Uncategorized
-
निष्ठेने काम करणाऱ्या आशा सेविकांचे मानधन रखडले
▫️सरकारची टाळाटाळ; सणासुदीच्या दिवसात आली उपासमारीची वेळ मुखेड प्रतिनिधी:- ०१ ऑक्टोबर तालुक्यात जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशा सेविकांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे तीन मिहन्यापासून मानधन रखडल्याने शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दसरा विदवाळीसारखे सण दारात उभे असताना या सेविका चिंतेत…
Read More » -
मुखेड येथे स्वतंत्र्य सैनिक ,क्रांतिकारक शहीद-ए-आझम भगतसिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
मुखेड प्रतिनिधी :- दि ३० सप्टेंबर महान क्रांतिकारक शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जयंती निमित्त दि २८ सप्टेंबर रोजी स्टुडंट्सफेडरेशन ऑफ इंडिया (SFI)तसेच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) च्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुखेड येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. शहीद भगतसिंगांना अभिवादन करुन सभेला सुरुवात करण्यात आली. या वेळी ॲड गजानन देवकत्ते म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील निर्भय क्रांतिकारक शहीद–ए–आझमभगतसिंग त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील लायलपूर जिल्ह्यात झाला. लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी त्यांनी पोलिस अधिकारी सॉन्डर्सची हत्या केली. त्यांनी सेंट्रलअसेंब्लीत बॉम्ब टाकून ब्रिटिश सरकारचा विरोध केला. त्यानंतर त्यांना लाहोर कट प्रकरणात अटक करण्यात आली. २३ मार्च १९३१ रोजी लाहोर कट प्रकरणातब्रिटिश सरकारने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली. या तिन्ही क्रांतिकारकांनी त्यांच्याबलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवीन दिशा दिलीच नाही तर त्यांच्या विचारांनी तरुणांच्याहृदयात देशभक्तीची भावना जागृत केली. आसद बल्खी यांनी सांगितले की, शहीदांच्या स्वप्नांचा भारतत्यांच्या विचारांना आत्मसात करून बांधण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी शेकाप चे…
Read More » -
जि.प. हायस्कूल मुलींच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संजय यलमवाड तर वेणुताई रॅपनवाड यांची उपाध्यक्षपदी निवड
मुखेड प्रतिनिधी:- ३० सप्टेंबर पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींचे) मुखेड येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. समाजकार्यात अग्रेसर आणि कोळी समाजाचे नेते संजय यलमवाड यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी वेणुताई रॅपनवाड यांचीही सर्वानुमते निवड झाली. या निवडणुकीत सदस्यपदी साईनाथ बोईनवाड, नितीन तलवारे, माधुरी इंगोले, शुभांगी कांबळे, एस के बबलू, शिवराज बेळीकर, रेशमा उतकर, रेखा गायकवाड, दिनेश कोनापुरे, सचिन गायकवाड, अश्विनी कांबळे, सदाशिव चव्हाण, स्वरुपा शिंदे, अंजली कोकणे, भीमराव बनसोडे, सुरेखा डुबुकवाड, शिवनंदा निरदुडे, निर्मला चव्हाण, संतोष जवादवार यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडणुकीत महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये आरक्षण घेऊन ११ महिला आणि १० पुरुष असेएकूण २१ सदस्यांची समिती गठित करण्यात आली. निवडणूक पूर्णपणे शांत, लोकशाही व पारदर्शक पद्धतीने पार पडली. या बैठकीचे अध्यक्षपद शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मेहताब शेख यांनी भूषविले. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी मुख्याध्यापक डि.जी. कांबळे, उपमुख्याध्यापक देवकांबळे सर, राजपूत सर, लोहबंदे सर, दारकू सर, स्वामी मॅडम, हराळे मॅडम, शृंगारे सर, भवानी चौहान यांची उपस्थिती होती. सर्वांनी नव्या समितीला शुभेच्छा देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Read More » -
भष्ट्राचाराच्या मुदयावरूण सहकारी पतपेढीची आमसभा प्रचंड गदारोळात गुंडाळली
