Sharmik Ekta

  • Uncategorized

    उद्यापासून श्रावणकावडी देवस्थानचा कलशारोहण कार्यक्रम

    मुखेड प्रतिनिधी:-   मुखेड शहरापासून जवळच असलेल्या ऐतिहासिक रामायणकालीन श्रावणकावडी देवस्थानच्याकलशारोहण कार्यक्रमास ५ फेब्रुवारीपासून सुरुवात तर ९ फेब्रुवारी रोजी सांगता होणार असल्याची माहितीश्रावणकावडी देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमास येवती मठाचे मठाधिपती सद्‌गुरु नराश्याम महाराज, मुखेड गणाचार्य मठाचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, हाळदा मठाचे मठाधिपती हाळदेकर महाराज, कोलंबी मठाचे मठाधिपतीकोलंबीकर महाराज, बेटमोगरा मठाचे मठाधिपती डॉ. सिध्ददयाळ बेटमोगरेकर महाराज, बारुळ मठाचेमठाधिपती श्रीसंत नामदेव महाराज बारुळकर, दापका मठाचे मठाधिपती नामदेव महाराज दापकेकर यांचीप्रमुख उपस्थिती असणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार असून, रात्री ८ वाजताएकनाथ महाराज वंडगीरकर, ६ रोजी त्र्यंबक महाराज नंदगावकर यांचे कीर्तन, ७ रोजी सकाळी ९ वाजतामूर्ती प्राणप्रतिष्ठापणा, कलशारोहण मठाधिपतींच्या सान्नीध्यांत होणार आहे तसेच रात्री ८ वाजता नामदेवमहाराज दापकेकर यांचे कीर्तन होणार आहे. ८ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहेतसेच ९ फेब्रुवारी रोजी नरसिंग महाराज केरुरकर यांचे सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन व दुपारीमहाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमासाठी ब्रह्मवृंद वे.शा.सं.श्री प्रबोधन महाराज शास्त्री पाळेकर, ह.भ.प. शिवाजी महाराज जळकोटकर, अण्णासाहेब महाराज जुन्नेकर यांच्या नियोजनात कार्यक्रम होतील. यासंपूर्ण कार्यक्रमास भाविक– भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्याबाई भीमरावमहाराज श्रावणकावडीकर यांनी केले आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी गजानन उत्तमराव कवटीकवार, ६ रोजी श्रावणकावडी देवस्थान समिती व रामरावमस्कले, ७ रोजी संतोष मारोतीराव बोनलेवाड, ८ रोजी बाबुराव हाणमंतराव देबडवार व राजेश चौधरी व ९रोजी बबलू शेषराव टेकाळे यांच्या वतीने अन्नदान होणार आहे

    Read More »
  • क्राईम

    एसटी व दुचाकीचा अपघात; बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर

    मागील आठ दिवसातला हा तिसरा अपघात तर चौथा मृत्यू  मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील चांडोळा तांडा जवळ एसटी व दुचाकीचा दि. ३ फेब्रुवारी रोजी अंदाजे सांयकाळी ५ च्यादरम्यान अपघात होऊन बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर झाल्याची घटना घडली. तालुक्यातील ईटग्याळ पदे येथील मारोती रमेश सूर्यवंशी वय ३८ व अश्विनी रमेश सूर्यवंशी वय ३२ हे दोघेभाऊ बहीण दुचाकी क्रमांक एम एच २६ बी डब्ल्यू ९२५२ ने ईटग्याळ पदे वरून चांडोळा मार्गे नांदेड ला जात असताना मुखेड – चोंडी – देगलूर ही बस चांडोळा मार्ग देगलूर ला जात असताना चांडोळा तांडा जवळसमोरासमोर धडक होऊन बहीण अश्विनी रमेश सूर्यवंशी (वय ३२) हिचा जागीच मृत्यू झाला तर भाऊमारोती सूर्यवंशी ( वय ३८) याच्या पायाला व उजव्या हाताला फॅक्चर झाल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयातडॉ. बालाजी गरूडकर यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले. सदर घटना कळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश हासुळे यांनी घटनेचा पंचनामा केला. मयतास शवविच्छेदनासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नातेवाईकांना ही घटना कळताच उपजिल्हारुग्णालयाकडे धाव घेत एकच हंबरडा फोडला होता.

