Uncategorized

  • मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी २४ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र वैध व ७ नामनिर्देशनपत्रे अवैध

    मुखेड प्रतिनिधी:-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमानुसार ९१  मुखेड कंधार विधानसभा मतदार संघासाठी दि. २४ ते २९ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीतकालावधीत २४ उमेदवारांची एकूण ३५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. पैकी छाननी मध्ये एकूण ७ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहेत. १७ उमेदवारांचे वैद्य नामनिर्देशन पत्र २८ एवढे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी  अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया ९१ – मुखेड कंधार मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक…

    Read More »
  • रानडुकराच्या भ्याड हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील लोभा तांडा कोडग्याळ शेतकरी शेतात खरिप हंगामातिल मशागतिचे काम करित असताना अचानक पणे सुसाट वेगाने सुटलेल्या…

    Read More »
  • नऊ उमेदवारांचे अकरा नामनिर्देशन पत्र दाखल

    आज अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत मुखेड : प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी दि.२८ रोजी सोमवारी नऊ उमेदवारांचे ११ नामनिर्देशन पत्रप्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र भरणा करण्याच्या पाचव्या दिवशी तेरा जणांना २२नामनिर्दे शन पत्र विक्री करण्यात आले आहेत. आज तारखेपर्यंत एकूण १२६ नाम निर्देशन पत्र विक्रीकरण्यात आले आहेत. आज दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत असून ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागेघेता येणार आहेत. दि. २८ रोजी नऊ उमेदवारांचे ११ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. यामध्ये यादव बळीराम कांबळे, गोविंददादाराव डुमणे, सचिन गोवर्धन चव्हाण, श्रीहरी राजाराम बुगडेमवार, प्रदीप धर्माजी इंगोले, बालाजी नामदेवखतगावकर, तुषार गोविंदराव राठोड, रुक्मीनबाई शंकर गीते, परशुराम दत्ता कदम यांचा समावेश असल्याचेनिवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले

    Read More »
  • मुखेड – कंधार विधानसभेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी बेटमोगरेकर यांना जाहीर

    मुखेड प्रतिनिधी:-  आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाची महाविकासआघाडीत काँग्रेस ला जागा गेली यात माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना दि. २६ रोजीरात्री ११ च्या सुमारास उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडी कडून अनेक जण रिंगणात होते. यात काँग्रेसकडून माजी आमदार हणमंतराव पाटीलबेटमोगरेकर, डॉ. त्र्यंबक दापकेकर यांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत होती. यात बेटमोगरेकर यांनी शेवटच्याक्षणी बाजी मारत तिकीट आपल्या पारड्यात टाकण्यात त्यांना यश आले. माजी जिप सदस्य संतोष राठोड यांनी सुध्दा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेनेला जागासोडण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे दिसून आले. मुखेड मतदारसंघात काँग्रेस कंधार भाजप अपक्ष अशीरंगत होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे वैसे असल्याने भाजपसाठी हीलढाई सोपी नसली तरी जातीय समीकरण पाहता व विकासाच्या प्रश्नावर राजकीय लढाई झाल्यास मतदारकोणाच्या बाजूने कौल देणार हे आत्ताच सांगणे कठीण होईल असे दिसते.

    Read More »
  • मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे भूकंपाचे हादरे; भूगर्भातून दोन मोठे आवाज होवून अनेकांची घरे हादरली

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु. येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते पावणे तिनच्या दरम्यानभूगर्भातुन एक मोठा आवाज येऊन अनेकांची घरे हादरत भूकंपाचा धक्का बसल्याने आंबुलगा व परिसरातभितीचे वातावरण पसरले आहे. आंबुलगा येथे भूगर्भात झालेल्या मोठ्या आवाजाने घरे हादरत असल्याचेलक्षात येताच हे भूकंप आहे असे म्हणत गावकरी घरातून बाहेर येत एकच गलका केला. आंबुलगा येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १४.४३ वाजता व १५.१३ वाजता दोनवेळा भूगर्भातून आवाज येऊनसौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रानी नोंद केल्याचे सांगण्यात येतआहे. या भूकंपसदृश्य हादऱ्याची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे १.५ व ०.७ अशी नोंदविण्यात आलेलीआहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून १२ किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीहीजिवीत व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र जिल्हाधिकारीकार्यालय नांदेड यांनी दिली आहे. मात्र या भूकंपाच्या हादऱ्यामुळे आंबुलगा सह परिसरात भितीचे वातावरणपसरले आहे.

    Read More »
  • उद्या पासुन मुखेड-शिर्डी लालपरी धावणार

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड ते शिर्डी आणि शिर्डी ते मुखेड राज्य परिवहन महामंडळाची  लालपरी सुरू होणार असून प्रवाशांनी याबससेवेचा फायदा घेण्याचे आवाहन मुखेड आगार प्रमुख सुभाष पवार तथा बस स्थानक प्रमुख मिलिंदकुमारसोनाळे यांनी केले आहे. मुखेड येथून लोहा–पालम– गंगाखेडपर्यंत जाण्यासाठी मुखेड येथून धर्माबाद आगाराची दररोज एकच गाडीआहे. प्रवाशांना थेट लोहा किंवा पुढे जाण्याचे असेल तर दुपारी ३:३० वाजेपर्यंत वाटबघत बसावे लागत होते. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आगार प्रमुख सुभाष पवार यांनी वरिष्ठांच्या परवानगीनेमुखेड–कंधार–गंगाखेड– परळी माजलगाव–गेवराई–शेवगावमार्गे शिर्डी बस चालू करण्याचा निर्णय घेतलाआहे. सदरील गाडी शनिवारपासून मुखेड येथून सकाळी ९ वाजता व शिर्डी येथून सकाळी ९ वाजता नियमित बससुटणार आहे. सदरील बसमुळे ऐन दिवाळी सणाच्या निमित्त येणाऱ्या व जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांची मोठीसोय होणार आहे. मुखेड आगार प्रमुखांनी मुखेड ते शिर्डी आणि परत शिर्डी ते मुखेड नियमित बस सेवा सुरू करण्याचा निर्णयघेतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार हे मात्र निश्चित आहे. तसेच मुखेड आगाराची मुखेड–नांदेड–जिंतूरजाणारी गाडी नियमित आहे. प्रवाशांना मुखेड ते नांदेड व नांदेड ते पुढे जिंतूर जाण्यासाठी गाड्या उपलब्धआहेत. त्यामुळे मुदखेड जिंतूर जाणारी बस ही नांदेड ऐवजी लोहा गंगाखेडमार्गे चालू करण्यात यावी, अशी प्रवासीवर्गातून मागणी होत आहे.