▫️सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन नांदेड प्रतिनिधी:- दि २८ सप्टेंबर सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक…
Read More » -
विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सेवादास विद्यालयाचे यश
▫️दोन खेळाडूंची झाली राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड मुखेड प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर विमुक्त जाती सेवा समिती शैक्षणिक संकुल वसंतनगर कोडग्याळ या शैक्षणिक संस्थेच्या सेवादास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सेवादास ज्यु. कॉलेज वसंतनगर (को.) येथील खेळाडू १) हाक्के गणपत दत्तात्रय२) चिकटवाड प्रथमेश धोंडिबा यांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई गोविंदराव राठोड, सचिव प्राचार्य गंगाधर गोविंदराव राठोड साहेब, मुखेड–कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. तुषार गोविंदराव राठोड साहेब, उप–प्राचार्य डॉ.व्ही. एस. जाधव , क्रीडा विभाग प्रमुख प्रा.बाबुराव गंदपवाड, तायक्वांदो क्रीडा प्रशिक्षक मास्टर बालाजीराव जोगदंड, शिवाजी जाधव , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.जयपाल राठोड, उप–मुख्याध्यापक सुभाष राठोड, संस्कृतीक विभाग भारत जायभाये, आदिसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Read More » -
मुखेड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी;ओढे, नाले, तलाव तुडुंब : अनेक गावांचा संपर्क तुटला
▫️भवानी तांडा येथील ३५ शेळ्या, अंबुलगा, बोमनाळी येथून ७ जनावरे गेली वाहून मुखेड प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरासह मुखेड तालुक्यांमध्ये अतिवृष्टी पावसाने हाहाकार माजवलाअसून २७ रोजी पाऊसाने तालुक्यात पुन्हा जोरदार सुरुवात केली असून अनेक जनावरे अतीदृष्टीमुळेवाहून गेली आहेत. अनेक छोट्या नदी नाल्याला पुन्हा पूर आला असून शेतातल्या शिल्लक पिकांचेहीमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. काही गावाकडे जाणाऱ्या पुलाहून पाणी जात असल्याने तहसील प्रशासनाने पुलावर वाहतूक बंद केलीआहे तर पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तहसीलदार राजेश जाधव यांनी यांनी नुकसानग्रस्त भागातभेट देवून पाहणी केली आहे. २६ रोजी रात्री सुरू झालेला पाऊस सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होतापावसाची तीव्रता अधिक असल्याने नदी, नाल्यांना पूर आला. नदी काठ वरील अनेक गावातील घरातपाणी घुसले आहे. शहरात मोती नाल्याचा पाण्याचा प्रवाह वाढला असून फुले नगर येथील काही घरातपाणी शिरले आहे. तालुक्यात पाच महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. जांब बु. येथे ११२ मिमी, मुखेडयेथे ६७ मिमी, येवती ७१ मिमी, चांडोळा ६७ मिमी, बाहऱ्हाळी १०२ मिमी, तालुक्यात ६१ मिमी पाऊसएक दिवसात कोसळला असून आजवर ९३२ मिमी पाऊसची नोंद झाली आहे. उंद्रीप. मु. येथील विठ्ठलहुलाप्पा नांगरे यांच्या शेतातील गोठ्यात वीज पडून एक बैल दगावला तर मौजे भवानी तांडा येथेमुसळधार पावसामध्ये जयराम धनाजी पवार यांच्या जवळपास ३५ शेळ्या पुरामध्ये वाहून गेल्याअसल्याची माहिती पोलीस पाटील व पशुवैद्यकी विभागाचे गंदीगुडे यांनी सांगितले. तसेच बोमनाळीयेथील नागनाथ गोविंद होनराव यांची एक म्हैस आणि एक हलगट अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्याओढ्यात वाहून गेले. त्याचबरोबर मौजे थामणगाव तालुका मुखेड येथील मेहबूब अमीरशाह मुर्शद यांचाहलगट पुराच्या पाण्यात वाहून मयत झाला आहे. राम रघुनाथ मंत्रे यांच्या ५ मेंढ्यांचा मृत्यु झाला मन्याड नदीला पूर आल्याने रातोळी व बेटमोगरा येथील पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. बाहाळी, निवळी येथील पुल बंद करण्यात आला आहे तर हातराळ येथील पुल वाहतूक खबर दारीचा उपाय म्हणूनबंद करण्यात आले आहेत. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी सलगरा, बेळी, चीवळी सह अनेकगावानं भेटी देवून पाहणी केली आहे.
