Uncategorized
-
मुखेड येथे आजपासून तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन!
रांगोळी स्पर्धा, मोटर सायकल रॅली, महाप्रसाद, ध्वजारोहण, शिवकालीन देखाव्यासह पालखी सोहळा मुखेड प्रतिनिधी:- महाराष्ट्राचा आराध्य दैवत, कुळवाडी भूषण, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त मुखेड येथे तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2025 भव्य रांगोळी स्पर्धांचा आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या राजश्री नागनाथराव लोखंडे तर उद्घाटक म्हणून डॉ. माधवी सुभेदार या उपस्थित राहणार आहेत. दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून माजी आमदार हाणमंतराव पाटीलबेटमोगरेकर हे उपस्थित राहणार आहेत. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमदार डॉ. तुषार गोविंदराव राठोड यांच्या शुभहस्ते भगव्याध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे यावेळी तहसीलदार राजेश जाधव, माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे आदीसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ९.३० वाजता राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक बाराळी नाक्यापासूनभव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्यावतीने शिव महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता भव्य पालखी सोहळा वशिवकालीन देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार असून कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड तर उद्घाटक म्हणून दिलीप पाटील बेटमोगरेकर हेउपस्थित राहणार आहेत. तीन दिवसीय या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सर्व कार्यक्रमास शिवप्रेमी जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थितराहावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष नागनाथराव लोखंडे, शिवजन्मोत्सव समितीचेअध्यक्ष नरेश इंगोले, सचिव योगेश पाटील जाधव खंडगावकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील मसलगेकर, प्रशांत उल्लेवाड, सहसचिव दीपक पाटील जुने, कोषाध्यक्ष बालाजी माधवराव इंगोले, सौरभ पाटीलजोगदंड, योगेश पाटील हिवराळे, माधव देवकते, विश्वजीत पाटील इंगोले, सुरज पाटील जाधव, सचिनरिंदकवाले, सहसल्लागार विशाल बाबळे, सचिन पाटील इंगोले, रामदास पाटील जाधव, श्याम पाटीलइंगोले, बालाजी पा. इंगोले, गंगाधर पाटील जाधव आदींनी केले आहे.
Read More » -
दोन आठवड्यात चोरट्यांनी 9.60 लाख रुपयांची रोकड व दागिने चोरून नेले
चोरीच्या घटना रोखण्यात मुखेड पोलीस प्रशासनाला अपयश मुखेड प्रतिनिधी:- तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अवघ्या दोन आठवड्यात मुखेड तालुका मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणांहून 9 लाख 60 हजार रुपयांची रोकड व दागिने चोरीला गेले आहेत. पोलिस प्रशासनाला अद्यापही चोरट्यांवर अंकुश लावता आलेला नाही. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक गावात (दवंडी) कर लावून नागरिकांना जागरूककेले जात आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या चोरीच्या घटनांवर नजर टाकली तर 3 फेब्रुवारीला इटग्यालप रिसरात घर फोडून 4 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज, 6 फेब्रुवारीला बिल्लाळी परिसरात घर फोडून 2 लाख 80 हजार रुपयांचा तर 13 फेब्रुवारीला औराळ परिसरातील घर फोडून 2 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुखेड मध्ये ठिकठिकाणी होत असलेल्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता मुखेड मधील नागरिकांकडून होत आहे.
Read More » -
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची सांगता
मुखेड प्रतिनिधी :-येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक युवक शिबीर मौजे…
Read More » -
मानव अधिकार संरक्षण समितीवर नांदेड जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी जैनोदीन पटेल यांची निवड
मुखेड प्रतिनिधी: – सामाजिक,अध्यात्मिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जैनोदीन पटेल यांची ‘मानवअधिकार संरक्षण समितीच्या नांदेड जिल्हा जनसंपर्क अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आलेलीआहे.समितीचे राष्ट्रीयअध्यक्ष डॉ. भगवानभाई दाठिया सर, तसेच जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्रराज्यगजानन भगत सर, महाराष्ट्र राज्य उपसचिव सौ. सरला इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन करत १२ फेब्रुवारी२५ रोजी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील न्यायप्रेमी, सामाजिक कार्याची आवडअसणाऱ्या विविध क्षेत्रातील इच्छुक मंडळीनी, युवक युवती, महिला पुरुषांनी नियुक्तीसाठी यांच्याशी संपर्ककरून मानव अधिकार संरक्षण समितीत सहभागी व्हावे, असे अवाहन करण्यात आलेले आहे. जैनोदीन पटेलयांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजिद,संपादक जयभीम सोनकांबळे,पत्रकार महेताब शेख,संपादक आसद बल्खी,पत्रकार शादुल होनवडजकर ,अब्दुल…
Read More » -
शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगेंनी दिली जि.प.मुलींचे हायस्कूलला भेट.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेच्या व्यवस्थापन बाबत केले कौतुक. मुखेड / प्रतिनिधी. नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ.सविता बिरगे यांनी मुखेड…
Read More » -
बेरळी खु. ता मुखेड येथे सरपंच चषक टेनिस बॉल क्रिकेटचे खुल्ले सामने !
