Sharmik Ekta

  • सामाजिक

    जातनिहाय जनगणना हा काँग्रेससह ओबीसींचा विजय – डॉ. श्रावण रॅपनवाड

    मुखेड-( ता. प्रतिनिधी) मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुलजी गांधीसह काँग्रेस आणि ओबीसींच्या दबावाचे फलित…

    Read More »
  • सामाजिक

    वारकरी संप्रदायाच्या संतामध्ये विद्रोह करण्याचे धाडस बसव विचारात दिसून येते:-प्रा.डॉ. रवींद्र बेंबरे

    मुखेड :-शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभागाच्या वतीने क्रांतीसूर्य , थोर विचारवंत , संत महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत…

    Read More »
  • शैक्षणिक

    मुखेड जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

    मुखेड/प्रतिनिधी:- येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक बॅच शाळेतील इयत्ता पाचवीतील १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतउत्तीर्ण होवून शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. पात्र विद्यार्थी संख्या व मिळालेले गुण पुढील प्रमाणे : मनस्वी आशिष कुलकर्णी (२४८ गुण), बालाजीमनोहर चौधरी (२३० गुण), बालाजी बसवराज इंद्राळे (२२८ गुण), वरद गणेश पिठलेवाड (२२० गुण), ऋतुजा प्रताप शिंदे (२१४ गुण), मारुती वैजनाथ इंगोले (२१४ गुण), सूरया इफत मस्तान शेख (२१०गुण), सोहम माधव चाबरे (२०८ गुण), कात्यायनी नागेश पालमकर (२०२ गुण), विनोद विवेक तांबोळी(१९८ गुण), आर्या विकास बंडे (१९८ गुण), तनुजा मलकाजी मुखेडकर १९०, सृष्टी गणेश बेंद्रे १८६ गुण, जान्हवी शिवानंद उमाटे १७० गुण, पल्लवी चंद्रकांत ताटे १७० गुण, आदित्य गजानन १५९ गुण, प्रथमेशशिवराज वडजे १५६ गुण. या विद्यार्थ्यांना काळवणे, कैलास कोंडलवाड, अत्तार शेख यांनी मार्गदर्शनकेले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शिवाजी कराळे, मुख्याध्यापक माधव माधसवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास पाटील, उपाध्यक्ष अॅड. आशिष कुलकर्णीसह अनेकांनी कौतुक केले आहे.

    Read More »
  • सामाजिक

    पाण्याविना जीवन अशक्य आहे. पण इथे जीवनच पाण्याच्या शोधात भटकतंय

    •हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण मग लाखो रुपये गेले कुठं? •जल व्यवस्थापन पंधरवडा प्रत्यक्षात नाही,फक्त कागदावर •जनजीवन चा कोट्यावधी निधी गेला कुठे ? मुखेड -(ता. प्रतिनिधी) दि २४ एप्रिल २५ एका बाजूला उन्हाचे चटके वाढू लागले आहेत तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीय. सरकारी योजना फक्त कागदावर असल्याने अनेकांच्या वाट्याला भटकंती आलीय. त्यामुळे सरकार पाण्याच्या टंचाईवर कधी तोडगा काढणार? हा खरा प्रश्न आहे. पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध  पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभालव दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तालुक्यातील खेड्यापाड्यात पाण्याची वाणवा जल व्यवस्थापन पंधरवडा उरला फक्त नावालाच हंडाभर पाण्यासाठी लोकांची भटकंती सध्या मुखेड येथे मुखेड पाटबंधारे मंडळाच्या वतीने “जल व्यवस्थापन पंधरवडा” साजरा केला जात आहे.  मात्र प्रत्यक्षात तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी देखील वणवण फिरावी लागत आहे. दुसरीकडे, तलावातील अवैध गाळ उपसा मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.  त्यामुळे तालुक्यातील गावागावात व तांडा हा उपक्रम पोहोचवण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडल्याचे स्पष्ट होत आहे. पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभाल वदुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.…

