Sharmik Ekta

  • Uncategorized

    मुखेड विधानसभा मतदार संघात आज ३६६ केंद्रावर २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती

    १० पोलीस अधिकारी, १०० सीआरपी जवान, ३४७ पोलीस कर्मचारी व ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात ५१ बस व ४२ खासगी वाहनांची व्यवस्था  मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड : मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीसाठी२० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून मतदार संघात ३६६ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रापर्यंतकर्मचाऱ्यांना ने–आण करण्यासाठी ५१ बस व ४२ खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सर्वमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या राष्ट्रीय उत्साहातसहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी व लोकसभा प्रशासनाने मतदारांच्या पूर्ण सुविधेसह ३६६ मतदान केंद्रे सुरूकेले आहेत. यासाठी लागणारे २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यांत आली. मतदानकेंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कामी १०पोलीस अधिकारी, १०० सीआरपी जवान, ३४७ पोलीस कर्मचारी व ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यातआले आहे. मतदार संघात जिल्हा परीषद हायस्कूल सावरगा येथे अंपग मतदान केंद्र, शहरातील शिवाजी नगर येथीलगुरुदेव विद्या मंदीर येथे सखी मतदान केंद्र, जांब (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युवा मतदानकेंद्र तर नगर परिषद येथील हुतात्मा स्मारक येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदानकेंदावर अपंग मतदारांसाठी व्हिल चेअर व रॅमची व्यवस्था करण्यांत आलेली आहे व २८३ मतदान केंद्रावरजीपीआरएस व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सदरील निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णयअधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातनिवडणुक विभागाचे नायब तहसीलदार जोहरे, नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकास अधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी, पाटील, गट विकास अधिकारी, महेश पाटील, लिपीक प्रशांत लिंबेकर, महाडीवाले, मंडळ अधिकारी जी.एस. गरुडकर, एस.डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, एन. एस. होनराव, राजुसुवर्णकार, सतिष बेदरकर, शेख गौस, चावरे, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत. 

    Read More »
  • Uncategorized

    मुखेड-कंधार मतदारसंघातील २९३ दिव्यांग – वयोवृध्द मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क तर १ हजार ३३१ टपाली मतदान

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेडः मुखेड–कंधारविधानसभा मतदारसंघात होऊ घातल्या लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग व ८५ वर्षावरील (वयोवृद्ध) २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी१२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ३३१ यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणुकनिर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी दिली. मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघात सर्व नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूकविभागाच्यावतीने मतदानाविषयी विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने १७ नोव्हेंबररोजी निवडणूक विभागाच्या स्वीप कक्षामार्फत तालुक्यातील कोळगाव येथे प्रत्येक घरोघरी जाऊन मतदानजनजागृती करून सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आव्हान करण्यातआले आहे. त्यासोबत जनजागृती मध्ये ‘मी मतदान करणारच‘ या घोषवाक्य समोर मतदारांची स्वाक्षरी घेतमतदार जनजागृती करण्यात आली आहे. सदरील मतदान जनजागृती अभियान हे निवडणुक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण, निवडणुकविभागाचे नायब तहसीलदार जोहरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकासअधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी पाटील, गट विकास अधिकारी महेश पाटील, लिपीकप्रशांत लिंबेकर, महाडीवाले, एस. डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, स्वीप कक्ष प्रमुख एस. एस. करेवाडमुजावार सर, एन. एस. होनराव, राजु सुवर्णकार, सतिष बेदरकर, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत. 

    Read More »
  • लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ५५ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल 

    उमेदवारांनी १८ तारखेपर्यंत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रत्येकी ३ जाहिराती देणे आवश्यक  उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मतदारांना देणे अनिवार्य नांदेड,…

    Read More »
  • Uncategorized

    शेकोट्या पेटल्या;शहरासह तालुक्यातील भागात थंडी वाढली 

    राजकीय वातावरण तापले! मुखेड प्रतिनिधी:- थंडीने मुखेड शहरासह तालुक्यात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी हातरुण परिसरात…