मुखेड प्रतिनिधी :- मुखेड – विधानसभचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड समर्थ यांच्या वतीने बेरळी खु. येथे सरपंचचषक क्रिकेटपच्या खुले सामन्याचे आयोजन केले असून प्रवेश फी २१००/- रु. व प्रवेशाची अंतिम तारीखदि. १४ फेब्रुवारी – २०२५ असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. लोकप्रिय कार्यसम्राट आमदारडॉ. तुषारजी गोविंदराव राठोड साहेब समर्थक बेरळी खु. आयोजित सरपंच चषकचे प्रथम पारितोषीक ५१,१११/- रुपये श्री. भागवत पांडुरंग तोटेवाड सरपंच बेरळी खु.व श्री. सिध्दार्थ बळीरामकांबळे बेळीकर उपसरपंच यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३१,१११/- रुपये मारोती मामाफुसकुलवाड मा. उप सभापती पंचायत समिती मुखेड व श्री माधव ईरबा बद्देवाड सहशिक्षक, श्री अतुलज्ञानोबा बेळीकर बी. ए. ट्रेडर्स मुखेड यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक २१,१११/- रुपये श्री मष्णाजी बद्देवाड मा. सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड व श्री बाबुराव नागोराव गिरबनवाड मा. सरपंच बेरळी खुर्द यांच्यातर्फे चतुर्थ पारितोषीक १५,१११ कै. गंगाराम नारायण पाटील श्री. नारायण गंगाराम पाटील यांच्या तर्फेठेवण्यात आले आहे. असे अनेक पारितोषिके ठेवण्यात आले आहेत. सरपंच चषक २०२५ या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. गंगाधर गोविंदराव राठोड साहेब मा. नगराध्यक्षमुखेड कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड साहेब आणि विशेष अतिथी म्हणून तहसीलदारराजेश जाधव साहेब, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे साहेब, व गटविकास अधिकारी सी एल रामोड साहेबयांची उपस्थिती लाभणार आहे . सामन्या मध्ये फेरबदल करण्याचा अधिकार कमिटी कडे राहील. असे आयोजकाकडून कळविण्यात आलेआहे.
Read More » -
नांदेड जिल्ह्यात प्रथमच आढळली मगर; वनविभागाच्या पथकाला मगर पकडण्यास आला यश.
लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली मुखेड (नांदेड) प्रतिनिधी:- मुखेड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतात दि ११ फेब्रुवारी २५ रोजी मंगळवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान दीड वर्षाची नर जातीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मगरीस शेतातून पकडले आहे. मात्र, शेतात अचानक मगरआढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळूनआल्याची माहिती आहे. घोटका येथील शेतकरी शेषेराव यादव कदम यांच्या शेतात मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनरयांनी वनपाल धोंडगे यांना मंगळवारी पहाटे दिली. वनपाल शंकरराव धोंडगे, वनरक्षक अरुण राठोड वसर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी लागलीच शेतात धाव घेत मगरीस चिमट्याच्या सहाय्यानेपकडले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मगरीवर डॉ. धनराज मुर्कीकरयांनी प्राथमिक उपचार केले. सध्या ही मगर वनक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. या कामास नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) भिमसिंग राठोड, मुखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ, निखील हिवरे यांनी मार्गदर्शन केले तर वनसंरक्षक धम्मपालसोनकांबळे, लक्ष्मण पांडुरणे, शेख महेबुब, प्रभु राठोड नदान शेख व ब्रम्हा राठोड यांनीही परिश्रम केले
Read More » -
गृहरक्षक दलाचे जवान इब्राहिम बल्खी यांच्या निधनाबद्दल पोलिस ठाणे कडून श्रद्धांजली अर्पण
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड (जि. नांदेड) – गृहरक्षक दलाचे सेवानिवृत्त जवान इब्राहिम बल्खी (वय 76) यांच्या निधनानंतर मुखेड पोलिस ठाणे आणि…
Read More » -
राजमाता अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
मुखेड प्रतिनिधी:- येथील श्रावणकावडी देवस्थान येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व स्वच्छतेचे प्रतीक असलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी आ. हणमंतराव पाटीलबेटमोगरेकर, भाजपनेते माधव अण्णा साठे, रामचंद्र आडेपवार, किशन पाटील हाके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दि. ८ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आले. तर दि.९ रोजी सकाळी १० वाजता काल्याची किर्तनाने पाच दिवसीय सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, धोबी समाजाचे नेते बालाजीराव शिंदे, ओ.बी.सी. समाजाचे नेते विश्वनाथ कोलमकर, माजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणी, अॅड. शिवराज पाटील कुंद्राळकर, सत्यवान अण्णा गरुडकर, मंदिरबांधकाम साठी डिझाईन केलेले इंजि. भारत गरूडकर, डॉ. रामराव श्रीरामे, रामराव मस्कले, अशोक पाटीलनाईक, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. सतीश धमणे, शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, शेतकरी नेते शिवशंकरपाटील कलंबरकर, बालाजी चाफेकर, संभाजी पाटील उन्द्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती
Read More » -
जिल्हाधिकारी राऊत यांची बदली;त्यांच्या जागी राहुल कर्डीले
नांदेड/प्रतिनिधी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभा, लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुक यशस्वी करून जिल्ह्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. अभिजीत राऊत यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची राज्यशासनाने छत्रपती संभाजीनगरयेथे सहआयुक्त वस्तु व सेवा कर या पदावर बदली केली आहे. त्यांच्या जागी सिडको नवी मुंबई येथेसहव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेले राहुल कर्डीले यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून ४फेब्रुवारी रोजी काढलेल्या एका आदेशान्वये पाठवले आहे.
Read More »