    Read More »
  • शैक्षणिक

    शालेय गुणवत्ता वाढिसाठी मातापालकांचे योगदान महत्वाचे -व्यंकटेश चौधरी

    विद्यार्थी शाळेत आला तरच तो शाळेत शिकवले जाणारे घकट आत्मसात करु शकतो.यासाठी वडिल सकाळी कामावंर जातात. वडिला पेक्षा मातेला आपल्या…

    Read More »
  • Uncategorized

    सेलू येथील पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्यास मुखेडहून मोठ्या संख्येने पत्रकार जाणार – महेताब शेख.

    मुखेड / प्रतिनिधी. मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्ण परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने…

    Read More »
  • क्रीडा

    व्हॉलिबॉलच्या महिला व पुरुष गटांमधे  सोहेल एलेवन मुखेड तर बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे महिला संघ प्रथम

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड :- माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्या बाढदिवसा निमित्य मुखेड येथील जिल्हा परिषदहायस्कूल मुलींच्या शाळेच्या मैदानात तिन दिवसीय महिला व पुरुष गटांचे व्हॉलिबॉल सामने घेण्यात आलेया अटीतटीच्या सामण्यात सोहेल एलेवन मुखेड मुलांचा संघ व बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे महिला संघ प्रथमक्रमांक मिळविला.  मुखेड येथे दि. २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान व्हॉलिबॉलचे डे नाईट पद्धतीने सामने खेळवण्यातआले. या स्पर्धेत एकसे बढ़कर एक टिमांचा सहभाग घेतला होता. यात मुलींच्या संघातून ५१ हजाराचे प्रथमबक्षिस बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे तर ३१ हजाराचे द्वितीय क्रमांकाचे बक्षिस लातूर स्पायकर लातूर या संघानेमिळविला. तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस पोलीस संघ मुंबई ने मिळविले, तर उत्तेजनार्थ चौथा क्रमांकाचेबक्षिस महाराष्ट्र क्लब लातूर या संघाने मिळविले, तर मुलांच्या गटातुन ५१ हजाराचे प्रथम बक्षीस सोहेलएलेबन मुखेड संघाने मिळविले. तर द्वितीय क्रमांकाचे ३१ हजाराचे चक्षिस अमन क्लब बिड संघाने मिळविले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस जि.जि. राठोड क्लब मुखेड संघाने मिळवले तर उत्तेजनार्थ चौथा क्रमांकरावनकोळा क्लब रावनकोळा या संघाने मिळविले. या स्पर्धेसाठी मुलांच्या गटासाठी प्रथम ५१ हजाराचेबक्षिस संजय रावनगावकर यांच्या वतीने देण्यात आले. तर ३१ हजाराचे व्दितिय क्रमांकाचे बक्षिस गंगाधरपिटलेवाड यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षिस माजी उपसभापती मारोतीफसकुलवाड यांच्या वतीने देण्यात आले. तर उत्तेजनार्थ ११ हजाराचे बक्षिस माजी नगरसेवक उत्तम बनसोडेयांच्या वतीने देण्यात आले. तर बेस्ट शुटर साठी ५ हजाराचे बक्षिस उमेश बनसोडे यांच्या वतीने, बेस्टलिफ्टर बिलास पाटील उमरदरिकर यांच्या वतीने देण्यात आले. तर मुलींच्या गटासाठी प्रथम क्रमांकाचे ५१हजाराचे बक्षीस राजकुमार बामने व गणेश पाटील बेळिकर यांच्या वतीने, द्वितीय क्रमांकाचे ३१ हजाराचेबक्षिस मनोज कांबळे सावरगावकर यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षिस विनोद दंडलवाडयांच्या वतीने तर उत्तेजनार्थ ११ हजाराचे बक्षिस हाणमंत नरोटे यांच्या वतीने, प्रतिक गायकवाड यांनीकामगिरी केली.