    Read More »
  • शहर

    मुखेड विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी दुसरे प्रशिक्षण                       

    मुखेड प्रतिनिधी:-                                    …

    Read More »
  • Uncategorized

    निर्भिड पत्रकार अनिल कांबळे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित

    मुखेड प्रतिनिधी :- मुखेड तालुक्यातील खैरका (गोपाळवाडी) येथे विठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दि. ७ नोव्हेंबर रोजी देशोनत्तीचे निर्भिड पत्रकार अनिल कांबळे सलगरकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे विठ्ठल बारसमवाड यांच्या वतिने दरवर्षीनिर्भीड, निपक्ष सामाजिक काम करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित केले जातोयावर्षी पत्रकार अनिल कांबळे यांना हा पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे  अनिल कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून या माध्यमातून निर्भिडपणे मुखेड शहर वतालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे या सन्मानामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे व मित्र मंडळाच्या वतिने त्यांचे अभिनंद होत आहे. तर यावेळी लघु आळंदी समजली जाणारी येवती येथील मठाधिपती श्री.प.पु. सदुरु नराशाम महाराज, ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर येथील प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, प्राचार्य धोंडीराम वाडकर, सुमनताई मोते, हणमंत आटाळकर, दशरथ आयतलवाड भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Read More »
  • सामाजिक

    सैनिक फेडरेशनच्या वतीने पाळ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

    विविध पदावर रूजू झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचाही गौरव. मुखेड/ प्रतिनिधी. तालुक्यातील पाळा येथील दहावी तसेच बारावी बोर्ड परीक्षेसह विविध क्षेत्रात यश…

    Read More »
  • Uncategorized

    निवडणूक निरीक्षक ए. गोविंदराज यांनी घेतला मुखेड येथील निवडणूक विषयक कामाचा आढावा

    मुखेड प्रतिनिधी:- मुख्य खर्च निरीक्षक ए. गोविंदराज यांनी आज 91-मुखेड विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयास भेट देवून…

    Read More »
  • क्राईम

    फेसबुक वर महिलेबद्दल अपशब्द लिहीणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा

    मुखेड पोलीस ठाण्यात महिला एकवटल्या मुखेड शहरातील फुलेनगर येथील महिला बद्दल एका भाजप कार्यकर्त्यांनी फेसबुक वर फुले नगरच्या बाया ३०० रुपये असा मानहानीकारक लिखाण केल्यामुळे बुधवारी पोलिस ठाण्यात किशोर मस्कले मंग्याळकर या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन पोलीस स्टेशनला दि. ६ नोव्हेंबर रोजी बहुसंख्यानी महिला एकवटल्या.    लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रंगीत तालीम सुरू झाले असून आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते सोशल मीडियाचा सर्रास वापर करीत असून आपल्या उमेदवारांना खुशकरण्यासाठी कधी जातीय रूप देत आहे तर कधी कामाचा लेखाजोखा दाखवीत आहेत तर काही कार्यकर्तेत्याला वेगळे वळण देऊन जातीय तेढ निर्माण होणारे व महिला बद्दल अपशब्द बिनधास्त लिहीत आहेतअसाच एक प्रकार मुखेड मध्ये घडला असून  भाजप कार्यकर्ता व सोशलमिडिया  प्रमुख फेसबुकवर महिलाबद्दल अपशब्द लिहिला आहे.     दरम्यान या शब्दाबद्दल येथील महिला पोलीस स्टेशन गाठून संबंधित कार्यकर्तावर कारवाई करण्याचीमागणी केली आहे.

    Read More »
  • शहर

    8 नोव्हेंबर रोजी मुखेड मतदारसंघ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी

    मुखेड प्रतिनिधी :-  91- मुखेड मतदारसंघातील उमेदवारांच्यानिवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवारी 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीतआयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगानेकेलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. तहसील कार्यालय, मुखेड पहिला मजला येथे खर्च निरिक्षकांसमोर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचीतपासणी करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्यावेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीलानामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यतदोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्वखर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे. या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्यापरिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्याकायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यासलोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्याकालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे 91-मुखेड विधानसभा मतदार संघाचेनिवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे

    Read More »
Back to top button