Sharmik Ekta

  • सामाजिक

    रावणगाव ग्रामपंचायत समोर बसलेल्या उपोषणास मामीडवाड यांनी दिली भेट !!

    मुखेड प्रतिनिधी :- तालुक्यातील लेंडी प्रधान प्रकल्पात जात आसलेल्या रावणगाव येथील सहा कुटूंबास घराचा मावेजा मिळाला नाही तो मिळावा ही…

    Read More »
  • शैक्षणिक

    आज पासुन दहावीची परीक्षा; १४ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ८२३ विद्यार्थी देणार परीक्षा

    मुखेड प्रतिनिधी:-  माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत १० वी बोर्डचे परीक्षेस दिनांक २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असूनतालुका परीरक्षक कार्यालय अंतर्गत १४ परीक्षा केंद्रावर ३ हजार ८२३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून संपूर्ण कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पारपडण्यासाठी तयारी केली असल्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांनी सांगितले आहे. तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड येथे २५० विद्यार्थी, गुरुदेव माध्यमिक विद्यालय मुखेड२५०, नृसिंह विद्यालय उमरदरी २४३, शाहीर आण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड ३१५, विद्या विकास विद्यालयबाराहाळी ३३१, माध्यमिक आश्रम शाळा चव्हाणवाडी ३६१, विद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत २२३, निती निकेतन माध्यमिक विद्यालय जांब १५८, जिल्हा परिषद हायस्कूल बेटमोगरा २५७, जिल्हा परिषदहायस्कूल जाहूर २०३, सेवादास माध्यमिक विद्यालय वसंतनगर ३८७, गंगाबाई माध्यमिक विद्यालयसावरगाव पिर २८८, जीप माध्यमिक पेठवडज ३७१, जनता माध्यमिक विद्यालय कौठा २५२, या १४ परीक्षाकेंद्रावर परीक्षा होत आहेत. यासाठी १४ बैठे पथक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मुख्याध्यापक सहनियुक्त करण्यात आले आहेत तर भरारी पथक तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्ष णाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे पथक गठित करण्यात आले आहे. परिरक्षक म्हणून एस. एस. करेवाड कामपाहणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले आहेत. बैठे पथकामध्ये केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली असून भरारीपथकामध्ये राजेश जाधव तहसीलदार मुखेड, चंद्रशेखर रामोड गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेडयांची जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना तपासून परीक्षादालनात प्रवेश देण्याची सूचना केंद्र संचालक यांना देण्यात आली आहे. केंद्र संचालकाचे शिवायकोणालाही परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राचे नावेपुढीलप्रमाणे जि.प. हायस्कूल बेटमोगरा येथे केंद्र संचालक म्हणून मोरे.बी.एस, जिल्हा परिषद हायस्कूलमुलींचे मुखेड येथे कांबळे डी.जे, शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड येथे मास्टे बी.एस, गुरुदेवविद्यामंदिर माध्यमिक शाळा मुखेड येथे बालाजी पाळेकर, जि.प. माध्यमिक विद्यालय जाहूर येथे जी.के. कदम, नितीनिकेतन विद्यालय जांब बुद्रुक येथे संजय गोंड, सेवादास विद्यालय वसंतनगर येथे श्रीमती प्रेमलास्वामी, विद्या विकास विद्यालय बाहऱ्हाळी येथे पी.एस.मोरे, नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे व्ही.टी. जाधव, पोस्ट बेसिक आश्रम शाळा चव्हाणवाडी बी. एन. पवार, विद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत येथे दीपकठाकूर, गंगाबाई मुलींचे हायस्कूल सावरगाव पीर येथे अभय कर्णावट, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले विद्यालयराजुरा बु. येथे वाय.डी. भैरवाड, कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय मुक्रमाबाद येथे ए. आर. पंचगट्टे हे केंद्रसंचालक म्हणून काम पहाणार आहेत

    Read More »
  • सामाजिक

    शिवजयंती निमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदान वाटप

    देगलूर/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे…

    Read More »
  • क्राईम

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा 50 हजारांचा दंड 

    * नाशिक जिल्हान्यायालयाचे आदेश,मंत्रीपद अन् आमदारकी धोक्यात नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटें आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचीशिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याप्रकरणी ही शिक्षासुनावण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. 1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकरावकोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्याहोत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्याहोत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हेआमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वादसुरू होता.

    Read More »
  • क्राईम

    ऑटो अपघातात पिता ठार तर मुलगा जखमी

    मुखेड तालुक्यात अपघात काही थांबेना मुखेड प्रतिनिधी:- मुखेड दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता मुखेड चांडोळा वळण रोडवरील  भगनूरवाडी रस्त्या जवळ ऑटो पलटी होऊन यातील अकबर चांदसाब शेख (वय ७०) रा. शिवाजीनगर ता. तुपरान जि. मेदक(तेलंगाना) हे  ठार झाले असून  मुलगा जखमी झाला आहे. तुपरान जि. मेदक येथील अकबर चांद शेख हे आपल्या परिवारासह मुखेड येथे लग्नाला आले होते. ते परत हैद्राबादला देगलूर मार्ग जात होते.  त्यांचा मुलगा जफर हा गाडी चालवत होता…