    Read More »
  • Uncategorized

    सेलू येथील १ फेब्रुवारीच्या मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – महेताब शेख.

    मुखेड / प्रतिनिधी. मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्ण परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने…

    Read More »
  • अधिक

    मुखेड अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी गोपाळ जाधव तर सिचवपदी गोविंद डुमणे

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड अभिवक्ता सघाची दि .२१ जानेवारी रोजी निवडणूक प्रिक्रया पार पडली असून अभिवक्ता संघाच्या विविवध पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड. गोपाळराव जाधव, उपाध्यक्षपदीअँड. संदीप कामशेटे तर सिचवपदी अॅड. गोविंद डुमणे विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल सर्वांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. मुखेड अभिवक्ता संघाच्या अध्यक्ष पदासाठी ॲड. गोपाळराव जाधव वॲड. शिवराज पाटील कंद्राळकर यांच्यात लढत झाली यामध्ये अॅड. जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अँड.शिवराज पाटील कुंद्राळकर यांचा पराभव करीत विजय मिळिवला आहे. तसेच उपाध्यक्ष पदासाठी ॲड. सुनिल पौळकर व अॅड. संदीप कामशेटे यांच्यात लढत झाली यात अॅड. पौळकर यांचा अॅड. कामशेट्टे यांनी पराभव करीत विजयी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्याचबरोबर सचिव पदासाठी अॅड. बाबुराव जाधव व अॅड. गोविंद डुमणे यांच्यात लढत झाली असून यामध्ये अॅड. जाधव यांचा अॅड. डुमणे यांनी पराभव करत विजयी पताका रोवली आहे. सहसचिव पदासाठी अॅड. विक्की मुद्देवाड व अॅड. हणमंत होट्टे यांच्यात लढतझाली यात अॅड. मुद्देवाड यांनी अॅड. होट्टे यांचा पराभव करीत विजयी झाले आहे. त्याचबरोबर कोषाध्यक्षपदासाठी अॅड. प्रज्ञावंत गायकवाड व अॅड. अरूणा तेलंग यांच्यात लढत झाली असून यामध्ये अॅड. गायकवाड यांनी अॅड. तेलंग यांचा पराभव करुन विजयी होण्याचा मान पटकावला आहे. निवडणूक प्रक्रियाशांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. कदम तसेच निवडणुक निर्णयअधिकारी अॅड. माधव मरकंठवाड यांनी काम पाहीले

    Read More »
  • Uncategorized

    “पोलिस व पत्रकारांना परस्पर सहकार्याची गरज” : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार

    देगलूर/प्रतिनिधीपत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देगलूर येथे आयोजित पोलीस व पत्रकारांचा सन्मान आणि कार्यालय उद्घाटन सोहळ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार…

    Read More »
  • शैक्षणिक

    एलिमेंट्री व इंटरमीजिएट परिक्षेत जि.प.मुलींचे हायस्कूलचे यश.

    ए-ग्रेडमध्ये १८, बी-ग्रेडमध्ये ३१ तर सि-ग्रेड घेवुन ६९ विद्यार्थी उत्तीर्ण. मुखेड / प्रतिनिधी. इंटरमिजीएट व एलिमेंट्री परिक्षेचा सन २०२४-२५ चा…

    Read More »
  • शैक्षणिक

    नैसर्गिक साधन सामग्रीचे संवर्धन करून इंधन बचतीचा संदेश दिला पाहिजे:- प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे

    मुखेड प्रतिनिधी :-आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इंधन बचत मासिक कार्यक्रम 2025 हे दि.16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025…

    Read More »
Back to top button