    Read More »
  • Uncategorized

    भारत सरकार नोटरी अधिकारी पदी ॲड. सुनील चौरे यांची निवड

    मुखेड/प्रतिनिधी:- दि २३ एप्रिल २५ मुखेड येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड.सुनील दत्तात्रयराव चौरे यांची  केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकारचे नोटरी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.     मुखेड येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड.सुनील चौरे हे गेल्या अनेक वर्षा पासुन मुखेड न्यायालयात वकीली व्यवसाय करीत असून…

    Read More »
  • क्राईम

    लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    पीडित मुलीला भामट्यांनी फसवले ! मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल मुखेड प्रतिनिधी:-  लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेऊन पीडित मुलीस गर्भवती करून जबरदस्तीने गर्भपात केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहितीअशी की, मुखेड तालुका येथील सुनील हणमंत बोडके (वय २६) या युवकाने एका मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक सबंधानंतर मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. यातून पीडित मुलगी गर्भवती झाली. पीडित मुलीस धमकी व भीती दाखवून उदगीर (जि. लातूर) येथीलखासगी रुग्णालयात गर्भपात करावयास लावले. ही घटना दि. २७ एप्रिल २०२३ ते १६ एप्रिल २०२५  दरम्यान झाली. याच्या विरोधात मुखेड पोलिस ठाण्यात पोस्को  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिसनिरीक्षक अनुपमा केंद्रे या करीत आहेत.

    Read More »
  • सामाजिक

    सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर व जाकिर भाई बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान

    मुखेड : १८ एप्रिल २५  क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले व विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राहुल लोहबंदेमित्रमंडळाच्या वतीने उपेक्षित समाज घटकासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच गौस अली सलगरकर व शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान करण्यात आले. राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्मारका समोर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. शेख जाकिरसाब व गौसअली सलगरकर यांना मराठवाडा भुषण डॉ. दिलीप पुंडे, तहसिलदार राजेश जाधव, पोलिस निरिक्षकलक्ष्मण केंद्रे, जेष्ठ नेते दशरथराव लोहबंदे, गौतम काळे, आयोजक राहुल लोहबंदे, भा. बौ. महासभा अध्यक्षगंगाधर सोंडारे, समन्वयक रियाज शेख आदींच्या हस्ते स्मृतीचिन्ह पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. तालुक्यात गेल्या चार दशकापासून शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांनी दिशा केंद्र बिलोली, पिसफूल सोसायटी गोवा, दलित फाउंडेशन, यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून समाजसेवा करत आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री १५ कलमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावीसाठी व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी जनजागृती व आंदोलने केली. तरगौस अली सलगरकर यांनी डाव्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यातील विविध आंदोलनात सहभाग घेतला. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष तथा सलगरा खु.चे उप सरपंच असताना हजारोंनिराधार, विधवा, कष्टकरी, कामगारांचे प्रश्न सोडले. दोघांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राहुललोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने समाज परिवर्तन पुरस्कार, स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद नांदेड,मुखेड शहरातील व ग्रामपंचायत सलगरा सहअनेक मान्यवरांनी जिल्ह्याभरातून त्यांचे अभिनंदन करीत आहेत.

    Read More »
  • शैक्षणिक

    फुले , शाहू , आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत सामाजिक समता प्रस्थापित करतो :-डॉ. अजय गव्हाणे

    मुखेड :-दि १८ एप्रिल २५शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

    Read More »
  • राजकीय

    सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा आज नांदेड दौरा 

                                           …

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड येथील नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द ची मागणी

    आज उपोषण चा ५ वा दिवस नांदेड/प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील शिवप्रसाद नर्सिग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्काची ची मागणी व त्यासंस्थे मध्ये गरीब विद्यार्थ्यांना अरे रावीची भाषा केली जाते. दिव्यांग विद्यार्थीनीना अपमानास्पद वागणूक दिली आहे. म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ३ जन बेमुदत उपोषणला बसले आहेत. आजचा हा उपोषण चा ५ वा…

    Read More »
Back to top button