    Read More »
  • क्राईम

    बांधकाम कामगाराचा अपघातात मृत्यू; दिवसेंदिवस अपघातात वाढ 

    मुखेड प्रतिनिधी:- तालुक्यातील बेरळी खुर्द येथील नितीन ज्ञानोबा बेळीकर (३४) हा खैरका येतील बांधकामावरूनमुखेड येथे येऊन कामगारांना जेवन घेऊन जात असताना रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना १७फेब्रुवारी रोजी अंदाजे दुपारी ३.३० वाजता घडली. तालुक्यातील बेरळी खुर्द येथील कामगार नितीन बेळीकरहा खैरका येथील कामावरून मुखेडकडे मोटारसायकलने कामगारांना जेवण घेऊन येण्यासाठी मुखेड येथेआले व जेवण घेऊन कामावर जात असताना शहराजवळील गरुडकर यांच्या कागद कारख्याजवळ त्यांचाअपघात झाला. यात नितीनला जब्बर मार लागला. दरम्यान नितीन हा जाग्यावरच बराच वेळ तडफडला पणरस्त्यावर रहदारी कमी असल्याने त्यांना दवाखान्यात आणण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे त्याचा जागेवरचमृत्यू झाला. नितीन बेळीकर यास उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांतगायकवाड यांनी मृत घोषित केले आहे. याबद्दल पोलिस जमादार बालाजी तेलंग यांनी पोलिस पंचनामा केला आहे. दुचाकी वाहनास दुसऱ्या अज्ञातवाहनाने धडक मारली की दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असा प्रश्न निर्माणझाला आहे.

    Read More »
  • Uncategorized

    बारावी परीक्षेच्या तणावातून मुखेडात विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या तालुक्यात हळहळ

    मुखेड / प्रतिनिधीबारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर अवघड गेल्याने नैराश्याचा गर्तेतून पुढील करिअर बाबतीत तणावात असलेल्या एका युवतीने मुखेड शहरातील फुलेनगर…

    Read More »
  • Uncategorized

    मुखेड येथे आजपासून तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन!

    रांगोळी स्पर्धा, मोटर सायकल रॅली, महाप्रसाद, ध्वजारोहण, शिवकालीन देखाव्यासह पालखी सोहळा मुखेड प्रतिनिधी:- महाराष्ट्राचा आराध्य दैवत, कुळवाडी भूषण, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त मुखेड येथे तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2025 भव्य रांगोळी स्पर्धांचा आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या राजश्री नागनाथराव लोखंडे तर उद्घाटक म्हणून डॉ. माधवी सुभेदार या उपस्थित राहणार आहेत. दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून माजी आमदार हाणमंतराव पाटीलबेटमोगरेकर हे उपस्थित राहणार आहेत. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमदार डॉ. तुषार गोविंदराव राठोड यांच्या शुभहस्ते भगव्याध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे यावेळी तहसीलदार राजेश जाधव, माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे आदीसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ९.३० वाजता राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक बाराळी नाक्यापासूनभव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्यावतीने शिव महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता भव्य पालखी सोहळा वशिवकालीन देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार असून कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड तर उद्घाटक म्हणून दिलीप पाटील बेटमोगरेकर हेउपस्थित राहणार आहेत. तीन दिवसीय या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सर्व कार्यक्रमास शिवप्रेमी जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थितराहावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष नागनाथराव लोखंडे, शिवजन्मोत्सव समितीचेअध्यक्ष नरेश इंगोले, सचिव योगेश पाटील जाधव खंडगावकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील मसलगेकर, प्रशांत उल्लेवाड, सहसचिव दीपक पाटील जुने, कोषाध्यक्ष बालाजी माधवराव इंगोले, सौरभ पाटीलजोगदंड, योगेश पाटील हिवराळे, माधव देवकते, विश्वजीत पाटील इंगोले, सुरज पाटील जाधव, सचिनरिंदकवाले, सहसल्लागार विशाल बाबळे, सचिन पाटील इंगोले, रामदास पाटील जाधव, श्याम पाटीलइंगोले, बालाजी पा. इंगोले, गंगाधर पाटील जाधव आदींनी केले आहे.

    Read More »
  • क्राईम

    दोन आठवड्यात चोरट्यांनी 9.60 लाख रुपयांची रोकड व दागिने चोरून नेले

    चोरीच्या घटना रोखण्यात मुखेड पोलीस प्रशासनाला अपयश मुखेड प्रतिनिधी:- तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अवघ्या दोन आठवड्यात मुखेड तालुका मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणांहून 9 लाख 60 हजार रुपयांची रोकड व दागिने चोरीला गेले आहेत. पोलिस प्रशासनाला अद्यापही चोरट्यांवर अंकुश लावता आलेला नाही. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक गावात (दवंडी) कर लावून नागरिकांना जागरूककेले जात आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या चोरीच्या घटनांवर नजर टाकली तर 3 फेब्रुवारीला इटग्यालप रिसरात घर फोडून 4 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज, 6 फेब्रुवारीला बिल्लाळी परिसरात घर फोडून 2 लाख 80 हजार रुपयांचा तर 13 फेब्रुवारीला औराळ परिसरातील घर फोडून 2 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुखेड मध्ये ठिकठिकाणी होत असलेल्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता मुखेड मधील नागरिकांकडून होत आहे.

    Read More »
  • शैक्षणिक

    महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची सांगता

    मुखेड प्रतिनिधी :-येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक युवक शिबीर मौजे…

    Read More »
Back to top button