Read More » -
हिमायतनगर :वादग्रस्त इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून पोलिसांत तक्रार
हिमायतनगर प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर दि. २७ सप्टेंबर रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशनला सय्यद अब्दुल अजिम (वय ३८, व्यवसाय-इलेक्ट्रीशियन, रा. बाजार चौक,…
Read More » -
नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना शनिवार २७ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर
नांदेड प्रतिनिधी:- २६ सप्टेंबर नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय…
Read More » -
सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार- व्यंकट गंदपवाड
नांदेड प्रतिनिधी :- २६ सप्टेंबर सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवलेले विषय सभासदांच्या व पतसंस्थेच्या हिताचे नसल्याने व तसेच सत्ताधारी संचालक मंडळाने केलेली नियमबाह्य कर्मचारी भरती सर्वसाधारण सभे पुर्वी गाजत आहे.यामुळे सभासदांचा प्रचंड रोष या सत्ताधारी संचालक मंडळावर आहे.याचे कारण असेही गेल्या अनेक वर्षापासून रिक्त जागा असताना. सत्ताधारी संचालक मंडळाने कर्मचारी भरती केली. पतसंस्थेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना, पतसंस्था संगणकिकृत असताना भरती केली .भरतीमुळे सभासदांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. व तसेच या पतसंस्थेने सुरक्षा कवच योजना स्वतःपतसंस्थेची उभारलेली असताना, अपघात विमा योजना ही इतर विमा योजनेकडून घेऊन या पतसंस्थेला २८ लाखांचा भुर्दंड बसलेला आहे. याचे कारण असेही यादरम्यान तीन मयत सभासद होऊनही अद्यापपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही. याच्यावरही कहर म्हणजे सत्ताधारी संचालक मंडळांनी या सभेमध्येआपल्या स्वतःची इमारत असताना दुसऱ्या रिकाम्या जागेवर बांधकाम करण्याचा ठराव विषयी सूचित त्यांनी ठेवलेला आहे व तसेच ही पतसंस्था स्वबळावर असताना अद्याप पर्यंत या पतसंस्थेने कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. परंतु या सत्ताधारी संचालक मंडळांनी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ववाढीव व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यासाठी ठराव ठेवलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. यासाठी शिक्षक परिषद व संघर्ष समितीने पतसंस्था विरोधात यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर ढोल बजाव आंदोलन केलेले आहे व सहकार विभागाकडे या ठरावा संदर्भाततक्रारी केलेली आहेत .तरी होणारी सर्वसाधारण सभा सत्ताधारी संचालक मंडळांना जाब विचारणारीअसेल सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे व यासाठी महाराष्ट्र शिक्षक परिषद सत्ताधारी संचालक मंडळाला जाब विचारणार असे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी स्पष्टकेले. …
Read More » -
पूर्वसूचना न देता विष्णुपुरी प्रकल्प धरणाचे दरवाजे उघडले; मोठे नुकसान, १ जणांचा मृत्यू.
▫️शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या (अल्पसंख्यांक) महानगर पदाधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व ईतर मागण्यासाठी दिले निवेदन नांदेड प्रतिनिधी २५ सप्टेंबर…
Read More »