Sharmik Ekta

  • सामाजिक

    संशयीताच्या घरावर बुलडोझर चालवणे ही हुकूमशाही कोरटकर, सोलापूरकर यांच्या घरावर संरक्षण का?-डॉ श्रावण रॅपनवाड

    मुखेड प्रतिनिधी:- दि. २४ मार्च २५संवैधानिक न्यायव्यवस्थेची प्रतीक्षा न करता एका विशिष्ट समाजाच्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्या राज्य शासनाकडून महाराष्ट्राची…

    Read More »
  • सामाजिक

    नंदनवन येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला आग ;कुटुंब बेघर  मदतीची मागणी 

    कौठा प्रतिनिधी… कंधार तालुक्यातील नंदनवन येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन गोविंदराव भागानगरे यांचे राहत्या घरात दिनांक 17 रोजी दुपारी अचानक आग लागून संसार उपयोगी वस्तू ,अन्नधान्य, आवश्यक साहित्य जळूनखाक झाले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदनवन येथील शेतकरी घरास कुलूप लावून शेताकडे कामासाठी गेलेअसता दिनांक 17 रोजी दुपारी घरास अचानक आग लागली गावकऱ्यांनी आग  विझवण्याचा  प्रयत्न केलातोपर्यंत घरातील टीव्ही, अन्नधान्य, कुलर ,फ्रीज ,सोफा सेट, शेतीमाल जळून खाक झाले असून अंदाजे सात लाखाचे नुकसान झाले .जीवित हानी झाली नाही आगीचे कारण समजू शकले नाही . घटनेचा पंचनामा नंदनवन सज्जाचे तलाठी श्री कापसे यांनी केला.सध्या मोहन भागानगरे यांचे कुटुंब उघड्यावर असून शासनाने त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे

    Read More »
  • शहर

    प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या मुखेड आगार प्रमुखावर कार्यवाहीची मागणी.

    शेकाप व रिपब्लिकन सेनेचे विभागीय नियंत्रक म .रा .प.म नांदेड यांना निवेदन  मुखेड /प्रतिनिधी    मुखेड आगारात कार्यरत आगार प्रमुख सुभाष पवार यांचे आगार कामकाजात लक्ष नसल्याने चालक वाहक मनमाणी पद्धतीने कामावर येणे वेळेवर बस सोडत…

    Read More »
  • क्रीडा

    मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्या संघामध्ये ओमप्रकाश मंडलेवाले यांची नुकतीच निवड 

    पुरुषांसह महिला संघाचाही समावेश मुखेड/प्रतिनिधी:-  ७२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली आहे  नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशन संघात मुखेड तालुक्याचा सुपुत्र ओमप्रकाश मंडलेवाले  यांची ७२वी प्रॉड गट (पुरुष ) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५ मध्ये नुकतीच निवड करण्यात आली तो नांदेड जिल्हा कबड्डी…

    Read More »
  • सामाजिक

    शिधापत्रिकारधाकांनी ई-केवाईसी करून घ्यावे अन्यथा अन्नधान्य योजनेचा लाभ सदस्याना मिळणार नाही :- तहसिलदार राजेश जाधव

    मुखेड/प्रतिनिधी:-   शासनाच्या अनुदानित अन्नधान्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राशनकार्ड धारकांनी सर्व सदस्यांची ई–केवाईसी करणे बंधनकारक आहे. रेशनकार्ड ई–केवाईसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणेबंद होणार आहे. अद्यापही तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थ्यांपैकी  ६८५६८ लाभार्थ्यांची ई–केवायसी होणे शील्लक आहे. त्यामुळे या सर्व राशनकार्ड धारकांनी ई –केवाईसी दि. ३१ मार्च पर्यंत तात्काळ करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार राजेश जाधव व नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे. राज्यातील नागरीकांना उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गतअनुदानित अन्नधान्य देण्यात येत असते. या योजनेमध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील राशन कार्डधारक कुटूंबाचा समावेश आहे. या अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील शिधापत्रिकेमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व सदस्यांची ई– केवाईसी करणे बंधनकारक आहे. केवायसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ त्या सदस्याला मिळणार नाही. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारक सदस्यांनी दि.३१ मार्च २०२५ पर्यंत आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे मुळ राशनकार्ड व आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतिसह रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या ई–पॉस मशिनवर सर्व सदस्यांनी बोटाचे ठसे देवून आपलीई–केवाईसी पूर्ण करुन घ्यावी.  तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थी असून आज रोजी पर्यंत ८५०७१ लाभार्थ्यांची ई–केवायसी पूर्ण झालेली आहे. तर अद्यापही ६८५६८ लाभार्थ्यांची ई–केवाईसी होणे शिल्लक आहे. केवाईसी न केलेल्या राशनकार्ड धारकांना अन्नधान्य मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्डधारकांनी आपली ई केवाईसी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत करुन घ्यावी व होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन तहसिलदार राजेश जाधव आणि नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे.

    Read More »
  • क्रीडा

    विद्यार्थ्यांमध्ये मैदानी व सांघिक खेळाची गोडी लागावी म्हणून डॉ.श्रीहरी बुडगेमवार यांनी शाळेला दिले क्रिडा साहित्य भेट

    मुखेड /प्रतिनिधी:- मुखेड येथील सुप्रसिद्ध आध्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक तथा वैद्यकिय संस्थेचे सचिव डॉ.श्रीहरी राजाराम बुडगेमवार यांनी श्री संत मन्मथ…

    Read More »
  • Uncategorized

    नांदेड जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव येथे मुख्य कार्यकारीअधिकारी म्हणुन बदली तर कवली मेघना नव्या सीईओ;

    नांदेड दि. 18 मार्च : किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी…

    Read More »
  • शैक्षणिक

    मज्योफुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान

    मुखेड /प्रतिनिधी:- येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांना महाराष्ट्र राज्य उच्च…

    Read More »
  • सामाजिक

    जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू           

    नांदेड दि. 17 मार्च :- नांदेड जिल्ह्यात 18 मार्च 2025 चे सकाळी 6 वाजेपासून ते 1 एप्रिल 2025 च्या मध्यरात्री…

    Read More »
  • Uncategorized

    अबिनाश कुमार यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून माधव टाकळे सन्मानित

    मुखेड प्रतिनिधी:- शहराचे पोलीस पाटील माधव टाकळे यांना उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून ११ मार्च रोजी नांदेड येथे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पोलीस पाटील हे पोलिसांचे एक महत्त्वाचे अंग असून, गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांना विशेष पुरस्कार देण्याचा मानस पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केली, या अनुषंगाने जिल्हा आदर्श पोलिस पाटीलपुरस्कार २०२५‘ हा नांदेड जिल्हा पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळा यात प्रदान करण्यात आला. यावेळीअप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराय धरणे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. तर पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक फड, पोना पांडुरंग पाळेकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी माधव टाकळे यांचेअभिनंदन केले

    Read More »
Back to top button