखेड पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून विचारपूस केली असता, या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एमएच २६ ए.डी. १५२७‘ क्रमांकाचा हा ट्रक कंधार मार्गे संगारेड्डी येथे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर हा विषय समोर आला. सध्या पोलीस प्रशासन संबंधित पुरवठा विभागाला पत्र देऊन याधान्याच्या मालकी व वाहतुकीच्या कायदेशीर बाबींची माहिती घेत आहेत. अधिकृत तपासणी व पुरवठाविभागाच्या अहवालानंतरच या प्रकरणात रेशनच्या काळ्या बाजाराचे रॅकेट उघडकीस येणार की अन्यकाही, याबाबतचा अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.

    Read More »
  • शहर

    दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर; मदतीसाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री अतुल सावे

    ▫️नांदेड जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पाणीसाठा व वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा ◽️नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती शासनाला सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश ◽️संभाव्य पाणीटंचाई व…

    Read More »
  • क्राईम

    संतापजनक! नांदेडमध्ये किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम गजाआड

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, नांदेड | १७ सप्टेंबर २०२६ नांदेड शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हमालपुरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचवेळी आरोपी आदिनाथ जाधव (वय २८) याने तिला रस्त्यात एकटी गाठले. त्यानंतर नराधमाने तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या भयंकर घटनेची माहिती मिळताच हादरलेल्या पीडितेच्या आईने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपी आदिनाथ जाधव याला तात्काळ बेड्या ठोकल्या असून, त्याच्याविरुद्ध ‘पॉक्सो‘ कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे. पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी स्पष्ट केले की, पीडितेच्या पालकांकडून सर्व आवश्यककागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत पुढील वैद्यकीय निर्णयघेतले जातील. या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेशपुरी करत आहेत.

    Read More »
  • क्राईम

    राजुरा-गोनेगाव मार्गावर अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट; विनाक्रमांक ‘हायवा’ गाड्यांद्वारे लूट, महसूल व पोलीस प्रशासन झोपेत?

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: १६ सप्टेंबर २६ मुखेड तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्यांना आता कायद्याचे कोणतेही भयउरले नसल्याचे विदारक चित्र आहे. गेल्या चार दिवसांपासून राजुरा बु. – आंबुलगा बु. – ईटग्याळ – गोनेगाव या मार्गावर भल्या पहाटे ओव्हरलोड आणि अवैध वाळूची राजरोसपणे तस्करी सुरू आहे.  दररोज पहाटे ५ ते ६ या वेळेत अंधाराचा फायदा घेत, पुढे आणि मागे कोणतीही नंबरप्लेट नसलेल्या ५ मोठ्याअवजड ‘हायवा‘ वाहनांमधून ही वाळू वाहतूक अत्यंत सुसाट वेगाने केली जात आहे. वाहनांवर नंबरप्लेट नसणे हा थेट नियमांचा भंग असूनही हे माफिया निर्ढावलेल्यापणे रस्त्यावरून गाड्या पळवत आहेत. मात्र, या अत्यंत गंभीर प्रकाराकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाने सोयीस्कररीत्या डोळेझाक केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामान्य नागरिकांवर क्षुल्लक कारणांवरून कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस आणि महसूल अधिकारी या वाळू माफियांसमोर हतबल झाले आहेत का, की यामागे प्रशासनाचे आणि वाळू माफियांचे काही आर्थिक संगनमत आहे, असा संतप्त सवालपरिसरातील नागरिक विचारत आहेत.  या बेकायदेशीर वाळू उपशामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, ओव्हरलोड गाड्यांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचीही अक्षरशः चाळण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन या मार्गावर धडक कारवाई करावी आणि वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

    Read More »
  • राजकीय

    घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १५ सप्टेंबर २६ तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून…

    Read More »
  • सामाजिक

    पोलीस पाटलाला पदावरून हटवण्याची मागणी

    गावात न राहता उदगीर येथे वास्तव्यास असल्याचा व खाजगी शाळेत शिक्षक असल्याचा आरोप; ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : १५ सप्टेंबर २६ मुखेड तालुक्यातील वडगाव येथील पोलीस पाटील स्वतःच्या गावात न राहता उदगीर येथे वास्तव्यास असून, तेथे एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस पाटलाची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी वडगावचे नागरिक मारोती नळगिरे यांनी मुखेडचे तहसीलदार आणि नांदेडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या नियमानुसार पोलीस पाटलाने स्वतःच्या कार्यक्षेत्रात (गावात) राहणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित पोलीस पाटील गावात राहत नसल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, ते दुसऱ्या ठिकाणी खाजगी नोकरी करत असल्याने त्यांच्या मूळ पोलीस पाटील पदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी स्वतः वडगाव येथे येऊन पोलीस पाटलाच्या वास्तव्याबाबत वनोकरीबाबत प्रत्यक्ष चौकशी करावी. या चौकशीत नियमबाह्य बाबी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ बडतर्फीची कारवाई करावी, जेणेकरून ग्रामस्थांची अडचण दूर होईल. प्रशासनाने या प्रकरणाची योग्यती दखल घेऊन कारवाई न केल्यास, यापुढे तीव्र उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही मारोती नळगिरेयांनी प्रशासनाला दिला आहे.

    Read More »
  • सामाजिक

    मुखेडात गणरायाचे जल्लोषात आगमन! ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांची प्रतिष्ठापना

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १४ सप्टेंबर २६  ढोल–ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण मुखेड शहर व परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी लाडक्या गणरायाचे मुखेड शहरासह ग्रामीण भागात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आगमन झाले. गणेश चतुर्थीनिमित्त सकाळ पासूनच शहरात सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते. लाडक्या बाप्पाची मूर्तीआणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत भाविकांची मोठी लगबग दिसून आली. फुलांचे हार, सजावटीचे साहित्य, मखर आणि प्रसादासाठी मिठाई खरेदी करण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत आबालवृद्धांची गर्दी उसळली होती. शहरासह परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल–ताशांच्या गजरात, गुलालाची उधळणकरत आणि लेझीमच्या तालावर बाप्पांना वाजत–गाजत मंडपात आणले. पारंपरिक वाद्यांचा गजर, तरूणाईचा उत्साह यामुळे मिरवणुकांचे आकर्षण अधिकच वाढले होते. दुपारनंतर शुभ मुहूर्तावर घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या भव्य मंडपात विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील अकरा दिवस मुखेड शहरात गणेशोत्सवाचा हा उत्साह असाच कायम राहणार असून, या काळात विविध मंडळांच्या वतीने आकर्षक देखावे, तसेच धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविले जाणार आहेत. दरम्यान, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था…

    Read More »
  • सामाजिक

    आयुष्यात येणारे अडथळे हे जीवनाला नवीन दिशा देतात -डॉ.राहुल कांबळे

    सलग दोन वेळेस विदेशातील विद्यापीठानेडॉ.राहुल कांबळे यांना आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदवी प्रधान सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आदर्श डॉक्टर पुरस्कार देऊन डॉ.राहुल कांबळे यांचा…

    Read More »
Back to top button