    Read More »
  • काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ही आहेत 48 उमेदवारांची नावे

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेसने आपली 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून अनेक दिग्गज…

    Read More »
  • सलगरा पोस्टवर १५ लाखांची विदेशी तर ३ लाखांची देशी दारुसह दोन वाहने केली जप्त

    मुखेड प्रतिनिधी:- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोकड रक्कम,अवैध दारू,नेण्यावर निर्बंध आहेत.  निर्बंध असताना देखील मुखेड तालुक्यातील सलगरा या ठिकाणी आचारसंहिता पथकाने दारुची वाहतूककरणारे दोन वाहने पकडले असून त्यात असलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाईबुधवारी दुपारी करण्यात आली. एम.एच.२६–सीएच. ०८२४ या क्रमांकाचे वाहन सलगरा चेक पोस्टवरुन जात असताना पथकाने अडविले. यावाहनात रॉलय स्टॅग, इम्पेरियल ब्ल्यू यासह इतर कंपन्यांची १५ लाखांची विदेशी दारु होती. चालकाकडेमालाच्या बिलाची व दारु बंदी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या पत्राची विचारणा केली असता बील दाखविण्यातआले. त्यानंतर दारुचे हे वाहन जप्त करण्यात आले. तर दुपारी ५ वाजेच्या सुमारास एम.एच.२६–एडी. ७६६३या वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ लाख रुपयांची देशी दारु आढळून आली. चालकाकडेकागदपत्रांची मागणी केली असता चूकीची कागदपत्रे दाखविण्यात आली. त्यामुळे दारुचे हे वाहनही जप्तकरण्यात आले असून मुखेड पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे. नोडल ऑफिसर संजीव सुरवसे, एम.एम. लष्करे, बी.पी. सूर्यकार, एन.एस. दोसलवार, डी. के. मोरे, आकाशकुंटूरवार यांनीही कारवाई केली. दरम्यान आचारसंहितेमुळे जिल्ह्याच्या सीमा भागात तपासणी नाकेउभारण्यात आले असून या ठिकाणी वाहनांची तपासणी होत आहे

    Read More »
  • मुखेड मतदारसंघात काल आणि आज ४७ अर्जाची विक्री

    उमेदवारी दाखल करण्यासाठी अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त निश्चित केला आहे. तर काही जणांनीत्यापूर्वीचा शुभमुहूर्त शोधण्यासाठी ज्योतिषांकडे धाव घेतली आहे मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड–कंधार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २२ ऑक्टोबर मंगळवारपासून प्रक्रिया सुरु झाली. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर नामनिर्देश पत्र दाखल करण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या १५व्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी विविध पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जबरदस्त चुरसदिसून येत आहे.दि.२२ रोजी मंगळवारी पहिल्या दिवशी गोविंद दादाराव डुमणे, गोपनर, शिवशंकरनागोराव,बालाजी नामदेवराव खतगावकर, पवन विरभद्र कॅदरकुंटे,रावसाहेब दिगंबरराव पाटील ५ लोकांनी ९ अर्जाची विक्री तर आज दि २३ रोजी लक्ष्मण बालाजी तेलंग, सचिन विठ्ठलराव गायकवाड, अनिल अंतेश्वरबनसोडे, परशुराम दत्ता कदम, सचिन गोवर्धन चव्हाण, हनुमंत राव अंगद मामीलवाड, नेवलेकर हनुमंतगंगाधर, गोविंद राठोड नागोराव, जितेंद्र दशरथ वाघमारे, प्रकाश चांदोबा गवलवाड, अहिल्याबाई हनुमंतमामीलवाड, अनिल अंतेश्वर बनसोडे, अनिल तेजराव शिरसे, खंडेराव हैबत्ती हसनाळकर, यादव बळीरामकांबळे, सोमवारे लक्ष्मण माधवराव,मारोती जाधव असे १७ लोकांनी ३८ अर्जाची विक्री केली आहे. मात्रएकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती माहिती निवडणूक विभागातून प्राप्त झाली आहे. दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून निवडणूक लढवू इच्छुकांकडूननिवडणुकांसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे आपल्या उमेदवारीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा दाखल करावयाचा याबाबत माहितीघेण्यासाठी धावपळ सुरू झालीय. दि.२२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत शासकीयसुट्या वगळून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरुझाली आहे. दि. २२ रोजी एकूण ९ तर दि २३ रोजी ३८ उमेदवारी अर्ज विकल्या गेले. मात्र एकानेही बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. तर काही उमेदवारांनी मात्र ज्योतिषाकडून मुहूर्तही काढून ठेवले आहेत विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आदर्शआचारसंहितेचे पालन केले जात आहे. कुठल्या राजकीय पक्षांकडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघात निवडणुकीचे चित्र काय असणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

    Read More »
  • विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची सुरुवात

    * सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार * नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर  नांदेड :…

    Read More »
Back to top button